Saturday, 28 January 2023

गणांक गणेशमूर्ती प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

 गणांक गणेशमूर्ती प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

            ठाणे, दि. 27 (जिमाका) : ठाण्यातील हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे महाराष्ट्र मूर्तिकार संघटना व आशुतोष म्हस्के यांच्यावतीने आयोजित 'गणांक' या गणेशमूर्ती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मूर्तिकार हे समाजाचे महत्वाचे घटक असून त्यांच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सकारात्मक विचार करू, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी आमदार रवींद्र फाटक, निमंत्रक आशुतोष म्हस्के, श्री. मूर्तिकार कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देसाई, प्रा. प्रदीप ढवळ आदी उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रदर्शनातील चित्रांची पाहणी केली. गणांक श्रमसाधना गौरव पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.


            मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्री. देसाई यांनी मागण्यांचे निवेदन दिले.

ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला

 ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील

डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला


पारसिक बोगद्यामुळे लोकांच्या प्रवासातील वेळेत बचत होईल

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            ठाणे, दि. 27 (जिमाका) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऐरोली काटई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजूच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून नियंत्रित स्फोट पद्धतीचा वापर करून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकल्पातील डाव्या बाजूच्या बोगद्याच्या भुयारीकरणाचे काम आता पूर्ण झाले असून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला झाला आहे. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, नवी मुंबई व ठाणे परिसरातील नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएमआरडीचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह अधिकारी, अभियंते उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील बोगदा दोन्ही बाजूकडून जोडण्यात आला आहे. या ऐरोली काटई प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, ऐरोली, नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या रस्त्यामुळे सात किमी अंतर कमी होणार आहे. नवी मुंबई येथून डोंबिवली, कल्याण,अंबरनाथ, बदलापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत कमालीची बचत होणार असून इंधनाचीही बचत होणार आहे. प्रवासाचा वेळ वाचल्यामुळे नागरिकांच्या कार्यक्षमतेतही वाढ होईल.


            राज्य शासनाच्या वतीने अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. शिळफाटा ते कल्याण व कल्याण ते भिवंडी असा थेट एलिव्हेटेड उड्डाणपूल करणार आहोत. तसेच कल्याण ते तळोजा मेट्रो असा दुमजली रस्ता व मेट्रो असलेल्या मार्गाचे नियोजन आहे. याशिवाय मानकोली -डोंबिवली या खाडी पुलाच्या कामामुळे अंतर कमी होईल. ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चेंबूर फ्रिवे जेथे उतरतो त्या ठिकाणाहून थेट फाऊंटनपर्यंत शहराच्या बाहेरुन बायपास करतोय. ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी असे अनेक प्रकल्प राबवित आहोत. मुंबई व मुंबई महानगर परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी डबलडेकर टनेल ही संकल्पना राबविणार आहोत. जेणेकरून मुंबई आणि एमएमआरमधल्या लाखो प्रवाशांची वाहतूक कोंडीमधून सुटका होईल व त्यांचे जीवन सुसह्य होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


असा आहे प्रकल्प


            ऐरोली काटई नाका प्रकल्प हा तीन भागात विभागाला गेला असून भाग-१ अंतर्गत चा रस्ता हा ठाणे बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ आहे. सदर भागाची लांबी ३.४ कि.मी. इतकी असून त्यामध्ये १.६९ कि.मी. लांबीचा दुहेरी बोगदा व उर्वरित रस्ता व उन्नत मार्ग आहे. या प्रकल्पात असलेला बोगदा हा चार ४+४ मार्गिकेचा आहे. ( त्यामध्ये १+१ रेफ्युजी मार्गिका आहे.)


            या बोगद्यांच्या भुयारीकरणाचे काम हे New Austrian Tunneling Method (NATM) कंट्रोलिंग ब्लास्टिंग या तंत्रज्ञान पद्धतीने करण्यात येत आहे. सद्यस्थितीत बोगद्याचे ६७ टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाची उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.


            सद्यःस्थितीत प्रवाशांना महापे किंवा ठाणे येथून मार्ग काढून जावे लागत आहे. या प्रकल्पामुळे कल्याण- डोंबिवली आणि नवी मुंबई मधील अंतर ७ कि.मी. ने कमी होईल. त्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होईल. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.


            एमएमआरडीचे महानगर आयुक्त श्री. श्रीनिवास म्हणाले की, "पारसिक टेकड्यामधील भुयारीकरणाचे काम हे खूप अवघड आहे. आज डाव्या बाजूच्या बोगद्यात शेवटचा ब्लास्ट करून तो दोन्ही बाजूंनी खुला झाला आहे. ह्या बोगद्याच्या दुसऱ्या बाजूच्या भुयारीकरणाचे काम देखील लवकरच पूर्ण होईल. दोन्ही बाजूंचे काम पूर्ण झाल्यावर प्रकल्पातील महत्त्वाचा आणि अवघड टप्पा पार होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहतूक कमी होईल आणि काटई नाका ते ऐरोली दरम्यानचा प्रवास 30 मिनिटांनी कमी होईल. ज्याचा फायदा मुंबईहून कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना होईल.


००००००

संकल्प पूर्ती

 जास्त ताणू नका , लाईटली घ्या* 


*प्रत्येकांनी एकमेकाला*

*थोडं समजून घ्या* 

*खूप जास्त ताणू नका*

*सगळेच लाईटली घ्या ll*


*थोडं फार मागे पुढे*

*होतच असतं*

*शंभर टक्के perfect* 

*कुणीच नसतं ll*


*माणुसकीही सर्वांकडे* 

*असलीच पाहिजे*

*वागण्यातून नम्रता*

*दिसलीच पाहिजे ll* 


*छोट्या छोट्या गोष्टी वरून*

*कशाला करायचं बंड*

*आपण गोड बोललंकी* 

*समोरचा होतो थंड ll*


*कधी कधी सारा विषय* 

*फारच क्षुल्लक असतो* 

*माणूस मात्र विनाकारण* 

*टेंन्शन मध्ये बसतो ll*

 

*कसाही प्रसंग असला तरी*

*राहिलं पाहिजे शांत*

*आपल्या सहनशीलतेचा*

*होऊ देऊने अंत ll*


*घर असो , ऑफिस असो*

*वा असो Whats app*

*भेटून घ्या , बोलून घ्या* 

*पडू देऊ नका gap ll*


*भाषा असली स्वीट*

*की सगळं होतं नीट*

*कुणाचाच कुणाला* 

*येत नाही वीट ll*


*झालं गेलं विसरून जा*

*घ्या हातात हात*

*निमित्ताने भेटलो आपण*

*द्या हासून साथ ll*

        🤝😄🤝😄🤝



*पुढील संपूर्ण एका वर्षासाठी आजपासून नवीन संकल्प करा. ते डायरीत लिहून ठेवा. मित्र परिवारात जाहीर करा. वारंवार ते संकल्प आठवा.*

१) प्रथम स्वतः वर प्रेम करा.

२) वडिलधा-यांना मान द्या.

३) बचत करायला शिका.

४) निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा.

५) चांगला मित्र परिवार वाढवा.

६) व्यसनांपासून दूर रहा.

७) भक्तीमार्ग अवलंबा.

८) समाजसेवा करा.

९) आपल्या मागे आपली आठवण काढणारी माणसे आहेत, याची सदैव जाणीव ठेवा.

१०) सल्ला घेऊनच प्रत्येक काम करा.

११) आजच्या तरूण पणावरच उद्याचे  

वृद्धत्व अवलंबून आहे. हे विसरू नका.

१२) मागा म्हणजे मिळेल, आणि शोधा म्हणजे सापडेल. या प्रमाणे वागल्यास पुढेच जाल.

१३) यशोगाथांचे वाचन करा.

१४) नैसर्गिक जीवन जगा.

१५) आयुष्य फार लहान आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺


 *👏आदर्श जीवन जगण्यासाठी जरुर वाचा..*


💎1) चूक झाली तर मान्य करा.

💎2) समोरच्याचे मत विचारात घ्या.

💎3) चांगल्या कामाची स्तुती करा.

💎4) आभार मानायला विसरू नका.

💎5) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.

💎6) सतत हसतमुख रहा.

💎7) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.

💎8) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.

💎9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.

💎10) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.

💎11) कृती पुर्व विचार करा.

💎12) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.

💎13) क्रोधावर नियंत्रण ठेवा.

💎14) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.

💎15) नेहमी सत्याची कास धरा.

💎16) इतरांना चांगली वागणूक द्या.

💎17) सुखाचा गुणाकार व

दुखाचा भागाकार करा.

💎18) विचार करून बोला.

💎19) वाहन चालवताना स्वतः ची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.

🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹

पहिली प्रजासत्ताक दिनाच्या परेडची

 आपल्या देशाची पहिली प्रजासत्ताक दिनाच्या परेडची ही छोटीशी दुर्मिळ व्हिडिओ 👍


लोक्रतिनिधींनी चे ST महामंडळ पत्र

 


धर्मवीर स्व. आनंद दिघे यांना मुख्यमंत्री शिंदे यांची आदरांजली

   धर्मवीर स्व. आनंद दिघे यांना मुख्यमंत्री शिंदे यांची आदरांजली



धर्मवीर स्व. आनंद दिघे यांना मुख्यमंत्री शिंदे यांची आदरांजली

            ठाणे, दि. 27 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती स्थळी तसेच आनंद आश्रम येथे जाऊन स्व. दिघे यांना आदरांजली वाहिली.


            यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आनंद आश्रमात जाऊन स्व. दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर शक्तीस्थळावर जाऊन समाधीवर पुष्प अर्पण केले.

वक्तृत्व

 कु.संस्कृती प्रशांत म्हात्रे इयत्ता.पहिली को.ए.सो.प्राथमिक शाळा रेवदंडा हिचे प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट शैलीतील वक्तृत्व



Featured post

Lakshvedhi