Sunday, 12 March 2023

अद्भुत, अकल्पनीय, देवभूमि, उत्तराखंड एक और चामत्कारिक भेट

 अद्भुत, अकल्पनीय, देवभूमि, उत्तराखंड एक और चामत्कारिक भेट देखे और ग्रुप मे भी भेजे


जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन

 जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन

अलिबाग(जिमाका):- मा.उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे निर्देशानुसार “न्याय आपल्या दारी” या संज्ञेतर्गत दि.9 मार्च ते दि.7 एप्रिल 2023 या कालावधीत रायगड जिल्हयात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

       या फिरते लोक अदालतीचा उद्घाटन समारंभ दि.9 मार्च 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता रायगड जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. 

      या कार्यक्रमास सर्व न्यायिक अधिकारी वर्ग, अलिबाग, जिल्हा सरकारी वकील व अध्यक्ष वकील संघटना अलिबाग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. 

       हे फिरते न्यायालय रायगड जिल्ह्यामध्ये दि.7 एप्रिल 2023 पर्यंत कार्यरत असणार आहे व ते जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये जावून लोकअदालत आयोजित करणार आहे. या फिरत्या लोकअदालतीचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड श्रीमती एस. एस. सावंत यांनी केले आहे.

शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य, अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवाव्यात

 शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य, अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवाव्यात

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन.

            मुंबई, दि. 10 : पारतंत्र्याच्या अंध:कारातून स्वराज्याच्या प्रकाशाकडे महाराष्ट्राला आणि देशाला घेऊन जाणाऱ्या ऐतिहासिक आणि तेजोमय शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत. राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून शिवराज्याभिषेकाचा 350 वा वर्धापनकाळ शिवराज्याभिषेक महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा, यादृष्टीने राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी कल्पक सूचना कळवाव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.


            या महोत्सवाच्या आयोजनाने महाराजांचे कृतज्ञ स्मरण करणे, त्यांच्या असाधारण कर्तुत्वाचा जागर करणे, त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून सत्कार्याची वाट उजळणे. यासह नव्या पिढीपर्यंत महाराजांचा हा पराक्रमी वारसा पोहोचवावा आणि त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या अनुषंगाने या संपूर्ण वर्षामध्ये विविध प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.


            min.culture@maharashtra.gov.in या ई-मेलवर सूचना पाठवाव्यात असेही आवाहन त्यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमावा

 सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी

प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमावा


- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन


            मुंबई दि. 10 : सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम लवकर पूर्ण होण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.


            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात सिंधुदुर्ग येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उप सचिव प्रकाश सुरवसे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव श्री.तेलंग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती नाईक, सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. गुरव, कार्यकारी अभियंता श्री. सर्वगोडे उपस्थित होते.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सन 2021-22 पासून जिल्हा रुग्णालयातील विविध इमारतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि वसतीगृह कार्यरत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या 29 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग येथे 100 विद्यार्थी क्षमता आणि 500 खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. इमारतीच्या बांधकामासाठी 427.57 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय सन 2022-23 च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे 43 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रथम 15 हजार चौ.मी. जमिनीवर अनुज्ञेय टप्पा 1 चे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच टप्पा 2 बाबत आवश्यक ती कार्यवाही करून बांधकाम सुरू करण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री.महाजन यांनी यावेळी केल्या.

हळदी समारंभ

 



Featured post

Lakshvedhi