सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 19 January 2023
प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी शासन प्रयत्न करणार
प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी शासन प्रयत्न करणार
- उद्योग मंत्री उदय सामंत
दावोसमधून राज्यात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूकया गुंतवणूकीतून एक लाख रोजगाराची निर्मिती
मुंबई, दि. १८ :- दावोस येथील परिषदेत महाराष्ट्र शासनाने जगभरातील विविध कंपन्यांसोबत सुमारे १ लाख ४० हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहे. या माध्यमातून राज्यात एक लाख रोजगार निर्माण होतील. नव उद्योगांना ३० दिवसांत विविध परवानग्या मिळण्यासाठी तातडीने नवीन कायद्याअंतर्गत धोरण तयार करण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
दावोस (स्वित्झर्लंड) येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेतून दूरदृश्य प्रणालीमार्फत उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे उपस्थित होते.
मंत्री श्री. सामंत यांनी म्हणाले, राज्यात सुरू होणाऱ्या नवीन प्रकल्पात ८० टक्के स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यासाठी विशेष सनियंत्रण पथक कार्यान्वित करण्यात येईल. नव उद्योगांना ३० दिवसांत परवानगी मिळावी म्हणून मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत नवीन धोरण आणण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यातील ज्या जिल्ह्यांत उद्योग नाहीत तिथे उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकांना सवलती देत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक विकासाच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल. थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून शासनाने राज्य आणि युवा पिढीच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतले असून, बेरोजगारी दूर करणे आणि औद्योगिक दृष्ट्या जगात विकसित राज्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन स्टील प्रकल्पाचे उद्योजक लक्ष्मी मित्तल यांची भेट घेतली. याशिवाय बंदर विकासाचे प्रकल्प सुरू करण्याबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला. स्टील उद्योगासह कोकणात मरिन पार्क आणि मँगो पार्क उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. कोकणवासीयांना विश्वासात घेऊनच हे प्रकल्प सुरू करण्यात येतील, असे मंत्री श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.
दावोसमध्ये भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत जर्मनीने त्यांच्या कंपन्यांसोबत ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने दोन दिवसांत सुमारे १ लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून राज्यात एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत. या कराराअंतर्गत बर्कशायर हाथवे ही अमेरिकन कंपनी १६ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. बोकोरो इंडिया प्रा. लि. कंपनी पाच हजार कोटी रुपयांचे चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. ग्रीनको सोलार आणि हायड्रो प्रकल्पात १२ हजार कोटी गुंतवणार आहे. आयसीडी मेडिकल टेक्निकल कॅपिटल पार्टनर्स १६ हजार कोटी रुपये, तर महिंद्रा इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रीकल व्हेहिकल क्षेत्रांमध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पाचा विस्तार नाशिकमध्ये होणार असून त्यासाठी सहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन या कोल गॅसिफिकेशन प्रकल्पासाठी विदर्भातील चंद्रपूरमध्ये २० हजार कोटी रुपये, निप्पॉन कंपनी २० हजार कोटी रुपये, लक्सेमबर्ग डेटा सेंटरमध्ये १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी लक्झमबर्गच्या पंतप्रधानांसह सिंगापूर, सौदी अरेबियाच्या मंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी विविध शिष्टमंडळाबरोबर बैठकही घेतली. त्यांनी विविध क्षेत्रात गुंतवणुकीची तयारी दर्शवली. या बैठकीदरम्यान मेडिकल डिव्हाईस पार्क उभारण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. बार्कलिन विद्यापीठासोबत कौशल्ये विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मंत्री श्री. सामंत यांनी दिली.
जे करार झाले आहेत, ते प्रत्यक्षात येतील. सेमी कंडक्टरचे इतर प्रकल्प महाराष्ट्रात येतील. त्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्याचे शासनाचे उद्दीष्ट असल्याचेही उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
०००
महाराष्ट्रीयन स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी काळी साडी का नेसतात? कधी केला का याचा विचार कोणी?
महाराष्ट्रीयन स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी काळी साडी का नेसतात? कधी केला का याचा विचार कोणी?
मित्रांनो आजपासून 259वर्षे आधी आजच्याच दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पानिपत येथील युद्धात महाराष्ट्रातील एक पिढीच्या पिढी गारद झाली होती. त्या युद्धाचे वर्णन असे करतात की,"लाख बांगडी फुटली,दोन मोहरे गळाले, सत्तावीस मोहरा कामी आल्या,चिल्लर खुर्दा किती उडाला,याची गणनाच नाही".
महाराष्ट्राच्या इतिहासातील हा अतिशय दुःखद दिन होता.एकही घर महाराष्ट्रातील असे नव्हते की ज्याघरीचा एकही माणूस या युद्धात कामी आला नाही.पण दुर्दैवाने महाराष्ट्रातील फार कमी लोकांना या दिवसाचा हा इतिहास माहिती आहे.इंग्रजी शिक्षणाने आणि स्वातंत्र्या नंतरच्या सेक्युलर शिक्षणाने आमचे जीवन हे कटी पतंग सारखे करून टाकले.त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे आम्हाला आमचा हा पराक्रमाचा,बलिदानाचा इतिहास माहितीही करून घ्यायचा नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रीयन स्त्रिया तर पांढरे कपाळ,हॉट पॅन्ट,आणि स्लिप्स घालुन फिरणाऱ्या संस्कृतीच्या ब्रँड एंबेसेडर झाल्या आहेत.
सदाशिवराव भाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे,अभिमन्यू सारखा पराक्रम करणारे जनकोजी शिंदे,"बचेंगे तो और भी लढेंगे" असे म्हणणारे दत्ताजी शिंदे,बळवंतराव मेहंदळे, पार्वतीबाई(सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी) यांना पाठीवर घेऊन दीडशे मैल धावत जाणारा जानू भिंताड्या यांच्या पराक्रम आणि बलिदानाच्या कथा आणि नावे विस्मरणात गेली आहेत.
आजचा संक्रांतीचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी शोकदिन होता,म्हणून संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातील स्त्री ही हळदीकुंकवासारख्या सौभाग्याची कामना करणाऱ्या आपल्या उत्सवाच्या दिवशी सुद्धा काळी साडी परिधान करते.आजच्या या संक्रमण पर्वावर महाराष्ट्रीयन महिला आजच्या दिवशीचा हा इतिहास लक्षात ठेवून व आपल्या मुलांना आणि मुलींना हा इतिहास सांगतील तसेच अतिशय अभिमानाने आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचे केवळ स्मरण करून नव्हे अभिमान बाळगून काळी साडीच परिधान करतील(काळी सलवार कमीज नव्हे बरे) अशी अपेक्षा व्यक्त करतो.
संतोष माहुरकर.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...








