*अजमोदादि चूर्ण.....*
.... आयुर्वेदात. वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळ्या प्रकारची चूर्णे तयार केलि जातात.. त्यापैकी एक महत्वाचे चूर्ण..अजमोदादि चूर्ण आहे.. अनेक प्रकारच्या. वनस्पतीची मुळे, पाने, फूले वापरून हे केलं जातं..
...... अजमोदा विडंगानि सैंधवं देवदारूच..चित्रक पिप्पलिमूलं शतपुष्पा च पिप्पली...
मरिचं चेति कर्षांशं प्रत्येकं कारयेद्बुध...कर्षास्तु पंच पथ्याया दंश स्युव्रुध्ददारुकात्...
( शारंगधर संहिता)...
वातावरणातील बदल झाला कि,. कफ वाढतो, अशा वेळी अजमोदादि चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो. गॅस झाल्यामुळे पोटाला फुगीर पणा येतो, जडत्व येतं, तेव्हा हे चूर्ण घेतल्यास आराम मिळतो,.. संधिवात आमवात गुडघेदुखी कंबरदुखी, हे सर्व वाताचे विकार आहे. आणि. चाळिशीच्या आसपास हे त्रास उद्भवतात,. रूग्णांना उठणे बसणे कठीण होऊन बसते, अजमोदादि चूर्ण या सर्व त्रासांवर अगदी.. रामबाण उपाय.. आहे. सायटिका, गाउट. हे वातविकार हे चूर्ण पाण्यासोबत
... घेतल्यास आराम मिळतो...
.. यातील घटक...अजमोद.फळे, वावडिंग, सैंधव मीठ, देवदारू, चित्रक, पींपळी, , मूळ..शतपुष्पा, मरिच व्रुद्धदारूक,नागर सुंठि.शतपुष्पा, हिरडे,..
....... मुख्यत्वे हे चूर्ण.. वातविकारावर.. उत्तम कार्य करते...
सुनिता सहस्रबुद्धे....
*
No comments:
Post a Comment