Friday, 20 January 2023

कीटकनाशक अन्न खाऊन तर पहा

 


आरोग्य संपदा सल्ला

 




हे आदि मां हा अंती मां

 या मातीचे आकाश तू

शिशीरात या मधुमास तू

देशी मृता तू अमृता

पुरोषोत्तमा

हे आदिमा


हे अंतिमा 🙏🌹🙏

मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता

 मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन.

            मुंबई, दि. १९ : मुंबईतील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा संकल्प आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून त्याला बळ दिले जात आहे. आधुनिक आणि विकसित मुंबई बनवण्यास शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे, आगामी काळात मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.


            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जाच्या हस्तांतरणाचा प्रारंभ करण्यात आला. त्याचबरोबर मेट्रो मार्गिका 2-अ आणि 7 चे लोकार्पण, बृहन्मुंबई महापालिकेच्या 20 नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण, 360 खाटांचे भांडूप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील 306 खाटांचे सिद्धार्थनगर रुग्णालय आणि 152 खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम या मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते झाली. सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महानगरपालिकेच्या गोरेगाव, भांडूप आणि ओशिवरा या तीन रूग्णालयांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन, सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.


            प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, मुंबईसाठी अतिशय गरजेची असलेली मेट्रो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, आरोग्य सेवा, रस्त्यांचे जाळे यासह प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ देण्यास शुभारंभ केला आहे.


            देशाची नवी ओळख जगामध्ये आता अधिक ठळक होत आहे, असे सांगून ते म्हणाले की, विकसित भारताची उत्सुकता आता केवळ देशातच नव्हे, तर जगातही आहे. भारताची अर्थव्यवस्था बळकट होत आहे. याच सकारात्मकता आणि सामर्थ्याचा उपयोग करून गतिशील विकास साध्य करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.


            सध्या देशात आधुनिक दळणवळणाकडे लक्ष दिले जात आहे. मुंबई हे महत्त्वाचे शहर आहे. त्याचबरोबर आगामी काळात मुंबईसह राज्यातील इतर शहरे देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे या शहरांच्या सर्वांगीण विकासाला आमचे प्राधान्य राहणार असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी स्पष्ट केले.


            मुंबईतील सामान्य मुंबईकरांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचे त्यांनी कौतुक केले. मुंबईच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी दिली.


            रेल्वेचे आधुनिकीकरण मिशन मोडवर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेची प्रवाशांना सुविधा मिळण्याबरोबरच, त्याच ठिकाणी बस, टॅक्सी आदी सुविधाही असाव्यात यासाठी मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी हब तयार करण्यात येणार असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.


केंद्राच्या पाठबळाने मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबई अधिक वेगाने धावू शकणार आहे. तीन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ आमच्यासोबत आहे.


सुवर्ण अक्षरात नोंद करावी असा दिवस


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईकरांचे जगणे सुसह्य करण्याची सुरूवात आहे. येत्या दोन वर्षांत त्याचा कायापालटही पहायला मिळेल आणि आजच्या दिवसाची सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशीच आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्याच हस्ते ऑक्टोबर 2015 मध्ये मेट्रोचे भूमिपूजन झाले होते आणि त्यांच्याच हस्ते आज उद्घाटनही होत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. म्हणूनच अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी प्रधानमंत्र्यांना आम्ही मुंबईत आमंत्रित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.


महाराष्ट्राच्या समृद्धीची सुरूवात


            गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये देशातल्या गेमचेंजर समृद्धी महामार्गाची सुरुवात झाली. आता नव्या वर्षाची सुरुवात आपण मुंबईकरांसाठी मेट्रो सुरु करीत आहोत. एक कार्यक्रम राज्याच्या उपराजधानीत झाला आणि आज राज्याच्या राजधानीत हा अभूतपूर्व सोहळा होतोय, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गामुळे राज्यात 'समृद्धी' दाखल होत आहे.


            समृद्धी असो, मेट्रो असो किंवा येत्या नोव्हेंबरपासून सुरु होणारा समुद्रावरील सर्वात लांब मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आहे. आम्ही रस्ते, रेल्वे, सागरी मार्ग उभारून देशातला एक आदर्श असा वाहतूक आणि दळणवळण आराखडा जगासमोर ठेवत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये आम्ही मेट्रो ३ चा पहिला टप्पा सुरु करणार आहोत. ही मेट्रो लवकरच लाखो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. मुंबई महानगरात ३१४ किलोमीटर मेट्रोच्या निर्माण होणाऱ्या जाळ्यामुळे मुंबईतील ३० ते ४० लाख वाहने कमी होतील. वेळेची बचत होईल. प्रदूषण कमी होईल. कोस्टल रोडचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून नवी मुंबई मेट्रो लवकरच सुरु होईल, असेही ते म्हणाले.


विकासाला मानवी चेहरा देणार


            गेल्या सहा महिन्यात आम्ही जे काम केले आहे, त्यावर मुंबईकर जनतेचा विश्वास आहे, आणि एकदा विश्वास टाकला की, मुंबईकर त्याची साथ कधीही सोडत नाही हा इतिहास आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले की, केवळ रस्ते, पूल बांधणे म्हणजे विकास नाही. विकासाला मानवी चेहरा पाहिजे. आज आम्ही आणखी एक स्वप्न सत्यात उतरवतो आहोत ते म्हणजे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करतोय. मुंबईतील सांडपाणी पुनर्प्रक्रिया, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सुशोभिकरण हे सर्वच आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे मुंबई हे खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होणार आहे.


            मुंबईतील सगळ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला असून याचीही सुरुवात आज होते आहे. काँक्रिटीकरण केल्यानंतर किमान २५ वर्ष रस्ते सुस्थितीत राहतील. संपूर्ण मुंबईला खड्डेमुक्त करण्याच्या या निर्णयाला सर्वांनी पाठींबा दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


सर्वसामान्य मुंबईकरांसाठी


             मुंबईकर मुंबईच्या बाहेर जाऊ नये याला आमचे प्राधान्य आहे. सर्वसामान्य मुंबईकर माणसाला स्वस्तात घरे मिळाली पाहिजेत यासाठी घरांच्या विविध योजना आम्ही राबवित आहोत. पुनर्विकासाला गती आणतो आहोत, पोलिसांना, कामगारांना घरे देत आहोत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी धारावी पुनर्विकासाचे उदाहरण दिले. 


            यावेळी त्यांनी राज्य शासनाने सामाजिक भावनेतून घेतलेल्या निर्णयांविषयीही सांगितले. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणे, स्वतंत्र दिव्यांग विभाग, ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत, दिवाळीत शंभर रुपयांत शिधा, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुविधा संपन्न कुटुंब मिशन, चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा दुपटीने जास्त मदत असे अनेक निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.


            दावोस दौऱ्यात अनेक उद्योजकांबरोबर बैठका झाल्या. प्रत्येकाने प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्याबद्दल आदर व विश्वास व्यक्त केला. ते आमचे नेते व मार्गदर्शक आहेत याचा अभिमान तर आहेच, पण एक भारतीय म्हणून अभिमान वाटला असे सांगून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला मिळालेल्या गुंतवणुकीविषयी माहिती दिली.


राज्यातील विकासाला प्रधानमंत्री मोदी यांचे बळ - उपमुख्यमंत्री फडणवीस


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ज्या योजनांचे भूमिपूजन प्रधानमंत्री यांच्या हस्ते झाले, त्यांच्याच हस्ते या प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे. ही विकासाची बदललेली संस्कृती आहे.


            प्रधानमंत्री स्वनिधी योजनेला मध्यंतरी खीळ बसली होती. पुन्हा राज्य शासनाने ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील एक लाखाहून अधिक फेरीवाल्यांना त्याचा लाभ होणार आहे. मुंबईच्या बाहेर राज्याच्या इतर भागातही आगामी काळात ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमामुळे मुंबईचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. धारावी येथील एक लाख लोकांचे पुनर्वसन करण्याचा प्रकल्प केवळ केंद्र सरकारने रेल्वे विभागाची जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


००००

जीवन गाणे

 


सुप्रभा

 


मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्मेट्रो मार्गिकेचे

 मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्मेट्रो मार्गिकेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण.

            मुंबई, दि. १९ : बृहन्मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या आणि मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास वेगवान करणाऱ्या मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ (टप्पा-२) या मार्गिकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.


            यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते.


            दरम्यान मुंबई-१ कार्ड आणि मेट्रो अॅप एनसीएमसी कार्डचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी गुंदवली मेट्रो स्थानक येथे मेट्रो प्रकल्पाच्या छायचित्रांचे प्रदर्शन आणि थ्रीडी आराखड्याची पाहणी केली. आणि मेट्रो स्टेशनवर स्वतः मेट्रोचे तिकीट घेऊन गुंदवली मेट्रो स्टेशन ते मोगरा मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास केला.


सुलभ वाहतुकीसाठी दोन स्मार्ट उपक्रम "मुंबई 1" मोबाईल ॲप आणि एनसीएमसी


            मुंबई 1" मोबाईल अॅप : या ॲपमध्ये प्रवाशांसाठी मेट्रो संबधित सर्व आवश्यक माहिती देण्यात आली आहे.तसेच मेट्रो स्थानकावर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी जे दरवाजे आहेत तिथे असलेल्या ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन पॉइंटवरून प्रवाशांना प्रवेश करता यावा यासाठी मोबाईल फोनवर हा ॲप एक क्यूआर कोड तयार करतो.


एनसीएमसी कार्ड


   नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) हे सुरूवातीला एमएमआरडीव्दारे चालवण्यात येणा-या मेट्रो कार्डवरती वापरल जाणार आहे.नंतर हळूहळू ही सुविधा लोकल ट्रेन्स आणि बसेससह सार्वजनिक वाहतूकीच्या इतर पर्यायांसाठी विस्तारीत करण्यात येणार आहे.डिजिटल व्यवहारासाठी या कार्डमध्ये १०० रूपये ते दोन हजार रूपयापर्यंत या कार्डला रिचार्ज करता येणार आहे.


मुंबई मेट्रो २ अ आणि ७ ची वैशिष्टयै


वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.पर्यावरणस्नेही मेट्रो नेटवर्क मुंबईकरांना नक्कीच दिलासा देणारे ठरणार आहे


मेट्रो 2 अ दहिसर पूर्व ते डीएन. नगर. ६४१० कोटी रूपयांचे १८.६ किमी मार्गिका असून १७ स्थानकांचा यामध्ये समावेश आहे.


 मेट्रो मार्गिका 7 (अंधेरी पूर्व- दहिसर पूर्व) रूपये ६२०८ कोटी खर्चासह १६.५ कि.मी मार्गिका असून १३ स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांची किंमत जवळपास 12 हजार 618 कोटी आहे.


मेट्रो मार्ग २अ आणि ७ च्या टप्पा २ मधील स्थानके


मेट्रो लाईन-२अ- टप्पा-२


 वळनई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी (पश्चिम).


मेट्रो मार्ग ७- टप्पा- २


 गोरेगाव (पूर्व), जोगेश्वरी (पूर्व), मोगरा, गुंदवली.


वरील दोन्ही मेट्रो मार्गांसाठी दहिसर पूर्व हे संयुक्त स्थानक आहे.


मेट्रो मार्ग २अ- टप्पा- १


दहिसर (पूर्व), आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर- I.C. कॉलनी, एकसर, बोरिवली (पश्चिम), पहाडीएकसर, कांदिवली (पश्चिम), डहाणूकरवाडी.


मेट्रो मार्ग ७- टप्पा- १


            दहिसर (पूर्व), ओवरीपाडा, राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे या स्थानकांचा समावेश आहे.


एकात्मिक मेट्रो मार्गिका


            पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने एकमेव सर्वसमावेशक मुंबई मेट्रो नेटवर्कच स्वप्न बघितल होते ते प्रत्यक्षात उतरल्यामुळे गर्दी आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.पर्यावरणस्नेही मेट्रो नेटवर्क मुंबईकराना नक्कीच दिलासा देणारे ठरणार आहे


            यामध्ये मुंबई मेट्रो मार्ग २अ (दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो मार्ग ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली, म्हणजेच अंधेरी पूर्व) आता पूर्णपणे कार्यान्वित झाली असून मेट्रो मार्ग १ सह एकात्मिक केली आहे. दहिसर किंवा गोरेगाव ते घाटकोपर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेची बचत होणार आहे


रोलिंग स्टॉक


            मेट्रो २ अ आणि मेट्रो लाईन 7 अनअटेण्डेड ट्रेन ऑपरेशनसाठी (युटीओ) विनाचालक ट्रेन विकसित करण्यात आल्या आहेत. सहा डबे असलेल्या ट्रेनची प्रवासी क्षमता २३०८ इतकी आहे. या ट्रेनची डिझाइन केलेला ताशी वेग ९० कि.मी. असून क्रियात्मक वेग ताशी ८० कि.मी. आहे. तर सरासरी वेग ताशी ३५ किमी आहे.स्थानकाची माहिती देण्यासाठी ऑटोमॅटिक पेसेंजर अनाऊन्समेण्ट यंत्रणा बसवण्यात आली आहे.तसेच प्रत्येक दरवाज्यावर स्टेशनची माहिती देणारे डिजिटल रूटमॅपही आहेत.


सुरक्षा यंत्रणा


             सर्व स्थानकावर बॅगेज स्कॅनिंग मशीन, हॅण्डहेल्‍ड मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहे.


रूफ टॉप सोलार सिस्टिम


            मेट्रो स्थानकावर रूफ टॉप सोलर सिस्टिमने सुसज्ज करण्यात येणार आहेत. ती रेस्को मॉडेलवर आधारित योजना आहे. स्थानक, डेपो आणि मागाठणे आरएसएस बिल्डिंगच्या छतावरची उपलब्ध जागा सोलार सिस्टिम बसवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. मेट्रो मार्ग ७ वरची स्थानक आणि संबंधित इमारतींवर बसवण्यात येणाऱ्या सोलार सिस्टिमची एकूण अंदाजित वीज निर्मिती क्षमता ३.० मेगावॅट - पीक एवढी असेल. सोलार सिस्टिमद्वारे निर्माण झालेली वीज स्थानकाच्या सहाय्यक भारांवर स्थानिक पातळीवर वापरली जाईल.


दिव्यांगासाठी सुविधा


             दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन स्थानकांवर व्हीलचेअर, ब्रेलसह लिफ्ट बटणे आणि प्लॅटफॉर्मवर टॅक्टाइल टाइल्स आहेत जे दृष्टिहीन लोकांसाठी दिशादर्शक म्हणून काम करतील.


सार्वजनिक माहिती प्रणाली


             प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व स्थानकांवर सार्वजनिक घोषणा आणि माहिती प्रदर्शित करणारी यंत्रणा देण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, सिग्नलींग, एस्कलेटर्स या सुविधाही करण्यात आल्या आहेत.


मेट्रो मार्ग ७ वरच्या स्थानकांना आयजीबीसीच 'प्लॅटिनम ' मानांकन


      पायाभूत सुविधांचा विकास करताना पर्यावरण संवर्धनाला महत्व देण्यात आले आहे.मेट्रो मार्ग ७ वरच्या १० मेट्रो स्थानकांना 'आयजीबीसी' तर्फे 'प्लॅटिनम ' दर्जाचे मानांकन देण्यात आलं आहे. जोगेश्वरी (पूर्व), आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान आणि ओवारीपाडा अशी या स्थानकाची नाव आहेत. आयजीबीसीच्या 'ग्रीन मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टिम रेटिंग प्रोग्राम' नुसार स्थानकाच मूल्यांकन करण्यात आले आहे. आयजीबीसीच्या मानांकन अहवालामध्ये मेट्रो मार्ग ७ साठीची पर्यावरण व्यवस्थापन योजना (ईएमपी)ची अंमलबजावणी करण्यात आली आहे.आयएसओ १४००१ च्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केले आहे.


प्रवाशांची सुविधा व सुरक्षा


               प्लॅटफॉर्म स्क्रिन डोअर्स (पीएसडी) ही मोटरव्दारे उघड बंद होणाऱ्या सरकत्या दरवाजांची अत्याधुनिक प्रणाली आहे. मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्म्सचं संरक्षण करण्यासाठी आणि मेट्रोमध्ये प्रवाशांच्या होणा-या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही प्रणाली फार उपयुक्त ठरणार आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि दिव्यांग व्यक्तींनाही मेट्रोत सहज येता यावे म्हणून असे सरकते दरवाजे फार उपुयक्त आहेत.


00000

Featured post

Lakshvedhi