Sunday, 26 March 2023

स्मृतिगंध .....

 *स्मृतिगंध .....* 👌🏼👌🏼


मला आठवतंय,...

*खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !*

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा .... 👌😊🙋‍♀️ 

भरपूर उपभोगलं त्यामुळे.... उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात... कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची...

     

*आता तसं नाही...*

लहानपणीच खूप मोठी होतात मुलं ! 

खूप महाग झालंय बालपण.... !

    

*पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती,* 

फुल टाईम ' *आईच* ' असायची तेव्हा ती ......!

 *आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची* ....

  

*आता 'मम्मी' थोडी महाग झालीय* 

जॉबला जातेयं हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते....! 


मामा चे गाव तर राहिलच नाही ....

मामा ने सर्वाना मामाच बनवल....🤔

प्रेमळ मामा आणि मामी आता राहिलेच नाहीत पूर्वीसारखे....आधी मामा भाच्यांची वाट पहायचे ....

आता सर्वाना कोणी नकोसे झालाय ....

 *हा परिस्थितीचा दोष आहे* ...

   

*मित्र* सुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा... 

हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं *बट्टी* म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची....👍 शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात *ऑरेंज गोळी* गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी... !!!👍


*आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,* 

*"डोन्ट शेअर युअर टिफिन हं !"* 

मैत्री बरीच महाग झालीय आता. 

   

*हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते ....!!!* 


सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती.....


*घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना* पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ... 💪

इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे ....!!!

   

*ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं.....* 

फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची..... 

वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची.... 👍


*आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय,* 

ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !

   

एवढंच काय, तेव्हाचे 

*आमचे संसार सुद्धा किती स्वस्तात पार पडले....* 

शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो. .. 😊

सकाळी फोडणीचाभात/पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड... !!

 रात्री गरम खिचडी, की झाला संसार... 😊

 ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची..... 


*आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं ....!!* 

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय आपण ...., मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं .....!! 

   

*कालपरवापर्यंत मरण तरी स्वस्त होतं.....* 

पण आता ....

 तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय....😔

    

*म्हणून म्हणतोय... जीव आहे तोवर भेटत रहायचं.. आहोत तोवर आठवत रहायचं......* 

नाहीतर आठवणीत ठेवायला सुद्धा कोणी नसणार ....ही जाणीव पण झाली तर रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल हो..

म्हणून जमेल तेवढे नातेवाईक किंवा मित्र गोळा करून ठेवा .... 😊

नाहीतरी ह्या *स्मृतीगंधा* शिवाय आहे काय आपल्याजवळ.. हो ना .....!!!


🌹 😊 💖 😊 🌹 🙋‍♀️

निकष पात्र सर्व आदिवासी जमातींना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण

 निकष पात्र सर्व आदिवासी जमातींना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण


- आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित


            मुंबई, दि. २५ : राज्यात १ लाख ८ हजार ७५९ आदिवासींना जात वैधता प्रमाणपत्र दिले गेले आहे. निकष पात्र करणाऱ्या सर्व आदिवासी जमातींना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य समाधान अवताडे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री डॉ. गावित म्हणाले की, लोकसंख्येच्या प्रमाणात जिथे आवश्यक आहे, तिथे जात पडताळणी कार्यालय उघडले आहेत.जात वैधता समितीची संख्या सातत्याने वाढविण्यात आली आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत सोलापूर जिल्ह्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणीबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

जब जब लोग परेशान हो जाते हैं, काफ़ी हद तक इंसान हो जाते है

 *☝जब जब लोग परेशान हो जाते हैं, काफ़ी हद तक इंसान हो जाते है.*👏 

*🌹हरीओम🌹* 


*👉Never apply any terms & conditions in ur Relations Otherwise Relations will be changed into *CONTRACTS.*

*🌹 🌹*


*☝रिश्ते मुनाफ़ा नहीं देते. मगर ज़िन्दगी को अमीर बना देते हैं 👀* 

*🌹जय हो🌹* 


*👇People don't lack strength often what they lack is willpower will to build new habits will to break old habits👆*

*🌹Have A Wonderful Day 🌹*

जीवन गाणे

 









मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजनापोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा

 मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजनापोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 25 : राज्यातील मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.


            मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली.


या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ. सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, मातंग समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.


            मातंग समाज योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यांमध्ये जनजागृती शिबीरे आयोजित करावी. समाजाच्या विविध मागण्यांबाबत संघटनांसोबत जिल्हानिहाय बैठका घेवून समस्या सोडवाव्यात. योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्यांची यादी तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले.


            सद्यस्थितीत मातंग समाजाच्या विकासाच्या योजनांसाठी निधी उपलब्ध आहे. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, रोजगार व स्वयंरोजगार, कर्ज पुरवठा आदी सोयीसुविधा मातंग समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी विभागाला 

मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबतअहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

 मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबतअहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

            मुंबई, दि. 25 : मांग गारुडी समाजाच्या मागण्या आणि अडीअडचणींसंदर्भात संघटनांसोबत बैठक घ्यावी. त्याचा अहवाल तयार करुन शासनास सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.


            मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात मांग गारुडी समाजाच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ.सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, मांग गारुडी समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.


            मांग गारुडी समाज शिक्षण, रोजगार आदी सोयीसुविधांपासून वंचित राहू नये यासाठी त्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा. मांग गारुडी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र अधिक सुलभतेने देण्यासाठी दक्षता पथकाचा उपयोग करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


००००

विधीमंडळ अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय

 विधीमंडळ अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 25 : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि सर्व घटकांना सामावून घेणारे निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला आणि युवा वर्गाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. खऱ्या अर्थाने कामकाजाच्या दृष्टीने हे अधिवेशन विक्रमी ठरले, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


      विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली.


       मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या अधिवेशनामध्ये विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रूपये हेक्टरी अनुदान जाहीर करण्यात आले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. लेक लाडकी योजना, राज्याचे नवे आधुनिक महिला धोरण, नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे आदी विषयांबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली. महिलांना एस टी बस प्रवासात 50 टक्के सवलतीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.


     यावेळी अधिवेशन कालावधीत झालेल्या कामकाजाची माहिती देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात मिळून 17 विधेयके संमत करण्यात आली. विधान परिषदेत 01 विधेयक प्रलंबित राहिले. संयुक्त समितीकडे एक विधेयक पाठविण्यात आले तर एक विधेयक मागे घेण्यात आले.


     उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आमचा भर विधीमंडळात जास्तीत जास्त कामकाज होण्यावर होता. राज्याला विकासाकडे घेवून जाणारा अर्थसंकल्प आम्ही सादर केला. विविध समाज घटकांना दिलासा देणारे निर्णय घेतले. सर्वांसाठी घरे ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी गृहनिर्माण याशिवाय विविध आवास योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्याचा संकल्प आपण केला आहे. विविध विषयांवरील चर्चेत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली. लोकहिताचे निर्णय घेण्यात राज्य शासनाला यश आल्याचे त्यांनी सांगितले.  


विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झालेली विधेयके खालीलप्रमाणे :


1) महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, 2023 (वित्त विभाग)


(2) महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरण विधेयक, 2023. (वैद्यकीय शिक्षण विभाग) 


(3) मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2023 (नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत) (नगर विकास विभाग)


(4) महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, 2023 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (ग्राम विकास विभाग)


(5) महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण विधेयक, 2023 (सामान्य प्रशासन विभाग)


(6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (विद्यापीठांचे कुलगुरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता सुधारणा करणे) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)


(7) महाराष्ट्र कामगार कायदे (सुधारणा) विधेयक, 2022 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)


(8) महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक, 2023. (वित्त विभाग)


(9) महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यांवरील कर (सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग)


(10) पंढरपूर मंदिरे (सुधारणा) विधेयक, 2023 (विधि व न्याय विभाग)


(11) महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2023 (वित्त विभाग)


(12) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क नियमन) (सुधारणा)


(13) महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना (सुधारणा) विधेयक, 2023 (विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याबाबत) (नगर विकास विभाग)


(14) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (सुधारणा) विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)


(15) महाराष्ट्र गोसेवा आयोग विधेयक, 2023


(16) महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) विधेयक, 2023. (विशेष पोलीस आयुक्त या पदाच्या संदर्भाचा समावेश करण्यासाठी वैधानिक तरतुद करणे) (गृह विभाग)


(17) महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2023 (कोविड-19 वैश्विक साथरोग राहिलेला नसल्याने त्या अनुषंगाने कलम 73अ मध्ये केलेली सुधारणा वगळणेबाबत.) (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)


विधान परिषदेत प्रलंबित विधेयक


(1) स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)


संयुक्त समितीकडे विधेयके


(1) महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग))


०००००


दीपक चव्हाण, निलेश तायडे/विसंअ

Featured post

Lakshvedhi