Monday, 20 February 2023

मेरा काम क्यू बिघाड तां हैं


 

हस्त मुद्रा

 *हातात हात घेतला तर मैत्री होते..*

*दोन्ही हात जोडले तर भक्ति होते..*

*हातावर हात आपटला तर टाळी वाजते..*

*कुणाचा हात धरला तर साथ होते..*

*कुणाला हात दाखवला तर धमकी होते..*

*हात वर केले तर असाहाय्यता दिसते..*

*हाता वर हात ठेवले तर निष्क्रियता दिसते..*

*हात पुढे केले तर मदत होते..हात पसरले तर मागणी दिसते..*

*हाताचे महत्व इतक की अनेक हात पुढे आले तर*

 *अशक्य ते शक्य होते.*🌹🌹🌹🌹🌹

  

 🙏🏻🙏🏻 *सुप्रभात.*🙏🏻🙏🏻

भावलेले छत्रपती शिवाजी महाराज

 *छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!*


1. अफजलखानाचा कोथळा 

2. शाईस्तेखानाची बोटे 

3. आग्राहून सुटका


  *पण भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!*


1. आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे होते...!

2. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!

3. सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!

4. विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावूनजगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!

5. समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते ...!

6. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्यारात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून "अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे चिकीत्सक राजे"

7. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे ! "जलतज्ञ" राजे छत्रपती शिवराय!!

8. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचेकोणतेही साधन नसताना अभेद्य असे १०० राहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते, "उत्तम अभियंते राजे"

9. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!!

10. परस्त्री मातेसमान मानत महिलांना सन्मानाने वागवाणारे "मातृभक्त, नारीरक्षक" छत्रपती शिवराय! खऱ्या अर्थाने ते "लोकराजे" होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी शिवशाही होती.....!

 शिवजन्मोत्सव_सोहळा🚩🙏

*ऋणानुबंध समुह अमरावती*

Sunday, 19 February 2023

निवृत्त शासकीय कर्मचऱ्यांसाठी पेन्शन

 * केंद्रीय कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2016 पासून सातवे वेतन आयोग लागू झाले. परंतु महाराष्ट्र राज्य शासनाने, आपल्या कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2019 रोजी आदेश काढून, सातवे वेतन आयोग लागू केले. परंतु 01 जानेवारी 2016 पासून सेवानिवृत्त झालेले. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सेवानिवृत्तीचे लाभ देण्यात आले. त्यानंतर. एक जानेवारी 2019 रोजीच्या राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे. आपल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही सातव्या वेतन आयोगानुसार सेवानिवृत्तीच्या लाभाचा फरक देण्यात आला. परंतु एक जानेवारी 2016 पासून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी. पैकी काही कर्मचारी प्रकृती बरी नसल्याने किंवा अल्पशा आजाराने मयत झाले. अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात आले. त्यामध्ये ग्रॅज्युएटीचा फरक देण्यात आला. रजा रोखीकरणाचा फरक देण्यात आला. परंतु पेन्शन विक्रीचा फरक नाकारण्यात आला. याबाबत मी स्वतः सेवानिवृत्त एपीआय पाणींद्रे माझे मित्र नामे दिनकर शिरसाट. यांच्या पत्नीला पेन्शन विक्रीच्या लाभातील फरक न मिळाल्याने. त्याबाबत मी त्यांच्या वतीने पूर्व प्रादेशिक विभाग कार्यालय येथे पेन्शन विक्रीच्या लाभातील फरक मिळावा म्हणून अर्ज विनंती केली. परंतु पूर्व प्रादेशिक विभागाने विनंती नाकारली. त्यानंतर सदरबाबत मी या महिलेच्या वतीने प्रतिष्ठा बिल्डिंग एक जी ऑफिस चर्चगेट. आपले पेन्शन कार्यालय येथे सदर महिलेसोबत जाऊन पेन्शन विक्रीच्या फरकाबाबत चौकशी केली. तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की वेतन आयोग लागू होण्यापूर्वी जे राज्य शासकीय कर्मचारी मयत झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंब पेन्शन धारकांना पेन्शन विक्रीचा लाभ देता येत नाही. कारण त्यांच्या पेन्शन मधून त्यांना देण्यात आलेल्या फरकाची रक्कम वसूल करता येत नाही. त्यामुळे शासनाने असे आदेश केले आहेत की. त्यांना पेन्शन विक्रीचा फरक देऊ नये. सदर महिलेस पेन्शन विक्रीचा फरक मिळावा म्हणून मी सर्व संबंधित कार्यालयाची भेट घेऊन सर्व अधिकाऱ्यांना विनंती केली. परंतु त्यांनी माझ्या विनंतीस काही एक सहकार्य केले नाही. म्हणून मी महाराष्ट्र राज्य कर्मचारी न्यायालय ( मॅट) न्यायालयात दावा (केस) दाखल केली. सदर दाव्याचा निकाल 22 डिसेंबर 2022 रोजी देण्यात आला. त्यामध्ये सदर महिलेस पेन्शन विक्रीच्या लाभातील फरक सहा आठवड्यात देण्याबाबत न्यायालयाने आदेश केले. त्याप्रमाणे आज दिनांक 10/02/2023रोजी सदर महिलेस पेन्शन विक्रीच्या लाभातील फरक त्यांचे बँकेच्या पेन्शन खात्यात जमा केलेला आहे. तरी माझी आपणास विनंती आहे की सदरचा संदेश आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या नंबर वर व ग्रुप वर पाठवा जेणेकरून आपल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंब पेन्शनधारकांना याचा लाभ मिळवून देता येईल. सदर महिलेस पेन्शन विक्रीच्या लाभातील फरकाची रक्कम रुपये सहा लाख एवढी मिळालेली आहे. आपल्या कुटुंब पेन्शन धारकांच्या दृष्टीने ही रक्कम फार मोठी आहे. तरी सर्व कुटुंब पेन्शन धारकांना ही रक्कम मिळावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. तरी कृपया हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करावा ही माझी विनंती आहे . काही चूक झाली असल्यास क्षमा असावी ही विनंती आहे मी ए. पी. आय. पाणिंद्रे माझा मोबाईल नंबर 9082919905 आपल्याला मदतीची अपेक्षा असल्यास संपर्क साधने

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळा गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल

 किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळा

गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल


                                        - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            पुणे, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे, आमदार प्रवीण दरेकर, अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते. 


            छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी येऊन दर्शन घेणे रोमांचक अनुभव आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. आज घराघरात शिवजयंती साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकीक कार्याची आठवण प्रत्येकाच्या मनात सतत रहाते. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण काम करतो. त्यांच्या विचारानुसार राज्य शासन सर्वसामान्य, गोरगरीब आदी सर्व घटकांसाठी काम करीत आहे.

शिवनेरी हे जगाचे श्रद्धास्थान

            महाराजांचा आदर्श केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आवश्यक आहे. त्यामुळे महाराजांनी बाणेदारपणे औरंगजेबाला उत्तर दिले त्या आग्राच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होत आहे. राज्य शासन पर्यटन विभागामार्फत शिवनेरीच्या पायथ्याशी हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करीत आहे. शिवनेरी हे जगाचे श्रद्धास्थान आहे.


शक्ती आणि युक्तीच्या आधारे स्वराज्याची निर्मिती


            शक्ती आणि युक्ती ही दोन शस्त्रे महाराजांच्या रणनितीचा भाग होती. त्यातून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, प्रजेचे कल्याण व्हावे यासाठी प्रयत्न केले. रयतेवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. रयतेच्या रक्षणासाठी, हितासाठी कधी त्यांनी तडजोड केली नाही. दूरदृष्टीने गडकोट बांधले. ते कुशल प्रशासक, संघटक होते. त्यांनी शेती, सिंचन, शिक्षण, भाषा, महसूल, शासन, प्रशासनाच्या अनेक योजना आखल्या. समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेतली. त्यांच्या पराक्रमापुढे परकियांच्या माना झुकल्या. पेशावर ते तंजावरपर्यंत छत्रपतींचा भगवा डौलाने फडकला, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काढले. 


शिवनेरी परिसराचा विकास आराखडा वेळेत पूर्ण होईल.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शिवनेरी परिसराचा विकास आराखडा वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होईल. गडकिल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. वढू, तुळापूरचाही चांगल्या प्रकारे विकास केला जाईल. शिवनेरी येथे शिवप्रभुंचे दर्शन घ्यायला कोणालाही अडथळा, बंदी नसेल. शिवजन्मोत्सवाचे अधिक चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


शिवरायांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बृहद कार्यक्रम- उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस


       उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवराय होते म्हणून आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, मानाने जगतो. शासनाने सर्व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दरवर्षी 3 टक्के निधी गडकिल्ल्यांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. किल्ल्याच्या वेगळ्या निधीव्यतिरिक्त हा निधी असल्याने संवर्धनासाठी निधीची कमतरता नसेल. शिवजन्मस्थानाच्या दर्शनाबाबत योग्य नियोजन करण्यात येईल.


            शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासंदर्भात बृहद असा कार्यक्रम सरकारने हाती घेतला असून 1 वर्ष सातत्याने महाराजांचा विचार, स्मारके आणि महाराजांचे तेज जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सरकार करेल. रायगड येथे उत्खननात वेगवेगळ्या गोष्टी सापडत असून नवा इतिहास समोर येत आहे. अशाच प्रकारचे काम शिवनेरी येथेही होईल. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या राजा वढू, तुळापूर साठी 397 कोटी रुपयांचा आराखडा केला असून तेथेही चांगल्या प्रकारे विकास केला जाईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.


            यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनीही विचार व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. 


            यावेळी जुन्नर येथील छत्रपती संघर्ष मर्दानी खेळ आखाड्याच्या पथकाने मर्दानी खेळांचे चित्तथरारक सादरीकरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली. 


            कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शिवनेरी भूषण पुरस्कार ह.भ.प. नामदेव महाराज घोलप यांना मरणोत्तर त्यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. आयर्नमन म्हणून पुरस्कार मिळवलेल्या मंगेश चंद्रचूड कोल्हे तसेच खेळाडू संदेश नामदेव भोईर यांनाही शिवनेरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार मिलिंद मधुकर क्षीरसागर यांना देण्यात आला. यावेळी 'शिवचरित्रातून काय शिकावे' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले.


            कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डुबल यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.


पालकमंत्री यांच्याकडून शिवाजी महाराजांना वंदन


        पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सकाळी किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सवानिमित्त बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देऊन शिवरायांना वंदन केले.



                                                                       दि. 19 फेब्रुवारी 2023


                                                                                

राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

            मुंबई, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

            यावेळी आमदार सदानंद सरवणकर, मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बृहन्मुंबई महानगर पालिका व श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले होते. 

            अभिवादन सोहळ्यानंतर राज्यपाल क्रीडा भवन येथे महानगरपालिकेतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील उपस्थित राहिले. आज प्रथमच राष्ट्रगीतासोबत 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत देखील गायले गेले. यावेळी महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा, समूहगायन व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.  

Governor Bais garlands statue of Chhatrapati Shivaji Maharaj on Shiv Jayanti

            The newly appointed Maharashtra Governor Ramesh Bais garlanded the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj at the Chhatrapati Shivaji Maharaj Maidan (Park) in Mumbai on the occasion of Shiv Jayanti on Sunday (19th Feb).

            Governor Ramesh Bais later participated in the Shiv Jayanti celebrations organised by the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) at Krida Bhavan and listened to the patriotic songs on the life of Chhatrapati Shivaji Maharaj. The musical programme was presented by the Sangeet Kala Academy of BMC. For the first time this year, the State song 'Jai Jai Maharashtra Majha' was sung along with the National Anthem.



               MLA Sadanand Sarvankar, Brihanmumbai Municipal Commissioner I S Chahal, Chairman of the Shri Chhatrapati Shivaji Maharaj Smarak Samiti Kisan Jadhav, Additional Municipal Commissioner P. Velarasu, officials and invitees were present.


 

                                     

छत्रपती शिवाजी महाराज यांना विधान भवना

मुंबई, दि.१९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सकाळपासूनच विधान भवनाचा परिसर तुतारी-सनई-चौघड्याच्या निनादाने दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेषातील तुतारीवादक हे या शिवजयंती सोहळयाचे वैशिष्टय ठरले.  


याप्रसंगी विधानसभा अध्यक्षांचे सचिव महेंद्र काज, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

०००



कला कारी ला सलाम

 


शिवजयंती

 *🚩प्रौढ़-प्रताप-पुरंदर*

*🚩गो-ब्राह्मण-प्रतिपालक*

*🚩हिंदवी स्वराज्यसंस्थापक*

*🚩क्षत्रियकुलावतंस*

*🚩कुलभूषण*

*🚩कुलवसंत*

*🚩चारीत्रवान*

*🚩शीलवान*

*🚩गुणवान*

*🚩शस्त्रास्त्र-शास्त्रपारंगत*

*🚩अष्टावधानजागृत*

*🚩अष्ठप्रधानवेष्ठित*

*🚩न्यायालंकारमंडित*

*🚩गजपती*

*🚩गढ़पती*

*🚩नरपती*

*🚩भूपती*

*🚩सुवर्णरत्न-श्रीपती*

*🚩अखंड पराक्रमाचा महामेरू*

*🚩सिहांसनाधीश्वर*

*🚩राजाधिराज महाराज*

*🚩श्रीमंत श्रीमंत श्रीमंत*

*🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय...🙏🏻🙏🏻🙏🏻🚩*


*🚩३३ कोटि देवांच्या आधी, ते देव ज्यांच्यामुळे सुरक्षित आहेत त्यांना...आई-बापाच्या सोबत, ज्यांच्यामुळे त्यांची अस्मिता टिकून आहे त्यांना...सबंध हिन्दुस्तानचे आणि हिंदूंचे आराध्य दैवत श्रीमन्महाराज छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांना ३९३ व्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा🙏🏻🚩*


*🙏🏻...माझ्या तमाम मावळ्यांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा...🙏🏻*


*🚩...जय भवानी


...🚩*

*🚩...जय शिवाजी...🚩*

Featured post

Lakshvedhi