सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 2 April 2023
Saturday, 1 April 2023
कौशल्य विकास विभागातर्फे आयोजित रोजगारमेळाव्यात 8 हजार 322 पदांकरिता घेतल्या मुलाखती
कौशल्य विकास विभागातर्फे आयोजित रोजगारमेळाव्यात 8 हजार 322 पदांकरिता घेतल्या मुलाखती
मुंबई, दि. 1 : कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत नायगाव, दादर (पूर्व) येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध उद्योग, कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्थांनी त्यांच्याकडील 8 हजार 322 पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मेळाव्यात नोकरीइच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मेळाव्यात 30 उद्योग तथा कंपन्यांनी सहभाग घेतला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले.
नायगाव, दादर (पूर्व) येथील स्प्रिंग मिल कंपाउंड येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार कालिदास कोळंबकर, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या मेळाव्याला भेट देऊन पाहणी केली.
5 लाख रोजगार देण्याचे उद्दिष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा
मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात पाच लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात विविध कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील विविध रिक्त पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याचबरोबर मेळाव्यात विविध शासकीय मंडळेही सहभागी झाली. त्यांनी स्वयंरोजगारासाठी असलेल्या त्यांच्याकडील विविध कर्ज योजनांची माहिती यावेळी उमेदवारांना दिली.
0000
गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे
कुणी लिहिले आहे माहीत नाही पण खूप छान लिहिले आहे
*समाजाला वेळ द्यायचा कधी*
*वय 20* वर्षे - आता शिक्षण चालू आहे .
*25 वर्षे* -- नोकरीच्या शोधात आहे.
*30 वर्षे* -- लग्न करायचं आहे.
*35 वर्षे* -- मुलं लहान आहेत
*40 वर्ष* -- थोडं "सेटल" होऊ द्या.
*45 वर्षे* -- वेळच मिळत नाही हो.
*50 वर्षे* -- मुलगा / मुलगी दहावीला आहे.
*55 वर्ष*-- प्रकृती बरी नसते.
*60 वर्षे* -- मुलामुलींचे लग्न करायची.
*65-75 वर्षे* -- इच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.
*80 वर्ष*-- मेला.
17 दिवसाच्या आत सर्व प्रॉपर्टीवरून तुमचे नाव कमी
अरेच्चा
*समाजाला वेळ द्यायचं राहूनच गेले … !*
आपल्या मालकीच अस कांहीच नाही या जगात
बाकी
सर्व
इथेच
राहणार
आहे .
झाडू,
जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो,तोपर्यंत तो " कचरा " साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो *स्वतः"कचरा" होवून जातो.*
*त्यामुळे समाजात एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना मदत करा आज मला एक नवीन शिकायला मिळाले.*
मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .
मी विचारले *"काय भाव आहे ?*
त्यांनी सांगितले : *"60 रूपये किलो ."*
त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती. मी विचारले: *" याचा काय भाव आहे "*
तो बोलला : *"20 रूपये किलो"*
मी विचारले :"इतका कमी भाव .?
तो बोलला :"साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!!
पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे
तेव्हा मला कळाले
जो व्यक्ती *संगठन...समाज* आणि *परिवार* याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... अर्ध्याहून कमी होते...
कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण *परिवार, संघटन* आणि *मित्र* यांच्याशी सतत जोडून रहा...
समाजाला वेळ द्या.
काकडीचा रस - बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर !*
*काकडीचा रस - बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर !*
काकडी आपल्याला सर्वांना माहिती आहे. काकडीचा वापर कोशिंबीर आणि सलादमध्ये केला जातो. त्याचप्रकारे काकडीचा रस पिऊन तुम्ही आरोग्यासंबंधित अनेक फायदे मिळवू शकता.
काकडीमध्ये भरपूर न्यूट्रीशन असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात काकडीचा रस प्यायल्याने शरीरात दिवभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. त्यासोबतच काकडी शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्याचे महत्वाचे काम करते.
आता हवामानातील बदल दिसून येत असल्याने सकाळी आणि रात्री थंडीचा अनुभव तर दुपारच्या वेळी उष्णतेचा त्रास होत असल्याने, अशा वेळेस स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी काकडीचा रस पिणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा (Blood Pressure) त्रास खूप जास्त होत असले तर काकडीचा रस बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच काकडीचा रस पचनासाठीदेखील फायदेशीर आहे.
संकलन-
डॉ. प्रमोद ढेरे,
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
सेपक टेकरा खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार
सेपक टेकरा खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार
- उपमुख्यमंत्री
33 व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा नागपूरात थाटात शुभारंभ
नागपूर, दि.1 :- देशात सेपक-टेकरा या खेळाची पाळेमुळे प्रथम नागपूरात रुजली आहेत. नागपूरमध्ये रुजलेला खेळ देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देत असेल तर या खेळाचे पालकत्व घ्यायला निश्चित आनंद होईल. या खेळाचे प्रशिक्षण, त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
33 व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ विभागीय क्रीडासंकुल, मानकापूर येथे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. पोलीस आणि सीमासुरक्षा दलाचे दोन संघ या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले आहे. 1 ते 5 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा सुरु राहणार आहे. पायाने चेंडू टोलवत खेळला जाणारा हा खेळ शारीरिक तंदुरुस्तीची परीक्षा घेणारा आहे. पश्चिम आशियाई देशांमध्ये प्रामुख्याने हा खेळ खेळला जातो. भारतामध्ये नागपूर शहरात हा खेळ रुजला आहे. नागपूरने या खेळात अनेक राष्ट्रीय खेळाडू दिले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर या खेळाची भारतातील जननी आहे. त्यामुळे निश्चितच या खेळाच्या लोकप्रियतेसाठी आणि प्रशिक्षणासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न केले जातील. राष्ट्रीय स्तरावरील आयोजक व स्थानिक स्तरावरील आयोजक यांनी एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी सुचविले. यावेळी स्पर्धक खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. “ या स्पर्धेत प्रत्येकाने आपले राज्य जिंकावे यासाठी प्रयत्न करा आणि जेव्हा देशासाठी खेळाल त्यावेळी तिरंग्याचा सन्मान राखा,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी सेपक-टेकरा खेळाला नागपूरमध्ये पालकत्व देण्याची घोषणा केली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सेपक टेकरा फेडरेशनचे राष्ट्र्रीय उपाध्यक्ष डॉ. योगेंद्र सिंह दाहिया, सचिव श्री विरेगोडा, महाराष्ट्राचे प्रमुख विपीन कामदार, सचिव डॉ. योगेंद्र पांडे, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, आयोजक डॉ. अमृता पांडे यांच्यासह या खेळातील मान्यवर खेळाडू उपस्थित होते.
अजमोदादि चूर्ण.....*vatvikaravar प्रभावी
*अजमोदादि चूर्ण.....*
.... आयुर्वेदात. वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळ्या प्रकारची चूर्णे तयार केलि जातात.. त्यापैकी एक महत्वाचे चूर्ण..अजमोदादि चूर्ण आहे.. अनेक प्रकारच्या. वनस्पतीची मुळे, पाने, फूले वापरून हे केलं जातं..
...... अजमोदा विडंगानि सैंधवं देवदारूच..चित्रक पिप्पलिमूलं शतपुष्पा च पिप्पली...
मरिचं चेति कर्षांशं प्रत्येकं कारयेद्बुध...कर्षास्तु पंच पथ्याया दंश स्युव्रुध्ददारुकात्...
( शारंगधर संहिता)...
वातावरणातील बदल झाला कि,. कफ वाढतो, अशा वेळी अजमोदादि चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो. गॅस झाल्यामुळे पोटाला फुगीर पणा येतो, जडत्व येतं, तेव्हा हे चूर्ण घेतल्यास आराम मिळतो,.. संधिवात आमवात गुडघेदुखी कंबरदुखी, हे सर्व वाताचे विकार आहे. आणि. चाळिशीच्या आसपास हे त्रास उद्भवतात,. रूग्णांना उठणे बसणे कठीण होऊन बसते, अजमोदादि चूर्ण या सर्व त्रासांवर अगदी.. रामबाण उपाय.. आहे. सायटिका, गाउट. हे वातविकार हे चूर्ण पाण्यासोबत
... घेतल्यास आराम मिळतो...
.. यातील घटक...अजमोद.फळे, वावडिंग, सैंधव मीठ, देवदारू, चित्रक, पींपळी, , मूळ..शतपुष्पा, मरिच व्रुद्धदारूक,नागर सुंठि.शतपुष्पा, हिरडे,..
....... मुख्यत्वे हे चूर्ण.. वातविकारावर.. उत्तम कार्य करते...
सुनिता सहस्रबुद्धे....
*
World Shitoryu Karate-Do Federation
World Shitoryu Karate-Do Federation
Kata, Technical Seminar & Dan Grading at NGV Builders Club on 1st April 2023.
Conducted by
*Kaicho Genzo Iwata*
President
World Shitoryu Karate-Do Federation &
Shitokai of Japan Karate-Do Federation.
Assisted by:
*Kyoshi Ramalingam*
President Dubai Karate Federation,
*Shihan Sasidharan*
Technical Chairman
*Shihan Rahul S.Tawde*
General Secretary
All India Shitoryu Karate-Do Union &
Japan Shitoryu K
arate-Do, India
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...







