Monday, 10 April 2023

शाळा सुटली पाटी फुटली

 *शाळा सुटली पाटी फुटली* असे आम्ही लहानपणी शाळा सुटताना मोठ्याने आनंदाने ओरडत घराकडे पळायचो . मात्र हे *कुंदा बोकील* यांनी गायलेलं साल १९६० मधिल छान गाणं आहे ते माहीतच नव्हतं. आज अचानक हा *खजिना* सापडला ... ऐका लहानपण आठवेल.


आमचाही एक जमाना होता*

 *आमचाही एक जमाना होता*  

बालवाडी हा प्रकार नव्हता ,पुढे 6 वर्षा नंतर स्वतः च शाळेत जावे लागत असे , सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती,

मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी

 भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही.

     🤪  

    पास / नापास हेच 

आम्हाला कळत होतं...

*%* चा आणि आमचा

 संबंध कधीच नव्हता.


😛


       शिकवणी लावली,

 हे सांगायला लाज वाटायची....

 कारण *"ढ"* असं 

हीणवलं जायचं...


🤣🤣🤣


       पुस्तकामध्ये झाडाची 

पानं आणि मोरपिस ठेवून 

आम्ही हुशार होऊ शकतो, 

असा आमचा दृढ विश्वास 

होता...


☺️☺️


       कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं.


😁


       दरवर्षी जेव्हा नव्या

इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि 

वह्यांना कव्हर्स घालणे, 

हा आमच्या जीवनातला

एक वार्षिक उत्सव 

असायचा...


🤗


 वर्ष सम्पल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे.


🤪


       आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते.   


😞


कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून,आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो

हे आता आठवतही नाही...


🥸😎


सरांचा शाळेत मार खाताना 

आणि पायांचे अंगठे धरुन 

उभं राहताना,कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा

 *'ईगो'* कधीही आडवा 

येत नव्हता, खरं तर 

आम्हाला 'ईगो' काय 

असतो हेच माहीत 

नव्हतं...


🧐😝


       मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती.

मारणारा आणि मार खाणारा

दोघेही खुष असायचे. 

मार खाणारा यासाठी की,

 'चला, कालच्यापेक्षा तरी 

आज कमी धोपटला गेलो 

म्हणून आणि मारणारा

आज पुन्हा हात धुवून 

घ्यायला मिळाले म्हणून......


😜


बिनचपला ,बुटांचे कोणत्याही चेंडू आणी लाकडी बॅट ने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट

खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते.


😁


आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही.

आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे.सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालाच तरी आम्ही बेहद खुश होतो.

दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे यात काही

अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही.


😁


       आम्ही आमच्या

आईवडिलांना कधी सांगूच

शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला


*आय लव यू'* 


म्हणणं माहीतच नव्हतं...


😌


       आज आम्ही असंख्य 

टक्के टोमणे खात, संघर्ष 

करत दुनियेचा एक हिस्सा

झालोय. काहींना जे हवं 

होतं, ते त्यांनी मिळवलंय

तर काही 'काय माहीत....?'

शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीट वर फिरवलेले आणि स्कूल बाहेरच्या त्या हापपॅन्ट वाल्या गोळीवाल्याकडून काय काय ज्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र,

कुठे हरवलेत ते...!


😇


       आम्ही जगात कुठेही 

असू पण हे सत्य आहे की, 

आम्ही वास्तव दुनियेत 

जगलो, आणि वास्तवात 

वाढलो........


🙃


कपड्यांना सुरकुत्या पडू 

न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं 

आम्हाला कधी जमलंच 

नाही.भाकरी आणि कालवना शिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं.


आपल्या नशिबाला 

चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत.


जे जीवन आम्ही 

जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार 

नाही.,,,,,,,,


😌


आम्ही चांगले असू

किंवा वाईट, पण आमचाही 

एक *'जमाना'* होता.....

पाणी पिणे वाढवा

 🇮 🇲 🇵 


*पाणी पिणे वाढवा


पाण्याचे महत्व -----

१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.

२) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.

४) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे.  

५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते.     

६) B. P. संतुलित राहतो.

७) बद्धकोष्ठता नष्ट होते.

८) आळसपणा कमी होतो.

९) डोक्यावरील केस गळत नाहीत.

१०) स्किनचे प्राँब्लेम्स होत नाहीत.

११) तारूण्य टिकून राहते.

१२) शरीर आतून स्वच्छ होते.

१३) किडनी स्टोन होत नाहीत.

१४) अन्नपचन चांगले होते.

१५) मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.

१६) जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते.

१७) जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते.

१८) जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी प्यायल्यास शरीर मध्यम राहते.

१९) जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटांनी आवश्य तेवढे पाणी प्यावे.

२०) आपण गरम / मध्यम गरम जेवण घेतो. म्हणून जेवतेवेळी कोमटच पाणी पिणे आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर होईल. फ्रिजचे पाणी / बर्फाचे थंड पाणी केव्हाच पिऊ नका. तर माठातील प्या.

२१) तहान लागली की पाणी प्यावेच.  

२२) जास्तच तहान लागली की मात्र गुळ पाणी प्यावे.

२३) क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे. ते चेक करून घ्या. अन्यथा आजार होतील.

२४) आजारपणात गरम पाणी प्यावे.  

२५) रात्री जास्त पाणी पिऊ नये.

२६) पाणी नेहमी बसूनच प्यावे. अन्यथा उतार वयात गुढघे दुखीचा त्रास नक्कीच होईल.

२७) पाणी चवीचवीने म्हणजेच तोंडात जास्तवेळ फिरवून पिणे. त्यामुळे पाण्यात लाळ मिसळून ती पोटात जाते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

२८) जेव्हढी तहान तेव्हढेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते. अधिक ऊर्जा खर्च होते. तसेच किडनीलासुद्धा त्रास होऊ शकतो.

      # *आरोग्य संदेश* #

पाणी म्हणजेच आपले जीवन.

करा आरोग्यासाठी भरपूर सेवन.



*


_*(

*फणस

 *फणस*


धंदेवाईक दृष्टीने म्हणा, भौगोलिक दृष्टीने म्हणा, धार्मिक दृष्टीने म्हणा किंवा साहित्यिक दृष्टीने म्हणा किंवा आणखी कुठल्या ह्याने म्हणा; बिचाऱ्या फणसाला मिळणारी वागणूक आंब्याच्या तुलनेत दुय्यमच! 

एखाद्या अक्षयतृतीयेला पिकलेल्या फणसाचा नैवेद्य दाखवून फणसाचं नवं केलय कुणी, त्याचे फोटो बिटो टाकलेत असं मात्र दिसत नाही! 

आमची रत्नांग्री फेमस कशासाठी, तर आंब्यासाठी! 

पण आंब्यांच्या बरोबरीने, काही काही वेळा आंब्यांच्यापेक्षाही वयाने ज्येष्ठ असणाऱ्या फणसांना मात्र हा फेमस व्हायचा मान नाही! 

इतकंच काय, पण सत्यनारायणाच्या पूजेत एखादा फणस ठेवलाय आणि गुरुजी त्यावर पाणी सोडायला सांगतायत असं दृश्य कुठेही बघायला मिळणं म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवण्यातला प्रकार आहे. 


साहित्यात सुद्धा आंब्याच्या झाडाला आम्रतरू बिरु असले अलंकारिक शब्द काय वापरतात, त्याच्यावर बसून कोकिळा काय गातात आणि अजून किती काय! 

पण फणसाची साहित्यिक जागा मात्र "परांजप्या, टाकतोस काय दोन डाव" असं विचारणाऱ्या अंतूबर्व्याच्या खांद्यावरच! कोकिळा बिकिळा लांबचीच गोष्ट! कुणाच्या कथाकाव्यात आमच्या फणसावर बसून कुणी कावळाचिमणी सुद्धा नाही हो ओरडत! इतकंच कशाला, जोडशब्दात उल्लेख सुद्धा आंबेफणस असाच; म्हणजे आंब्याच्या नंतरच! 


नाही म्हणायला 'आम्ही खातो गरे, तुम्ही खा आठळा आणि बाकीच्यांना चारखंड' या म्हणीत मात्र फणसाला मान दिलेला दिसतो! 


असतं एकेकाचं नशीब! काय करणार!


पण खरं सांगतो! खरा कोकण्या मात्र आंब्याइतकच प्रेम फणसावर सुद्धा करतो! 

पिके गरे ही फार पुढची पायरी झाली! पण फणसाच्या *कुयरीच्या* भाजीची अवीट चव ज्याने चाखलेली नाही त्याच्या *जिभेने* आयुष्यभर नुसतं तोंडात राहून केलन काय असा प्रश्न पडावा! 


एखाद्याने आयुष्यात बाकी अगदी सगळं चांगलंचुंगलं खाल्लंन पण *उकडगऱ्याची* चळचळीत फोडणी दिलेली भाजी खाल्लीन नाही तो आमच्या दृष्टीने सगळे दागिने घालूनही कुंकू न लावणाऱ्या सवाष्णीसारखा! 


खरं म्हणाल तर दिवाळी होऊन गेल्यावर थोड्या दिवसांनी फणसाच्या बारीक बारीक कुयऱ्या झाडावर दिसायला लागल्या की तेव्हाच आमच्या जिभा *पाऱ्याच्या* आणि *उकडगऱ्यांच्या* भाजीच्या नुसत्या विचाराने लपलपायला लागतात! 


बाकी हल्ली तळलेले गरे, फणसाची साटं हे प्रकार बाजारात बऱ्यापैकी दिसतात.


आंब्यांसारखेच या फणसाचे पण प्रकार आहेत.

( इथे सुद्धा आंब्यांसारखेच हे सांगायला लागतं.) पार्वतीकाकू, सावित्रीकाकू आणि सिताकाकू या तिघी जावा जावा. 

तिघीही माझ्या पणज्या. 

या तिघींनी आठळा रुजवलेल्या आणि त्याची मग फणसाची झाडं झालेली. 

या तिघींच्या नावावरून या फणसांना पार्वतीकाकूचा, सावित्रीकाकूचा आणि शीताकाकूचा अशी नावं दिलेली. या तिघींनाही जाऊन आता तीसचाळीस वर्षांहून जास्त काळ झाला. 

पण त्यांच्या नावाचे फणस मात्र अजूनही आहेत. 

यातला पार्वतीकाकूचा फणस कापा. चवीला अगदी साखर नुसता! शीताकाकूच्या फणसाची ही मोठ्ठी ढेरी केवढीतरी आणि सावित्रीकाकूचा फणस मागाहून तयार होणारा. 

अगदी पहिला पाऊस पडून गेला की तयार होणारा. शीताकाकूचा आणि सावित्रीकाकूचा बरका फणस. 


ही नावं आता एवढ्या अंगवळणी पडलेली आहेत की “जा बरी सावित्रीकाकूच्यातला आण एक काढून” असं सहजपणे गड्याला सांगितलं जातं. 

एक फणस तर मुळी गुरांचा फणस म्हणूनच ओळखतात. 

याचे फणस कधीही पिकत नाहीत त्यामुळे फणस काढायचे आणि साकटून गुरांच्या अम्बोणात घालायचे. 


कित्येक ठिकाणी घरांची दारंखिडक्या फणशी लाकडाच्या आहेत. 

पावसात पाणी लागून लागून हे फणसाचं लाकूड आणखी आणखी टणक होत जातं असं सांगतात. 

इतकं टणक की हतोडीने खिळा ठोकताना खिळा वाकतो हे बघितलेलं आहे.


आजकाल बाजारात फणसाचे काढलेले गरे विकत मिळतात. पण फणस खायचा यथासांग विधी सांगतो! 


सगळ्यात आधी अनुभवी गड्याकडून झाडावरून फणस उतरवून घ्यावा! काढायला तयार झालेला फणस ओळखायची खूण अशी की फणस तयार व्हायला लागला की त्याच्यावरच्या *काट्यांमधलं* अंतर वाढायला लागतं. 

अनुभवी नजरेला ते बरोबर समजतं. 


तर असा फणस झाडावरून उतरावल्यावर एखाद्या कागदावर किंवा चांदाड्याच्या पानावर देठ खालच्या बाजूला करून भिंतीच्या आधाराने उभे करून ठेवायचे! 

म्हणजे देठाशी असलेला चीक निघून जातो! 

आणि 

मग हा फणस पिकायची वाट बघायची! 

फणस पिकून पक्का तयार झाल्यावर त्याचा मादक घमघमाट सुटतो! 

हा घमघमाट प्रसंगी आंब्याच्या वासालाही *थोत्रीत* मारतो! 


फणस खायची उत्तम वेळ म्हणजे सकाळी न्याहरीची! न्याहारीच्या आधी आगरात शिंपणं, पातेरा झाडणं वगैरे मेहनतीची कामं करून पोटात कावळे ओरडायला लागलेले असावेत! 

अशावेळी पडवीत फतकल मारून बसावं, समोर फणस घ्यावा! त्यावर टिचकी मारून बघावं आणि डबडब आवाज येतोय याची खात्री करून घ्यावी! बोटांना थोडंसं खोबरेल तेल लावून घ्यावं आणि मग कभी कभी लागता है आपुनही भगवान है असे विचार मनात आणून भगवंताने *हिरण्यकशपूचं* पोट फडलं तसं फणसाचं पोट फाडावं! 

पक्का तयार झालेला फणस फोडायला *हाताची बोटं* सोडल्यास बाकी कुठलीही हत्यारं शक्यतो लागत नाहीत. 

हे सगळं केल्यावर क्षणाचाही विलंब न लावता पटकन एक गरा तोंडात टाकावा! 


फणसाची पाव बाजूला काढून टाकावी आणि मग राहिलेल्या गऱ्यांच्या यथावकाश घाई न करता समाचार घ्यावा! 

फणस जर बरका असेल तर गाऱ्यातली आठीळ बाहेर काढायचा आणि गरा गिळायचा मुहूर्त बरोबर साधायला लागतो. 


कापा फणस असेल तर सांभाळून खायला हवा आणि कापे गरे खाल्ल्यावर चुकूनही *पाणी* पिऊ नये. 

शक्य असेल तर सगळा फणस *एकट्यानेच* संपवावा आणि गऱ्यांना *भांड्याचा* किंवा *जीभ* सोडून दुसऱ्या कसलाही स्पर्श होऊ द्यायचं पाप करू नये! 

पूर्ण फणस संपवणं शक्य नसेल तर आपलं पोट भरल्यावर उरलेले गरे केळीच्या *फाळक्यावर* काढून घरात द्यावे आणि घरच्या अन्नपूर्णेला *सांदणाची चाळण* शिजवायची विनंती करावी!


बाकी आम्ही कोकणची साधी भोळी माणसं वरून फणसारखे वरून काटेरी आणि आतून रसाळ आहोत हे जगजाहीर आहेच!


 😊😊

------------------

वैभव देवधर, रत्नागिरी

#स्फुटवैभव

पोट साफ करण्याचे प्रभावि उपाय...*

 *पोट साफ करण्याचे प्रभावि उपाय...*


  १) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या.

    २) १०० मि.लि पाण्यात एक चमचा मेथि दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे. व जेवणानंतर हे मेथिचे दाणे घालून खावे. याने सकाळी पोट साफ होते.

   ३) भाजलेले जिरे पूड जेवणानंतर घ्या. पाण्यासोबत.,

  ४) मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे., रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात इसबगोल मिसळून घ्यावे..

  ५) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून गुलकंद खाऊन त्यावर एक कप भरून दूध घ्यावे.

   ६), दूधात दोन तीन अंजिर उकळून मग अंजिर खावे . आणि वरून दूध घ्यावे..

   ७) एक ग्लास पाण्यात २ चमचे कोरफड गर मिसळून घ्यावे..,. त्रिफळा चूर्ण मातिच्या भांड्यात भिजवून मग सकाळी हे गाळून घ्यावे. याने पोट साफ होते.

    ८) रात्री झोपण्यापूर्वी एक कप पाण्यात एक ते दोन चमचे साजूक तुप व  किंचित सैंधव मीठ घालून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होते.

     ९) रोज सकाळी दोन खजुर साजुक तुपासोबत खाल्ल्यास पोट साफ होते..

     १०) ताजी कोरफड मंद गॅसवर भाजून, नंतर साल काढून, यातिल गर मलमलच्या कपड्यात गाळून, त्यात मध मिसळून घ्यावे.. याने सकाळी पोट साफ होते..

    ११,) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून ओवा खावा, याने पोट साफ होते..

    १२) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून एरंडेल तेल घ्यावे, याने सकाळी पोट साफ होते..


 वरील उपाय करावेत आणि, आहारात नेहमी पालेभाज्या फळे खावीत.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


_*(

जंगली झाडपाल्यापासून बनवलेला अर्क व काढ्याचा फक्त 15 दिवसातील

 🪴🌵🌿☘️🌱   *जंगली झाडपाल्यापासून बनवलेला अर्क व काढ्याचा फक्त 15 दिवसातील जबरदस्त रिझल्ट*


*आपल्या ग्रुप मधील सदस्य मारूती बळवंत चौगुले यांना शुगर मूळे पोटाची प्रक्रिया बिघडलेली होती Antox D व Antox T घेतल्यानंतर 15 दिवसातच 100% सूधरली*


*तसेच शुगर पण 100 ने कमी झाली*


*Antox D व Antox T ऑर्डर साठी आजच संपर्क करा - 7875481853*

वयानुसार (blood sugar level) रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे !

 *वयानुसार (blood sugar level) रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे !!* 


सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी पूर्णपणे चुकीच्या झाल्या आहेत. आजकाल  मधुमेहाची समस्या फार वाढत असून कमी वयामध्ये लोक मधुमेहासारख्या आजाराच्या विळख्यात येतात.


अशा परिस्थितीत तुम्हाला बदलत्या जीवनशैलीनुसार, खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावं लागतं. यासाठीच आम्ही तुम्हाला तुमच्या वयानुसार, रक्तातील साखर म्हणजेच blood sugar level किती असलं पाहिजे याबाबत सांगणार आहोत.


*वयानुसार रक्तातील साखरेची पातळी (Diabetes Level)* 


6 ते 12 वर्षे - 80 ते 180 mg/dl


13 ते 19 वर्षे - 70 ते 150 mg/dl


20 ते 26 वर्षे - 100 ते 180 mg/dl


27 ते 32 वर्षे - 100 ते 140 mg/dl


33 ते 40 वर्षे - 140 mg/dl पेक्षा कमी


40 ते 50 वर्षे - 90 ते 130 mg/dl


50 ते 60 वर्षे - 90 ते 130 mg/dl


*रक्तातील साखर कशी कमी करावी :* 


जर तुम्ही ब्लड शुगरचे पेशंट असाल तर तुम्हाला सकाळी उठण्याच्या सवयीपासून ते खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत बदल करावे लागतात. तुम्हाला तुमची शारीरिक क्रिया वाढवाव्या लागणार आहे. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये व्यायामाचा समावेश झालाच पाहिजे.


जास्त साखर, मीठ, कोल्ड ड्रिंक, मिठाई या गोष्टी खाण्यापासून दूर राहिलं पाहिजे. या पदार्थांमध्ये कार्बोहाइड्रेट असतं, त्यामुळे आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करू नये. अशावेळी तुम्ही आहारात सलाडचा वापर करू शकता.


*blood sugar चेक करण्याची योग्य वेळ कोणती ?* 


जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखर म्हणजेच blood sugar ची योग्य माहिती हवी असेल तर तुम्ही ब्लड शुगर सकाळच्या वेळी तपासलं गेलं पाहिजे. सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी रिडींग घेतल्यास ती परफेक्ट येऊ शकते. रात्रीचं जेवळ आणि सकाळची तपासण्याची वेळ यामध्ये तब्बल 8 तासांचा गॅप असला पाहिजे.


*मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ :* 


आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या अहवालानुसार 2019 पर्यंत देशात मधुमेहाचे सुमारे 7.7 कोटी रुग्ण होते. 2030 पर्यंत ही संख्या 10 कोटी होऊ शकते. 20-79 वयोगटातील मधुमेहग्रस्तांच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 7.2 कोटी लोकं मधुमेहग्रस्त आहेत. यापैकी 3.6 कोटी लोकांना मधुमेहाची लागण झाली आहे याची कल्पनाच नाही. 90.95 टक्के लोकं ही टाईप-2 चे रुग्ण आहेत.


*संकलन-* 

निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️

_*(

Featured post

Lakshvedhi