Monday, 20 March 2023

धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाइल पार्क उभारणार

 धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाइल पार्क उभारणार


- उद्योग मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 20 : धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शासनामार्फत समिती गठित करण्यात येईल. या समितीचा अहवाल 30 दिवसात मागविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य राणा जगजीत सिंह पाटील यांनी धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाइल पार्क स्थापना करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाईल पार्क स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून के.पी.एम.जी. या संस्थेमार्फत प्राथमिक व्यवहार्यतेबाबत पडताळणी करून प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, प्रकाश सोळंके यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi