Friday, 7 April 2023

जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला

 जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा!


राज्यात आरोग्य विभागामार्फत आजपासून 'सुंदर माझा दवाखाना' उपक्रम.

            मुंबई, दि.7 : राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या जात आहेत, असे सांगत आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. आजपासून राज्यात आठवडाभर 'सुंदर माझा दवाखाना' हा उपक्रम सुरू होत असून सामान्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यानिमित्ताने केले आहे.


            आरोग्यविषयक आव्हानाला ताकदीने सामोरे जाणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, राज्यात आरोग्याच्या क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकली आहेत. राज्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुंबईमध्ये देखील सुमारे १६० हून अधिक आपला दवाखाना सुरू झाले आहेत.


            मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात आरोग्याचा प्रकाश आणला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत गेल्या नऊ महिन्यांत ६२०० रुग्णांना एकूण ५० कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात ४ कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पाच लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहेत. शिवाय या योजनेत नवीन २०० रुग्णालयांचा समावेश करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


            दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 'समान आरोग्य सेवा' हे यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे. शासकीय रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये सर्वांना समान सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त रुग्णांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने यानिमित्त यावर्षी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबवत ७ ते १४ एप्रिल दरम्यान “सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम राज्यभर राबविणार आहे. त्या माध्यमातून सामान्यांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले

 आहे.


०००००


राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाअवयवदान जनजागृती अभियान

 राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाअवयवदान जनजागृती अभियान

-वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन


अवयवदान जनजागृती अभियानाचा राज्यात उद्या शुभारंभ


            मुंबई, दि. 6 : राज्यातील अवयवदानाशी संबंधित समस्या सोडविणे आणि अवयवदानाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग काम करणार आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ उद्यापासून राबविण्यात येणार असल्याचे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            “अवयवदानाबाबतची चळवळ यापूर्वी आपण राबविली होती. त्यावेळी अवयव दानाचे प्रमाण देखील सुधारले होते. परंतु नंतरच्या काळात कोरोनामुळे अवयव दानाची चळवळ मागे पडली. उद्यापासून पुन्हा एकदा राज्यभरात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ची सुरुवात होईल आणि वर्षभरात वार्षिक उपक्रमांचे नियोजन केले जाईल. राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अधिकाधिक प्रमाणात जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाला अवयवदानाच्या कार्यपद्धतीची चांगली माहिती देण्यात येईल आणि त्यांचे सर्व गैरसमज समाधानकारक आणि वैज्ञानिकदृष्ट्या दूर होतील,” असे मंत्री श्री. महाजन म्हणाले.


           मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सध्या भारतात शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी २ लाख मूत्रपिंड आणि १ लाख यकृताची गरज आहे, मात्र दरवर्षी केवळ ४ हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि ५०० यकृत प्रत्यारोपण केले जाते. पाच हजार रुग्णांना हृदयाची गरज असून केवळ २० ते ३० हृदय प्रत्यारोपण केले जात आहे. आज अवयव मिळत नसल्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण व यकृत प्रत्यारोपण करण्याकरिता बरीच प्रतीक्षा यादी आहे. एक ब्रेन डेड रुग्णांमुळे सात अवयव गरजू रुग्णाचे जीव वाचू शकतात. परंतु ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकाकडून गैरसमजामुळे अवयव दान करण्यात येत नाही. अवयव दान चळवळीमधून हा गैरसमज दूर केल्यास अवयव दानाचे प्रमाण नक्कीच सुधारेल. अवयव निकामी झालेल्या रुग्णास अवयव मिळाल्यानंतर केवळ त्याचाच जीव वाचत नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण कुटुंब पूर्ववत होते. त्याकरिता अवयव दानाची मोठ्या प्रमाणात चळवळ उभी राहणे आवश्यक आहे व त्यातून अवयवदान प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण अवयव दानाची चळवळ पुनश्च पूर्वीप्रमाणेच जोमाने सुरू करीत आहोत.


            अवयव दान केल्यानंतर देखील त्या अवयवाचे तत्काळ प्रत्यारोपण करणे देखील तेवढेच आवश्यक असते. त्याकरिता सर्वत्र अवयव प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्याकरिता अवयव प्रत्यारोपण बाबतची सुविधा सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


            या अभियानाच्या माध्यमातून नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन सेंटरची संख्या वाढवून गरीब व गरजू रुग्णांसाठी शासकीय संस्थांमध्ये परवडणाऱ्या प्रत्यारोपण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक शासकीय संस्थेत अवयवदान जनजागृती अधिकारी यंत्रणा समाविष्ट करून विद्यमान रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन आहे. आधीच उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांमध्ये समावेश करून तसेच त्यासाठी आर्थिक देणगीदारांचा पूल तयार करून प्रत्यारोपणाच्या आर्थिक ओझ्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत उपाय शोधले जात असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.


            वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, डॉ. मिलिंद फुलपाटील, डॉ. अजय चंदनवाले यांच्या नेतृत्वात अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे राज्यस्तरीय समन्वयक डॉ. हरीश ताटिया, डॉ. योगेश गवळी व डॉ. राकेश वाघमारे करणार आहेत.


००००

विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्यापोटनिवडणुकांसाठी 18 मे रोजी मतदान

 विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्यापोटनिवडणुकांसाठी 18 मे रोजी मतदान


 


            मुंबई, दि. 6 (रानिआ): राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती, राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली.  


            निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होईल.


-0-0-0-

Sarada Peeth

 *After 70 years, Sarada Peet temple in Kashmir was opened for public.*


It is very close to the LOC.

From here you can see Pakistan.


This is an unimaginable achievement for 70 ye


ars..

काळ्या पाण्याची शिक्षा झालेले भोगलेले किती स्वातंत्यवीर आहेत.*

 *पहा काळ्या पाण्याची शिक्षा झालेले भोगलेले किती स्वातंत्यवीर आहेत.* 


*मित्रांनो,आपण यांना ओळखता का..?*


*१. स्वातंत्र्यवीर अण्णाजी,* 

*२. स्वातंत्र्यवीर भिमाजी* 

*३. स्वातंत्र्यवीर बागल यदु पाटील* 

*४. स्वातंत्र्यवीर भीमराव* 

*५. स्वातंत्र्यवीर आत्माराम सन्तु भोसले* 

*६. स्वातंत्र्यवीर बाबाजी भुजंग भोसले* 

*७. स्वातंत्र्यवीर राजू खंडू भोसले* 

*८. स्वातंत्र्यवीर रघु मानाजी भोसले* 

*९. स्वातंत्र्यवीर विठू हंगू भोसले* 

*१०. स्वातंत्र्यवीर व्याकात्राव भोसले* 

*११. स्वातंत्र्यवीर बिरबत कुणबी* 

*१२. स्वातंत्र्यवीर अन्न नाथु* 

*१३. स्वातंत्र्यवीर बाळकृष्ण* 

*१४. स्वातंत्र्यवीर बारकू* 

*१५. स्वातंत्र्यवीर भीमा* 

*१६. स्वातंत्र्यवीर गानू बापू चव्हाण* 

*१७. स्वातंत्र्यवीर कृष्णाप्पा गोपाल चव्हाण* 

*१८. स्वातंत्र्यवीर महादेव चव्हाण* 

*१९. स्वातंत्र्यवीर दामोदर आबाजी*

*२०. स्वातंत्र्यवीर दत्तू नथु* 

*२१. स्वातंत्र्यवीर दामू सरमळकर* 

*२२. स्वातंत्र्यवीर नारायण देसाई* 

*२३. स्वातंत्र्यवीर पांचाली गोविंद देसाई* 

*२४. स्वातंत्र्यवीर राघोबा देसाई* 

*२५. स्वातंत्र्यवीर देवाजी शिरसाठ* 

*२६. स्वातंत्र्यवीर देवजी गायकवाड* 

*२७. स्वातंत्र्यवीर गानू सावंत* 

*२८. स्वातंत्र्यवीर गणेश महाराज =*

*२९. स्वातंत्र्यवीर गणू सखाराम.* 

*३०. स्वातंत्र्यवीर हरिभाऊ गरबेद* 

*३१. स्वातंत्र्यवीर विठू गवळी* 

*३२. स्वातंत्र्यवीर हनुमंत घाटगे* 

*३३. स्वातंत्र्यवीर संत साली गोपाल* 

*३४. स्वातंत्र्यवीर गोविंद* 

*३५. स्वातंत्र्यवीर गोवर्धन* 

*३६. स्वातंत्र्यवीर गोविंद महार* 

*३७. स्वातंत्र्यवीर गोविंद विठू* 

*३८. स्वातंत्र्यवीर गोविंद गोविंद* 

*३९. स्वातंत्र्यवीर हरी* 

*४०.स्वातंत्र्यवीर देवजी हिंदालकर* 

*४१. स्वातंत्र्यवीर होनाजी* 

*४२. स्वातंत्र्यवीर रघु जाधव* 

*४३. स्वातंत्र्यवीर सुभाना बापू जाधव* 

*४४. स्वातंत्र्यवीर जयराम राजे* 

*४५. स्वातंत्र्यवीर शिवाजी अभिमन्यु* 

*४६. स्वातंत्र्यवीर बाजी जोरेकर* 

*४७. स्वातंत्र्यवीर अन्न नथु* 

*४८. स्वातंत्र्यवीर गणाजी कबरे* 

*४९. स्वातंत्र्यवीर अन्न बापू कदम* 

*५०. स्वातंत्र्यवीर राम कदम* 

*५१. स्वातंत्र्यवीर रावजी काळजी कदम* 

*५२. स्वातंत्र्यवीर गोपाल कार्सोवकर* 

*५३. स्वातंत्र्यवीर जिल्लू कोचारकर* 

*५४. स्वातंत्र्यवीर गोपाल कोकामकर* 

*५५. स्वातंत्र्यवीर मान्या कोळी* 

*५६. स्वातंत्र्यवीर बोंबी कोकमकर* 

*५७. स्वातंत्र्यवीर विठू सातवजी कुंभार* 

*५८. स्वातंत्र्यवीर गिरवार कुणबी* 

*५९. स्वातंत्र्यवीर जवाहर कुणबी* 

*६०. स्वातंत्र्यवीर हैबतराव आप्पा महाडिक* 

*६१. स्वातंत्र्यवीर विठू बहिरू महल्ले* 

*६२. स्वातंत्र्यवीर अप्पा मालवणकर* 

*६३. स्वातंत्र्यवीर नरसिह माने* 

*६४. स्वातंत्र्यवीर मावजी* 

*६५. स्वातंत्र्यवीर मावजी धुमाळ* 

*६६. स्वातंत्र्यवीर म्हसकर रावजी लीन्गोजी नाईक* 

*६७. स्वातंत्र्यवीर तात्या मोहिते* 

*६८. स्वातंत्र्यवीर लिंब भवानी मोरे* 

*६९. स्वातंत्र्यवीर मोहन* 

*७०. स्वातंत्र्यवीर भीमा नाईक* 

*७१. स्वातंत्र्यवीर बी.वाय नाईक* 

*७२. स्वातंत्र्यवीर गंगा एक्का नाईक* 

*७३. स्वातंत्र्यवीर नारोजी लीन्गाजी नाईक* 

*७४. स्वातंत्र्यवीर सोमिया जत्रा नाईक* 

*७५. स्वातंत्र्यवीर नालाजी वारादिकीर* 

*७६. स्वातंत्र्यवीर नाना चीलोजी* 

*७७. स्वातंत्र्यवीर व्यंका पवार* 

*७८. स्वातंत्र्यवीर बापू पाइप्कर* 

*७९. स्वातंत्र्यवीर पांडू सिंगीकर* 

*८०. स्वातंत्र्यवीर भाऊ कान्जोरा पाटील* 

*८१. स्वातंत्र्यवीर भाऊ हरजी पाटील* 

*८२. स्वातंत्र्यवीर भिल्ल अत्त्या पाटील* 

*८३. स्वातंत्र्यवीर गरिब्दास पाटील.* 

*८४. स्वातंत्र्यवीर इत्तु पाटील* 

*८५. स्वातंत्र्यवीर खुशाल गोविंद पाटील* 

*८६. स्वातंत्र्यवीर मावजी अर्जुन पाटील* 

*८७. स्वातंत्र्यवीर पांडू धोंडी पाटील* 

*८८. स्वातंत्र्यवीर त्र्यंबक हरी पाटील.* 

*८९. स्वातंत्र्यवीर जीवासा भीरु पाटील* 

*९०. स्वातंत्र्यवीर रामजी जगताप* 

*९१. स्वातंत्र्यवीर राम परब* 

*९२. स्वातंत्र्यवीर रामराव*

*९३. स्वातंत्र्यवीर भिकाजी रावनेकर* 

*९४. स्वातंत्र्यवीर गोपाल साळवी* 

*९५. स्वातंत्र्यवीर साधू* 

*९६. स्वातंत्र्यवीर सन्तु चंदू* 

*९७. स्वातंत्र्यवीर बाबाजी सावंत* 

*९८. स्वातंत्र्यवीर गणू सावंत* 

*९९. स्वातंत्र्यवीर मनु अप्पा सावंत* 

*१००. स्वातंत्र्यवीर पुताजी बाबुराव सावंत* 

*१०१.स्वातंत्र्यवीर त्र्यंबक सावंत* 

*१०२. स्वातंत्र्यवीर विश्राम सावंत* 

*१०३. स्वातंत्र्यवीर नारायण पिराजी शिंदे* 

*१०४. स्वातंत्र्यवीर दोन्द सावंत* 

*१०५. स्वातंत्र्यवीर राम रघु शिंदे* 

*१०६. स्वातंत्र्यवीर बापू नारोजी थोरात* 

*१०७. स्वातंत्र्यवीर तुकाराम कृष्णाजी* 

*१०८. स्वातंत्र्यवीर रघु त्र्यंबक* 

*१०९. स्वातंत्र्यवीर बालाजी विलोबा* 

*११०. स्वातंत्र्यवीर बाबाजी विठा* 

*१११. स्वातंत्र्यवीर विठोबा* 

*११२. स्वातंत्र्यवीर विठोबा जुनकर*

*११३. स्वातंत्र्यवीर वित्ठू* 

*११४. स्वातंत्र्यवीर वित्तू बाबा* आणि 

*११५. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर* 

*हे सर्वजण आहेत,*

*अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेचे कैदी*


*बबन फाले, नागपूर,यांनी लिहिलेल्या "क्रांतीधाम" या पुस्तकातील माहिती!* 


*लोकापर्यंत अजूनही न पोचलेले सत्य. लेखक स्वतः २९ वर्षे अंदमान निकोबार येथे शिक्षण विभागात नोकरीला होते. त्यांना तिथे जी माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी "क्रांतीधाम" हे पुस्तक लिहिले आहे. वरील सर्वजण राजकीय कैदी आहेत.*


*काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले महाराष्ट्रातील हे स्वातंत्र्यसैनिक. ते अंदमानात राहिले व अंदामानातच मेले.* 

*मग यांनाहि आम्ही भारताचे "स्वातंत्र्यवीर" च म्हणणार. नाही का ?*


*त्यांना अंधारात ठेवले गेले, त्यांच्यावर अनन्वित जुलूम करून त्यांना छळण्यात आले, सक्तीने मजुरी करवून घेतली ...


*अशा या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन.......!*


*एक निवेदन : आपण ही पोस्ट सर्वत्र वितरित करा कारण  तुम्ही पणswantryveer आहात.

🙏🙏

कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये

 कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

.

            मुंबई, दि. ६ : राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर कोतवालांच्या मानधनवाढीबाबत केलेल्या घोषणेप्रमाणे कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर करताना केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दिनांक १७ मार्च, २०२३ रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन ७ हजार ५०० रुपयावरून १५ हजार करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व १२ हजार ७९३ कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट १५ हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे. १५ हजार रुपये इतके मानधन दि. ०१ एप्रिल २०२३ पासून अनुज्ञेय असणार आहे.

महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही

 महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही


- विधानसभा अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर


 


            मुंबई, दि. ६ : महाराष्ट्रात वकिलांना मारहाण होण्याच्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांना संरक्षण देण्यासंदर्भात "महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा" आणण्याच्या दृष्टीने सरकारने कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण निधी अधिनियम, १९८१ हा कायदा बदलून सुधारित प्रभावी कायदा आणण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न व्हावेत, असे मत विधानसभा अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.


            विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांच्या दालनात आज बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा संस्थेचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ वकिलांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि यासंदर्भातील मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी वकिलांनी आपल्या मागण्या विधानसभा अध्यक्षांना सादर केल्या. यासंदर्भात आपण स्वत: पुढाकार घेऊन राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे सूचित करु, असे ॲङ नार्वेकर यांनी सांगितले.


            वकील हे जनता व न्यायालय यातील महत्वाचा दुवा असतात. जनसामान्यांना न्याय मिळावा यादृष्टीने वकील वर्ग सातत्याने कार्यरत असतो. त्यांच्यावरील हल्याच्या घटना या अप्रत्यक्षपणे जनतेच्या न्याय्य हक्‍कांवर होणारा हल्ला आहे. अशा घटनांना पायबंद बसून निकोप वातावरण कायम राहण्याच्या दृष्टीने नवीन कायदा उपयुक्त ठरेल, असेही यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲङ नार्वेकर यांनी सांगितले. या शिष्टमंडळात ॲड. जयंत जायभावे, ॲड. मिलिंद पाटील, ॲड. संग्राम देसाई, ॲड. विठ्ठल कोंडे-देशमुख, ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. सतीश देशमुख, ॲड. विवेक घाडगे, ॲड. अहमद खान पठाण, ॲड. गजानन चव्हाण, ॲड. संदीप केकाणे यांचा समावेश होता.



००००



 


Featured post

Lakshvedhi