Sunday, 12 March 2023

सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमावा

 सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी

प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमावा


- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन


            मुंबई दि. 10 : सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम लवकर पूर्ण होण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.


            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात सिंधुदुर्ग येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उप सचिव प्रकाश सुरवसे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव श्री.तेलंग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती नाईक, सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. गुरव, कार्यकारी अभियंता श्री. सर्वगोडे उपस्थित होते.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सन 2021-22 पासून जिल्हा रुग्णालयातील विविध इमारतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि वसतीगृह कार्यरत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या 29 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग येथे 100 विद्यार्थी क्षमता आणि 500 खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. इमारतीच्या बांधकामासाठी 427.57 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय सन 2022-23 च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे 43 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रथम 15 हजार चौ.मी. जमिनीवर अनुज्ञेय टप्पा 1 चे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच टप्पा 2 बाबत आवश्यक ती कार्यवाही करून बांधकाम सुरू करण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री.महाजन यांनी यावेळी केल्या.

हळदी समारंभ

 



आला उन्हाळा,

 


प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते सिमेंटचे करणार

 प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते सिमेंटचे करणार

- मंत्री गिरीश महाजन.

            मुंबई, दि. 10 : राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत येणारे रस्ते सिमेंटचे करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य सुनील राणे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत केलेल्या कामांचे कंत्राटदारांकडून वस्तू व सेवाकराची रक्कम कपात न केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री.महाजन म्हणाले की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणाऱ्या कामाबाबत संबंधित कंत्राटदाराचे अंतिम देयक अदा करताना नियमानुसार वस्तू व सेवाकराची कपात करून कंत्राटदाराला देयके अदा केली जातात. कंत्राटदारांना काम देण्याअगोदर त्यांची बीड कॅपॅसिटी किती आहे हे तपासली जाते.


            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ बागडे, नारायण कुचे, प्रशांत बंब, आशिष जयस्वाल यांनी सहभाग घेतला.


०००००

जलयुक्त शिवार योजनेसह जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविणार

 जलयुक्त शिवार योजनेसह जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविणार

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 10 : राज्य शासन सर्व घटकांच्या विकासासाठी सकारात्मक असून वातावरणातील बदलांमुळे अल निनोचा प्रभाव येणाऱ्या वर्षात जाणवू शकतो. त्यामुळे हे वर्ष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन संरक्षित सिंचनासाठी जलयुक्त शिवार टप्पा 2 आणि जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.


            राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेनंतर राज्यपालांच्या आभाराचा ठराव मांडताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह 30 सदस्यांनी यासंदर्भातील चर्चेत सहभाग घेतला.


            श्री.फडणवीस म्हणाले, शासनाने मागील आठ महिन्यांच्या काळात जनहिताचे विविध निर्णय घेतले आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने सात हजार कोटी रूपयांची मदत केली आहे. 65 मि.मी. पावसाची मर्यादा न ठेवता सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात मदत देण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषांपेक्षा दुप्पट मदत देण्यात आली आहे. सन 2025 पर्यंत 30 टक्के फिडर सौर ऊर्जेवर आणणार असल्याने शेतकऱ्यांना दिवसा वीज देता येईल, असे त्यांनी सांगितले. विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी आतापर्यंत 12 लाख 84 हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी 12 हजार कोटी रूपये देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. उर्वरित शेतकऱ्यांचे साक्षांकन पूर्ण झाल्यानंतर त्यांना मदत देण्यासाठी एक हजार 14 कोटी रूपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. कांद्याच्या प्रश्नावर देखील शासन सकारात्मक असून यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. कांदा निर्यातीवर केंद्राची बंदी नाही, तसेच राज्यात 42 केंद्रांवर 45796 क्विंटल खरेदी करण्यात आली असल्याने हा प्रश्न सुटेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


            उपमुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाला दिलासा देताना 1553 अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली. उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून डावोस येथील आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेत 1.5 लाख कोटींचे करार करण्यात आले आहेत. ‘आपला दवाखाना’च्या माध्यमातून मोफत उपचार देण्यात येत असून राज्यात लवकरच 700 दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने स्वतंत्र विभाग निर्माण केला आहे.


            राज्याच्या आणि देशाच्याही आर्थिक विकासाला हातभार लागावा आणि दळणवळण गतिमान व्हावे यासाठी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू झाला असून पुढील टप्प्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. राज्यात संरक्षित सिंचनाकरिता जलयुक्त शिवार टप्पा 2 तसेच ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजना महत्त्वपूर्ण ठरणार असून त्याच्या अंमलबजावणीवर भर देण्यात येणार आहे. राज्यातील 846 शाळांना केंद्र शासनाच्या मदतीने ‘पीएम श्री’ योजनेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त राज्यातही तृणधान्य उत्पादनाला चालना देण्यात येणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा अधिक भाव मिळावा यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शाश्वत विकासाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून नवीन वस्त्रोद्योग धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


            मुंबईतील दळणवळणाची समस्या सोडविण्यासाठी वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचे काम लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करण्यात येत असून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, सागरी मार्ग टप्पा-1, मेट्रोचे नवीन मार्ग यांची कामे देखील गतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. मेट्रोची 337 कि.मी.ची कामे सध्या सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. इंदू मील येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम गतीने सुरू असून त्यांच्या परिवारातील सदस्यांना दाखवून पुतळ्याबाबतचे डिझाईन अंतिम करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असून ती उठवावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.


00000

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीची आढावा बैठक संपन्न.

 साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीची आढावा बैठक संपन्न.

मुंबई,दि.11 : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचीआढावा बैठक समितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतपाटील यांनी घेतली.


श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट कॅम्पस मुंबईयेथे आयोजित केलेल्या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिवविकास चंद्र रस्तोगी, शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) डॉ. शैलेंद्रदेवळाणकर, समितीचे सदस्य सचिव डॉ. संजय शिंदे, शिवा कांबळे, डॉ. मिलिंद

कसबे, डॉ. सोमनाथ कदम, डॉ.प्रमोद गारुडे, डॉ. विजय कुमठेकर, डॉ.बळीरामगायकवाड आदी उपस्थित होते.


साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित चित्रमय पुस्तक,

समीक्षा ग्रंथ आणि जीवन पट निर्मिती करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्यावतीने तयारकरण्यात येत असलेल्या ग्रंथाचे लवकरात लवकरात प्रकाशन करण्यात येईल. तसेच

समितीच्या कार्यालयासाठी जागेची उपल्बधता करण्यात येईल, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.


समितीचे सदस्य सचिव डॉ.संजय शिंदे यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेचरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने तयार करण्यात येत असलेल्या चारखंडाचे काम पुर्णत्वास येत आहे. तसेच या खंडाचे ऑडिओ आणि ई-बुक तयारकरण्यात येत असल्याची माहिती दिली.

शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीअंमलबजावणी करावी

 शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीअंमलबजावणी करावी


- मंत्री चंद्रकांत पाटील


मुंबई,दि.11 : स्वायत्त महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांनी

प्रेरणा जागृती करण्याचे काम करावे. राज्यातील शैक्षणिक दर्जा

उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची राज्यात प्रभावीअंमलबजावणी करावी. यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.


श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट कॅम्पस मुंबईयेथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिलाविद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शैक्षणिकधोरण 2020 च्या अंमलबजावणीकरिता सुकाणू समितीसमवेत स्वायत्त

महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री

श्री. पाटील बोलत होते.


यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी,उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसीमहिला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव, सुकाणू समितीचे अध्यक्ष

डॉ.नितीन करमळकर, स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक वसंबंधित अधिकारी उपस्थित होते.


मंत्री श्री.पाटील म्हणाले, प्रत्येक महाविद्यालयाने माजी विद्यार्थी वसामाजिक उत्तरदायित्व निधीतून स्वायत्त निर्माण करावी. स्वायत्तमहाविद्यालयांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना आणखी पाचमहाविद्यालयांना या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तयार करावे. गुणवत्ता

राखण्यासाठी नॅक मूल्यांकन महत्त्वाचे आहे.त्यामुळे ज्या महाविद्यालयांनानॅकचे मानांकन मिळाले आहे, अशा महाविद्यालयांनी इतर महाविद्यालयांना नॅकमानांकन मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.


आज जागतिक स्तरावर भारताचे नाव आदरपूर्वक घेतले जाते. विविध क्षेत्रातमहत्त्वाच्या प्रमुख पदावर भारतीय वंशाच्या व्यक्ती कार्यरत आहेत. देशाचे

नाव जागतिक स्तरावर नंबर एकवर राहण्यासाठी शैक्षणिक धोरणातील बदलमहत्त्वाचे आहेत. देशातल्या उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तनात्मकसुधारणेचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्याअंमलबजावणीसाठी प्राध्यापकांनी जबाबदारी घेऊन प्रेरणा जागृत करण्याचे कामकरावे असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.


या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुकाणू समितीचेअध्यक्ष डॉ.नितीन करमळकर यांनी केले. यावेळी पनवले, मुंबई, पुणे,

कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आदी स्वायत्त महाविद्यालयांच्या

प्राचार्यांनी सादरीकरण केले.


000

Featured post

Lakshvedhi