Sunday, 26 March 2023

एका आठवड्यात गौण खनिज धोरण जाहीर करणार

 एका आठवड्यात गौण खनिज धोरण जाहीर करणार


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील


            मुंबई, दि. 25 : राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरिता एका आठवड्यात गौण खनिज धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खननाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री विखे पाटील म्हणाले की, गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पथके नेमण्यात आली असून या पथकाने एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत 662 प्रकरणात कारवाई करण्यात आली असून दंडात्मक रक्कम वसूल करून शासनस जमा करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय अवैधपणे दगड उत्खनन करून क्रशर चालविण्यात येत आहेत, अशा खडीक्रशरवर कारवाई करून बंद करण्यात आले आहेत असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.


००००

नागपूर जिल्हाधिकारी यांच्याकडून दस्त नोंदणी अहवाल मागविण्यात येईल

 नागपूर जिल्हाधिकारी यांच्याकडून दस्त नोंदणी अहवाल मागविण्यात येईल


 - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

            मुंबई, दि. 25 : दुय्यम निबंधक कार्यालय, नागपूर येथील दस्तातील अनियमितेबाबत दस्तनिहाय स्वतंत्र अहवाल जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडून मागविण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य विकास कुंभारे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे दस्त नोंदणीत अनियमितता असल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने याबाबत समिती गठीत केली आहे. या समितीचा अहवाल मागविण्यात येईल. तसेच दस्त नोंदणीबाबत विशेष शिबिर घेण्यात येईल.



मशिद आणि दर्ग्यांच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत मोजणी करून हद्द निश्चित करणार

 मशिद आणि दर्ग्यांच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत

मोजणी करून हद्द निश्चित करणार

- मंत्री शंभूराज देसाई.

            मुंबई, दि. 25 : मशिद आणि दर्गा यांच्या जागांवर सरकारी कार्यालये वा इमारतींचे अतिक्रमण झालेले नाही. मशिद आणि दर्गा यांच्याजवळ सरकारी कार्यालये असल्याने त्यांच्या हद्दी जवळ असल्याने काही तक्रारी असतील, तर संबंधित ठिकाणी जागेची मोजणी करून हद्दी निश्चित करण्यात येतील, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य अबू आजमी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            अहमदनगर शहरातील मशिद व दर्ग्यांच्या जागांसंदर्भात अतिक्रमण झालेले नाही, असे मंत्री श्री.देसाई यांनी स्पष्ट केले.

जिगाव प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता पाहून अतिरिक्त गावांचा लाभक्षेत्रात समावेश करण्यात येईल

 जिगाव प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता पाहून

अतिरिक्त गावांचा लाभक्षेत्रात समावेश करण्यात येईल


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 25 : जिगाव प्रकल्पात मोठी सिंचन क्षमता तयार करण्यात येत आहे. यामध्ये अधिक सिंचन क्षमता उपलब्धतेचे प्रमाणपत्र प्राप्त झाले तर मलकापूर विधानसभा मतदार संघातील 14 अतिरिक्त गावे या लाभक्षेत्रात समाविष्ट करुन त्यांना लाभ देता ये

लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध

 लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध

- राज्यपाल रमेश बैस.

            मुंबई, दि. 25 : लघु व मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाला आत्मनिर्भर बनविण्यात लघु व मध्यम उद्योग मोलाचे योगदान देत आहेत. सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने या उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.


            राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत लघु आणि मध्यम उद्योजकांची प्रमुख संघटना 'एसएमई चेंबर ऑफ इंडिया' या संस्थेचा ३० वा वर्धापन दिवस तसेच इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि. २५) मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. 


            कार्यक्रमाला एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, लार्सन अँड टुब्रोचे कॉर्पोरेट रणनीती व विशेष प्रकल्प अधिकारी अनुप सहाय, चेंबरचे कार्यकारी अधिकारी महेश साळुंखे तसेच राज्यातील विविध लघु व मध्यम उद्योग संस्थांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.


            यावेळी लघु आणि मध्यम उद्योजकांच्या 'इंडिया एसएमई लीडरशिप समिट' परिषदेला संबोधित करताना राज्यपालांनी कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणारे क्षेत्र लघु आणि मध्यम उद्योग हे असून या उद्योगांच्या माध्यमातून महिला तसेच समाजातील विविध उपेक्षित घटकांच्या हातांना रोजगार मिळत असल्याचे राज्यपाल श्री.बैस यांनी सांगितले. 


            लघु मध्यम उद्योग क्षेत्रातील अर्ध्याहून अधिक उद्योग ग्रामीण भागात असल्यामुळे ग्रामीण भागात समृद्धी आणण्याच्या कार्यात या उद्योगांचे योगदान मोठे आहे. तसेच उद्योगांच्या वाढीसाठी संशोधन आणि विकासाला महत्व असून महाराष्ट्र शासनाने या दृष्टीने अनेक उपाय योजना केल्या असल्याचे राज्यपाल यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी राज्यातील लघु मध्यम उद्योगांच्या वाटचालीचा आढावा घेतला. देशाला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यात लघु मध्यम उद्योग मोठी भूमिका बजावू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


            राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ उद्योजक प्रभाकर साळुंके (सुमित ग्रुप पुणे), डॉ सीमा सैनी (दालमिया शिक्षण समूह) व सुषमा चोरडिया (सूर्यदत्ता शिक्षण समूह) यांना 'प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्कार देण्यात आले. 


            युवा उद्योजक अर्पित सिद्धपुरा, ज्येष्ठ उद्योजक ललित चड्ढा, जितेंद्र पटेल, युसूफ कागझी, सोनीर शाह, उदय अधिकारी, विशाल मेहता यांसह २० उद्योजकांना 'इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी एसएमई चेंबरच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.


००००

Maharashtra Governor presents India SME Excellence Awards.

      Mumbai 25 : Maharashtra Governor Ramesh Bais addressed the India SME leadership Summit and presented the India SME Excellence Awards to successful small and medium entrepreneurs in Mumbai on Sat (25 Mar).


            The Summit and awards function was organised by the SME Chamber of India and the Maharashtra Industry Development Association on the occasion of the 30th Foundation Day of the Chamber.


            Founder Chairman of the SME Chamber of India Chandrakant Salunkhe, Head, Corporate Strategy and Special Projects Anup Sahay and heads of various small and medium entrepreneurs were present.


            The Governor released the Activity Report and launched the initiative of 'Entrepreneurship Development Council' on the occasion.


            The India SME Excellence Awards were presented to Arpit Sidhpura, Lalit Chadha, Jittendra Patel, Yusuf Kagzi, Sonir Shah, Uday Adhikari, Vishal Mehta among 20 others. The Governor also presented the Pride of Maharashtra to Prabhakar Salunke, Dr Seema Saini and Sushama Chordiya on the occasion.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित पुढील अधिवेशन 17 जुलै रोजी मुंबईत.

 विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

पुढील अधिवेशन 17 जुलै रोजी मुंबईत.

            मुंबई, दि. 25 : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. 17 जुलै 2023 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.


विधानपरिषद कामकाज


            विधानपरिषदेत प्रत्यक्षात 125 तास 20 मिनिटे कामकाज झाले. सरासरी कामकाज 6 तास 57 मि.झाले. सन्माननीय सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 91.22 टक्के होती तर सदस्यांनी एकूण सरासरी उपस्थिती 80.60 टक्के होती.


विधानसभा कामकाज


            विधानसभेत प्रत्यक्षात 165 तास 50 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 10 मिनिटे झाले. सन्माननीय सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 94.71 टक्के होती. तर एकूण सरासरी सदस्यांची उपस्थिती 80.89% होती.

विधानपरिषद कामकाज

 विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित


पुढील अधिवेशन 17 जुलै रोजी मुंबईत


 


            मुंबई, दि. 25 : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. 17 जुलै 2023 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.


विधानपरिषद कामकाज


            विधानपरिषदेत प्रत्यक्षात 125 तास 20 मिनिटे कामकाज झाले. सरासरी कामकाज 6 तास 57 मि.झाले. सन्माननीय सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 91.22 टक्के होती तर सदस्यांनी एकूण सरासरी उपस्थिती 80.60 टक्के होती.


विधानसभा कामकाज


            विधानसभेत प्रत्यक्षात 165 तास 50 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 10 मिनिटे झाले. सन्माननीय सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 94.71 टक्के होती. तर एकूण सरासरी सदस्यांची उपस्थिती 80.89% होती.

Featured post

Lakshvedhi