Monday, 20 March 2023

बनावट औषध विक्रीवर नियंत्रणासाठीसंगणक प्रणाली विकसित कर नार

 विधानपरिषद प्रश्नोत्तरे

बनावट औषध विक्रीवर नियंत्रणासाठीसंगणक प्रणाली विकसित करणार


- मंत्री संजय राठोड.

            मुंबई, दि. २० : बनावट औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी येत्या काळात उत्पादक - विक्रेते - ग्राहक अशी संगणक प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी आज विधानपरिषदेत दिली.


            विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. राठोड म्हणाले की, मुंबईमध्ये औषध विक्री दुकानातून खरेदी केलेल्या इंजेक्शनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी तपासानंतर ते इंजेक्शन बनावट असल्याचे उघडकीस आले. त्याप्रकरणी पोलिसांत १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            बनावट औषध आणि गोळ्या विक्रीची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी विक्रेते आणि उत्पादकांची तपासणी करण्यात आल्याचे मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले. राज्यात एकूण १ लाख १८ हजार परवाने अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. तपासणी दरम्यान ८९ हजार किरकोळ विक्रेते, २८ हजार ८५५ घाऊक विक्रेते आणि ९९६ उत्पादक यांची तपासणी करण्यात आली. यात २ हजार ४५० परवाने निलंबित करण्यात आले असून ५५२ परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत. केंद्र सरकार ऑनलाईन औषध विक्री संदर्भात धोरण तयार करीत आहे. याशिवाय, परराज्यातून येणाऱ्या अशा प्रकारच्या बनावट औषध विक्री संदर्भात कडक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.


            यावेळी, सदस्य अभिजित वंजारी, ॲड. अनिल परब, भाई जगताप, ॲड. मनीषा कायंदे आदी सदस्यांनी उपप्रश्न विचारले. त्यालाही मंत्री श्री. राठोड यांनी उत्तर दिले.


000


गुढपाडव्याच्या पूजन बाबत

 


तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनातवाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता

 तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनातवाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता.


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. 20 : राज्यातील शासकीय महाविद्यालये/ संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे रिक्त आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये यादृष्टीने रिक्त पदांवर तासिका तत्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.


उच्च शिक्षण संचालनालय :


            कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता रु.625 वरुन रु.1 हजार प्रति तास व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता रु.750 वरुन रु. 1 हजार प्रति तास.


             शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण / विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता रु. 750 वरुन रु.1 हजार प्रति तास.


तंत्र शिक्षण संचालनालय :


            उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान रु. 1 हजार वरुन रु. 1 हजार 500 प्रति तास.


            पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन दर रु. 600 वरुन रु. 1 हजार प्रति तास.


            पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन दर रु. 500 वरुन रु.800 प्रति तास.


कला संचालनालय :


            उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन दर रु. 750 वरुन रु.1 हजार 500 प्रति तास.


            कला शिक्षण पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन दर रु. 625 वरुन रु.1 हजार प्रति तासाप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे.


००००

हार्ट अटँक वर....पिंपळपानाचा रामबाण उपायः

 ##...हार्ट अटँक वर....पिंपळपानाचा रामबाण उपायः


...🌿 हार्ट अटँक....???. सहज सुलभ उपायः।   


    99% ब्लाँकेजसना काढून टाकणारे पिंपळाचे पान🌿

       

     ##.. 15. पिंपळाचि पाने जी, गुलाबा नसावित, पण हिरवि, कोवळि, चांगली वाढलेली असावित...

    प्रत्येक पानांचे वरचे टोक व खालचा जाड देठ पानाचा थोडाश्या पानासकट कापून टाका.

                ## मग सर्व पंधरा पाने स्वच्छ धूवुन घ्या..

एका भांड्यात हि पाने व एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवा..

           ##. जेव्हा पाणि (१/३).. एक त्रितियांश उरेल तेव्हा उकळवणे बंद करा.. व गाळून घ्या.., नंतर थंड जागी ठेवा.. झाले आपले औषध तयार!!!।☕️☕️☕️

            ##*.🌿.. हा काढा तिन भागात प्रत्येक तीन तासांनि सकाळपासून घ्यावयाचा आहे...


...💔.... हार्ट अटँक नंतर लागोपाठ पंधरा दिवस अश्या प्रकारे पिंपळकाढा घेतल्याने ह्रुदय पुनः स्वस्थ होते💖..

  व पुन्हा हा दौरा पडण्याचि शक्यता राहत नाही..

            ##*. ह्रुदय विकारि व्यक्तिंनि ह्या ईलाजाचा प्रयोग अवश्य करून बघावा...

            यातून कोणताहि साईड ईफेक्ट होत नाही..


🌿.. पिंपळाच्या पानात ह्रुदयाला शक्ती आणि शांति देण्याचि अद्भूत क्षमता आहे..

  . .. ..हया पिंपळकाढ्याचे तीन डोज असे आहेतः

       सकाळि 8:00 वाजता,, 11:00 वाजता व

 दुपारी 2:00 वाजता.. म्हणजे दर तीन तासाने घ्यावयाचे आहे,.


🌿.. डोज घेण्यापूर्वि पोट रिकामे असता कामा नये..

  हलका नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोज घ्यावयाचा आहे..

  ......सदरच्या पंधरा दिवसात तळलेले पदार्थ, भात वर्ज आहे, तसेच मांसाहार, अंडि, दारू, धूम्रपान पूर्णतः बंद करण्यात यावे..

            ##* मीठ व तेलकट पदार्थ सेवन करू नये..

💟... डाळिंब, पपयि, आवळा, लसूण, मेथि, सफरचंद, मौसंबि, रात्रि भिजवलेले काळे चणे, गुगूळ, मनूका, दहु, ताक, इ. घ्यावे..

         🌿 पिंपळकाढा घेउन तर बघा!!!🌿

🙏.. भगवंतिने पिंपळाचे पान💝.. ह्रुदयाच्या आकाराचे कां बनवले आहे???...

                  💚💛💚💛💚....



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/JoUXUUkKL2YAw1pSuXJtlQ

येत्या एप्रिलमध्ये मच्छिमारांना प्रलंबित डिझेल परतावा देणार

 येत्या एप्रिलमध्ये मच्छिमारांना प्रलंबित डिझेल परतावा देणा


                            - मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. 20 : मच्छिमारांना डिझेल परतावा देण्याबाबत शासन सकारात्मक असून 120 हॉर्स पॉवर पर्यंतच्या बोटींना डिझेल परतावा दिला जाणार आहे. एप्रिल महिन्यात यासाठी निधी उपलब्ध होताच हा प्रलंबित डिझेल परतावा देण्यात येईल, असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            विधानसभा सदस्य राजन साळवी, भास्कर जाधव आणि नितेश राणे यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मत्स्यव्यवसाय हा रोजगार देणारा व्यवसाय असून शासन मच्छिमारांच्या समस्या सोडविण्यासाठी ठामपणे पाठीशी उभे आहे. यापुढे मच्छिमारांना डिझेल परतावा नियमित देण्यासाठी विधी व न्याय विभागाची मदत घेण्यात येईल. बंदराची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येत असून पहिला अत्याधुनिक मच्छिबाजार सातपाडी येथे करण्यात येत आहे. मत्स्य व्यवसाय विभागातील विविध प्रश्न आणि 12 मैलांच्या सीमेबाहेर पर्सेसिन मासेमारी करणाऱ्यांच्या बाबत किनारपट्टीच्या सर्व राज्यात एकमत नाही. त्यामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन एकत्रितपणे येत्या 5 एप्रिल 2023 रोजी विचारमंथन करण्यात येणार आहे.


            काही दिवसांपूर्वी 10 लोकांच्या मच्छिजाळीचे नुकसान झाले होते. 10 मच्छिमारांची जाळी जळाल्याने त्यांना मत्स्यव्यवसाय करण्यास अडचण येत होती. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांनी त्या 10 मच्छिमारांना जाळीसाठी 54 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात आल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांसाठी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरण आणण्यात आले आहे. यामध्ये मच्छिमारांना जवळपास 6 लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. शासकीय मत्स्यबीज केंद्र पीपीपी तत्तावर भाडेपट्टीने देणे, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून खाजगी मत्स्यबीज निर्मितीला चालना देणे, शासकीय आणि खासगी मत्स्यबीज संवर्धन क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. याशिवाय सागरी क्षेत्रात पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन करणे, सागरी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेबाबत सुधारीत निर्णय घेणे, किसान क्रेडीट कार्डद्वारे मच्छिमार आणि मस्त्यशेतकरी यांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देणे, असे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवू

 राज्यातील, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना

वेतनेतर अनुदान देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवू

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. २० : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.            


            राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत सदस्य किरण सरनाईक यांनी प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, सध्या आपण जे वेतनेतर अनुदान देतो. त्याला २६६ कोटींची कॅप निश्च‍ित केली होती. त्याच्यानंतर हा प्रश्न उच्च न्यायालयाकडेही गेला होता. उच्च न्यायालयाने शाळांना किती खर्च होतो याबद्दल ऑडिट केलेली माहिती संकलित करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे माहिती मागविण्याचे काम सुरू आहे. उच्च न्यायालयाने केलेल्या सूचनेप्रमाणे व त्याची अंमलबजावणी करण्याबाबत आवश्यकता तपासून याबाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.


            या चर्चेत जयंत आसगावकर, विक्रम काळे, एकनाथ खडसे, निरंजन डावखरे यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते. त्यालाही मंत्री श्री. केसरकर यांनी उत्तर दिले.


000

मुंबईतील मराठी टक्का घटवणाऱ्यांची चौकशी करा

 मुंबईतील मराठी टक्का घटवणाऱ्यांची चौकशी करा


          आमदार अतुल भातखळकर यांची मागणी .

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांमधील सुमारे 2,051 पदे गेल्या तीन-चार वर्षांपासून रिक्त आहेत. मुंबईतील मराठी टक्का घटवण्याच्या मागे कोण आहे ? याची चौकशी करून रिक्त जागा भरण्याबाबत शासनाने निवेदन करावे, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आज सभागृहात केली.


 यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांमध्ये 3,213 पदे मंजूर आहेत. 2,051 पदे रिक्त आहेत. मुंबईतील मराठी टक्का घसरतोय. मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून पब्लिक स्कूलच्या नावाखाली इंग्रजी माध्यमातील शाळा चालू करण्याचा निर्णय गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात घेण्यात आला आहे.


 हे सरकार मराठीला प्राधान्य देणार आहे. सरकार सत्तेत आल्यावर मराठीचे राज्यगीत अधिकृत करण्यात आले. हे गीत आता सर्वत्र म्हणायलाही सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मराठी टक्का घटवण्याच्या मागे कोण आहे, याची चौकशी केली पाहिजे तसेच या रिक्त जागा भरण्याबाबत सरकारने निवेदन करावे, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली.

Featured post

Lakshvedhi