Saturday, 14 January 2023

तिळगुळ


 तीळ तीळ प्रमाणे वाढणारी ,                                      गुळाचा गोडवा प्रमाणे                                                   नातं जपणारी ,.                                                        मकर संक्रांत,                                                            करेल  सुखाचा विक्रांत.

ये भारत देश हैं मेरा

 






राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

             मराठी भाषा संवर्धन पंधरवडा राज्यभर साजरा करावा, अशा सूचना मराठी भाषा विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इ. संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो.


            मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या विभागाच्या मुख्य धोरणास अनुसरुन "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा करण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात येतात. त्यानुसार यावर्षी देखील मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये आयोजित करण्यासाठी मराठी भाषा विभागाने सर्व कार्यालयांना सूचना दिल्या आहेत.

००००

 ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त राजधानीत विविध उपक्रम.

            नवी दिल्ली, १३ : ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये ट्विटर मोहिम, लघुपट, मराठी चित्रपट, मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्याने, ग्रंथ प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा असे कार्यक्रम होणार आहेत. 


               मराठी भाषा विभागाच्या सूचनेनुसार १४ ते २८ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चे राज्यात व राज्याबाहेरील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये आयोजन करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


मराठी भाषेवर आधारित विविध उपक्रम


        महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून १४ ते २८ जानेवारीपर्यंत मराठी भाषेशी संबंधित सुविचार देण्यात येतील. यासह मान्यवर कवी त्यांच्या स्व-लिखित कविता सादर करतील या कविता परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून दररोज प्रसारित केल्या जातील.


मराठी भाषेची म‍हती सांगणारे लघुपट, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपट समाज माध्यमांव्दारे तसेच कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.


            २१ आणि २२ जानेवारी रोजी नवीन महाराष्ट्र सदनातील प्रांगणात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये रसिक प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, संस्कृती प्रकाशन, आदी प्रकाशन संस्था पुस्तक विक्री प्रदर्शन लावणार आहेत.


            यासह कॅनडा दूतावासातील वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अर्चना मिरजकर यांचे ‘साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली’ या विषयावर व्याख्यानाचे प्रसारण केले जाईल. नूतन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेता विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र दिले जाईल.


समाज माध्यमांहून प्रसारण होणार


         मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त कविता, लघुपट, व्याख्याने, परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल, फेसबुक, युट्यूब चॅनेलहून प्रसारीत होणार आहे. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिचय केंद्राव्दारे करण्यात आले आहे.


           हे व्याख्यान परिचय केंद्राच्या ‍मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI, फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वर पाहता येणार आहे.

परफेक्ट solution



 

जिंदगी गुलजार हैं










 

Friday, 13 January 2023

परळ येथील महारोजगार मेळाव्यात१४ हजार पदांसाठी मुलाखती संपन्न

 परळ येथील महारोजगार मेळाव्यात१४ हजार पदांसाठी मुलाखती संपन्न

            मुंबई, दि. १३ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत परळ येथील कामगार मैदान येथे गुरुवारी झालेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात पहिल्याच दिवशी विविध उद्योग, कंपन्या, आस्थापनांनी त्यांच्याकडील विविध पदांसाठी ४३० उमेदवारांची प्राथमिक निवड केली आहे. १ हजार २०० उमेदवारांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. उर्वरित उमेदवारांनी कंपन्यांकडे नोंदणी केली असून पात्रतेनुसार त्यांना संधी मिळणार आहे. मेळाव्यात विविध ३१ कंपन्यांनी सहभागी होत त्यांच्याकडील १४ हजार ९० जागांसाठी मुलाखती घेतल्या. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले.


पाच लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट - मंत्री मंगलप्रभात लोढा


            मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये मागील महिन्याभरात हा चौथा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्य शासनाने ७५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे, असे त्यांनी सांगितले.


            एअरटेल, अथेना बीपीओ, फन अँड जॉय ॲट वर्क, करिअर एंट्री, मॅजिक बस, एसएम रिक्रूटमेंट, हिंदू रोजगार डॉट कॉम, उडान ५०५, कल्पवृक्ष प्रा. लि., जीएस जॉब सोल्यूशन, आरटीईसी प्रा. लि., सॅपिओ ॲनेलिटिका, कॅटेलिस्ट टॅलेंट मॅनेजमेंट, बझवर्क्स, इंपेरेटिव्ह बिझनेस, मनी क्रिएशन, स्पॉटलाईट, टीएनएस एंटरप्राईजेस आदी विविध ३१ कंपन्या, उद्योग, आस्थापनांनी त्यांच्याकडील १४ हजार ९० जागांसाठी या मेळाव्यात मुलाखती घेतल्या.


स्वयंरोजगारविषयक योजनांचे मार्गदर्शन


            मेळाव्यामध्ये उमेदवारांना नोकरीविषयक विविध संधींबाबत समुपदेशनही करण्यात आले. त्याचबरोबर बायोडाटा कसा लिहावा, मुलाखत कशी द्यावी याबाबतही माहिती देण्यात आली. उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन देण्याकरिता मेळाव्यामध्ये राज्य शासनाच्या विविध महामंडळांनी सहभाग घेतला. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ यांनी सहभागी होत उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली.


००००

दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय स्टार्टअप दिना

 दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्ताने

कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 16 जानेवारी व मंगळवार दि. 17 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


            महाराष्ट्राने उद्योगक्षेत्रात लौकिक निर्माण केला आहे. देशाच्या प्रगतीचे इंजिन असलेल्या महाराष्ट्रात सर्वाधिक स्टार्टअप निर्माण झाले आहेत. नव उद्योजकांसाठी महाराष्ट्राने नेहमीच लाल गालिचा अंथरलेला आहे. राज्यात आतापर्यंत 18 टक्के स्टार्टअपची नोंदणी झाली आहे. प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी ई गव्हर्नन्स ही संकल्पनाही राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्ताने शासनाच्यावतीने रोजगारक्षम उमेदवारांना हक्काचा रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळाव्यांचे कशाप्रकारे आयोजन करण्यात येत आहे याविषयी सविस्तर माहिती डॉ. रामास्वामी एन. यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000



 

Featured post

Lakshvedhi