Monday, 27 March 2023

जगातील सर्वश्रेष्ठ आई'चा पुरस्कार मिळालेला भारतीय पुरुष......!

 'जगातील सर्वश्रेष्ठ आई'चा पुरस्कार मिळालेला भारतीय पुरुष......!!


      मागील संपूर्ण आठवडा विविध माध्यमातून महिलांच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव करीत काल ८ मार्च रोजी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या महिलांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या अस्तित्वाला बळ देण्यासाठी "जागतिक महिला दिन " म्हणून साजरा केला गेला. 'जागतिक महिला दिना'च्या निमित्ताने वर्तमानपत्र, सोशल मिडियांचे रकाने महिलांच्या गुणगौरवाने भरलेले होते. देशभरात त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले. त्यात महिलांना शुभेच्छा देत अनेक पुरस्कार दिले व घेतले गेले. यासर्व पुरस्कार समारोहात वेगळा आणि त्याची दखल विविध वर्तमानपत्रांनी घ्यावी असा समारोह म्हणजे बेंगळुरू येथे संपन्न झालेला 'वेमपावर'. या समारोहात "बेस्ट माॅम आॅफ द वर्ल्ड " हा खिताब जाहीर करण्यात आला तो एका पुरुषाला. बेस्ट माॅम म्हटले की, ह्या पुरस्काराची मानकरी महिलाचं असेल असे वाटत असतांनाच तो एका पुरुषाला म्हणजेच पुणे शहरातील आदित्य तिवारी यांना जाहीर झाला.

       आदित्य तिवारी हे सिंगल पॅरेंट असून २०१६ मध्ये २२ महिन्याच्या अवनिशला त्यानी दत्तक घेतले. मुल दत्तक घेतांना कोणताही पालक सुदृढ बाळाची निवड करेल, पण आदित्य यांनी चक्क डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाची निवड केली. डाऊन सिंड्रोम हा मुलांमध्ये मतिमंदत्व आणणारा आजार असतो. हा आजार असलेल्या मुलांना काळजीपूर्वक जपावं लागतं. अशा मुलाला एक सिंगल पॅरेंट म्हणून मोठा कायदेशीर आणि सामाजिक लढा आदित्यला द्यावा लागला व शेवटी त्याची ममता जिंकली. साधारण दीड वर्षाच्या संघर्षानंतर १ जाने. २०१६ रोजी आईने अनाथालयात सोडलेल्या अवनिशला आदित्यला घरी आणता आले. दत्तक कायदा व समाजाप्रमाणे त्याला घरातूनही विरोध झालाच. परंतू अवनिशला आईची कमतरता न भासू देणा-या आदित्यमधील ममता यासर्व विरोधांना बाळगणारी नव्हती.

        आदित्य तिवारी एका सुप्रसिद्ध आयटी कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. परंतू अवनिशचे पालकत्व स्विकारल्यानंतर त्याच्या काळजीपोटी त्याने नोकरीवर पाणी सोडत 'स्पेशल' मुलांच्या आई-वडिलांना मार्गदर्शन, समुपदेशन व त्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. हे करत असतांना त्याला लक्षात आलं की, भारतात बौद्धिक अपंगत्वासाठी वेगळा विभागाचं नाही. सरकार अशा मुलांना अपंगत्वाचं प्रमाणपत्रही देत नाही. करीता आदित्याने आॅनलाइन याचिका दाखल केली. परिणामी आज सरकारकडून स्पेशल मुलांसाठी वेगळा विभाग तयार करण्यात आला असून अशा मुलांसाठी प्रमाणपत्रही देण्यात यायला लागली आहेत.

      'सिंगल पॅरेटिंग' हे काही लिंग आधारित काम नाहीच असे म्हणणारा आदित्य त्याच्या या प्रवासाबद्दल, " ईश्वराने दिलेल्या भेटीमध्ये तो माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ भेट आहे. यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो." असा सहज साक्षात्कारात बोलून जातो. आदित्याने स्वत:ला कधीच कोणत्याही भूमिकेत टाकण्याचा प्रयत्न केला नाही...ना आई, ना बाबा... तो नेहमीच एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करीत होता. एक चांगला पालक कसे बनायचं हे अवनिशने 'एक पालक' म्हणून आदित्याचा स्वीकार करीत शिकवलं.

        आजपर्यंत आदित्य आणि अवनिश यांनी मिळून २२ राज्यांची सफर केली असून जवळजवळ ४०० ठिकाणी कार्यक्रम व कार्यशाळा घेतल्या आहेत. याखेरीज ते जगभरातील दहा हजारांहून अधिक पालकांशी जोडले गेले आहेत. मानसिकरीत्या असमर्थ असणा-या मुलांचा सांभाळ करण्याच्या पध्दतीबद्दल बोलण्यासाठी आदित्यला संयुक्त राष्ट्राच्या एका संमेलनात विशेष आमंत्रित करण्यात आले होते. केवळ एक महिलाच बाळाचा सांभाळ करु शकते अशी आपल्याकडे मान्यता असतांना आपल्या 'स्पेशल' मुलाचा आदित्याने, एका सिंगल पॅरेंटने काळजी घेतली आणि म्हणूनच आदित्य तिवारींच्या या कर्तुत्वाची दखल घेत नुकत्याच पार पडलेल्या बेंगळुरु येथील वेमपावर या 'जागतिक महिला दिना'च्या समारोहात "जगातील सर्वश्रेष्ठ आई " या किताबानं एका पुरुषाला गौरविले.


🙏🙏

Idea

 


जीवन ऐसे कैसे

 





[



Wobderful Life

: Nice relationships are 

like breathing-air; we 

can never see them,

but we'll always feel &

need their presence.

.

🌹 

: *Relations are not an exam to pass or fail.*

*Nor its a competition to win or lose*.

*Its a feeling that you care for someone more than yourself !*

: *Thought of the day..।* 

 

*Put your Heart, Mind*

*and Soul Into your...!!*

*Smallest Act. This is* 

*The secret of your*

*....Success....!!**:                                          *Don't look for someone                                who will solve all your problems               .Look for someone                                         who won't let you face them alone.*

           🌹🌹🌹🌹🌹

        *Good Morning*

   **

ज्यांच्या घरी वाय-फाय आहे व घर स्वतंत्र आहे, अलर्ट

 forwarded. *ज्यांच्या घरी वाय-फाय आहे व घर स्वतंत्र आहे, बहुधा वरच्या मजल्यावरील फ्लॅटला हे शक्य होणार नाही, तरी काळजी आवश्यक, त्यांनी हा लेख अवश्य वाचावा.*


*अकल्पित घडलेली सत्य घटना -*


माधवीने आणलेल्या गरम चहाचा घोट घेत विजयने आताच आलेले ताजे वर्तमानपत्र उघडले. आज रविवार असल्यामुळे ऑफिसला जाण्याची गडबड नव्हती. माधवी स्वयंपाकघरात पोह्यांसाठी कांदा चिरत होती. 

विजय एक बडा सरकारी अधिकारी. रिटायरमेंटला अजून दोन वर्षे बाकी होती. माधवी गृहिणी, पण वर्षभरापासून मुलगी जान्हवी लग्न होऊन अमेरिकेत आणि मुलगा निखिल नोकरीनिमित्त बंगळुरूला असल्यामुळे ती आपला बराचसा वेळ एका संस्थेच्या समाजकार्यासाठी देत होती. 

विजयने पेपरचे पान उलटले आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्याने उठून दार उघडले. दारात तीन व्यक्ती उभ्या होत्या. "कोण हवंय आपल्याला?" विजयने विचारले. "मी इन्स्पेक्टर शिंदे, हे आमचे सायबर क्राइम सेल ऑफिसर दीक्षित आणि हे हवालदार कदम", इन्स्पेक्टर शिंदेंनी दोघांकडे निर्देश करत सांगितले. "काय झालंय इन्स्पेक्टर?" प्रश्नांकित चेहरा करुन विजयने विचारले. एव्हाना माधवी बाहेर आली होती. "तुम्हाला आमच्याबरोबर पोलिसस्टेशनला चौकशीसाठी यावे लागेल." इन्स्पेक्टर म्हणाले. "का? काय झाले?", विजयने विचारले. "दिल्लीच्या एका व्यापाऱ्याच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून काही परदेशी शॉपिंग साईट्सवरून ऑनलाईन खरेदी करण्यात आली आहे - सुमारे साडेचार लाखांची." इन्स्पेक्टरने माहिती दिली. "पण यात माझा काय संबंध?" विजयला कळत नव्हते की इन्स्पेक्टर हे सगळं आपल्याला का सांगताहेत. विजय आणि माधवी दोघेही गोंधळलेल्या चेहऱ्याने त्या तिघांकडे आलटून पालटून पाहत होते. "तुम्हाला चौकशीसाठी यावे लागेल, कारण यांत तुमच्या वाय फाय नेटवर्कचा वापर केला गेला आहे आणि हा एरिया आमच्या पोलिस स्टेशनच्या अखत्यारीत येत असल्याने दिल्ली पोलिसांनी ही कम्प्लेंट आम्हाला वर्ग केली आहे." दीक्षितांनी पुस्ती जोडली. विजय आणि माधवी दोघांच्या पायांखालची जमीन सरकल्यासारखी झाली. काय करावं, काय प्रतिक्रिया द्यावी, त्यांना कळेना. त्याही अवस्थेत विजय माधवीला धीर देत म्हणाला, "मी जाऊन येतो, बघतो काय झाले आहे ते. काळजी करू नकोस." आणि तो त्या तिघांबरोबर बाहेर पडला. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर शिंदे आणि सायबर सेल ऑफिसर दीक्षित या दोघांसमोर विजय बसला होता. 

दीक्षितांनी सांगितल्याप्रमाणे शुक्रवारच्या रात्री एक-दीड वाजण्याच्या सुमारास त्याचे वायफाय नेटवर्क वापरून दिल्लीच्या आलोक शर्मा या व्यापा-याच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून पाच सहा विदेशी शॉपिंग साइट्सवरून ऑनलाइन खरेदी करण्यात आली होती. वायफाय नेटवर्क त्याच्या नावे असल्याने या प्रकाराला तोच नैतिक जबाबदार ठरत होता. "हे कसे शक्य आहे? आमच्या घरी फक्त मी आणि माझी पत्नी असे दोघेच असतो आणि रात्री साडेनऊला तर आमची निजानीज झालेली असते. त्या दिवशी आमच्याकडे कोणीसुद्धा आलेले नव्हते, मग...?" "मिस्टर विजय जोशी..", त्याला मध्येच तोडत दीक्षित म्हणाले, "आम्हाला कळतंय की हे काम तुमचे नाही." त्या नंतर दीक्षितांनी हा सर्व प्रकार विजयला कळेल अशा सविस्तरपणे समजावून सांगितला. 

या प्रकाराला 'वॉर ड्रायव्हिंग' असे म्हणतात. यात सायबर गुन्हेगार कार किंवा कुठलेही वाहन घेऊन रात्री बाहेर पडतात. सोबत लॅपटॉप किंवा कुठलेही स्मार्ट डिव्हाइस ठेवतात. त्यावर 'एअरक्रॅक'सारखे सॉफ्टवेअर आणि वायरलेस ॲडाप्टर, वायफाय पासवर्ड क्रॅक करण्यासाठी लावलेले असते. एकदा का स्ट्राँग सिग्नलचे वायफाय नेटवर्क मिळाले आणि त्याचा पासवर्ड क्रॅक झाला की, ते वायफाय नेटवर्क वापरण्यासाठी उपलब्ध होते. ते वापरून सायबर गुन्हेगारी कारवाया केल्या जातात. हे गुन्हेगार स्वतःचा ट्रेस लागू न देण्यासाठी एक खास प्रकारचे ब्राउझर वापरतात. त्यामुळे ते सहजासहजी पकडले जात नाहीत. मात्र ज्याच्या वाय फाय नेटवर्कचा वापर केला गेला असेल, ती व्यक्ती संकटात येऊ शकते. विजयच्या केसमध्ये नेमके हेच झाले होते. स्ट्राँग पासवर्ड आणि फारसे सिक्युर्ड वायफाय नेटवर्क नसल्याने हे घडले होते. बिचाऱ्याची काही चूक नसतांना तो नाहक गोवला गेला होता. थोडीशी बेपर्वाई त्यांच्या अंगलट आली होती. दोन महिने खटला चालला. विजयवर डेबिट कार्डच्या गैरवापराचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही, पण त्याला वायफाय नेटवर्कच्या बेजबाबदार वापराबद्दल दंडाची मोठी रक्कम भरावी लागली. दरम्यान काही दिवस त्याला नोकरीतून निलंबित राहावे लागले. 

मित्र मैत्रिणींनो, तुमच्यापैकी बहुतेकजण घरात वायफाय नेटवर्क वापरत असाल तर काही नियम जरूर पाळा, तुमच्या वायफाय नेटवर्क सर्व्हिस इंजिनीअरला सांगून WPA इन्क्रिप्शनचा वापर करा. स्ट्राँग पासवर्ड लावा. शक्यतो रात्री किंवा वायफाय वापरांत नसल्यास राऊटर बंद करून ठेवा. घरातले नेहमीच्या वापरातले लॅपटॉप, स्मार्ट डिव्हाइसेस फक्त तुमच्या वायफाय नेटवर्कचा वापर करू शकतील, अनोळखी डिव्हायसेसला वायफाय नेटवर्क स्वीकारणार नाही, अशी सेटिंग सुद्धा तुम्ही करू शकता... 

तर सावध आणि सजग राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या...

✍🏻

*कविता दातार.*

*सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट.*

शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य आणि अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवा !

 शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य आणि अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवा !


सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन


लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घातली पत्राद्वारे साद !


साडेतीनशे वर्षानिमित्त शासनाकडून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन


 


मुंबई, ता. ३: पारतंत्र्याच्या अंधकारातून स्वराज्याच्या प्रकाशाकडे महाराष्ट्राला आणि देशाला घेवून जाणाऱ्या ऐतिहासिक आणि तेजोमय शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत अर्थात या वर्षी हा सोहळा 350 वर्षात पदार्पण करत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात येणारा शिवराज्याभिषेकाचा ३५० वा वर्धापनकाळ राज्याचा सांस्कृतिक विभाग शिवराज्यभिषेक महोत्सव म्हणून साजरा करणार असून हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यादृष्टीने राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी कल्पक सूचना कळवाव्यात असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.


यासंदर्भात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी भावनिक आवाहन करणारे एक पत्र राज्यातील खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, महापौर, नगराध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी व इतर अधिकारी पदाधिकारी आदींना पाठविले आहे.


या पत्रात ना. मुनगंटीवार यांनी आर्त साद घालताना म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा पराक्रम,महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची दुर्दम्य आकांक्षा,महाराष्ट्राच्या शौर्याचे तेजस्वी प्रतिक आहेत.


बलाढ्य मोगल सत्तेशी युक्ती आणि बुद्धीने लढत महाराजांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण करीत स्वराज्याची स्थापना केली.हा सगळा संघर्षपूर्ण कालखंड म्हणजे महाराजांच्या अद्भुत प्रतिभेचा,दिव्यत्वाचा,अफाट सामर्थ्याचा साक्षात्कार होय.सर्वसामान्य मावळ्यांच्या बळावर आणि विश्वासावर झालेली ही वाटचाल म्हणजे भावी पिढ्यांसाठी कोरल्या गेलेली प्रेरणागाथाच होय.ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला.केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर साऱ्या देशाच्या दृष्टीने ही एक असाधारण गोष्ट होती,एक सुवर्णक्षण होता .या क्षणाने मराठी माणसाच्या आयुष्यात नवीन पहाट उगवली,सामान्य माणसांच्या शक्तीने मदांध सतेला आव्हान दिल्या जावू शकते हा विश्वास महाराष्ट्रीयांच्या मनात रुजवल्या गेला,अनेक शतकांचे दास्य निखळून पडले आणि महाराष्ट्र धर्माची पुनःस्थापना झाली.या क्षणाने महाराज छत्रपती झाले,शिवराज्यभिषेक शकाचा प्रारंभ झाला,महाराजांच्या दिग्विजयाची आणि मराठा साम्राज्याची ख्याती सर्वत्र निनादू लागली.


सन २०२३-२०२४ या वर्षात शिवराज्याभिषेक शक ३५० हा येत आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी चालू वर्षात २ जून रोजी येत असून २०२४ मध्ये ही तिथी २० जून रोजी येत आहे. तेंव्हा दिनांक २ जून २०२३ पासून २० जून २०२४ या काळात शिवराज्यभिषेक महोत्सव साजरा करण्यात येईल.


       या महोत्सवाच्या आयोजनाने महाराजांचे कृतज्ञ स्मरण करणे ,त्यांच्या असाधारण कर्तुत्वाचा जागर करणे,त्यातून निर्माण होणार्या उर्जेतून सत्कार्याची वाट उजळणे हा दैवी योग तर साध्य होईलच पण यासह नव्या पिढीपर्यंत महाराजांचा हा पराक्रमी वारसा पोहोचेल आणि त्यातून प्रेरणा घेत नवी पिढी सर्वच क्षेत्रात आपल्या प्रतिभेने अग्रेसर राहिल असा विश्वास वाटतो. शिवराज्यभिषेक महोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन या संपूर्ण वर्षामध्ये विविध प्रकारचे उपक्रम हाती घेत आहे.


नवनवीन कल्पनांना साकार करून समाजाला गतिशील राखण्यात आपण सतत कार्यरत राहिला आहात. शिवराज्यभिषेक महोत्सव हा अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा करण्याच्या दृष्टीने आपण सूचना कळविल्यास त्या बहुमोल ठरतील असेही ना. मुनगंटीवार यांनी या पत्रात म्हटले आहे.


min.culture@maharashtra.gov.in यावर किंवा त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयातसूचना पाठविल्यास शासनातर्फे त्यांचा अवश्य विचार करण्यात येईल असेही आवाहन त्यांनी केले आहे.

अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहुन 29 मार्च रोजी जाणार काष्ठ

 अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहुन 29 मार्च रोजी जाणार काष्ठ

देशातील सर्वोत्तम सागवान काष्ठ दिल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने मानले आभार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंदिर महासचिवांचे पत्र

 

मुंबई, दि. 25 मार्च 2023 :  


चंद्रपूर जिल्ह्यात सापडणारे सागवान काष्ठ देशात सर्वोत्तम आहे. या सागवान काष्ठचा अयोध्येत निर्माणाधीन श्रीराम मंदिरासाठी पुरवठा केल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह वने, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहे.


श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी यासंदर्भात ना. मुनगंटीवार यांना सविस्तर पत्र पाठविले आहे. विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. तेव्हापासून श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य वेगाने सुरू आहे. सुमारे एक हजार वर्ष श्रीराम मंदिराची वास्तू उभी राहावी, यासाठी वास्तूतज्ज्ञांच्या मदतीने मंदिराची इमारत उभारण्यात येत आहे. यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मंदिराच्या महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजे यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज आहे.


निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र मिश्र यांनी उत्तराखंडमधील देहराडून येथे असलेल्या फॉरेस्ट रिसर्च इंस्टिट्यूटशी संपर्क साधल्यानंतर त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान भारतात सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर येथील सागवान काष्ठाच्या काही नमुन्यांची ट्रस्टचे अभियंता तथा लार्सन अॅन्ड टुब्रो टीसीईच्या अभियंत्यांनी चाचणी घेतली. चाचणीत हे काष्ठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मंदिर निर्माण समितीने ना.श्री. मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठ पुरविण्याची मागणी केली होती. ना. श्री. मुनगंटीवार यांनी या विषयात व्यक्तीश: लक्ष घालत सर्वोत्तम दर्जाचे सागवान काष्ठ अयोध्येला पाठविण्याकरीता नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधीकाऱ्यांना दिल्या.


सागवानचे हे काष्ठ दि.29 मार्च 2023 रोजी विधीवत पूजा करून आणि शोभायात्रा काढत अयोध्येकडे रवाना होणार आहे. यासंदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला माहिती मिळताच ट्रस्टने ना. श्री. मुनगंटीवार यांना तातडीने पत्र पाठवत या कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे.


लाकडावर करणार नक्षीकाम व कोरीवकाम


चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा डेपोतून श्रीराम मंदिरासाठी मिळणाऱ्या लाकडावर अभियंते व कलावंत नक्षीकाम करणार आहेत. सागवानचे हे काष्ठ ना. श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शुभहस्ते अयोध्येकडे प्रस्थान करावे, अशी विशेष विनंतीही श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी पत्रात केली आहे.


असा असेल काष्ठपूजन सोहोळा


चंद्रपूर जिल्हा हा देशातील घनदाट वने असलेला आणि खनिज संपत्तीने समृद्ध जिल्हा आहे. देशातील सर्वात जास्त वाघ याच जिल्ह्यात आहेत. रामायणकालीन सुप्रसिद्ध दंडकारण्यात वसलेल्या या जिल्ह्याला अगदी रामायण काळापासूनचा इतिहास आहे. त्यामुळेच नैसर्गिक साधनसंपत्तीसोबतच अतिशय समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरांचा वारसाही चंद्रपूरला लाभला आहे. इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यातही चंद्रपूर जिल्हा अग्रेसर होता. अशा या चंद्रपूरमधून देशाच्या अभिमानाचे केंद्र ठरलेल्या अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उभारणी करिता अत्यावश्यक सागवान मागवले गेले आहे, ही अतिशय अभिमानाची आणि समाजातील श्रीरामभक्तीला उजळवणारी बाब आहे. त्यामुळेच चंद्रपूरहून श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठीचे सागवान काष्ठ हे विधिवत पूजन करून भव्य शोभायात्रेने वाजत गाजत रवाना करण्यात येणार आहे.


ही शोभायात्रा दोन भागात होणार असून दि. 29 मार्च रोजी बल्लारपूर येथे दुपारी 3.30 वाजता काष्ठ पूजन आणि आरती होऊन सायं.4 वा. पहिल्या शोभायात्रेची सुरुवात होईल. येथे राम लक्ष्मण नावाचे दोन प्राचिन वृक्ष आहेत. त्यांचा घेर देशातच नव्हे तर बहुदा आशियातील सर्व वृक्षात सर्वात मोठा आहे. या वृक्षांचे पूजन यावेळी करण्यात येईल.


 ही शोभायात्रा सायं .6 वा. संपेल आणि त्याच वेळी चंद्रपूर येथे महाकाली मंदिरातून दुसरी शोभायात्रा सुरू होईल. चंद्रपूर येथील शोभायात्रा रात्रौ 9 पर्यंत चालेल.


या शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे मनोहरी सादरीकरण करण्यात येणार असून, एकूण 43 प्रकारच्या लोककला, रणवाद्य, योग मल्लखांब, दिंडी, लेझीम, आदिवासी कलाप्रकार, ढोलपथके, ध्वजपथके यांचे सादरीकरण या शोभायात्रेत करण्य़ात येणार आहे. यात कोकणातील दशावतार पासून गणगौर, तारपा, असे सर्वदूरचे कलाप्रकार असतील. स्थानिक एक हजार तर महाराष्ट्रभरातून 1100 असे एकूण 2100 कलाकार हे सादरीकरण करणार आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवार आधारित विविध सादरीकरणे भारतभरातून विविध प्रांतातून आलेले कलाकार करणार आहेत.


प्रत्येक चौका चौकात विविध कलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शोभायात्रेत पूजन केलेल्या काष्ठांवर घराघरातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. शोभायात्रा मार्ग रंगोळ्यांनी सजविण्य़ात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनीं गुढ्या तोरणे उभारण्यात येणार आहेत. 


या शोभायात्रेत दिल्लीतील कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक संचलनात पारितोषिक प्राप्त महाराष्ट्राचा “नारीशक्ती – साडॆतीन शक्तीपिठे” हा चित्ररथ आणि उत्तर प्रदेशचा प्रजासत्ताक दिन संचलनातील चित्ररथही सहभागी होणार आहेत.


काष्ठ वाहून नेणाऱ्या रथाच्या भोवती कलकारांचे रिंगण राहिल. हा चित्ररथ श्रीराम मंदिरात पोहोचल्यावर ही शोभायात्रा चांदा चौकात संपन्न होईल.


शोभायात्रेनंतर रात्री 10 ते 12 या वेळेत कैलास खेर यांच्या गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्य़ात आला आहे. या कार्यक्रमात श्रीरामभक्तीची विविध गीते सादर करण्यात येतील.


या काष्ठ पूजन सोहॊळा आणि शोभायात्रेत दूरदर्शनच्या रामायण मालिकेतील कलाकार अरूण गोवील, दीपिका, सुनील लहरी यांच्यासह हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठे कलाकार उपस्थित राहणार आहेत. या शोभायात्रेकरिता योगगुरू श्री. स्वामी रामदेव बाबा तसेच सद्गुरू श्री जग्गी वासुदेव आणि श्रीश्री रवीशंकर यांनाही सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात येत आहे.


ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व खासदारांना आणि आमदारांना तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांना या भव्य काष्ठपूजन सोहोळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. उत्तर प्रदेशचे अनेक मंत्री आणि खासदार व आमदार यांनाही या सोहोळ्यासाठी निमंत्रित केले आहे.


या काष्ठपूजन सोहोळ्याच्या निमित्ताने चंद्रपुरातील घरोघरी दहा हजार श्रीराम जपाच्या वह्या वाटल्या असून एक कोटी श्रीरामनाम जपाचा संकल्प करण्यात आला आहे.


देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पुनरूभारणीत अनेकांचे हात लागले आहे आहेत. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडून श्रीराम ही काष्ठार्पण सेवा करवून घेत आहे, अशी भावना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. या ऐतिहासिक क्षणाचे सर्व नागरिकांनी साक्षिदार व्हावे, काष्ठ पूजनात सहभाग घेऊन श्रीरामजन्मभूमी मंदिर उभारणीत आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहनही ना.श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.


 


 


 


 


 


 




Featured post

Lakshvedhi