Friday, 17 February 2023

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी

 नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी


            मुंबई, दि. 16 :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे.


            तत्पूर्वी श्री. बैस यांचे शुक्रवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर त्यांचे स्वागत करतील.


श्री.रमेश बैस यांचा परिचय


            नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे.


संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्री. बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.


            दिनांक २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले रमेश बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले.


            सन १९७८ साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन १९८० ते १९८५ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले. सन १९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.


            सन १९८९ साली श्री बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.


            सन १९९८ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.


            सन १९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले.


            सन २००३ साली श्री. बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.


            आपल्या प्रदीर्घ संसदीय जीवनात श्री बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.


            सन २००९ ते २०१४ या काळात श्री. बैस हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. सन २०१४ ते २०१९ या काळात १६ व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. श्री बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयकासंदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.


            सन २०१९ साली श्री. बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दिनांक २९ जुलै २०१९ ते १३ जुलै २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर दिनांक १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली.


            नवनियुक्त राज्यपाल श्री. बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. श्री. बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. मध्यप्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.


            महाराष्ट्राला अशा प्रकारचे विविधांगी कार्यानुभव असलेले व्यक्तिमत्त्व राज्यपाल म्हणून लाभलेले आहेत.


*****

जगभरातील उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वासगुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’

 जगभरातील उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वासगुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 17 :- “केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने काम करीत आहे. राज्य शासन उद्योग वाढीसाठी योग्य आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. उद्योजकांना विश्वास प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढायला सुरूवात झाली आहे. परदेशातील गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर (MACCIA) यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राघवेंद्र, करूणाकर शेट्टी, आशिष पेडणेकर आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, राज्यातील उद्योजक ही राज्याची ताकद आहे. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेला उपस्थित असलेल्या जगभरातील अनेक उद्योजकांनी महाराष्ट्राच्या दालनाला भेट दिली. अनेक उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुकता दर्शवली. या परिषदेत सुमारे एक लाख 37 हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार झाले. केवळ सामंजस्य करार न करता त्याच्या अंमलबजावणीची कार्यवाही सुरू केलेली आहे. हे करार केवळ मुंबई, पुणे, नाशिक येथे नसून मराठवाडा, विदर्भाच्या दुर्गम भागाला प्रगतीकडे नेणारे आहेत. जमीन वाटप आणि इतर सुविधांची पूर्तता विभागामार्फत केली जात आहे.


            देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा 15 टक्के वाटा आहे. औद्योगिक उत्पादनात 20 टक्के आणि परकीय गुंतवणुकीत सुमारे 30 टक्के एवढा वाटा आहे. राज्यात 12 लाख सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आहेत. त्यांच्या माध्यमातून 94 लाख लोकांना रोजगार मिळत आहे. नव्या उद्योगांच्या माध्यमातून नव्याने सुमारे दीड लाख रोजगार तयार होणार आहेत. कौशल्य विकास विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगार मिळत आहेत, विविध रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळत आहे. एकीकडे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमीपूजन होत आहे, त्याचबरोबर औद्योगिक गुंतवणुकीवर भर दिला जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            समृद्धी महामार्ग हा एक हरित मार्ग आहे. या महामार्गामुळे उद्योगाला चालना मिळणार आहे. लॉजिस्टिक पार्क, टेक्स्टाईल पार्क याठिकाणी गुंतवणूक करावी, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.


            राज्यभरात रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे. मिसिंग लिंक कमी करून अंतर कमी केले जात आहेत. प्रवास वेगवान होत आहे. याचा फायदा उद्योगांना होणार आहे. नॅशनल पोर्टस विकसित करण्यासाठी ‘गती शक्ती ‘ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. रेल्वेसाठी केंद्राने साडेतेरा हजार कोटी रूपये राज्याला दिले आहेत. सहकार क्षेत्रासाठी केंद्राने दहा हजार कोटी रूपयांचा दिलासा दिला आहे. प्रधानमंत्री यांचे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न आणि त्यात राज्याचा एक ट्रिलियन डॉलरचा सहभाग पूर्ण करण्यासाठी या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसह आपल्या सारख्या उद्योजकांचा हातभार लागणार आहे.


            महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना एक चांगले व्यासपीठ मिळते. जगभरातून आलेल्या रिटेलर्स व मोठ्या उत्पादकांना इथे विक्रीची संधी मिळते. आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असेही ते म्हणाले.


जगातील सर्वात मोठ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे ऑक्टोबरमध्ये आयोजन - उदय सामंत


            उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, उद्योजकांना वेळेत इन्सेन्टिव्ह आणि सबसिडी देण्यात येत आहे. 2300 कोटी इन्सेन्टिव्ह दिले. आणखी 15 दिवसांत 2000 कोटी इन्सेन्टिव्ह देणार आहे. उद्योगांना त्वरित परवानग्या मिळण्यासाठी मैत्री कायदा लागू केला. 30 दिवसांत उद्योगांना लागणाऱ्या सर्व परवानग्या याद्वारे मिळू लागल्या आहेत. याचे अधिकार उद्योग विभागाच्या आयुक्तांना देण्यात आल्याने परवानग्या मिळण्यास अडचणी येत नाहीत. उद्योगाला पुढे नेणारे महाराष्ट्र राज्य आहे. यामुळे राज्य शासन जगातील सर्वात मोठ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


            महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन (MITEX) हे 17 ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर आयोजित करण्यात आले. विविध उद्योगांतील सहभागींना एकाच छताखाली आणून ग्राहकोपयोगी वस्तूंपासून ते यंत्रसामग्रीपर्यंतचे प्रदर्शन येथे होत आहे. प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि विक्री करणे हे व्यापार प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी आणि रिटेल क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ असेल, अशी माहिती श्री. गांधी यांनी यावेळी दिली.


            या प्रदर्शनात गुजरात, जम्मू - काश्मीर, राजस्थान, गोवा आणि परदेशातील उद्योजक सहभागी झाले आहेत. उत्पादन, वस्त्रोद्योग, हस्तकला आणि हातमाग, अंतर्गत आणि बाह्य, जीवनशैली, फॅशन, भेटवस्तू, लेखन साधने, प्रवास आणि पर्यटन, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ यासारख्या विविध क्षेत्रांसाठी लागणाऱ्या उत्पादनांचे स्टॉल्स येथे लावण्यात आले आहेत.


००००

राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना;नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी

 राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना;नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी.

            मुंबई, दि. 17 : मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनीषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते.


            विमानतळाकडे प्रस्थान करण्यापूर्वी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. 


            महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवारी दुपारी १२.४० वाजता राजभवन येथे शपथ घेणार आहेत.


०००

Governor Koshyari given Guard of Honour by Navy;


New Governor to take charge on Saturday.

            Mumbai, 17th Feb : Outgoing Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari was given a ceremonial Guard of Honour by the contingent of Indian Navy at Raj Bhavan Mumbai. Chief Secretary Manukumar Shrivastava, DGP Rajnish Seth, Commissioner of Police Vivek Phansalkar, ACS Protocol Manisha Mhaiskar and others were present.


            The Governor proceeded to the Siddhi Vinayak Mandir on the way to the airport. The Governor will proceed to Dehradun later in the day.


            The newly appointed Governor of Maharashtra Ramesh Bais will take charge at 12.40 pm on 18th February.


0000



सुन्दर गुंफण पतिपत्नी ची

 👌 खूप छान कथा..👌

पती व पत्नी कायद्याने दोघे वेगळे 

झाल्यावर त्याने राहतं घर विकायला काढलं.


ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलानीच ते घर 

विकत घेतलं......


पून्हा घराची 

एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले... 


'मी माझ्या लेकीला ओळखतो .....


तसा तुलाही.. ...


सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस... 


अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा......


पून्हा भावनेच्या भरात 

एकत्र यावसं वाटलं तर?


तसं व्हायला नको...


म्हणून 

ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो......


कधी वाटलं तर येऊन बसत जा.....


"भरल्या घरा पेक्षा 

रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी......"


भावनेपेक्षा विचार 

जास्त ठाम असतात......


विचारांवर ठाम झालास 

तर ......

घेतल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही.. ...


निर्णय ठाम झाला की 

माझी किल्ली मला परत दे. .....


नाहीतर येऊन 

माझी मुलगी परत घेऊन जा......'


आणि खरच तो ढळत्या दुपारी 

रिकाम्या घरात बसायला लागला......


कलंडणारी ऊन्ह आपल्या घरात 


अशी ऐसपैस पसरतात 

त्याला माहीतच नव्हतं... ...


मावळतीचा वारा 

अख्ख्या घराचा ताबा घेतो .. ..


याची त्याला कल्पनाच नव्हती...


एक चूकून राहिलेलं 'कालनिर्णय' होतं 

भिंतीवर हवेमुळेफडफडत होतं ....


त्या फडफडण्याचा 

आवाज सुद्धा त्याला नवा होता... ...


त्याने जवळ जाऊन 

बघितलं ......कसल्या कसल्या नोंदी 

त्यावर तिने करून ठेवल्या होत्या...


कसली बीलं देण्याची तारीख, 

दूधाचा हिशोब, कामवालीचे खाडे,

पेस्ट कंट्रोलची तारीख...


सिलेंडर संपल्याची तारीख, 

ग्राहकचं सामान येण्याची तारीख...


इस्त्रीचे कपडे त्याचा हिशोब 

या कशातच तो सहभागी नव्हता... ..


अगदी तिच्या 

महिन्याच्या तारखा... 


तारीख पुढे गेलीतर....


त्याला गलबलूनच आलं ....


या कशा कशातच

आपण सहभागी नव्हतो.. ...


ती एकटीचा डाव 

खेळत राहीली आणि आपण फक्त.......


तक्रार करत राहिलो.....


त्याला त्या 'कालनिर्णय' 

समोर उभं राहणं शक्य होईना. .....


तो बेडरूम मधे आला 

त्याने खिडकी उघडली .....


खिडकीत तिने 

हौसेनं लावलेली शेवंती होती ......


वाळून वाळून 

झूरायला आलेली ....


तिला भिजवयला 

तो आतूर झाला,......


कातर झाला...


पाणी घालायला 

भांड नव्हतं .......


त्याने कूंडीच 

सींक मधे नेली यथेच्छ पाणी शिंपडलं.....


तहानलेली शेवंती 


गटा गटा पाणी प्यायली.. ....

आणि तोच तृप्त झाला......


तेवढ्यात लँच कीने 

दार उघडल्याचा आवाज आला .......


ती आली होती......


 शेवंतीसारखीच... .....


तिला समोर बघून 

तो उनमळून गेला... ...


काय अवस्था 

करून घेतली आहे हिने... ....


हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान 

आपल्या लक्षात कसं आलं नाही?... ....


की आपण लक्षात घेतलं नाही?

जिद्दीला पेटून भांडते तेंव्हा 

ती कुठल्याही टोकाला पोहोचते 

हे काय आपल्याला लग्नाआधी माहीत नव्हतं?.....


दोघांची नजरा नजर झाली... 


दोघे क्षणभरासाठी स्तब्ध.....


ती म्हणाली, 


"मी ही शेवंतीच न्यायला आले होते... "


तो गलबलून म्हणाला, 


"आत्ताच पाणी दिलय... ...


तिचं निथळणं संपेपर्यंत थांब ना......"


आणि ती थांबली......


..अगदी... कायमची...!!!


पाहताक्षणी एखादी 

व्यक्ति आवडणं हे 'आकर्षण'असतं.....


परत पहावसं वाटणं हा 'मोह'असतो....


त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची 

इच्छा असणं ही'ओढ'असते.....


त्या व्यक्तिला 

जवळून जाणणं हा 'अनुभव' असतो.....


आणि त्या व्यक्तिला 

तिच्या गुणदोषांसह स्विकारणं .......


हेच खरं "प्रेम" असतं.....


हेच खरं "प्रेम" असतं.....


नात्याची सुंदरता 

एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.....


कारण एकही दोष नसलेल्या 

माणसाचा शोध घेत बसलात.......


तर आयुष्यभर एकटे राहाल......


विश्वास उडाला की आशा संपते......


आणि काळजी घेण सोडल की प्रेम......


म्हणुन, विश्वास ठेवा,....


आणि काळजी घ्या.....

आपल्या जीवनसाथी ची.... व आपल्या कुटुंबाची .....

आयुष्य खुप सुन्दर आहे..... 

💐👍💐👍💐 👌👌👌👌

लेखकाचे नाव माहिती नाही.

काय ते सोनेरी दिवस होते

 शाळेत असताना टीचर कडून हातावर छडी पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँट वर हात पुसून दुसरा हात पुढे करत असे....कारण मी साफसफाईच्या बाबतीत खूप जागरूक होतो 😎


माझे सगळे टीचर मला क्लासमध्ये उभा रहायला सांगून शिकवत असत...कारण माहितीये? ....ते सगळे माझी खूप इज्जत करत असत.😎


माझ्या शालेय दिवसांमध्ये, माझे शिक्षक बर्‍याचदा माझ्या आई पप्पा ना घेऊन यायला सांगत असत , कारण ते काहीही direct सांगायला मला घाबरत असत...🤣🤣🤣


मी जे काही लिहायचो ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असे, माझ हस्ताक्षर त्यांना खूप आवडत असे त्याच कारणास्तव ते बराचवेळी मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत...😅


कितीतरी वेळेस शिक्षक मला न विचारता त्यांचा किमती chalk माझ्या दिशेने कॅच पकडण्यासाठी फेकत असत...ही गोष्ट वेगळी की ती कॅच सुटून मलाच chalk लागत असे. 

उद्देश एकच होता की मी चांगला fielder बनावा हीच काय ती अपेक्षा होती त्यांची माझ्याकडून 😦


परीक्षेच्या वेळी बहुतेक वेळा मला 3-4 शिक्षक z टाइप सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंच च्या आजुबाजूला पूर्ण exam संपेपर्यंत उभे राहत असत.😮‍💨🤣


कितीतरी वेळा मला बेंच वर उभं करून मला सन्मानित करण्यात येत असे,  


कारण मी बाकी मुलांना व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घेण्यात यावी आणि मला वर्गातल्या सर्व मुली व्यवस्थित दिसायला हव्यात हा मुख्य उद्देश असायचा शिक्षकांचा.🤣


शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती 

माझ्या शरीराला vitamin D आणि मोकळी हवा मिळवी ह्यासाठी मला बर्‍याच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात मैदानाला 10 फेर्‍या मारायला सांगितल्या जात असत.

जेंव्हा की बाकी मुलं वर्गात घाम गाळत , गुदमरून शिकत असत.🤣


मी इतर मुलांपेक्षा हुशार असल्याने माझे बहुतेक सगळे शिक्षक मला नेहमी म्हणत असत.... 

तू शाळेत का येतोस...तुला ह्याची गरज नाहिये...🤣


वाह !!! काय ते सोनेरी दिवस होते 😮‍💨

घरे बिघडवणाऱ्या आजच्या TV. मालिकांपासून सावध राहा

 *घरे बिघडवणाऱ्या आजच्या TV. मालिकांपासून सावध राहा*

*पंडित कांबळे*

_________________

आपण कोणते कार्यक्रम पाहतो. ते कार्यक्रम घरातील सर्वानी एकत्र पाहण्यासारखे आहेत का ? त्या सर्व मालिकामध्ये काय दाखवले जात आहे. याचा जर विचार केला तर


1) अनैतिक संबंध

2) घटस्फोट

3) सासू आणि सुनेची भांडणे

4) घरातील इतर व्यक्ती नको फक्त पाहिजे नवरा बायको

5) एकमेकींच्या चुगल्या करणे

6) बायकोला सासू सासरे नको पण तिचे आई वडील पाहिजे.

आणि हे तुमच्या बरोबर झाले पाहिजे का ?

तुमच्या घरात असेच घडले पाहिजे का?


तुमच्या बायकोने/ नवऱ्याने, तुमच्या सासू सास-याने असे वागले पाहिजे का ?


म्हणतात ना आपण जे पाहतो, आपण जे ऐकतो, ते कोठे ना कोठे, कोणत्यातरी माध्यमातून आपल्या जीवनात घडत असते.


 आपल्या या जीवनात आपल्यावर नकळत पणे हे "स्टोरी रायटर" आपल्यावर करत असलेल्या हा अन्याय अत्याचार हे आपल्या लक्षातच नाही येणार.


आणि त्यांना हेच उलटे कार्य का सुचते?


 भारतातील कुटुंब व्यवस्था उध्वस्त करून संस्कृती संकटात टाकणे हा एक छुपा विकृत अजेंडा आहे या.

  आपल्या महापुरुषांच्या विचारांच्या 

आदानप्रदाना ऐवजी या असल्या विकृत सिरीयल्स दाखविल्या जातात.


काही अपवादात्मक मालिका सोडून.


त्यामुळे आपण या पुढे अशा प्रकारच्या सिरीयल पाहू नये आणि आपला वेळ व्यर्थ वाया घालवू नये ही अपेक्षा.


 सिरीयल मध्ये काय दाखवतात असे तर प्रेम ,घटस्फोट,अनैतिक सबंध, सवती मत्सर, भाऊबंदकी, कटकारस्थाने, विश्वासघात, स्टंटगिरी, काही सिरियल मधे तर मुलं सुना आल्या तरी बापाचे अनैतिक संबंध असलेली त्याच घरात येउन राजरोस राहते. मुलं त्यांचे आजी आजोबा हे सर्व एकत्रपणे राहून सहन करत असतात 

अन आपण सुग्रास अन्न खात खात हे असले अविचारी कथानक पहात असतो.

 हे असेच दाखवले जाते आणि संध्याकाळी 6 ते 7 ला चालू होतो टीव्ही, तो रात्री 11 ते 12 पर्यत तेच चालू असते. ज्यांना कोणाला या वेळेत शक्य नसेल त्यांचे करीता दुपारी परत प्रक्षेपण आहेच.


लहान मुलांसमोर काय पाहिले पाहिजे याचे भान ही आपल्याला नसते. 


या सिरीयल पाहण्यात आपण इतका वेळ घालवतो .


आपण विनाकारण आपले स्वतःच्या समस्या या रडक्या तोंडाच्या सिरियल घरात सकाळ संध्याकाळ च्या वेळी पाहुन स्वतः चे ब्रेन वॉश का करून घेतोय?


स्वतःच्या विचारात काहीही अनावश्यक घाणेरडे निगेटिव्ह गोष्टी का भरून ठेवतोय?


या सर्व विकृत गोष्टी पाहून व वेळ वाया घालवून काय सिध्द करणार आहोत?


 काय मिळवणार आहोत?


 आणि नाहीच या गोष्टी बघितल्या तर काय आभाळ कोसळणार आहे का ?


उलट आपला वेळ इलेक्ट्रिसिटी, पैसे, चारित्र, ऊर्जा, उत्साह आणि आत्मबल सकारात्मकता इत्यादी वाचेल.....!


आणि वर्षानुवर्ष हे बघत बसण्यापेक्षा त्या ऐवजी योगा-प्राणायाम-ध्यान इत्यादी सलग एकाच ठराविक वेळी नित्य नेमाने केल तर नक्कीच फायदाच होईल.


कधी आपण सहकुटुंब बसुन आपल्या महापुरुषांचे आत्मचरित्र वाचतो का ?


कधी आपण महापुरुषांनी केलेल्या कार्यावर सहकुटुंब चर्चा करत असतो का ?


याचे उत्तर आपण आपलेच शोधले पाहिजे.


अजुन ही वेळ गेली नाही.

नाहीतर हे अश्या विकृत सिरीयलच्या माध्यमातून आपल्याला असे गुंतवून ठेवतील.

 वेळीच सावध व्हा.


आणि असल्या विकृत सिरियल पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या मुलांकडे, घरांकडे, उदयोगधंद्याकडे लक्ष द्या.


आपल्या कामात गुणवत्ता आणि दर्जेदारपणा निर्माण करा.


ते कलाकार व त्यांची टीम त्यांचे करिअर बनवतात. प्रचंड पैसा कमावतात , रिसाॅर्ट मधे जाउन खर्चीक शुटींग करु शकतात कारण त्यांना त्यांच करिअर करायचंय.


जाहीरातदारांना त्यांचं प्राॅडक्ट विकायचय, अनेक सिरियल मध्ये तर प्रायोजकत्व घेणारे कंपनीच्या चाॅईसचे पात्र निवडलेले असतात.


आणि आपण आपला अमूल्य वेळ गमवितो हे सर्व पाहत असतो हे लक्षात घ्या!.


  त्यांचा मुख्य प्रेक्षक महिलावर्ग आहे .अनेक कुटुंबातील माहिला या मालिकांच्या इतक्या आहारी गेल्यात की सिरियल बघताना नातेवाईकांचा फोन आला तर त्यांना अडथळा वाटतो .


 अनेक मालिकांतील दृश्य आणि डायलॉग्स तरुण मुला -मुली समक्ष बघताना संकोच वाटतो.


   वर उल्लेख केलेल्या मालिकांतून लहान, शाळकरी बालकांवर , महाविद्यालयीन युवक - युवतीवर कोणते संस्कार करावेत असा प्रश्न नाही का तुम्हाला पडत ?

    मालिकानिर्माते विवेकी, चिकित्सक, राष्ट्रप्रेमी, समाजशील, संशोधक, नैतिकताधिष्ठित, समता, ज्ञानाधिष्ठित असा नवसमाज निर्माण करणाऱ्या मालिका बनवतंच नाहीत.


 ज्या राष्ट्रसंतांनी व राष्ट्रपुरुषांनी मानवतावादी समाजनिर्माणाचे, राष्ट्रउभारणीचे कार्य केले त्यांच्या कार्यावर हे कमाईदार T.V. वाले मालिका बनवतंच नाहीत . 

    अपवादाने बनविल्याच तर त्यामध्ये मसाला भरून अनेक काल्पनिक गोष्टी घुसडतात . आणि अशा मालिका थोडयाफार प्रमाणात बनविल्या तरी त्यांना प्रेक्षकवर्ग मिळत नसल्यामुळे अनेक मालिका मध्येच बंद पडल्या कारण प्रेक्षक वर्गाला मसालेदार, चटपटीत आणि अदभूत चमत्कार दाखवणाऱ्या मालिकांच्या अधीन केले गेले आहे . 

  बघा , हे आपल्याला पटतंय का ? 


   हे चिकित्सात्मक / विश्लेषण ,विचार योग्य वाटत असतील तर कुटुंबात यावर चर्चा करा आणि विविध मार्गाने समाजात Share करा आणि अयोग्य वाटत असतील तर खुशाल टीका / निंदा करा . 

मी क्रिएटिव मिडियाचा द्वेष्टा नक्कीच नाही, परंतू मनोरंजनाच्या नावावर आपल्या संस्कृतीचा आणि संस्कारांचा गळा घोटणं मला मान्य नाही

जिंदगी इमतीहान लेती है




डे


जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही





 

Featured post

Lakshvedhi