सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 13 February 2023
सांग कधी कळणार तुला
🌻
बाळासाहेबांच्या बायकोचा *३५ वा वाढदिवस* होता. बाळासाहेब दौऱ्या निमित्त शहरा बाहेर होते.
बाळासाहेबांनी थोडी युक्ती केली. बायको ३५ पेक्षा ही कमी वयाची वाटते असे सुचवण्या साठी म्हणून त्यांनी फक्त *२५ गुलाबांची 🌹 फुलं* आपल्या बायको ला पाठवण्यासाठी ऑर्डर केली.
फुलां बरोबर देण्यासाठी
बाळासाहेबांनी note पाठवली, " *डिअर, मी तुला तितकी च फुलं पाठवत आहे जितक्या वर्षाची तू मला वाटतेस* " 💃
नेमकी फुलवाल्या कडे *'एकावर एक फ्री'* 🌹+🌹स्कीम चालू होती....
🤦🏻♂️
....
....
*आत्ता बायको बाळासाहेबांची वाट पहातेय*. 😝😆🤣
मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविणार
मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही.
मुंबई, दि. 13 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईत मेट्रो, ट्रान्सहार्बर लिंक, रस्ते या पायाभूत सुविधेवर विशेष भर देण्यात येत आहे. मार्च २०२४ पर्यंत मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँकीटचे करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यासाठी ६५०० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. मुंबईतून कनेक्टिव्हीटी उत्तम असल्याने आंतरराष्ट्रीय नागरिक, उद्योजक मोठ्या संख्येने येत आहेत, यामुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याचा संकल्प केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दादर येथे टीव्ही ९ च्या वतीने आयोजित 'महाराष्ट्राचा महासंकल्प' या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आमदार सदा सरवणकर, टीव्ही 9 चे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बरूण दास, संपादक उमेश कुमावत उपस्थित उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, राज्य शासन सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. गेल्या सात महिन्यात जनतेच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. कोरोना काळात बंद पडलेले विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू केले. या प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण केले. हा महामार्ग शिर्डीपर्यत सुरू झाला असून येत्या वर्षाअखेर मुंबईपर्यतचा महामार्ग पूर्ण होईल. यामुळे नागपूर ते मुंबई अंतर 6 ते 7 तासांवर येणार आहे. शेवटचा टप्पा येत्या वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. या समृद्धी महामार्गावर 18 ठिकाणी नवीन नोड तयार करण्यात आले असून विविध ठिकाणी उद्योग, लॉजिस्टीक पार्क, फूड पार्क तयार झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाचे मूल्यवर्धन होईल. पर्यटनाला चालना मिळणार असल्याने लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. महामार्गांवर 33 लाख वृक्ष लागवड करणार असून यामुळे पर्यावरण समतोल राखला जाईल. सुमारे २५० ते ५०० मेगावॅट सोलर वीज तयार करण्याचे उद्दिष्ट असून हा ग्रीन महामार्ग आहे. सर्व प्रकल्प पर्यावरणाचा समतोल राखून करण्यात येत आहेत.
ट्रान्स हार्बर लिंकमुळे केवळ १५ मिनिटांत रायगड
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, मुंबईच्या सुशोभीकरणावर, कोळीवाड्यांचा विकास करण्यावर भर देण्यात येत असून शिवडी न्हावाशिवा ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबईतून रायगडला केवळ 15 मिनिटांत पोहोचणार आहोत. याठिकाणी ग्रोथ सेंटर, लॉजिस्टिक पार्क, टाऊनशिप, टेक्नो हब, फार्मा हब बनविणार आहे. याठिकाणचे फ्लेमिंगो इथेच राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.
पुणे-मुंबई आठ लेनचा जगातील सर्वात रूंद बोगदा करणार
मुंबईहून पुण्याला घाटातून जाताना वाहतूक समस्या दूर करण्यासाठी जगातील सर्वात रूंद आठ लेनचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होईल, प्रदूषण कमी होईल, इंधन आणि वेळ वाचणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गाला गडचिरोली, भंडारा, गोंदिया जोडणार
समृद्धी महामार्गाची व्याप्ती वाढविणार असून आता नागपूर-मुंबईसह गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड, जालना असा महामार्ग जोडणार आहे. तसेच समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई-सिंधुदुर्ग हा मार्गही हाती घेण्यात येणार आहे. शिवाय नागपूर-गोवा शक्तीपीठ करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यामुळे शेतकऱ्यांचा माल त्वरित मोठ्या बाजारपेठामध्ये पोहोचणार असून माल खराब होण्याची शक्यता कमी होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वर्सोवा-विरार सी-लिंक
मुंबईतल्या व्यक्तीला विरारला पोहोचायला दोन तास लागतात. मात्र वर्सोवा-विरार सी-लिंक पॉईंटमुळे हे अंतर कमी होणार आहे. मुंबईतली व्यक्ती केवळ ४५ मिनिटात विरारला पोहोचणार आहे. हा विकास केवळ शहरापुरता मर्यादित न ठेवता पालघरसह ग्रामीण भागापर्यंत विकास पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शिवाय मेट्रो २ अ, ७ अ सुरू झाल्याने वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे. मेट्रो ३ सुरू झाल्यास वेळ, इंधनाची बचत होईल. ३३७ किमी मेट्रोचे जाळे तयार झाल्याने ६० ते ७० लाख कारचा वापर कमी होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून १४७ प्रकारच्या तपासण्या
राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतली असून मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना १०० ठिकाणी सुरू केला आहे. शिवाय २५० आणखी दवाखाने सुरु करणार असून ग्रामीण भागातही प्रत्येक तालुक्यात एक दवाखाना सुरू केला आहे. यामाध्यमातून १४७ विविध प्रकारच्या तपासण्या मोफत होणार आहेत. ‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ योजनेंतर्गत राज्यातील चार कोटी 39 लाख मातांची तपासणी करून रोगनिदान केले. दुसऱ्या टप्प्यात 0 ते 18 वयोगटातील 3 कोटी मुलांची तपासणी सुरू केली. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अपग्रेडेशन सुरू केले असून प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी उपचार देण्याचा प्रयत्न राहणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
१८ ते २० सिंचन प्रकल्पांना मान्यता
कृषी, पाणी टंचाई यावर शाश्वत उपाय शोधण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शेतकरी आत्महत्या रोखणे, पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देणे यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. १८ ते २० सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामुळे अडीच ते पाच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करून प्रभावीपणे राबवित आहोत. वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी नदी जोड प्रकल्प हाती घेत आहे, असेही त्यांनी सांगितले.
दाओस येथील आर्थिक फोरममध्ये दीड लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. उद्योगस्नेही धोरण ठेवल्याने अनेक नवीन उद्योग राज्यात येत आहेत. महाराष्ट्रात कौशल्य असलेले मनुष्यबळ, कनेक्टिव्हीटी असल्याने मोठ्या प्रमाणात थेट गुंतवणूक होत आहे. उद्योगांनी राज्यात यावे यासाठी त्यांना जलद गतीने परवानग्या देण्यात येत आहे. सर्व सवलती देण्यात येत असून एक खिडकी योजनेतून सर्व प्रकारच्या परवानग्या देत आहोत. उद्योगांना पोषक वातावरण देण्यात येत असून यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.
ऊस उत्पादक शेतकरी, सहकार, चित्रपट उद्योग यासाठी सवलती देऊन राज्य शासन सहकार्य करीत आहे. मुंबईतील रखडलेले प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येत आहे. जनहिताच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सडेतोड उत्तरे दिली.
000
विविध विकास कामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार
विविध विकास कामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेसह विविध विकास कामांचे भूमिपूजन
नाशिक, दि. : 13 (जिमाका वृत्तसेवा) : पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल. तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आज नांदगाव तालुक्यातील करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजना, शिवसृष्टी यांचे भूमिपूजनाच्या आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार, बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मालेगाव अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेला 15 टक्के निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या पूर्णत्वाने येथील स्थानिकांना दररोज पाणी मिळणार असून त्यांच्या आयुष्यात बदल घडविणारी ही योजना असल्याने यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच मनमाड म्हणजे राज्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असल्याने येथील रस्त्यांच्या विकासाकरिता निधी देण्यात येऊन बंद असलेल्या योजना सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मनमाड नगरपरिषद इमारतीच्या दुरुस्तीसाठी 10 कोटींचा निधी दिल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले.
ते म्हणाले, नांदगाव तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मनमाड येथे एमआयडीसी सुरू करण्याकरिता येत्या नजीकच्या काळात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे फिरते दवाखाने, फिरते कार्यालये या संकल्पनाचे कौतुक करून यांच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताचे काम येथे होत असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
महिलांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार : डॉ भारती पवार
आज करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनातून महिलांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी करंजवण -मनमाड पाणी पुरवठा योजनेस तात्काळ मंजूरी दिली आहे यातून त्यांची कामाबद्दलची तत्परता गावोगावी पोहचत आहे. नांदगाव शहरात साकारत असलेली भव्य शिवसृष्टी केवळ नांदगावचा नाहीतर सर्व महाराष्ट्रातील जनतेचा ऐतिहासिक वारसा आहे. नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव व सटाणा तालुक्यांचा समावेश करण्याबाबत शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येवून त्याबाबत मंजूरीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पाणीपुरवठामंत्री श्री. पाटील म्हणाले की, या पाणीपुरवठा योजनेमुळे महिलांच्या 50 टक्के समस्या कमी होणार आहेत. या योजने सोबतच ग्रामीण पुरवठा विभागाच्या वतीने देखील 500 कोटी रुपयांच्या पाणी योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून मनमाडच्या विकासात भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड शहर व मार्गस्थ -२ गावे पाणी पुरवठा (करंजवण धरण उद्भव) योजना, शिवसृष्टी व ललवाणी उपजिल्हा रुग्णालय, मनमाड या कामांच्या कोनशिलांचे अनावरण करण्यात आले. तसेच फिरते दवाखाने व फिरते कार्यालये असलेली वाहनांचे लोकार्पण करून दिव्यांग बांधवांसाठी सायकलींचे वाटप यावेळी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मी श्री स्वामी समर्थ पाहिले
🙏🌸 *: मी श्री स्वामी समर्थ पाहिले :* 🌸🙏
*"खरोखरच मनापासून वाचाल तर डोळ्यात पाणी येईल.*
एका भयाण रात्री *"मठाच्या* पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण *पंधरा वर्षाचा एक मुलगा* अभ्यास करताना पाहिला.
*थंडीचे* दिवस होते. *कुडकुडत* होता पण वाचनात *मग्न* होता.
हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ.
दिवसा कधी दिसत नसायचा.
खुप *जिज्ञासा* होती त्या मुलां बद्दल जाणण्याची.
एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो.
मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी *पार्सल* घेऊन जाऊ.
*रात्रीचे साडेबारा* वाजले असतील.
मी त्या मठाकडे आलो.
तर तो *मुलगा* नेहमी प्रमाणे *मठाच्या पायरीवर* अभ्यास करत दिसला.
मी *गाडी* थांबवली. त्याच्या जवळ गेलो.
मला बघून तो गालातल्या गालात *हसला.*
जणू माझी त्याची जुनी ओळख असावी.
मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस?
सर माझ्या *घरात लाईट* नाही.
माझी *आई आजारी* असते.
दिव्यात *रॉकेल* घालून अभ्यास करायला. माझी *ऐपत* नाही.
बाळ तू मला बघून का *गोड हसलास* ?
सर तुम्ही *स्वामी* आहात !
नाही रे!
सर तुम्ही माझ्या साठी *स्वामीच* आहात.
ते जाऊदे तू *जेवलास* का?
मी तुझ्यासाठी *खाऊचं पार्सल* आणलं आहे.
सर म्हणूनच मी *हसलो.*
मला माहित होतं.
माझे ( स्वामी ) कोणत्याही *रूपात* येतील पण मला *भुकेलेला नाही* ठेवणार.
मी जेंव्हा जेंव्हा *भुकेलेला* असतो, ते काहींना काही मला *देतातच.*
कधी *नवसाचे पेढे* तर कधी *फळ* ते मला देऊन जातात.
आज मी *भुकेलेला* होतो पण *निश्चिंत* होतो.
मला माहित होतं....ते काहीतरी कारण करून मला *भेटायला* येणार आणि *तुम्ही* आलात.
तुम्ही *स्वामी* आहात ना !
मी *निःशब्द* झालो, नकळत माझ्या कडून *पुण्याचं* काम घडलं होतं.
रोज *कर्जाच्या* ओझ्याखाली दबताना *स्वामींना* कोसत होतो. त्यांनी आज मला *देवा ची उपाधी* देऊन लाजवलं होतं.
त्याने तो अर्धवट *खाऊ* खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या *आईला* देऊन येतो.
माझे डोळे *तरळले.*
त्याला काही विचारण्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं.
तो पाच मिनिटांनी परत आला.
त्याच्या ओंजळीत *पारिजातकाची फुलं* होती.
सर,
माझी *आई* सांगते, ज्या *परमेश्वराने* आपल्या *पोटाची खळगी* भरली त्याच्या चरणी *ओंजळभर फुलं* तरी वहावीत.
क्षणभर *डोळे* बंद केले आणि त्या बंद दारातल्या *श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती कडे* पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड *हसण्यासारखं* वाटले.
नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं.
*शाळा, कॉलेज, मंदिर,मठ बंद* झाले.
देवळं ओस पडली. देवळांना *कुलूप* ठोकली आणि रस्त्यावर *शुकशुकाट* झाला.
असच एके दिवशी *त्या* मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या *मठाकडे* डोकावलं.
रात्रीची वेळ होती.
मठाच्या पायरीवरील *लाईट बंद* होती आणि तो *मुलगा* कुठेच दिसला नाही.
वाईट वाटलं मला.
या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ?
काय खात असेल ?
कसा जगत असेल ?
असे *ना ना प्रश्न* आ वासून उभे राहिले.
कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी *प्राण* गमावले.
असाच आमचा एक मित्र *पॉजिटीव्ह* होऊन दगावला.
मी त्याच्या *अंत्य संस्काराला स्मशानात* गेलो होतो. *अंत्यसत्कार* झाले.
सर्व आपल्या घरी निघाले.
निघताना हात पाय धुवावे म्हणून *शंकराच्या* मंदिरा शेजारील *नळावर* गेलो.
पाहतो तर तो मुलगा नळावर *स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे* धुऊन त्या *स्मशानाच्या भिंतीवर* वाळत टाकत होता.
मला बघून त्याने आवाज दिला,
सर ....
अरे तू *इथे* काय करतोस ?
सर आता मी *इथेच राहतो.*
आम्ही घर बदललं.
*भाडं* भरायला पैसे नव्हते.
त्यातच लॉकडाऊन मध्ये *मठ* मंदिर बंद झालं आणि पायरी वरची *लाईटही* बंद झाली.
मग मला घेऊन आई इथे आली.
काही झालं तरी *शिक्षण थांबता* कामा नये असं तिनं सांगितलं आहे.
त्या *शिव* मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या *शव* मंदिराचे दरवाजे *कधी बंद होत* नाहीत.
तिथे *जीवंत माणसं* यायची आणि *इथे मेलेली.*
ह्या लाईट खाली माझा *अभ्यास* चालू असतो.
सर मी *हार* नाही मानली.
*आई* सांगायची........
ज्याने *जन्म* दिला तोच *भुकेची खळगी* भरणार.
बरं..... तुझी आई कुठे आहे ?
सर ती *कोरोनाच्या* आजारात *गेली.*
तीन दिवस ताप खोकला होता.
नंतर दम अडकला.
मी कुठे गेलो नाही.
इथे *पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी* दिला.
*१४ दिवस* इथंच ह्या खोपीत *होम क्वाँरनटाईन* राहिलो.
*सरकारी कायदा मोडू* नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो, असं *ती* सांगायची.
*आईच्या अस्थी* समोरच्या नदीत *विसर्जित* केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या *अग्नी* देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच *क्रियाकर्म* आटपलं.
सर तरी मी *हरलेलो* नाही पण *दुःख* एव्हढच आहे की मी *पास* झालेलो पहायला *आई* ह्या जगात *नाही.*
ती जिथे ज्या जगात असेल तिथे *खुप खुश* असेल हे माझं *यश* बघून.
कालच माझा *रिजल्ट* लागला आणि मी शाळेत *पहिला* आलोय.
आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे *शिक्षक* करणार आहेत पण आता तर *खरी अडचण* उभी राहिलीय.
*ऑनलाईन* अभ्यास करायला माझ्या जवळ *मोबाईल* सुद्धा नाही.
असो
सर,
तुम्ही का वाईट वाटून घेता ?
तुम्हाला मी *पास* झाल्याचा *आनंद* नाही झाला ?
सर,
तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा.
त्याने छोट्याशा *डब्यातून साखर* आणली होती.
चिमूटभर माझ्या हातावर ठेवली.
सर *तोंड गोड* करा.
तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या *तोंडावर* त्या नळाचं पाणी मारून *भानावर* आलो.
*भरलेले डोळे* लपवण्यासाठी *तोंड धुतले.*
सर,
मला माहीत होते, *स्वामी* या जगात आहे आणि ते माझ्या *आनंदात माझी पाठ थोपटायला* नक्की येणार.
त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या *खिशातला* माझा *नवा मोबाईल* त्या मुलाच्या *हातावर* टेकवला आणि त्याची *पाठ थोपटून* निमूटपणे *बाय* करून *स्मशानाबाहेर* चालू लागलो.
आता दर महिन्याला *मी* त्याचा मोबाईल *रिचार्ज* करतो......
न सांगता.
खरे स्वामी तर कधीच नाही दिसले पण,
मी त्या *मुलाच्या डोळ्यात स्वामी* पाहिले ....
*स्वामी पाहिले....*
🙏 *धन्यवाद !!* 🙏
हे कोणी लिहिलं आहे हे माहीत नाही पण हे वाचल्यानंतर माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं..
म्हणून मी *शेअर* करतोय.....
कारण मलाही कळले स्वामी आहेच🙏🏻🌹 *श्री स्वामी समर्थ*🌹🙏
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ ; मुंबईच्या वाहतुकी स मोठा दिलासा मिळणार ...
