Tuesday, 21 February 2023

मॅनहटन कम्युनिटी कॉलेज समवेत करारकौशल्य

 मॅनहटन कम्युनिटी कॉलेज समवेत करारकौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्याज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास होईल मदत  


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. 21 :- मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो सोबतच्या करारामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण कमी खर्चात उपलब्ध होणार असून कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास आणि रोजगार उपलब्ध होण्यास देखील निश्चितच मदत होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.


            शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत आहे. याअंतर्गत जागतिक दर्जाच्या नामांकित शिक्षण संस्थांसोबत करार करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र आणि न्यूयॉर्क येथील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो यांच्यादरम्यान परस्पर शैक्षणिक सहकार्य विकसित करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला.


            या करारानुसार पात्र विद्यार्थ्यांना बरो ऑफ मॅनहटन कम्युनिटी कॉलेज ऑफ द सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (बीएमसीसी) मध्ये केवळ 20 टक्के शुल्कात उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना आणि विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण व प्रशिक्षणास प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्याचबरोबर संशोधन, अध्यापन, अभ्यासक्रम आदी क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविले जाणार आहे.


            शालेय शिक्षण विभाग आणि मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो यांच्यादरम्यान झालेल्या या करारावर शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी, तर मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरोच्या वतीने शिक्षण विभागाचे अध्यक्ष अँथनी मुनरो यांनी स्वाक्षरी केली. मंत्री श्री. केसरकर यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कराराप्रसंगी मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरोचे उपाध्यक्ष संजय रामदत, शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक डॉ.कैलास पगारे, राजभवन येथील उपसचिव प्राची जांभेकर आदी उपस्थित होते.


00000

मेरा भारत महान


 

Be alert

 सल्ला: अपग्रेड केलेल्या सेवांचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या Jio नंबरचे सिम कार्ड बदलण्यास सांगणाऱ्या फसव्या संदेशांपासून सावध रहा. ईमेल किंवा एसएमएसद्वारे मिळालेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. ओटीपी आणि इतर आर्थिक माहिती यांसारखी गोपनीय माहिती चोरण्यासाठी फसवणूक करणारे तुमचे डिव्हाइस मिरर करू शकतात.

आज 12 फेब्रुवारी आहे, आजून 15 दिवस बाकी आहेत-

 *आज 12 फेब्रुवारी आहे, आजून 15 दिवस बाकी आहेत--*

 *एक होतं गाव.*

*"महाराष्ट्र" त्याचं नाव.* 


*गाव खूप छान 👌होतं,*

*लोक खूप चांगले👌 होते.* 


*"मराठी" भाषा बोलत होते,*


*गुण्यागोविंदानं नांदत होते.*

*त्यांचं मन ❤ खूप मोठ्ठं होतं.* 

*वृत्ती खूप दयाळू होती.*


*दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून 🏃🏻🏃🏻जायचे.*

*आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे*

*एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे,*


*महाराष्ट्रात होता एक भाग.* 

*"मुंबई" त्याचं नाव.*


*मुंबईसुद्धा छान 👌होती;*

*महाराष्ट्राची शान होती.*


*सर्वांच्या आकर्षणाची बाब होती.*

*आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते.*


*इथं आले, की इथलेच होऊन राहत होते.*


*"अतिथी देवो भव...!" 👏*


*या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं.*

*पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले.*


*हळूहळू परिस्थिती बदलू लागली.*

 *"अतिथी" जास्त आणि "यजमान" कमी झाले.*


*मुंबई 🏢🏩🏨🏬 कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती.*


*मराठी आपली वाटत नव्हती.*


*प्रश्न ?मोठा गहन होता,पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती.*


*त्यांना एक युक्ती सुचली.*

*दूरदेशीची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली.*


*त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, 🇺🇸🇦🇺 परदेशात जातील, उच्चशिक्षित 📖होतील. सर्वांचाच,अगदी "महाराष्ट्राचा" ही विकास होईल, म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली.*


*आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली.* 

*आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली,*


*आणि मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना, मराठी कोणीच बोलेना,*

*बोलीभाषा ही बदलली.*


*सगळ्याचा नुसता काला झाला. शुद्ध, सुंदर मराठीचा लोप⚫ झाला.*


*अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर__*


*माफ करा हं........*


*आपल्या 'मम्मी' बरोबर एकदा वाचनालयात गेला.*


*चुकून त्याचा हात एका 📖 पुस्तकावर पडलं,*

*त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं,*

*पानं फडफडली, आनंदित झाली.*


*त्यांना वाटलं, चला निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल.*


*इतक्यात त्या मुलानं विचारलं, (त्याच्या भाषेत) "मम्मी" कोणत्या भाषेतलं पुस्तक आहे गं हे ?''*


*'मम्मी' खूप सजग होती,*

*मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती.*


*पुस्तक 📖 परत जागेवर ठेवत म्हणाली, "अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस,*


*"मराठी भाषा" प्रचलित होती; आता कोणी नाही ती बोलत.*


*पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली,*

*पानांपानांतून अश्रू ठिबकले;*

*पण...................*


*हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं. कारण, आता मराठी साठी दुःखी 😩 होणारं काळीज❤ कोणाचंच उरलं नव्हतं.!!* 


*महाराष्ट्राची शान "मराठी"भाषा!!!*


*मला एकानी विचारले तू मराठीत का 'पोस्ट' टाकतो....???* *आणि, मी त्यांना एवढंच म्हटलं,* 


*आमच्या घरात "तुळस"🌿आहे,*

 *" Money plant'🎍नाही.*


*आमच्या घरच्या स्त्रीया 👵🏼 "मंदीरात" जातात,*

*'PUB' मध्ये नाही.*


*आम्ही मोठ्यांच्या 👏 पायाच पडतो, त्यांच्या डायरेक्ट गळ्यात मिठी मारत नाही.*


*आम्ही "मराठी" आहोत,*

*आणि मराठीच राहणार 👍!!!*


*तुम्ही English मध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय मराठीतूनच देतो,*


*याचा अर्थ असा नाही की, मला English येत नाही,*


*अर्थ असा आहे की, मी आपल्याला मराठी शिकवतोय.*


*अरे गर्व बाळगा तुम्ही मराठी असल्याचा...*


*"तुळशी" ची जागा आता*

*'Money Plant' ने घेतलीय...!!*


*"काकी" ची जागा आता 'Aunti' घेतलीय...!!!*


*'वडील' जिवंतपणीच "डेड" झालेत.*


*अजुन बरंच काही आहे, आणि तुम्ही आत्ताच Glad झाले....???*


*"भाऊ"👬 'Bro' झाला...!!*

*आणि "बहीण "👰 'Sis'...!!!*


*दिवसभर मुलगा "CHATTING" च करतो... नाही तर रात्री झोपताना Mobile वर 'SETTING' पण करतो...!!!*


*दुध पाजणारी "आई" जिवंतपणीच 'Mummy'झाली.!!*


*घरची "भाकर" आता कशी आवडणार हो...*


*५ रु. ची 'Maggi' आता किती "Yummy" झाली...!!!*


*माझा मराठी माणूसच "मराठी" ला विसरू लागलाय....*


 *आपली संस्कृती लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न 👏तरी करा !!!*


*विनंती आहे ,,, सगळयांना पाठवा.*

*२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पोचवा._____*

🙏🙏

रोजगार प्रशिक्षण


 

मेरा भारत महान

 


सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा कणेरी मठ येथे शुभारंभ

 सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा कणेरी मठ येथे शुभारंभ


राज्यात 25 लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


             कोल्हापूर दि. 20 : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून 25 लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी केले.


            कणेरी मठ येथे 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. समारंभास शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भय्याजी जोशी, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक, कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील- यड्रावकर, महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे भविष्यात सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. गट शेती, क्लस्टर बरोबरच नैसर्गिक शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शासनामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. नदीला, मातीला माय मानणारी आपली संस्कृती असून या संस्कृतीचे जतन आणि रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण व संस्कृती रक्षणाची चळवळ पुन्हा जोमाने सुरु होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.


            विकास योजना व प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम केले जात असून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर 33 लाख झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. आपले शासन सर्वसामान्यांचे शासन असून शासनाने घेतलेले निर्णय लोकाभिमुख आहेत. यास केंद्र शासनाचेही सर्व सहकार्य असून केंद्राकडून सर्व प्रस्ताव मंजूर होत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी काळाची गरज ओळखून सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाची संकल्पना मांडल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वामीजींना धन्यवाद दिले. अध्यात्म शास्त्र आणि नैसर्गिक तत्त्वाची सांगड घालून सिद्धगिरी मठावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. हा लोकोत्सव मठाचा किंवा शासनाचा नसून प्रत्येकाचा आहे. या संकल्पनेत प्रत्येकाने सहभाग व योगदान दिल्यामुळेच हा लोकोत्सव यशस्वी होत आहे. पर्यावरणाचा संदेश देणारा हा लोकोत्सव चळवळ व्हावी व हा उत्सव घराघरात पोहोचावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.


अपारंपरिक स्त्रोतातून ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर भर


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण व प्रदूषण मुक्तीसाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर शासनाने भर दिला आहे. ग्रीन हायड्रोजन, सोलार एनर्जी असे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. या प्रकल्पातून दहा ते बारा हजार मेगावॅट वीज उपलब्ध होईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.


            पर्यावरणाच्या विनाशाने अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलायला हवी, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वदूर पोहोचेल. आपल्या संस्कृतीमध्ये नदीला माता आणि निसर्गाला ईश्वर मानले जात असून पर्यावरण रक्षणाचे शाश्वत विचार प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे.


            कणेरी मठ येथे काडसिद्धेश्वर स्वामीजींनी शेतीत प्रयोग केले. पर्यावरणपूरक शेती बनवली. कणेरी मठ मोठे ज्ञानाचे भंडार असून हे ज्ञान समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव राज्याच्या अन्य शहरात आयोजित करून पंचमहाभूतांचे संवर्धन करण्याबाबत व्यापक काम होणे गरजेचे आहे.


            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी काडसिद्धेश्वर स्वामीजींनी वेगवेगळ्या कल्पना राबविल्या आहेत. त्यांच्या या कल्पना भविष्यात पर्यावरण रक्षणासाठी मैलाचा दगड ठरतील.


            काडसिद्धेश्वर स्वामीजींनी विषमुक्त शेती करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले असल्याचे सांगून या महोत्सवात उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपण स्वागत करतो, असे पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले.


            श्री. जोशी म्हणाले, या लोकोत्सवातून देण्यात येत असलेला पर्यावरण रक्षण आणि शांतीचा संदेश विश्वभर पोहोचेल.


            पर्यावरण संवर्धनाविषयी ‘जाणू या पंचमहाभूतांचे महत्त्व जपू या त्यांचे अस्तित्व’ हा संदेश जगभर देऊया, असे आवाहन काडसिद्धेश्वर स्वामीजींनी यावेळी केले. ते म्हणाले, आज पंचमहाभूतांचा समतोल ढासळला असल्याने यामध्ये असंतुलन निर्माण झाले आहे. यासाठी ‘पर्यावरण रक्षणाची स्वतः पासून सुरुवात करुया, निसर्गाची हानी थांबवू या व पर्यावरण रक्षण हाच परमार्थ समजू या’, असे आवाहन त्यांनी केले. कणेरी मठ येथे वेस्ट पासून बेस्ट बनवण्यासाठी नवीन स्टार्टअप सुरु करण्याचा मानस असल्याचे स्वामीजी यांनी यावेळी सांगितले. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात शासनाच्या प्रत्येक विभागाने आपले योगदान दिल्याबद्दल त्यांनी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले


            या समारंभात ‘सुमंगल विचार संपदा’ या पुस्तिकेचे प्रकाशन आणि कापडी पिशव्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


            समारंभास पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.


०००००



 



Featured post

Lakshvedhi