Thursday, 26 January 2023

Happy republic day

 


15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक ...*🇮🇳

 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक ...*🇮🇳 


*1)* 15 ऑगस्ट ला *पंतप्रधान* झेंडा *फडकवतात* तर ... 26 जानेवारीला *राष्ट्रपती* *ध्वजारोहण* करतात. 

कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     

************                                                                      


*2)* 15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला *ध्वजारोहण (flag hoisting)* म्हणतात तर... 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा *फडकवला* जातो. त्याला *(flag unfurling)* म्हणतात. 

************   


*3)* 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला *ध्वजारोहण* म्हणतात. तर... 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला *झेंडा फडकवणे* म्हणतात. ***************    


*4)* 15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर *ध्वजारोहण* होते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा *फडकवला* जातो. *************      


_आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे._

राज्यपालांच्या हस्ते राजभवन दिनदर्शिकेचे प्रकाशन.

 राज्यपालांच्या हस्ते राजभवन दिनदर्शिकेचे प्रकाशन.

            मुंबई, दि. 25 : मुंबईतील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या राजभवनाच्या 2023 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.


            राजभवनातील 'सौंदर्य स्थळे' या विषयावर दिनदर्शिका तयार केल्याबद्दल राज्यपालांनी कला दिग्दर्शक व छायाचित्रकारांना कौतुकाची थाप दिली. कार्यक्रमाला राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासाचे अध्यक्ष रवींद्र संघवी व सुचेता संघवी यावेळी उपस्थित होते. 


            यावेळी राज्यपालांच्या हस्ते दिनदर्शिकेचे कला दिग्दर्शक अशोक दाभाडे व डिझाइनर रणजित रणशूर, भाषांतर कर्त्या डॉ. मंजुषा कुलकर्णी तसेच छायाचित्रकार प्रतीक चोरगे, अस्मिता माने, सचिन वैद्य, वैभव नडगावकर, राकेश गायकवाड, हृषीकेश परदेशी, नवीन भानुशाली, हनीफ तडवी, नागोराव रोडेवाड, संदीप यादव, दिलीप कवळी, पराग कुलकर्णी व कालिदास भानुशाली यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शासकीय मुद्रणालयाचे अधिकारी प्रमोद धामणकर यांचा देखील दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला.   


            छायाचित्रकार मुकेश पारपियानी यांच्या संकल्पनेनुसार साकारलेल्या या कॅलेंडरसाठी विविध छायाचित्रे काढली होती. त्यातील निवडक छायाचित्रांचा समावेश दिनदर्शिकेमध्ये करण्यात आला आहे. दिनदर्शिकेचे मुद्रण शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय यांनी केले आहे.    


००००

Governor Koshyari felicitates photographers

contributing to Raj Bhavan Calendar.

            Mumbai Dated 25 : The Annual Calendar of Raj Bhavan for 2023 containing beautiful photographs of various photographers from Mumbai was unveiled by Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai.


            Congratulating the photographers for sharing their best pictures for the Raj Bhavan Calendar, the Governor presented a copy of the calendar to the photographers. 


            Chairman of Rashtriya Patrakarita Kalyan Nyas Ravindra Sanghvi, Smt Sucheta Sanghvi, photographers and designers were present.


            The Governor felicitated Calendar designer Ashok Dabhade and Rajan Ranshoor and photographers Pratik Chorge, Asmita Mane, Sachin Vaidya, Vaibhav Nadgaonkar, Rakesh Gaikwad, Hrishikesh Tadvi, Navin Bhanushali, Hanif Tadvi, Nagorao Rodewad, Sandeep Yadav, Dilip Kawli, Parag Kulkarni and Kalidas Bhanushali on the occasion. The Calendar was conceptualized by Mukesh Parpiani and printed by the Government Printing Press.                                                                                    


00000



 



राष्ट्रीय मतदार दिन-2023लोकशाहीत प्रत्येक मतदाराचे मत अमूल्य

 राष्ट्रीय मतदार दिन-2023लोकशाहीत प्रत्येक मतदाराचे मत अमूल्य


- श्रीकांत देशपांडे

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला विशेष संस्थात्मक योगदान पुरस्कार.

            मुंबई, दि.25 : “लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वपूर्ण असून मतदार हा गाभा आहे. यात मतदाराचे मत मोलाचे आहे. प्रत्येक मतदाराचे मत किती महत्वाचे आहे, हे अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो”, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले.


            मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन -2023 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, कुलसचिव विलास नांदवडेकर, उपसचिव मनोहर पारकर यांच्यासह मिलिंद बोकील, सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, डॉ.सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, डॉ.उज्ज्वला चक्रदेव आदी पाहुणे उपस्थित होते.


            यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक कार्यात योगदान देणाऱ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हे प्रसिद्धीसाठी नेहमीच अग्रेसर असते. राज्याच्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळस माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि त्यांच्या अधिनस्त कार्यालय हे निवडणूक कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्राथम्याने करते. त्यामुळे माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांना विशेष संस्थात्मक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


            निवडणूक कार्यात राज्यातील अधिकारी वर्गाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आले. यात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी शण्मुगराजन एस. (वाशिम), रूचेश जयवंशी (हिंगोली), अशोक शिनगारे (ठाणे), डॉ.विपीन इटनकर (नागपूर), डॉ.राजेंद्र भोसले (अहमदनगर) आणि राजेश देशमुख (पुणे) यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन (वाशिम), दिलीप कच्छवे (हिंगोली), श्रीमती अर्चना कदम (ठाणे), श्रीमती मीनल कळसकर (नागपूर), जितेंद्र पाटील (अहमदनगर), पुण्याच्या श्रीमती आरती भोसले आणि श्रीमती मृणालिनी सावंत यांना विभागून पुरस्कार देण्यात आले.


            त्याचप्रमाणे राज्यस्तरीय पुरस्कारात गणेश राठोड (मेहकर, जि.बुलडाणा), धीरज मांजरे (कारंजा, जि.वाशिम), डॉ.सचिन खल्लाळ (वसमत, जि.हिंगोली), श्रीमती क्रांती डोंबे (कळमनुरी, जि.हिंगोली), राहुल मुंडके (पनवेल, जि.मुंबई उपनगर), श्रीमती वैष्णवी बीष्वा (भाप्रसे)(तुमसर, जि.भंडारा), संदीप भस्के (ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर), श्रीमती ज्योती कावरे (सिन्नर, जि.नाशिक), डॉ.शशिकांत मंगरूळे (संगमनेर, जि.अहमदनगर), सुशांतकिरण बनसोडे (कागल, जि.कोल्हापूर) आणि गणेश मरकड (पलूस कडेगाव, जि.सांगली) या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा समावेश होता.


            सध्याचे युग हे समाजमाध्यमांचे असल्याने समाजमाध्यमावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडणूक कार्यालयाचा गौरव करण्यात आला. यात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा तसेच मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, शिवडी, जत आणि कोल्हापूर उत्तर यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे उत्कृष्ट मतदार मित्र पुरस्कारात किन्नर मॉ ट्रस्ट व कोरो इंडिया या सामाजिक संस्थाचा गौरव करण्यात आला. निवडणुकीचे वार्तांकन करून जनजागृती करणारे लोकसत्ताचे पत्रकार निखिल अहिरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.


            या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात लोकशाही दिंडी, पथनाट्य, रांगोळी प्रदर्शन, मतदार जागृती दालन, ध्वनीचित्रफितीचे सादरीकरण, शपथ घेणे, ओळखपत्राचे वाटप, अहवाल प्रकाशन आदी करण्यात आले.


            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी केले, तर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी आभार मानले.

राज्यात उद्यापासून ‘महाराजस्व’ अभियान

 राज्यात उद्यापासून ‘महाराजस्व’ अभियान

            मुंबई, दि. 25 : सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांचा महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराजस्व अभियान 26 जानेवारी ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत राबविण्यात येणार असून महसूल व वन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे.


            एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे, भूसंपादन केलेल्या व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत करणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या विविध कलमांची कार्यवाही करणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते/ पाणंद/ पांधण/शेतरस्ते/ शिवाररस्ते/ शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करणे, मामलेदार न्यायालय अधिनियम, 1906 अंतर्गत मंजूर वहिवाटीचे रस्ते मोकळे आणि तयार करणे, गाव तिथे स्मशानभूमी/ दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देणे, लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 ची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच यासाठी प्रचार प्रसिध्दी करणे, निस्तार पत्रक व वाजिब-उल-अर्जच्या नोंदी अद्ययावत करणे, सप्टेंबर 2022 पर्यंतची मोजणी प्रकरणे मार्च 2023 पर्यंत निकाली काढणे, ई पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी करणे, ई चावडी प्रणालीची अंमलबजावणी करणे, भूसंपादन अधिनियम, 1894 अंतर्गत कार्यवाही करणे या घटकांची जिल्हाधिकारी कार्यालयापासून गावपातळीपर्यंत प्रभावीपणे जिल्हाधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार आहेत.


            याशिवाय परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात यावी, गौण खनिज ऑनलाईन प्रणाली वापराबाबतची माहितीही देण्यात यावी तसेच सन 2016 चा महाराष्ट्र अधिनियम क्र 1 अन्वये कुळकायद्याच्या कलम 63 मधील सुधारणा करणे,पोटहिस्सा/सामीलिकरण/ भूसंपादन/रस्ता सेटबॅक इत्यादी कारणामुळे नकाशामध्ये होणाऱ्या बदलाबाबत दुरुस्तीसह अद्ययावत नकाशा पुरविणे, नावीन्यपूर्ण योजना उपविभाग आणि तहसील कार्यालय येथे राबविणे महाराजस्व अभियाना घेण्यात आले आहे.


            राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी महाराजस्व अभियानाअंतर्गत आपल्या जिल्हयांमध्ये जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवरक केलेली कामगिरीबाबतची माहिती मासिक प्रगती अहवालाद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील. तसेच जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख यांनी या अभियानाअंतर्गत त्यांच्या अधिनस्त कार्यालयात होणाऱ्या कार्यवाहीचा आढावा शासनाला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


            महाराजस्व अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अभियानात अंतर्भूत विविध लोकाभिमुख आणि प्रशासकीय घटकांच्या निपटाऱ्यासाठी कालबध्द मोहिम आखून प्रलंबित कामांचा निपटारा करण्यावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागीय आयुक्तांनी घटकनिहाय कालबध्द कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करुन व्यवस्थापन पथकाची स्थापना करुन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अनुपालनाचे निर्देश देण्यात यावेत अशा सूचना आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. 

दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य सेवा हक्कआयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची मुलाखत.

 दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य सेवा हक्कआयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 25: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नाशिक विभागाच्या राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. 27, शनिवार दि. 28, सोमवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


           महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यान्वये राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान, कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याविषयी सविस्तर माहिती आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा, लोकसेवा हक्क आयोगाची कार्यपद्धती अशा विविध विषयांची माहिती त्यांनी या मुलाखतीतून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणाऱ्याअधिनियमात सुधारणा

 उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणाऱ्याअधिनियमात सुधारणा.

            मुंबई, दि. २५: उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकास कामे नियमाधीन करणाऱ्या अधिनियम २००६ मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे. या सुधारित अधिनियमास राज्यपालांची संमती मिळाली आहे. त्यामुळे हा अधिनियम महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे.


            या अधिनियमास उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे (सुधारणा) अधिनियम २०२२ असे म्हणण्यात येणार आहे. तसेच अधिनियमातील कलम तीनमध्ये पोट कलम तीन मधील खंड ' क ' तील ' पुढील तक्त्यानुसार निर्धारित केलेली ' या मजकुरा ऐवजी ' विहित करण्यात येईल अशी ' हा मजकूर दाखल करण्यात येईल. तसेच फिचा तक्ता वगळण्यात येणार आहे.


            त्याचप्रमाणे मुख्य अधिनियमाच्या कलम चारमध्ये पोट कलम तीन मधील खंड ' क' च्या परंतुकामधील '४.०० हून अधिक तलपृष्ठ निर्देशांक (एफ.एस.आय) ' या मजकुराऐवजी ' उल्हासनगर शहर महानगरपालिकेला लागू असलेल्या महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन विनियमांमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे तलपृष्ठ निर्देशांक (एफ.एस.आय) पेक्षा अधिक तलपृष्ठ निर्देशांक ' हा मजकूर दाखल करण्यात येईल. अशी सुधारणा करण्यात आलेला अधिनियम प्रसिद्ध करण्यात आला आहे.


0000


 


 



 



Featured post

Lakshvedhi