Monday, 10 April 2023

चना, उडीद डाळींचा साठासंकेतस्थळावर अद्ययावत करावा

 , चना, उडीद डाळींचा साठासंकेतस्थळावर अद्ययावत करावा


- शिधावाटप नियंत्रक कान्हुराज बगाटे


            मुंबई, दि. 10 : राज्यातील तूर, चना व उडीद या डाळींचा संबंधित आस्थापनांकडे असलेला साठा fcainfoweb.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून आठवड्यातून किमान एकदा (दर शुक्रवारी) अपलोड करावा, अशा सूचना कान्हूराज बगाटे, नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिल्या आहेत.


            तूर, चना व उडीद या डाळींच्या साठ्याच्या अनुषंगाने साठ्याचे प्रकटीकरण, निरीक्षण आणि पडताळणीबाबत केंद्र सरकारने 29 मार्च 2023 रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सूचना दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित आस्थापनेने त्यांच्याकडील तूर, चना व उडीद या डाळींचा साठा आठवड्यातून किमान एकदा ग्राहक व्यवहार विभागाच्या fcainfoweb.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अपलोड करावा. तसेच तूर, चना व उडीद या डाळींची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअन्वये कडक कारवाई करण्यात येईल, असेही श्री. बगाटे यांनी म्हटले आहे.


                                         

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi