Thursday, 6 April 2023

असंख्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि योगदानातून भारतीय जनता पक्षाचे रूपांतर

 असंख्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि योगदानातून भारतीय जनता पक्षाचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. राष्ट्रवादी विचारधारा अंत्योदयाचा सिद्धांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष अविरत परिश्रम घेत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले.


 कांदिवली पूर्व विधानसभेतील आ. भातखळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा 44 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आ. भातखळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.


 आ. भातखळकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कुशल नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास तसेच 'राष्ट्र प्रथम' या मंत्राला आदर्श ठेवून सर्व समावेशक कार्यशैलीतून भारतीय जनता पक्षाकडून देशात विकास सुरू असल्याचेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कांदिवली पूर्व विधानसभेतील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


यावेळी कांदिवली पूर्व विधानसभेत ८ प्रभागात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा झा

ला.


पवनपुत्र अंजनी सुताय

 🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩


          🌻 *आनंदी पहाट* 🌻


  *स्वामीनिष्ठ हनुमान जन्मोत्सवाची*


⚜🚩⚜🌸🙏🌸⚜🚩⚜


     *राम रसायन तुम्हरे पासा*

     *सदा रहो रघुपति के दासा*

     *तुम्हरे भजन राम को पावै*

     *जनम जनम के दुख बिसरावै*

     *.... संत तुलसीदास*


        *भारतीय संस्कृतीतील देशविदेशातील भक्तगण आज भल्या पहाटे उठून शुचिर्भूत होत मारुतीरायाच्या उपासनेत दंग आहेत. मारुती स्तोत्र.. हनुमान चालीसा पठन सुरू आहे.*

        *ज्यांच्या जवळ रामनामाचे रामबाण औषध आहे अशा हनुमानाची केलेली भक्ती ही रामापर्यन्त पोहोचते अन् जन्मजन्मांतरीची दुःख दूर होतात.* 

        *जिथे राम तिथे हनुमान आणि जिथे हनुमान तिथे राम कारण हनुमंताच्या हृदयातच राम आहे. पवनसुत हनुमान हे जीवनात उर्जा देणारे आदर्श असे दैवत.*

        *रुद्रअवतार रामभक्त हनुमान हे गुणसागरच. बल-बुद्धी संपन्न हनुमान हे मानसशास्त्र.. राजनीती.. साहित्य.. तत्त्वज्ञान यात पारंगत होते. अत्यंत विश्वासू असे स्वामीनिष्ठेचा आदर्श. रामराज्य हनुमंताशिवाय अशक्यच होते. हनुमान हे श्रीरामाचे निस्सिम भक्त.. सेवक.. सैनिक आणि सहयोगी होते. त्यांनीच प्रभू श्रीरामाची सुग्रिवाशी भेट घडवून वानरसेना मिळवून दिली. युद्धात बिकटप्रसंगी संजिवनी आणण्यास पर्वतही खांद्यावर वाहण्याचे सामर्थ्य हनुमंताचेच.*

        *बिभीषण या शत्रूच्या भावाला अनेकांच्या विरोधानंतरही आपल्या पक्षात घ्यावे हा सल्ला प्रभू श्रीरामाला दिला. हनुमानाची विश्वासपात्रता तर एवढी की श्रीरामांनी त्यांना शत्रूराज्यातही धाडले. तर भरताची राज्य परत करण्याची मानसिकता खरच आहे का हे तपासायला रामाने हनुमंतालाच पाठवले. प्रभूच्या शब्दाला जागणारे. बुद्धी आणि बल असूनही अहंकार, लोभ, मोह, माया, पदलालसा यापासून अलिप्तच होते.*

        *हनुमानाचे भक्तीसामर्थ्य असे की या नामयोगीचे साथीदारही रामनाम घेत सागर.. भवसागर पार करु शकले. लंकादहन करुन शत्रूत घबरहाट निर्माण करुन मनोधैर्य खच्चीकरणाने विजय सुकर करणारे हे हनुमान. दास्यभक्ती असावी तर हनुमानासारखी. विजयानंतर प्रभूंनी काय हवे विचारले तर रामभक्तीचे वरदान मागितले.*

        *अचाट बुद्धिमत्ता.. सामर्थ्य असूनही जेवढी कामगिरी दिली तेवढीच पार पाडली. त्यावर ना शंका ना प्रश्न. स्वतः हालअपेष्टा सहन करुन, दैवताला विश्वासाने हृदयी स्थान देत प्राणाची बाजी लावणारे स्वामीनिष्ठ जिथे.. तिथेच रामराज्य निर्माण होते, म्हणूनच हनुमानांसारखी बलोपासना करायला आणि तरुणांकडून गावाचे संरक्षण व्हावे, स्वराज्याचे सुराज्य व्हावे.. यासाठी या भक्त आदर्शाची हनुमान मंदिरे समर्थ रामदास स्वामींनी गावोगाव स्थापन केली.*

     *मनोजवं मारुततुल्यवेगं*

     *जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्* 

     *वातात्मजं वानरयूथमुख्यं*

     *श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये ॥*

        *जो मनाप्रमाणे कुठेही वाऱ्याच्या वेगाने भ्रमण करु शकणारा वेगवान, ज्याने इंद्रियविजय प्राप्त केला आहे, बुद्धिवंतांमध्ये श्रेष्ठ वानरसेनेचा प्रमुख हनुमंताला मी शरण आलोय.*

        *हनुमानांला लाभले तसे रामनामाचे कवच आपणास लाभो. चिरंजीव रामभक्त हनुमान जन्मोत्सवाने आपली भक्ती व्दिगूणीत होवो, आपल्या जीवनात सर्व संकट निवारक हनुमान बळ लाभो हीच शुभेच्छा.. !!*


🌹⚜🌹🔆🙏🔆🌹⚜🌹


  *

कीलिबिल किलबिल पक्षी बोलती

 


माता अंजनी के लाल

 


सुप्रभात

 


आरोग्य संदेश कोहळा

 सर्व सभासदांना विनंती आहे की या व्हिडिओमध्ये जे काही दाखवले गेले आहे दररोज उठल्यावर सकाळी चहा पिणे बंद करून उपाशीपोटी वरील ज्यूस चे सेवन केले असता आपल्या जीवनामध्ये बरेचसे रोग कमी होण्यास मदत करते आणि त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व कृती करावी याने दहा ते पंधरा वर्षे आपले आयुष्य नक्की वाढते व शुगर बीपी आणि वजन कमी करण्या स खूप उपयोगी वस्तू आहे बाजारात आरामशीर बारा महिने मिळते ज्याला एश गार्ड म्हणतो ते म्हणजे दुसरे काही नाही आपण जे दुसऱ्याचं नजर लागू नये म्हणून आपल्या दरवाज्यात टा॑गतो ना *कोहळा* किंवा पांढरा भोपळा, भोपळ्या सरकत असते पण भोपळा नव्हे, व हे ज्यूस करतेवेळी अजिबात पाणी जास्त घालू नये ह्यामध्येच खूप प्रमाणात पाणी असते कृपया नोंद घ्यावी


पवनपुत्र

 


Featured post

Lakshvedhi