Friday, 27 January 2023

मिटटी की कला

 मुंबईतील प्रसिद्ध कलाकार चेतन राऊत यांनी मातीच्या दिव्यांनी जगातील सर्वात मोठा 'राम दरबार' बनवला आहे. ते पाहण्यासाठी अनेक लोक पोहोचत आहेत. दोन लाख मातीचे दिवे, ३० लोक आणि हा राम दरबार तीन दिवसांत तयार झाला आहे. अवघ्या 20 सेकंदाचा व्हिडिओ, जरूर पहा. जय श्री राम


प्रजासत्ताक दिन : राजभवन येथील 'अटल उद्यान',

 प्रजासत्ताक दिन : राजभवन येथील 'अटल उद्यान',

'जैव विविधता’ प्रकल्पाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन


            मुंबई, दि.२६ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या 'अटल उद्यान' प्रकल्पाचे उद्घाटन तसेच नव्याने प्रस्तावित जैवविविधता प्रकल्पाच्या कोनशिलेचे देखील अनावरण केले.


            दिवंगत प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती प्रित्यर्थ राजभवनात 'अटल उद्यान' बनविण्यात आले असून ते जपानी गार्डनच्या संकल्पनेवर आधारित तयार करण्यात आलेले आहे. 


            राजभवन येथे भेट देणाऱ्या देशीविदेशी पाहुण्यांकरिता तसेच नागरिकांकरिता 'अटल उद्यान' व जैव विविधता प्रकल्प आकर्षण ठरणार आहे.


            राजभवनातील प्रस्तावित जैव विविधता प्रकल्प यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सहकार्याने तयार करण्यात येणार आहे.  


000


Republic Day: Governor Koshyari opens 'Atal Udyan' and unveils foundation stone of Biodiversity Park at Raj Bhavan


Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the newly created theme based park 'Atal Udyan' at Raj Bhavan Mumbai on Thursday (26 Jan).


The Governor also laid the foundation stone of the proposed 'Biodiversity Project' on the occasion. The Biodiversity Project is being created in collaboration with the Yashwantrao Chavan Maharashtra Open University and the Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri.


Both the demonstrative projects are expected to become attractions for the important State Guests and the citizens visiting Raj Bhavan.


000

तिरुपती येथील अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

 तिरुपती येथील अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत.


जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.

            मुंबई, दि. 26: तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करतानाच मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


            तिरूपती येथे दर्शनासाठी सोलापूर येथून गेलेल्या तरुणांच्या वाहनाला काल तिरूपतीजवळ अपघात झाला. त्याच पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तिरूपती देवस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जखमींच्या उपचाराबाबत सोलापूर प्रशासनाला निर्देश दिले. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.



जय श्री कृष्ण


 

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती" हा विषय चित्ररथाद्वारे महाराष्ट्राने दिल्ली येथील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने

 नमस्कार 

यंदाच्या वर्षी "महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती" हा विषय चित्ररथाद्वारे महाराष्ट्राने दिल्ली येथील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सादर केला


यामध्ये महाराष्ट्रातील अध्यात्मिक शक्ती असलेल्या साडेतीन पिठाचा देखावा, महाराष्ट्राची अमूर्त लोककला आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर शैली दाखवण्यात आली होती 


हा चित्ररथ अतिशय लक्षवेधी ठरला असल्याचे अनेक माध्यमातून दिसून येत आहे 


 *वोटिंग महत्वाचे* 


महाराष्ट्र चित्ररथ ला 1 क्रमांक पसंती साठी आपल्या मोबाईल नंबर वरुन पसंती क्रम खालील प्रमाणे द्यावा


MYGOVPOLL 337011,12


पाठवण्याची नंबर

7738299899


यातील 12 वा क्रमांक महाराष्ट्रासाठी आहे



यंदा चित्ररथाची पुरस्कारासाठी निवड ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी वरील लिंक आपणास वापरता येईल


महाराष्ट्राच्या शक्तिमाता या निमित्ताने संपूर्ण जगभर गेलेल्या आहेत. आपणास विनंती आहे वरीलप्रमाणे आपली पहिली पसंती महाराष्ट्राच्या चित्ररथाला द्यावी आणि महाराष्ट्राचा चित्ररथ देशात पहिला यावा यासाठी आपण योगदान द्यावे ही विनंती....


https://secure.mygov.in/group-poll/vote-your-favorite-tableau-republic-day-2023/


यंदा चित्ररथाची पुरस्कारासाठी निवड ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी वरील लिंक आपणास वापरता येईल


महाराष्ट्राच्या शक्तिमाता या निमित्ताने संपूर्ण जगभर गेलेल्या आहेत. आपणास विनंती आहे वरीलप्रमाणे आपली पहिली पसंती महाराष्ट्राच्या चित्ररथाला द्यावी आणि महाराष्ट्राचा चित्ररथ देशात पहिला यावा यासाठी आपण योगदान द्यावे ही विनंती....

प्रजासत्ताक दिनानिमित्त संदेश

 


जय हिंद, प्रजासत्ताक दिनी

 सार्वजनिक विद्यामंदिर पेण


Featured post

Lakshvedhi