*"Life will become much easier when we will finally understand which hands to shake and which one to hold"...*
*Thought Of The Day:-*
*Even if you do little-little things to help others,*
*it makes big space in the heart of others'. "*
ing*😊
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
*"Life will become much easier when we will finally understand which hands to shake and which one to hold"...*
*Thought Of The Day:-*
*Even if you do little-little things to help others,*
*it makes big space in the heart of others'. "*
सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातसर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
· मुख्यमंत्र्यांकडून कणेरी मठ येथील पंचमहाभूतांवर आधारित विविध दालनाची पाहणी
· या लोकोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाचा संदेश घरोघरी पोहोचवावा
· श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानच्या वतीने कणेरी मठावरील पर्यावरण पूरक सेंद्रिय शेतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
· राज्य शासनाकडून सेंद्रिय शेतीसाठी सर्व प्रकारची मदत देण्यात येणार.
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा जागर होत असून यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कणेरी मठ येथे सिद्धगिरी संस्थानच्यावतीने सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत उभारण्यात आलेल्या विविध दालनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून कार्यक्रमाच्या तयारीची माहिती घेतली. यावेळी श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार अमल महाडिक, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सध्या जागतिक तापमान वाढ आणि बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम होत आहेत. पंचमहाभूतांच्या संरक्षणाबद्दल जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी कणेरी मठ येथे घेण्यात येणारा सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल व या ठिकाणी भेट देऊन जाणारा प्रत्येक नागरिक पुढील काळात पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरण पूरक असलेली सेंद्रिय शेती खूप उपयुक्त असून राज्य शासन ही सेंद्रिय शेतीसाठी प्राधान्य देत आहे. सेंद्रिय शेतीचे उत्पादन घेणाऱ्या बचत गटांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी जिल्हा स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगून सेंद्रिय शेतीमुळे शेती पिकांच्या उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने कणेरी मठावर घेण्यात येत असलेल्या सेंद्रिय शेती पिकांची त्यांनी पाहणी केली. या महोत्सव कालावधीत येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी विशेषत: शेतकरी बांधवांनी येथील सेंद्रिय शेतीला भेट देऊन या पद्धतीची शेती आपण स्वतः करण्याबाबतचा निश्चय करावा, असे आवाहन त्यांनी केले. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
याठिकाणी उभारण्यात आलेल्या आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही पंचमहाभूते व आयुर्वेद यावर आधारित सहा दालनांची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. पंचमहाभूतांची निर्मिती, त्यांचे उपयोग, मानवाकडून पंचमहाभूतांचा होणारा दुरुपयोग आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती येथील दालनांमध्ये देण्यात आली आहे. त्रिमिती मॉडेल, माहितीपत्रक, ध्वनी व प्रकाश व्यवस्थेच्या माध्यमातून पंचमहाभूतांचे महत्त्व या ठिकाणी अत्यंत उत्कृष्टपणे दाखवण्यात येत असून या ठिकाणी भेट देणारा प्रत्येक नागरिक हा पर्यावरण संरक्षणाचा संदेश येथून घेऊन जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी श्री सिद्धगिरी मठ येथील महादेवाचे दर्शन घेतले. तसेच 1100 देशी गायींच्या गोशालेची पाहणी केली. तसेच सिद्धगिरी हॉस्पिटलची पाहणी करुन याठिकाणी देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा सुविधांची माहिती घेतली.
यानंतर गुरुकुलला भेट देवून गुरुकुल शिक्षणपद्धतीची माहिती घेतली. येथील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सादर केलेल्या योगाची प्रात्यक्षिके, रोप योगा, बौद्धिक प्रात्यक्षिके, वैदिक गणित, आदी कलागुणांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भरभरुन कौतुक केले. तसेच देशाच्या उन्नतीसाठी हातभार लागेल असे नावीन्यपूर्ण उपक्रम गुरुकुल शिक्षण पद्धती आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी मुख्यमंत्री महोदयांना सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेली गोशाला, गुरुकुल शिक्षण पद्धती, कृषी विज्ञान केंद्र, हॉस्पिटल सह आदींची माहिती दिली. या महोत्सवात शेकडो स्टॉल लावले जाणार आहेत. त्यामध्ये शासनाच्या विविध विभागांच्या महत्वपूर्ण लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिनस्त असलेल्या महिला बचत गटांचेही स्टॉल उभारले जाणार आहेत.
00000
*मटणाची नळी*
*लेखक: स. दा.उपाशी*
कडाडून भूक लागलेली असताना समोर मस्त मटणाचे ताट येते. वाडग्यात दिलेल्या रस्सेदार मटणातून एक मोठी भरीव नळी बाहेर डोकावत असते. इतरांच्या कुणाच्या ताटात न जाता नळी आपल्याच ताटात आली म्हणून आपण मनोमन सुखावून जातो.
पहिल्या घासापासून त्या नळीशी चाळे सुरू होतात. नळीला लागुन असलेले लुसलुशीत मटण खाताना देखील त्या भरीव नळीची खरी मजा देणाऱ्या आतल्या मगज वर आपली नजर कायम असते. मग त्या नळीची उघडी बाजू तोंडात पकडून ओठांचा चंबू करत फुर्रर्रकन आवाज काढत तो मगज तोंडात ओढण्याचा प्रयत्न होतो पण यश येत नाही. मग नळी ताटाच्या एका कडेला ठेऊन पुन्हा जेवणावर लक्ष केंद्रित केले जाते.
ताटात किती जरी मटण असले तरी खाणाऱ्याचे सगळे लक्ष त्या नळीतल्या मगज वरच असते. दर दोन घासानंतर ती नळी उचलून ओठांचा चंबू करत ती रिकामी करण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू असतो. मग लक्षात येते की ही नळी पण आपल्या सारखीच जिद्दी आहे. म्हणून तिला शेवटी जेवण झाल्यावर बघू म्हणत परत ताटाच्या कोपऱ्यात सरकवली जाते.
बघता बघता जेवण संपते. ४ वाट्या मटण खाऊन झालेले असले तरी आपले लक्ष त्या नळीवरच असते. मोर्चा पुन्हा नळीकडे वळवला जातो. पुढून ओढून नळी रिकामी होत नाही म्हंटल्यावर तिला मागून फोडण्याचा प्रयत्न सुरू होतो. दाढा, सुळे सगळ्याखाली धरून पूर्ण ताकदीनिशी दाबली तरी त्या नळीला काही फरक पडत नाही. पुन्हा हातात धरून तिचे मागून पुढून नीट निरीक्षण होते. पुन्हा जोराचा प्रयत्न केला जातो पण नळीतला थोडा रस्सा आणि लाळेव्यतिरिक्त तोंडामध्ये काहीच येत नाही.
खाणारा घरात बसून खात असेल तर मग बत्ता घेऊन नळी फोडायचा प्रयत्न होतो किंवा नळी हातात पकडून ताटात जोरजोरात आपटून मगज काढण्याचा प्रयत्न केला जातो.
पण या जिद्दी नळीची गाठभेट जर एखाद्या हॉटेलात झाली असेल तर खाणाऱ्याच्या प्रयत्नांवर मर्यादा येतात. इकडे तिकडे बघत नळीला ताटाच्या दिशेने दोन चार झटके दिले जातात. पण हाती काही लागत नाही. शेवटी जीव रडकुंडीला येतो. नळीची उघडी बाजू पुन्हा ओठांमध्ये धरून त्यात जीभ घालून चव चाखण्याचा प्रयत्न होतो. पण सगळे प्रयत्न करून दमल्यावर लक्षात येते की किलोभर मटण खाऊन जिरवण्याची ताकद असलेल्याची मटणाच्या एका नळीने जिरवली आहे.
शेवटी त्या नळीकडे एक कटाक्ष टाकला जातो. "एका फुरकीत जर त्यातला मगज जिभेवर आला असता तर काय मजा आली असती राव" या स्वप्नात मन काही क्षण रमते, त्या स्वप्नातच जिभेवर त्याच्या चवीचा आनंद अनुभवला जातो आणि लगेच भानावर येत जड अंतःकरणाने हार मान्य करत आपण ती नळी ताटात परत ठेऊन टाकतो.
ताट समोर आल्यापासून नळीसोबत सुरू झालेले द्वंद्व युद्ध इथे संपुष्टात येते, आपण आपले मन त्या नळीत गुंतवून युद्धात हरलेल्या योध्याप्रमाणे खांदे उतरवून जड पावलांनी हॉटेल बाहेर पडतो. कितीही मटण फस्त केले असले तरी एका नळीमुळे आपला आत्मा अतृप्त राहुन गेलेला असतो.
मित्रांनो या प्रसंगात लेखकाच्या नळीप्रतीच्या वेदना फक्त एक मटण प्रेमी रसिकच समजू शकेल.
😊😊😆😆😀😀😀😆