Thursday, 16 March 2023

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण कामलवकरच पूर्ण करणार

 विधानसभा प्रश्नोत्तरे


पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण कामलवकरच पूर्ण करणार


- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण


            मुंबई, दि. १६ : पुणे जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम (पीएन 25) लवकरच पूर्ण करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी 1200 मीटर रस्त्याचे, तर डिसेंबरपर्यंत 4.5 किमी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्यापचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चच्हाण यांनी सांगितले.


            सदस्य संजय जगताप, छगन भुजबळ, चंद्रकांत भिंगारे आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातला नॅशनल हायवे 962 ते पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सासवड-नारायणपूर-कापूरहोळ रस्त्याच्या कामाबाबातचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.


            मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, येथील स्थानिक रहिवाशांनी या रस्त्याच्या कामाला हरकत घेतल्याने या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. सध्या या रस्त्यावरील वर्दळ वाढली असून वाहनांची या रस्त्यावरुन ये जा करण्याची संख्याही वाढली आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पण तात्पुरते काम न करता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्यात 1200 मीटर रस्त्याचे काम तर डिसेंबरपर्यंत 4.5 किमी रस्त्याच्या पॅचचे काम, पूर्ण करण्यात येईल. यासाठी आवश्यक असणाऱ्या 25 कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात येईल. 1200 मीटर लांबीमध्ये 7 मीटर रुंदीचे काँक्रीटीकरणाचे काम मार्च 2023 च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले असून निविदा प्रक्रिया पूर्ण करुन काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनात कोट्यवधींची उलाढाल;

 ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनात कोट्यवधींची उलाढाल;

ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद.

            नवी मुंबई, दि. १५ : ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे आयोजन प्रथमच नवी मुंबईत करण्यात आले आहे. प्रदर्शनात कोट्यवधींची उलाढाल होत असून अनेक स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या मालास मोठ्या व्यापाऱ्यांकडून आणि घाऊक विक्रेत्यांकडून मागणी होत आहे.  


            सिडको एक्झीबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे ८ मार्चपासून आयोजित या प्रदर्शनाला नवी मुंबई, पनवेल, मुंबई आणि ठाणे येथील रहिवाशांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. उमेद अभियानांतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या क्रियाशिलतेला चालना देण्यासाठी आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी या राज्यस्तरीय भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.


            या प्रदर्शनात ५२५ हून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील उमेद अभियानाच्या महिलांचे ३५०, नाबार्डचे ५० तर देशभरातून आलेल्या महिलांचे १२५ स्टॉल या ठिकाणी आहेत. या प्रदर्शनातील वस्तू, पदार्थ, कपडे आणि इतर सामानाची शुद्धता आणि वैशिष्ट्य याबद्दल खात्री झाल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतो आहे.


            प्रदर्शनाचे आणखी ५ दिवस बाकी असताना १ कोटी १० लाखांची विक्री झाली असून शनिवारी, आणि रविवारी महिला उत्पादकांनी उत्पादित केलेल्या मालाला घाऊक विक्रेते आणि व्यापाऱ्यांकडून थेट मागणी होत आहे. या प्रदर्शनात बकरीच्या दुधापासून बनविलेले साबण, वनौषधी अशा बऱ्याच अशा दुर्मीळ वस्तू उपलब्ध आहेत. शनिवार-रविवार या दोन दिवसांत ८२ हजार ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.


            या प्रदर्शनाला आता केवळ ५ दिवस शिल्लक असून या कालावधीत नागरिकांनी आणखी जास्त प्रतिसाद द्यावा व या ग्रामीण महिलांच्या स्टॉलवर खरेदी करून महिलांच्या स्वावलंबनाला मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी केले आहे.

छोटी सी जिंदगी है

 छोटी सी जिंदगी है..!!

हर बात में खुश रहो।।


जो चेहरा पास ना हो..!!

उसकी आवाज में खुश रहो।

 

कोई रूठा हो आप से...!!

उसके अंदाज में खुश रहो ।


और जो लौटके नहीं आने वाले!!

उनकी याद में खुश रहो ।


कल किसने देखा है ...!!!

अपने आज में खुश रहो..।।


*सदा मुस्कुराते रहो*

मुंबईतील स्वच्छतागृहांमध्ये महिलांसाठी पाच हजार सॅनिटरी नॅपकीन मशिन्स बसविणार

 मुंबईतील स्वच्छतागृहांमध्ये महिलांसाठी

 पाच हजार सॅनिटरी नॅपकीन मशिन्स बसविणार


-मंत्री शंभूराज देसाई


            मुंबई, दि. १५ : मुंबई शहरात असलेल्या ८ हजार १७३ स्वच्छतागृहांपैकी बृहन्मुंबई महानगरपालिकेने निश्चित केलेल्या पाच हजार स्वच्छतागृहांवर आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) आणि डेटा एनालिटीक्स आधारित कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग आणि इन्सिनेरेटर मशीन बसविण्यात येणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले. संबंधित पुरवठादारांशी संबंधित सर्व बाबी निविदा समितीने तपासल्या असून या कामी अनियमितता झाली नसल्याचे ते म्हणाले.


            सदस्य ॲड. अनिल परब यांनी या मशीन बसविण्यासाठी काढलेल्या निविदेमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. 


            मंत्री श्री.देसाई म्हणाले, शहरातील सर्व महिलांची आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यादृष्टीने स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकीन बसविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर २७ जानेवारी २०२३ पर्यंत प्राप्त होतील, अशा रितीने निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. यास केवळ दोन निविदाधारकांचा प्रतिसाद मिळाल्याने त्यास ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर प्राप्त निविदांमधून लघुत्तम निविदाकाराचा ७६,५२८ हा रास्त व वाजवी दर असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छतागृहांच्या व्यतिरिक्त इतर स्वच्छतागृहांमध्ये सुद्धा अशा मशिन्स बसविण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी एका उप प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.


            बृहन्मुंबईतील स्वच्छतागृहांच्या संख्येबाबत विसंगती दिसून येत असल्याने महानगरपालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत २० तारखेला बैठक घेण्याचे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले. त्यावर अशी बैठक घेण्यात येईल, असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्येआवश्यक सोयी-सुविधा देणार

 सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्येआवश्यक सोयी-सुविधा देणार


- मंत्री संजय राठोड


            मुंबई, दि. १५ :- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, ग्रंथालय, संगणक कक्ष, जेवण, स्वच्छता गृह, सीसीटीव्ही अशा विविध सुविधा असणे अपेक्षित आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन राज्यातील ४४१ शासकीय वसतिगृहांची तत्काळ तपासणी करण्याची मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती, मंत्री संजय राठोड यांनी आज विधान परिषदेत दिली. 


            विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्यात कसूर केल्याप्रकरणी आतापर्यंत ४९ वसतिगृहांतील गृहपालांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


            शासकीय वसतिगृहांमध्ये अनियमितता झाल्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.राठोड बोलत होते.


            मंत्री श्री. राठोड म्हणाले की, राज्यात ४४१ शासकीय वसतिगृहात ३ हजार ३५८ विद्यार्थी असून, त्यांना विविध सोयी सुविधा देण्यात येतात. मात्र, प्राप्त तक्रारीनुसार ५४ वसतिगृहांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४९ वसतिगृहांत तक्रारीत तथ्य आढळून आले. सर्व गृहपालांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. २८ गृहपालांवर विभागीय चौकशी सुरू आहे, तर पाच गृहपालांना निलंबित करण्यात आले आहे. या वसतीगृहांतील भोजन ठेकेदाराविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, वसतिगृहांतील प्रवेशित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य इत्यादी अदा करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.


             ज्या तालुक्यात वसतिगृहांची आवश्यकता आहे तेथे नव्याने वसतिगृह उभारण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना असून, याअंतर्गत वसतिगृहाप्रमाणेच सोयी सुविधा देण्यात येत असल्याची माहितीही मंत्री श्री.राठोड यांनी यावेळी दिली.


यावेळी सदस्य निरंजन डावखरे, अभिजित वंजारी, अनिकेत तटकरे यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.


000

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यासलगेचच उपचार करून घ्यावेत

 इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यासलगेचच उपचार करून घ्यावेत


- सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत.

            मुंबई, दि. १५ : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावेत अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.


            एच३एन२ फ्ल्यू सदृश्य साथरोगाबाबत आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी आज विधानसभेत निवेदन केले.


            मंत्री सावंत म्हणाले, एच३एन२फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. अहमदनगर आणि नागपूरमध्ये एका व्यक्तीचा H3N2 ने मृत्यू झाला आहे. इन्फ्लूएंझा ए आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फ्लूएंझा ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. उदा. एच१ एन १ एच३एन२ इ. या आजाराची सर्वसाधारण लक्षणे ताप, खोकला घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळून येतात. इन्फ्लूएंझा ए बाबत रुग्ण सर्वेक्षण मुख्यतः लक्षणाधारीत आहे. याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात येते व मार्गदर्शक सूचना नुसार उपचार करण्यात येतात. १३ मार्च २०२३ अखेर एच१ एन१ बाधित ३०३ रुग्ण आणि एच३एन२ बाधित ५८ रुग्ण आढळून आले आहेत.


            राज्यात इन्फ्लूएंझा आजार मुख्यत्वेकरुन पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागात दिसून येत आहेत. या आजाराची लक्षणे तसेच उपचार पध्दती याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. राज्यातील रुग्णालयात संशयीत रुग्णांवर आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत असून आरोग्य संस्थेत आजारावरील उपचारासाठी लागणारी औषधे उपलब्ध असल्याचे श्री सावंत यांनी यावेळी सांगितले.


०००

नाटू नाटू' गीत व द 'एलिफंट व्हिस्परर' माहितीपटास ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल

 नाटू नाटू' गीत व द 'एलिफंट व्हिस्परर' माहितीपटास ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल


उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विधान परिषदेत अभिनंदनाचा ठराव.

            मुंबई, दि. १५ : ऑस्कर पारितोषिक सोहळ्यात आरआरआर या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गीतास तसेच 'एलिफंट व्हिस्परर' या माहितीपटास पुरस्कार मिळाल्याबद्दल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. सभागृहातील सदस्यांनी या ठरावाचे समर्थन केले.


            याबाबत अधिक माहिती देताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, 'नाटू नाटू' या गीताचे गीतकार चंद्रा बोस असून एम. एम. किरवाणी यांनी संगीत दिले आहे. राहुल सिपलीगंज व कालभैरव यांनी गायले आहे. या गाण्याची आवृत्ती दिनांक १० नोव्हेंबर २०२१ रोजी टी-सिरिजद्वारे प्रदर्शित झाली होती. लॉसएंजेलिस, अमेरिका येथे हा पुरस्कार १२ मार्च २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.


            याच सोबत द एलिफंट व्हिस्परर या लघु माहितीपटाबाबत माहिती देताना उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, या डॉक्युमेंटरीची निर्मिती अचित जैन यांनी केली आहे. कार्तिकी गोन्सालवीस व गुनीत मोंगा यांनी दिग्दर्शन केले आहे. तामिळनाडूच्या मुदुमिलिया टायगर रिझर्व्ह मधील हत्तींच्या निरीक्षणातील ही जन्मकथा आहे. महिला दिग्दर्शिका कार्तिकी गोन्सालवीस यांनी भारतमातेस हा पुरस्कार अर्पण केला आहे. 


00000

Featured post

Lakshvedhi