Friday, 7 April 2023

दैनंदिन आरोग्य समस्या उपचार

  *डँन्ड्रफ ची समस्या*


१)केसांना खायचा सोडा लावत जा केस ओले करुन.नंतर शांपू लावू नका.

२)अँपलव्हेनिगर लावत जा यानं स्काल्पवरील पीएच बँलन्स साधला जाऊन नियमीत वापरानं डेंन्ड्रफ ची समस्या कमी होईल.

३)वेळच्या वेळी लिंबू रस लावत जा .समस्या कमी होईल.

४)लसूण पेस्ट व मध एकत्रितपणे केसांना लावा स्कँल्पवरचे फंगस जाईल. पीएच बँलन्स साधला जाऊन फंगस कोंडा होणार नाही.

५)हिवाळ्यात केसात भरपूर कोंडा होतो चार चमचे मेथीच्या बियांची दाणे रात्री भिजत ठेऊन सकाळी वाटून स्काल्पवर लावा डँड्रफ,केस कोरडे होण्याची समस्या जाईल. उष्णतेचा त्रास असलेल्या मंडळी नी मेथीचा प्रयोग टाळावा.

 वरील उपायाने तुम्हाला अँन्टी डँड्रफ शाँपूचे महागडे केमिकल फासायची गरज च तुम्हाला पडणार नाही .



_*पायात गोळेयेणे..... उपाय...*


.... बरेच वेळा अचानक रात्री पायात गोळे येतात, असह्य वेदनां येतात. आणि काहि केल्या बरं वाटतं नाही. तेव्हा आपण खालील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच....


      १) एका वाटीत लिंबू रस काढून घ्यावा. हा रस पायाला चोळा. ,मग त्यांवर साधे मीठ चोळावे. आणि एका रुमालात खडे मीठ घालून तव्यावर गरम करून , याचि पुरचूंडी बांधून हळूहळू पाय शेका. या तिन गोष्टी एकत्र केल्यास पायात आलेले गोळे जातात. व आराम मिळतो...

     २) एका वाटीत तिळाचे तेल घेऊन त्यात भिमसेन कापूर पावडर टाका आणि मिक्सिंग करून हे तेल पायांना लावून चोळावे. पंधरा मिनिटे करा हळूहळू गोळा निघून जाईल..

     ३) थोडा मवू गूळ घ्या . यात सुंठ पावडर मिसळून घ्यावि. आणि यांच्या बोराईतक्या सात गोळ्या करून घ्या. आणि दररोज उपाशी पोटी सकाळी एक गोळि घ्या. असे सात दिवस केल्यास कधिच पायात गोळे येणार नाही.

    ४)  चार बदाम, एक चमचा कच्चे तिळ, आणि एक चमचा खडिसाखर, एकत्र करून रोज सकाळी उपाशीपोटी एक महिना खावे. आयुष्य भर पायात गोळे येणार नाही..

   ५) एक पेला भर दूधामध्ये एक चमचा भरून नाचणीचे सत्त्व टाकून उकळून घ्यावे, आणि यात पाच भिजवलेल्या काळ्या मनुका टाका. व सकाळी उपाशीपोटी खा. असे दहा दिवस करा.. शरिरात भरपूर कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही..

 ६) शेवग्याच्या शेंगांची भाजी, आठवड्यातून दोन वेळा खा. किंवा शेवग्याच्या शेंगांचे चूर्ण रोज जेवणानंतर घ्या. याने भरपूर प्रमाणात कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही.

७) रोज सकाळी दोन डोंगरि आवळे अनशा पोटि खावे., आणि दिवसातून एकदा केळं खावे.

८) जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळा येतो तेव्हा आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात गोळे येतात तर, आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरं वाटेल..

९) EVION. 400 या कॅप्सुल्स घेतल्यास आलेला गोळा चटकन जातो. व काही दिवस नियमित पणे गोळ्या घेतल्यास पुढे बरेच दिवस येतं नाही..


      तेव्हा तुम्हाला जेव्हा पायात गोळे येथिल, तेव्हा वरील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच..


     आयुर्वेद अभ्यासक..... सुनिता सहस्रबुद्धे......



**भूक मंदावणे / भूक न लागणे


✅️खरा श्रीमंत कोण तर ज्याला व्यवस्थित भूक लागते व ज्याचे पोट नीट साफ होते तो आयुर्वेदानुसार सर्व प्रकारच्या आजारांची सुरूवात ही 'भूक कमी होणे' यामुळे होते. वरकरणी ही गोष्ट छोटी जरी वाटत असली तरी अनेक गंभीर आजारांना जन्म देत असते.


✅ बऱ्याचदा आपली भूक व्यवस्थित आहे की नाही हे कळायला मार्ग नसतो ! वेळ झाली म्हणून जेवायला बसतो. भूक लागलेली नसताना जेवण करतो. त्यातून पुढे अपचन होतं आणि रोजचं हे दुष्टचक्र असच सुरु राहतं.


✅️सामान्यात: माणसाला दोन वेळचं जेवण पुरेसे असते. सकाळ जेव्हा भूक लागेल तेव्हा पोटभर जेवण करणे व सायंकाळी सूर्य मावळायच्या आत जेवण! ही खरी आदर्श जेवणाची पद्धत म्हणता येईल. या व्यतिरिक्त मध्ये मध्ये सारखं काहीतरी खाण्याची लागेलेली 'चुकीची सवय' ही भूक कमी करायला कारणीभूत ठरत असते.


 

 इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल समाधान


सामाजिक न्याय विभागातर्फे लोकप्रतिनिधींचा दौरा


 


            नवी दिल्ली, 06 : मुंबईतील इंदू मिल या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे या पुतळ्याच्या प्रतिकृतीचा पाहणी दौरा आज आयोजित करण्यात आला.


           मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील सदस्य, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, माजी मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांचा गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील राम सुतार आर्ट कंपनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला.


            यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी करून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. तसेच, काही किरकोळ बदल सुचविले. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, असा राज्य शासनाचा मानस आहे. इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यास राज्य शासन कटिबद्ध असून बाबासाहेबांचा पुतळा या स्मारकाचे खास वैशिष्ट्य आहे.


          भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्याकडून गाझियाबाद येथे या पुतळ्याची 25 फुटांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येणार आहे. यावेळी श्री.सुतार यांनी उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याबद्दलचे सादरीकरण केले.


         सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित दौऱ्यामध्ये भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, विधानसभा सदस्य संजय बनसोडे, यामिनी जाधव, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, डॉ. राजेंद्र गवई, जयदीप कवाडे, भदंत राहुल बोधी यांसह सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सदस्य, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, सर ज.जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी येथे आयोजित बैठकीतील चर्चेत सहभागी होऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकातील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीविषयी समाधान व्यक्त केले.


            देश-विदेशातील डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी या स्मारकाला भेट देवून त्यांच्या भव्य पुतळ्यापासून प्रेरणा घेतील, अशी भावना सर्वांनी यावेळी व्यक्त केल्या.


००००

म्हाडा'तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित

 म्हाडा'तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित


म्हाडाच्या सन २०२३-२४ साठी सादर १०१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मान्यता


मुंबईत २१५२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित




            मुंबई, दि. ०६ :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन २०२३-२०२४ च्या १०१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व सन २०२२-२०२३ च्या सुधारित ६९३३.८२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची नुकतीच मान्यता मिळाली आहे. सन २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पात शून्य तूट, तर सन २०२२-२०२३ च्या सुधारित अर्थसंकल्पात ११३६.४७ कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे.


        सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात प्राधिकरणाच्या मुंबई, पुणे, कोंकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या प्रादेशिक मंडळांतर्फे एकूण १२७२४ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ५८००.१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


        मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात २१५२ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ३६६४.१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंडळातर्फे बीडीडी चाळींचा पुनर्विकास योजनेसाठी २२८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ॲण्टॉप हिल, वडाळा येथील गृहनिर्माण योजनेसाठी २४ कोटी रुपये, बॉम्बे डाईंग मिल वडाळा योजनेसाठी ३० कोटी रुपये, कोपरी पवई येथील गृहनिर्माण योजनेसाठी १०० कोटी रुपये, कन्नमवार नगर, विक्रोळी येथील योजनेसाठी २१३.२३ कोटी रुपये, मागाठाणे बोरिवली येथील योजनेसाठी ५० कोटी रुपये, खडकपाडा दिंडोशी येथील गृहनिर्माण योजनेसाठी १८ कोटी रुपये, पहाडी गोरेगाव येथील गृहनिर्माण योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. गोरेगांव-सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपये, धारावी पुनर्विकास प्रकल्प टप्पा १ ब साठी ५९ कोटी रुपये, गोरेगांव मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी १० कोटी रुपये, पोलिस गृहनिर्माण प्रकल्प वसाहतीच्या पुनर्विकासासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


        कोंकण मंडळाअंतर्गत ५६१४ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित असून सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात त्यासाठी ७४१.३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंडळांतर्गतच्या विरार बोळींज गृहनिर्माण प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात १० कोटी रुपये, बाळकूम ठाणे गृहनिर्माण प्रकल्पासाठी ३३ कोटी रुपये, माजिवाडे, ठाणे संयुक्त भागीदारी प्रकल्पासाठी ३५ कोटी रुपये, मीरा रोड टर्न की प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.


        पुणे मंडळाअंतर्गत ८६२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ५४०.७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 


        नागपूर मंडळाअंतर्गत १४१७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ४१७.५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 


        छत्रपती संभाजी नगर मंडळाअंतर्गत १४९७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात २१२.०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


        नाशिक मंडळाअंतर्गत ७४९ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ७७.३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


        अमरावती मंडळाअंतर्गत ४३३ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १४६.२४ कोटी रुपयांची तरतूद 

करण्यात आली आहे.


००००


Thursday, 6 April 2023

राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात‘अवयवदान जनजागृती अभियान’

 राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात‘अवयवदान जनजागृती अभियान’


-वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन


अवयवदान जनजागृती अभियानाचा राज्यात उद्या शुभारंभ


            मुंबई, दि. 6 : राज्यातील अवयवदानाशी संबंधित समस्या सोडविणे आणि अवयवदानाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग काम करणार आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ उद्यापासून राबविण्यात येणार असल्याचे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            “अवयवदानाबाबतची चळवळ यापूर्वी आपण राबविली होती. त्यावेळी अवयव दानाचे प्रमाण देखील सुधारले होते. परंतु नंतरच्या काळात कोरोनामुळे अवयव दानाची चळवळ मागे पडली. उद्यापासून पुन्हा एकदा राज्यभरात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ची सुरुवात होईल आणि वर्षभरात वार्षिक उपक्रमांचे नियोजन केले जाईल. राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अधिकाधिक प्रमाणात जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाला अवयवदानाच्या कार्यपद्धतीची चांगली माहिती देण्यात येईल आणि त्यांचे सर्व गैरसमज समाधानकारक आणि वैज्ञानिकदृष्ट्या दूर होतील,” असे मंत्री श्री. महाजन म्हणाले.


           मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सध्या भारतात शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी २ लाख मूत्रपिंड आणि १ लाख यकृताची गरज आहे, मात्र दरवर्षी केवळ ४ हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि ५०० यकृत प्रत्यारोपण केले जाते. पाच हजार रुग्णांना हृदयाची गरज असून केवळ २० ते ३० हृदय प्रत्यारोपण केले जात आहे. आज अवयव मिळत नसल्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण व यकृत प्रत्यारोपण करण्याकरिता बरीच प्रतीक्षा यादी आहे. एक ब्रेन डेड रुग्णांमुळे सात अवयव गरजू रुग्णाचे जीव वाचू शकतात. परंतु ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकाकडून गैरसमजामुळे अवयव दान करण्यात येत नाही. अवयव दान चळवळीमधून हा गैरसमज दूर केल्यास अवयव दानाचे प्रमाण नक्कीच सुधारेल. अवयव निकामी झालेल्या रुग्णास अवयव मिळाल्यानंतर केवळ त्याचाच जीव वाचत नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण कुटुंब पूर्ववत होते. त्याकरिता अवयव दानाची मोठ्या प्रमाणात चळवळ उभी राहणे आवश्यक आहे व त्यातून अवयवदान प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण अवयव दानाची चळवळ पुनश्च पूर्वीप्रमाणेच जोमाने सुरू करीत आहोत.


            अवयव दान केल्यानंतर देखील त्या अवयवाचे तत्काळ प्रत्यारोपण करणे देखील तेवढेच आवश्यक असते. त्याकरिता सर्वत्र अवयव प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्याकरिता अवयव प्रत्यारोपण बाबतची सुविधा सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


            या अभियानाच्या माध्यमातून नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन सेंटरची संख्या वाढवून गरीब व गरजू रुग्णांसाठी शासकीय संस्थांमध्ये परवडणाऱ्या प्रत्यारोपण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक शासकीय संस्थेत अवयवदान जनजागृती अधिकारी यंत्रणा समाविष्ट करून विद्यमान रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन आहे. आधीच उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांमध्ये समावेश करून तसेच त्यासाठी आर्थिक देणगीदारांचा पूल तयार करून प्रत्यारोपणाच्या आर्थिक ओझ्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत उपाय शोधले जात असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.


            वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, डॉ. मिलिंद फुलपाटील, डॉ. अजय चंदनवाले यांच्या नेतृत्वात अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे राज्यस्तरीय समन्वयक डॉ. हरीश ताटिया, डॉ. योगेश गवळी व डॉ. राकेश वाघमारे करणार आहेत.


००००


वर्षा आंधळे/विसंअ

तुम ही ने दर्द दिया

 तुम ही ने दर्द दिया है, 

तुम ही दवा देना... 😀😀😀😀😀टिळक रोड पुणे 👆😀😀😀😀


नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहातप्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहातप्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन


 


मुंबई, दि. ६ : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्तांनी केले आहे.


या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या प्रवर्गातील असाव्यात. अर्जदार महिला ज्या ठिकाणी नोकरी करीत असेल, तेथील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले पत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच मासिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा जास्त नसावे. वसतिगृहात कमाल तीन वर्षापर्यंत राहण्याची मुभा देण्यात येते. तसेच पाच हजार इतकी रक्कम अनामत म्हणून व्यवस्थापकांकडे जमा करावी लागेल, अशी माहिती सहाय्यक आयुक्तांनी पत्रकाद्वारे दिली आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई येथे संपर्क साधावा.

 


०००


विधानपरिषद विशेषाधिकार समितीवर सदस्यांची नामनियुक्ती

 विधानपरिषद विशेषाधिकार समितीवर सदस्यांची नामनियुक्ती



            मुंबई, दि. 6 : विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीवर सन 2023-24 या वर्षासाठी सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे.


            या समितीचे प्रमुख म्हणून विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सदस्य सर्वश्री प्रवीण पोटे पाटील, सुरेश धस, गोपिचंद पडळकर, ॲड.अनिल परब, विलास पोतनीस अब्दुल्लाह खान दुर्राणी, शशिकांत शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, अभिजित वंजारी, कपिल पाटील हे या समितीचे सदस्य असणार आहेत, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi