Friday, 13 January 2023

फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप आत्मनिर्भर भारतातील महत्वाचा उपक्रम

 फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप आत्मनिर्भर भारतातील महत्वाचा उपक्रम

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्पर्धेसाठी महाराष्ट्राचेही निमंत्रण, ई-कारचे गेटवे-ऑफ-इंडियाच्या प्रांगणात अनावरण

            मुंबई, दि. १३ : - रस्ते हे विकासाचा मार्ग असतात, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप’ हा आत्मनिर्भर भारत उपक्रमातील महत्वाचा भाग ठरेल, म्हणूनच या स्पर्धा महाराष्ट्रातही व्हाव्यात, असे निमंत्रणही आज येथे दिले.


            भारतात पहिल्यांदाच आयोजित केल्या जाणाऱ्या फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप या ई व्हेईकल्स च्या कार रेसमधील कारचे मुख्यमंत्री श्री. शिंदे, केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, तसेच तेलंगणाचे नगर विकास मंत्री के. टी. रामा राव यांच्या हस्ते येथे अनावरण करण्यात आले. यासाठी गेटवे ऑफ इंडियांच्या प्रांगणात शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता.


            या कार अनावरण सोहळ्यास तेलंगणाच्या नगर विकास विभागाचे सचिव अरविंद कुमार, तसेच ग्रीनको समुहाचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चलमाशेट्टी आदी उपस्थित होते. तेलंगणामधील हैद्राबाद येथे ११ फेब्रुवारीला ही ‘फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप कार रेस’ पार पाडणार आहे.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या ‘ई-व्हेईकल्स वर्ल्ड चॅम्पियनशिप’ या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, देशात होणाऱ्या पहिल्या अशा उपक्रमाची सुरवात मुंबईतून होत आहे, याचे समाधान आहे. मुंबई ही देशाची शान आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात हा सोहळा होतो आहे, यालाही वेगळे स्थान आहे. नुकताच जी-२० ची आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची बैठक इथे झाले. त्यांना परिसर खूप आवडला होता. अशी ही फार्म्युला- रेस महाराष्ट्रातही व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी इथे रस्त्यांचे उत्तम जाळे आहे. नुकतेच आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खुला केला आहे. हा महामार्ग या रेससाठी उत्तम ठरेल. त्यामुळे यात सहभागी होणारेही खुश होतील, असे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धा आयोजकांना आपल्या भाषणात दिले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भुपृष्ठ वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांच्या रस्ते विकास आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील कामांची प्रशंसाही केली. त्यांच्यामुळेच मुंबईत ५५ उड्डाण पुल उभे राहील्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य आहे. इथे उद्योगांसाठी पोषक अनेक घटक उपलब्ध आहेत. मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि एक खिडकी योजना सारख्या सवलती आहेत. महाराष्ट्रात अनेक रस्ते प्रकल्पांचे काम सुरु आहे. आम्ही वेगाने या महाराष्ट्राने प्रगतीपथावर नेत आहोत. यात केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांसह केंद्रीतल अनेक मंत्र्यांचे सहकार्य मिळत आहे. या सहकार्यातूनच आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचे आहे. फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्व असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, आपल्याला ई-व्हेईकल्सच्या वापराव भर द्यायचा आहे. त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करायची आहे. याशिवाय ईथेनाँलसारख्या ग्रीन फ्युईलच्या वापरालाही प्रोत्साहन द्यायचे आहे. यातून आपल्या इंधनाची आयात कमी करायची आहे. पुढे जाऊन फाईव्ह ट्रीलीयन ईकाँनामीचे उद्दीष्टही गाठायचे आहे. यात आपली अँटोमोबाईल इंडस्ट्रीजचा सर्वात मोठा वाटा असेल. कारण आज हेच क्षेत्र सर्वाधिक जीएसटी भरते. हेच क्षेत्र सर्वाधिक रोजगार निर्मिती करते. आपल्याला अधिकाधिक ई-व्हेईकल्स, कार-ट्रक्सची निर्मिती करायची आहे. आपल्याकडे सौर ऊर्जा मुबलक आहे. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही याच साऱ्या गोष्टींवर भर असतो. म्हणूनच येत्या काळात आपल्याला ई-व्हेईकल्सचा वापर आणि त्यांच्या निर्मितीवर भर द्यायचा आहे. आपल्या आत्मनिर्भर भारताच्या उद्दीष्टापैकी एक असे हे उद्दीष्ट आहे. त्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून आपण ही स्पर्धा आयोजित करत आहोत.


            सुरवातीला या फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पिनयनशिप विषयीही माहिती सादर करण्यात आली.


0000



_आपल्या हाताच्या बोटांची कमाल

 

*_आपल्या हाताच्या बोटांची कमाल -  बोटे फक्त वस्तू उचलण्यासाठी नाहीत नाहीत तर ती शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना कशी जोडली गेली आहे व ते कसे काम करतात त्याची माहिती या व्हिडिओत दिलेली आहे. तेव्हा आवर्जून हा व्हिडिओ बघा...✌🏼_*

भोगी बद्दल खुलासा

 🌹 *भोगी बद्दल खुलासा*

---------------------------------------------------------


भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी, ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. भोगी हा उपभोगाचा सण आहे. या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा. दारासमोर रांगोळी काढावी. घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे.

या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.

इंद्र देवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते.  

हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं.

करदात्यांना त्याच्या वापरावर देखरेख करण्याचा अधिकार असला पाहिजे

 इन्कमटॅक्स भरणारेच्या परवानगीशिववाय सरकार काहीच फुकट वाटणार नाही न्यायालयाच्या या निर्णयामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना बसेल लगाम.

सर्वोच्च न्यायालयाने काल एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला की करदात्यांची अखिल भारतीय संघटना स्थापन करावी, जी जगातील सर्वात मोठी संघटना असेल.


 कोणतेही सरकार सत्ताधारी असले तरी, या संस्थेच्या मान्यतेशिवाय, त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही सरकार मोफत वीज, मोफत पाणी, मोफत वितरण किंवा कर्जमाफीची घोषणा करू शकत नाही.

 पैसा आमच्या कर देयकांचा असल्याने, करदात्यांना त्याच्या वापरावर देखरेख करण्याचा अधिकार असला पाहिजे.

 राजकीय पक्ष मतांसाठी फुकट वाटून जनतेला आमिष दाखवत राहतील, कारण त्याचा फायदा त्यांना होतो.  ज्या काही योजना जाहीर केल्या जातात, त्या आधी सरकारने त्यांची ब्लू प्रिंट देऊन या संस्थेची संमती घ्यावी.  खासदार-आमदारांचे पगार आणि त्यांना मिळणाऱ्या इतर बिनदिक्कत लाभांनाही हे लागू व्हायला हवे.

 लोकशाही फक्त मतदानापुरती मर्यादित आहे का?  त्यानंतर आम्हा करदात्यांना कोणते अधिकार आहेत?

 संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल खासदार, आमदारांना जबाबदार धरण्याचा आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही अधिकार करदात्यांना असला पाहिजे.  ते सर्व "सेवक" आहेत, करदात्यांनी भरलेले आहेत.

 राईट टू रिकॉल अशा कोणत्याही ‘फ्रीबीज’चीही लवकरच अंमलबजावणी व्हायला हवी.

 तुम्ही सहमत असाल तर कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा.  हे करण्यासाठी, पोस्ट शेअर करा.

 तुमच्या किमान 10 मित्रांना ते पाठवा.

 कृपया व्हायरल होण्यासाठी हा संदेश शेअर करा.  🙏


 https://www.nationalheraldindia.com/india/sc-forming-panel-to-examine-issue-of-freebies-by-political-parties-is-burial-by-committee-experts

ब्रम्हांड दाखवते फक्त बायको

 आई कडेवर घेऊन चंद्र दाखवते,


बाप खणकन वाजवून सूर्य दाखवतो,


शिक्षक गृहपाठ देऊन नक्षत्र दाखवतात,


नोकरीत साहेब दिवसा ढवळ्या तारे दाखवतो,


आणि


बायको समोर आली तर ब्रम्हांड दिसतं.


बाकी हे इस्रो, नासा वैगरे अंधश्रद्धा......😂😂😁😁

बेस्ट आचारी कमी मेहेंनतना

 *कोणाला आचारी लागला तर कमी पैशात मिळेल महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट आचारी 🤣 🤣*


जिंदगी


कभी जीने की आशा,

कभी मन की निराशा,

कभी खुशियों की धूप,

कभी हकीकत की छाव,

कुछ खोकर पाने की आशा,

शायद यही है जीवन की परिभाषा

: प्रतिभा आपल्याला आपल्या कारकिर्दीत उच्च स्थानावर नेईल परंतु वागणूक आपल्याला इतरांच्या हृदयात उच्च स्थान टिकवून ठेवण्यास मदत करेल


सुप्रभात .. आपला दिवस आनंदात जावो...🌹🌹🌹: ☀️☀️☀️☀️☀️🙏🏻☀️☀️☀️☀️☀️

*प्रवास हा असाच असतो..,*

*चढ आला तर कष्ठाने चढायचा असतो*

*आणि उतार आला की त्याचा आनंद*

*लुटायचा असतो...*

☀️☀️☀️☀️☀️🙏🏻☀️☀️☀️☀️☀️

           

सही दिशा में किया गया 

      अच्छा कर्म 

मनुष्य का वर्तमान और भविष्य

    दोनों बदल देता है!!: *गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर*.....,

*संकटाच्यावेळी* 

*आपली माणसं गर्दी करायला* 

*विसरत नाहीत*....!!!!!!

*वाक्य लहान आहे पण खूप महत्वाचे*

           💐 *शुभ दिवस* 💐

Featured post

Lakshvedhi