Monday, 6 February 2023

पोट तुझं भरलं असेल तर, देवा माझ्यासाठी घेऊ का,

 पोट तुझं भरलं असेल तर,

देवा माझ्यासाठी घेऊ का,

       तुझं राहिलेलं उष्ट,

माझ्या घरी मी नेऊ का.?


      देवा इथे मात्र तुमची,

मस्त अंगत पंगत रंगलीय,

       घरात पीठ नाही म्हणून,

सकाळीच आई बाबासोबत भांडलीय.


       आटवा भर पिठासाठी,

आई सगळ्या गल्लीत हिंडली,

      सगळ्या शेजारच्यांनी,

तुझ्या निवदाची सबब सांगितली.


      देवा आज सकाळी मला,

सडकून भूक लागली,

       अचानक तुला आठवून,

तुझ्या मंदिराकडे धूम ठोकली.


       देवा मला तुझा ,

कधी कधी हेवा वाटतो,

     एका जाग्यावर बसून,

मस्त निवदाचा मलिदा लाटतो.


      दर्शनासाठी आलेल्या लोकांनी,

नारळाचा तुकडा हातावर ठेवला,

      तुला मात्र देवा त्यांनी,

अर्धा नारळचं वाहिला.


     माफ कर देवा मला,

तुझा घास हिसकावतोय,

      अर्ध्या कोर तुकड्यासाठी,

भाऊ माझा घरात रडतोय.


     देवा मी आता ठरवलंय,

तुझ्यासोबत बंड करायचं,

     माझ्या भाकरीच्या


प्रश्नासाठी,

स्वतःच पेटून उठायचं!"

जराशीच डुलकी लागली.

 Tata Motors new technology. बर झालं...


जराशीच डुलकी लागली,

म्हणून.... मागून ठोकली😳


आता बंद होईल🥳🤠👍


साधी माणसे

 *सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाही, मग ते वृक्ष असो की आईवडील.....*. *शुभ प्रभात*🙏


नाणे खातात का, छोटू ना दाखवा

 दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास राहणार वरखेड बु. तालुका शेगांव जिल्हा बुलढाणा येथील 14 वर्षीय

मंगेश विलास इंदोरे या शेतमजुराच्या मुलाने सहजच 10 रुपयाचे नाणे तोंडात ठेवले, व बघता बघता ते नाणे त्याच्या घशात गेले व त्याला घशात वेदना व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याने याबाबत वडिलांना सांगितले. वडील श्री विलास इंदोरे यांना शेगांव येथील बालरोगतज्ज्ञ डॉ सचिन प्रकाशराव सांगळे यांनी याआधी असे अन्न नलिकेत अडकलेले नाणे काढल्याचे ज्ञात असल्याने, मुलाला तात्काळ डॉ सांगळे यांच्या अग्रसेन चौक शेगांव स्थित प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल येथे आणण्यात आले, तेथे पोहचताच मुलाचा एक्स रे काढून नाणे अडकल्याची जागा निश्चित करण्यात आली. व डॉ सांगळे व त्यांच्या टीम ने वैद्यकीय क्षेत्रात नविन अविष्काराप्रमाणे शोधून काढलेल्या पद्धतीचा वापर करून फोलिज कॅथेटरच्या मदतीने *अवघ्या 40 सेकंदात* मुलाला कुठलाही त्रास न होऊ देता विनाशस्त्रक्रिया अन्न नलिकेत अडकलेले नाणे बाहेर काढले. व या कौशल्यात आपण निष्णात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.

त्यांच्या या नविन पद्धतीमुळे आजवर अनेक मुलांचे प्राण वाचले असून, सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा नाणे काढतांनाचा विडिओ सर्व सोशल मीडियावर वायरल होत असून सर्वत्र कुतूहलाचा विषय बनला आहे.


कडक जोके बंड्या चा

 


ये जिवन हैं

 









कोंकणात येवा

 


Featured post

Lakshvedhi