Tuesday, 21 March 2023

ससून गोदी मत्स्य बंदर येथे विविध सुविधा देण्यास प्राधान्य

 ससून गोदी मत्स्य बंदर येथे विविध सुविधा देण्यास प्राधान्य


- मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई दि. 21 : ससून गोदी मत्स्य बंदर येथे विविध सुविधा निर्माण करण्याला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. कोरोनामुळे येथील कामे प्रलंबित राहिली होती. या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या अनुषंगाने एक सर्वसामावेशक बैठक घेण्यात येणार असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            सदस्य राजेश राठोड यांनी या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.


            मत्स्य व्यवसाय मंत्री श्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, ससून गोदी येथे काम करणाऱ्या महिला व पुरुष मच्छिमार यांच्यासाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था होईपर्यंत तत्काळ मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच येथील कामे विहित वेळेत येथील कामे पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली जाईल.


            ससून गोदी येथे एकूण 31 विकास कामे प्रस्तावित होती. ठेकेदारांनी कामे कोरोनामुळे पूर्ण केलेली नसल्याचे आढळून आले आहेत. तसेच ही कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी संबंधित ठेकेदार करीत आहेत. विहित वेळेत काम पूर्ण न करता अडवणूक करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाईल असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

ज्वारी चे महत्व

 *ज्वारीच्या भाकरीचे महत्व* 

        *!! रामबाण !!*


“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन १४ किलोनी कमी झालं.” 


“माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स काढून फेकून दिले.”


“गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.”


“माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”


“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” वगैरे सुधारले...


गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते.  काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. 


*जेवणात का खावी ज्वारीची भाकरी… ?*


ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. 


ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते. 


बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.


तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.


ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.


तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.


भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.


ज्वारीचे फायदे


1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.


2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.


3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.


4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.


5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.


6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.


7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.


8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.


9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.


10) शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.


11) काविळ आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळ आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.

ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या, ज्वारीला चांगली किंमत मिळाली तर शेतकरी शेतात ज्वारीचे उत्पादन करील, त्यातून त्याला चांगले उत्पन्न आणि जनावरांना कडबा उपलब्ध होईल .

ज्वारीचा आहारामध्ये उपयोग करा ,रोग पळवा .

विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून वाचावा व इतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा.

गुढीपाडव्यापासून मिळणार 'आनंदाचा शिधा'

 गुढीपाडव्यापासून मिळणार 'आनंदाचा शिधा'

            मुंबई दि. 20 : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त "आनंदाचा शिधा" वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षांपासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात येणार आहे.


            राज्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील दारिद्रय रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम सर्व जिल्ह्यांत एकाच वेळी सर्व ठिकाणी आयोजित करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.


            राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर या परिमाणात पामतेल हे शिधाजिन्नस देण्यात येणार आहे. हा “आनंदाचा शिधा" गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीकरिता ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.


            शिधाजिन्नस खरेदी करण्याकरिता 455.94 कोटी रुपये व इतर अनुषंगिक खर्च 17.64 कोटी रुपये अशा एकूण 473.58 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय यापूर्वीच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

Monday, 20 March 2023

*सुन्ठ.....Ayurvedic उपाय

*सुन्ठ.....*

आल्याचा कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. दोन्ही मूलत: एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे.

आल्याचा कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. दोन्ही मूलत: एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे.

पडसे, खोकला असताना आल्याचा रस पिंपळीपूर्ण व मधासोबत द्यावा. हा प्रयोग दिवसातून तीन वेळा करावा.

आल्याचा रस मधासोबत दिल्याने उचकीसुद्धा कमी होते. संपूर्ण अंगावर सूज येत असेल तर आले गुळासोबत खाल्लयाने फायदा होतो.

आलं हे कटु, उष्ण, तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारे आहे. म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात त्याचा वापर मुद्दाम जास्त करावा.

आल्यापासून आल्याचा कीस, सुपारी, पाक बनविता येतात. आल्याचा पाक करताना आल्याच्या रसात विलायची, जायफळ, लवंग, पिंपळी, काळी मिरी, हळद, साकर टाकावी. यामुळे आलेपाक जास्त गुणकारी बनतो.

आलं हे अग्निदीपक आहे. भूक लागत नसेल, अजीर्ण झाले, तोंडाला चव नसेल तर आले द्यावे. जेवणापूर्वी 1/2 तास अगोदर आल्याचा तुकडा मिठासोबत खावा किंवा आल्याचा रस एक चमचा आणि थोडेसे काळे मीठ टाकून घ्यावे. यामुळे भूक लागते. 

सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण, स्गिन्ध असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. मधुर असल्यामुळे तिचा वापर दौर्बल्यात होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामुळे आलेल्या अशक्तपणात सुंठीचा शिरा देतात. चांगल्या तुपात भाजून साखर टाकून केलेला हा शिरा बलवृद्धी करतो. या शिर्यामुळे आम्लपित्तसुद्धा कमी होते.

सुंठ पावडर रात्रभर एरंडेल तेलात भिजवावी. सकाळी हे सर्व मिश्रण पीठात टाकून त्याच्या पोळ्या खायला द्याव्या. यामुळे आमवात निश्चितपणे कमी होतो.

याशिवाय सुंठही खोकल्यावरील रामबाण औषध आहे. सुंठीची काळी राख किंवा सुंठ पावडर मधासोबत दिल्याने खोकला कमी होतो. तसेच पडसे असताना सुंठ, दालचिनी व खडीसाखरेचा काढा करून द्यावा. खोकला व पडशामुळे डोके दुखत असेल तर सुंठ पावडरचा गरम लेप डोक्यावर व छातीवर लावावा. याने डोकेदुखी थांबते.

पडसे, खोकला असताना आल्याचा रस पिंपळीपूर्ण व मधासोबत द्यावा. हा प्रयोग दिवसातून तीन वेळा करावा.

आल्याचा रस मधासोबत दिल्याने उचकीसुद्धा कमी होते. संपूर्ण अंगावर सूज येत असेल तर आले गुळासोबत खाल्लयाने फायदा होतो.

आलं हे कटु, उष्ण, तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारे आहे. म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात त्याचा वापर मुद्दाम जास्त करावा.

आल्यापासून आल्याचा कीस, सुपारी, पाक बनविता येतात. आल्याचा पाक करताना आल्याच्या रसात विलायची, जायफळ, लवंग, पिंपळी, काळी मिरी, हळद, साकर टाकावी. यामुळे आलेपाक जास्त गुणकारी बनतो.

आलं हे अग्निदीपक आहे. भूक लागत नसेल, अजीर्ण झाले, तोंडाला चव नसेल तर आले द्यावे. जेवणापूर्वी 1/2 तास अगोदर आल्याचा तुकडा मिठासोबत खावा किंवा आल्याचा रस एक चमचा आणि थोडेसे काळे मीठ टाकून घ्यावे. यामुळे भूक लागते. 

सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण, स्गिन्ध असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. मधुर असल्यामुळे तिचा वापर दौर्बल्यात होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामुळे आलेल्या अशक्तपणात सुंठीचा शिरा देतात. चांगल्या तुपात भाजून साखर टाकून केलेला हा शिरा बलवृद्धी करतो. या शिर्यामुळे आम्लपित्तसुद्धा कमी होते.

सुंठ पावडर रात्रभर एरंडेल तेलात भिजवावी. सकाळी हे सर्व मिश्रण पीठात टाकून त्याच्या पोळ्या खायला द्याव्या. यामुळे आमवात निश्चितपणे कमी होतो.

याशिवाय सुंठही खोकल्यावरील रामबाण औषध आहे. सुंठीची काळी राख किंवा सुंठ पावडर मधासोबत दिल्याने खोकला कमी होतो. तसेच पडसे असताना सुंठ, दालचिनी व खडीसाखरेचा काढा करून द्यावा. खोकला व पडशामुळे डोके दुखत असेल तर सुंठ पावडरचा गरम लेप डोक्यावर व छातीवर लावावा. याने डोकेदुखी थांबते 

*सुनील इनामदार.*

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

*

कशी घ्याल तळपायाची काळजी...##उपाय

 कशी घ्याल तळपायाची काळजी...##उपाय....👇


० पायाला भेगा पडल्या असतील तर एरंडेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन टाचांवर दिवसातून २ वेळा चोळून लावा.


० आपली पादत्राणे नरम, आरामदायी घ्यावीत. भेगाळलेल्या पायांना घट्ट व कडक चपलांमुळे जास्त इजा होते.


० पायाची फाटलेली त्वचा कात्रीने कापणे टाळा. कापताना त्वचा खेचली गेली किंवा कात्री लागली तर जखम चिघळून संसर्ग होण्याची शक्यता असते.


० रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पाय १० मिनीटे बुडवून ठेवा. असे केल्याने पायांना आराम वाटेल व धूळ, माती निघून जाईल.


० झोपण्यापूर्वी खोबरेल तेल कोमट करून भेगांना लावून टुथब्रशने टाचा हलके-हलके घासून घ्या. नंतर कपडय़ाने स्वच्छ करून घ्या.


० साखर आणि साय एकत्र करून त्या मिश्रणाने टाचांवरील भेगांवर साखर विरघळेपर्यंत चोळून घ्या, यामुळे भेगा कमी होतील.


० मेण आणि तूप गरम करून त्याचे थेंब भेगांवर नियमित सोडावे, त्यामुळे टाचा मुलायम राहतील.


० भेगांकडे दुर्लक्ष केल्यास कोरडेपणामुळे त्या रुंदावतात व त्यातून रक्त येते. काही वेळा चालताना खूप त्रास होतो. त्यामुळे त्यांना नियमित स्निग्ध पदार्थाने मसाज करावा.


० पावसाळ्यात पायांच्या नखांवर मॅचिंग किंवा पारदर्शक नेलकलर लावा. त्यामुळे नखांच्या कडेला माती साचून तेथे होणारा जंतुसंसर्ग टाळता येईल,


० पावसाळ्यात शक्यतो बंद चप्पल किंवा सँडल वापरणे टाळा, बंद चपलांमध्ये ओलसरपणा राहातो. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.


० पावसाळ्यात सतत पाण्याशी संपर्क येत असल्याने पायाच्या बेचक्यांमधील त्वचा पांढरी पडते व गळून पडते, खाज सुटते, त्यातून रक्त येते. यासाठी चप्पल वा शूज घालण्यापूर्वी बोरिक पावडर असलेली टॅल्कम पावडर तेथे लावा. अँटिसेप्टिक मलमही लावू शकता.


Cp.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा *




_

धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाइल पार्क उभारणार

 धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाइल पार्क उभारणार


- उद्योग मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 20 : धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शासनामार्फत समिती गठित करण्यात येईल. या समितीचा अहवाल 30 दिवसात मागविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य राणा जगजीत सिंह पाटील यांनी धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाइल पार्क स्थापना करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाईल पार्क स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून के.पी.एम.जी. या संस्थेमार्फत प्राथमिक व्यवहार्यतेबाबत पडताळणी करून प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, प्रकाश सोळंके यांनी सहभाग घेतला.

हिंगणघाटातील वना नदीवर बंधारा बांधकामास मंजुरी देणार

 हिंगणघाटातील वना नदीवर बंधारा बांधकामास मंजुरी देणार


- उद्योग मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 20 : हिंगणघाट शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वना नदीवरील बंधारा बांधकामास मंजुरी देण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


             विधानसभा सदस्य समीर कुणावार यांनी हिंगणघाट येथे नवीन बंधारा बांधकामाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले, केंद्र पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत हिंगणघाट शहराच्या 61.80 कोटी रुपये किमतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पात 15 द. ल. लि. क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ व वितरण व्यवस्था आणि इतर कामांचा समावेश असून सद्यस्थितीत पाणीपुरवठा प्रकल्पाची कामे पूर्णत्वास आलेली आहेत. हिंगणघाट येथे बंधारा बांधण्याबाबतचा प्रस्ताव नगरपरिषदेकडून शासनास सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीच्या पुढील बैठकीत हा प्रस्ताव सादर येईल आणि त्यानंतर मंजुरी देण्यात येईल.


००००

Featured post

Lakshvedhi