Saturday, 7 January 2023

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सैयद शहजादी ८ जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर.

 राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य

सैयद शहजादी ८ जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर.

            मुंबई, दि. ७ : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य (केंद्रीय मंत्री दर्जा) कुमारी सैयद शहजादी या ८ ते ११ जानेवारी २०२३ या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.


            या दौऱ्याच्या कार्यक्रमात ते अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीची पाहणी करतील. तसेच अल्पसंख्याक समाजाला भेडसावणाऱ्या तक्रारी, प्रश्नांवर चर्चा करतील. प्रधानमंत्री यांचा १५ कलमी कार्यक्रम, केंद्र आणि राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक घेऊन चर्चा करतील.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आज हिंगोली दौर्‍यावर.

 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आज हिंगोली दौर्‍यावर.

मुंबई : ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज चे अध्यक्ष ललित गांधी हे रविवारी (ता. ८) रोजी हिंगोली जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.


मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँण्ड कॉमर्स संलग्नित हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ व्दारा आयोजित ८ जानेवारीला भव्य मराठवाडा व्यापारी महापरिषद होत आहे. हिंगोली येथील रामलीला मैदान, महावीर भवनात सकाळी साडेदहा वाजता होत असलेल्या या महापरिषदेसाठी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र चेंबरने राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यात उद्योग व व्यापार वाढून पायाभूत सुविधांचा विकास, पर्यटनासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी चेंबरच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील उद्योजक आणि व्यापारी यांच्यासोबत ते संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र चेंबरचे हिंगोली जिल्ह्यातील उद्योजक व व्यापारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सायबर क्राईम सतर्क राहा


 

सावधान इंडिया


 

Jai हो गणितज्ञ शंभु राजे

 


कुठलाही आजार आपल्याला का होतो?*

 *डॉ.शरद ठुबे, अहमदनगर*

*Anorectal Surgeon*

Mob.9423792622


*कुठलाही आजार आपल्याला का होतो?* 

तर त्याचे सहज सोपे उत्तर आहे. 

*तुम्ही स्विकारल्यामुळे!*

आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे. पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल आपल्या मनाने अतिशय स्ट्रॉंगली स्विकारलेय की मला पोहायला येत नाही आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे तोही पोहतो. कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीतच आहे तो पाण्यावर तरंगणार आहे. अहो सापाला हात पाय नसतात. तोही पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले, तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो हाही गैरसमजच आहे. बघा जी माणसं पाण्यात बुडून मरतात त्यांचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते. याप्रमाणेच आपल्यात प्रतिकारशक्ती आहे. 

*ती आपल्याला कसलाच आजार होऊ नये यासाठी सतत काम करत असते. तिला मनापासून स्ट्रॉंगली मान्य करा.* हेच खरे शरीर शास्त्र आहे. मेडीकल सायन्स ही शक्ती तुमच्यात नसेल तर काहीच करू शकत नाही. तर ताप आल्यावर,सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर कसलाही आजार झाल्यावर थोडे थांबा. 

*तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या.*

अशा आजारांवर वारेमाप खर्च करणे *शरीरावर अत्याचार* आहेत. ही अंधश्रद्धा आहे. 

शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे खरे विज्ञान आहे.

आपल्या शरीरातली अर्ध्याहून अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञ मन असतं. पण कित्येकदा पेशंटला याची माहीती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं, उफाळून येतं, काय करावं, ते समजत नाही.


*मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे बघू या.*


१) एखाद्या गोष्टीची जबरदस्त भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते. 


२) परीक्षेचा किंवा अजून कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो, 


३) समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहिली की हातापायातली शक्ती गळून जाते.


४) आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती नेहमी क्वचितच आजारी पडते.


तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची!


ताकतवार असला तरी तो गुलामच! दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम!

आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत.


१) ब्लडप्रेशर आणि हृदयविकार - 

समजा एखादा माणुस, नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल, 

उदा.

- त्याला बघितलं की माझं रक्तच खवळतं!

- ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, आणि हे बदलले!

- माझी तळपायाची आग मस्तकाला जाते!


क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो.


डॉक्टरकडे गेल्यावर औषध-उपचाराने काही काळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही.


*ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्‍या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच तिला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात.*


*थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशपणा आणि निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात.*


२) आतड्यांचे विकार – जी व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलते, स्वतःची निंदा करते, स्वतःला दुबळा समजते, तिला छोट्या आतड्यांच्या विकारांची समस्या उदभवते.


३) अपचन – बहुसंख्य लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत, खरं तर मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे, तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचां, जसं की एखादे चुर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा आधार घ्यावा लागतो.


आता ह्याची बरीचशी कारणं आहेत, इथे एका उदाहरणची चर्चा करुयात.


काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं, कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते, त्याचा राग त्याच्या मनात असतो, लहान मूल आईवडीलांवर राग काढू शकत नाही, त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते, त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो.

ह्या ठिकाणी आई वडील त्याला जबरदस्ती करु शकत नाहीत, हळुहळू तो मोठा होतो, शिस्तीचा बडगाही संपतो पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गीक नियंत्रण तो हरवून बसतो.


असं ही बघण्यात आलं की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर होते. जे लोक कंजुष वृत्तीचे असतात, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळते.


४) छोट्याछोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते, त्याचा परिणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.


५) डोकेदुखी – 

आजकाल बहुतांश भगिनीवर्गाला झंडुबाम शिवाय झोप येत नाही. कारण काय असेल बरं?

- ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं!

- त्याने माझं खुप डोकं खाल्लं!

- आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही,


निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे.

आणि मायग्रेनचा त्रास चालू!


डोकेदुखीची अजुनही काही कारणे आहेत, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा तिला उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते.


तेव्हा असे कटु अनुभव विसरुन जाणेच इष्ट!


कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते, आणि डोके दुखते. जितके पोस्टपोन केले तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावीत.


६) पाठदुखी वा कंम्बर दुखी – 

एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकून थकुन गेली असेल तेव्हा तिला पाठदुखीला वा कम्बरदुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात, ह्यात मानेपर्यंतचे स्नायू आखडले जातात. त्यांच्यावरचा ताण जाणवतो.


चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो.


आता सर्वात महत्वाचे, ह्यावर उपाय काय आहे?


*आपापले औषधौपचार चालू ठेवा, पण हे रोग शरीरातून समूळ उपटून काढायचे असतील तर स्वयंसुचन हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे.*

      

जसं की डोकेदुखीचं उदाहरण घेऊ – तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सुचना द्या –


आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे, 

आता ते अजून शिथील आणि हलकं झालं आहे, 

डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे, माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरीक्त रक्त आता शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे.

माझा डोकेदुखीचा त्रास नाहीसा होत आहे, काही क्षणांमध्ये ही बैचेनी दुर होईल!


आणि डोकेदुखी गायब!

प्रत्येक रोगासाठी अशा सुचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवून रोगमुक्त होता येते.


*सारांश काय तर मित्रांनो, भावनांची कोंडी करुन जगू नका, रोग बनून ते शरीराला पोखरतील, राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा!*


इथे मला एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो, त्यांना राग आल्याक्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहून काढायचे, मनातले संपुर्ण भाव ओतून रिते व्हायचे, ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलावर ठेवायचे आणि नंतर जाळून किंवा फाडून टाकायचे.


अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते. आता क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं.


तुम्हा सर्वांना, निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा!

*नवीन वर्ष २०२३,तुम्हाला अतिशय आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा!* 


🌹🌹🌹☘️🌹🌹🌹

तीन धडे .., शिकण्यासारखं

 तीन धडे ..


*वाचायला सुरुवात करण्याआधी... आपले डोळे अलगद बंद करा... जीवनातील असा एक प्रसंग आठवा की तुम्ही कुणासाठी काहीतरी चांगले केले होते... त्यावेळी तुम्हाला कसे वाटले होते आणि तुम्ही ज्या व्यक्तीला मदत केली होती त्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय होती...*


*तीन धडे*


एक यशस्वी उद्योजक *नारायण मुर्ती* यांनी सांगितले की :


जेव्हा मी लहान होतो, त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो. हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही. 


माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली. 


एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या. एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, “बेटा, तुला कोणती वाटी हवी आहे ती तू घेऊ शकतो.”


 त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते! आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे. 


म्हणूनच मी ज्या वाटीत अंडे होते ती वाटी निवडली! आम्ही जेवण करायला सुरुवात केली, तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास सुरुवात केली. 


जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली दोन अंडी होती! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला. मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो. माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले, *“बाळा, नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते असे नाही. जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे. शेवटी तुमची हारच होईल.”*


 दुसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले : एका वाटीत वर एक अंडे होते आणि दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. पुन्हा त्यांनी त्या दोन वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या व मला सांगितले, “बाळा, तुला जी वाटी हवी असेल ती घे.”


ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली! मी अंड नसलेली वाटी निवडली. मला फार आश्चर्य वाटले जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंडे नव्हते.


 पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, *“बाळा, तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये कारण जीवनात खूप अनिश्चितता असते. कधी कधी, जीवन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो. अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये, फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही.”*


तिसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले, एका वाटीच्या वर एक अंडे होते आणि दुसऱ्या वाटी वर एकही अंडे नव्हते. त्यांनी दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितले, “बाळा, तू निवड आता तुला कुठली वाटी हवी आहे?”


 या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की, “आधी तुम्ही घ्या कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहे.”


माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाटीवर एक अंडे ठेवले होते ती वाटी निवडली. जेव्हा मी माझ्या वाटीतील नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंडे निघणार नाही. परंतु जेव्हा माझ्या वाटीत दोन अंडी निघाली, तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो!


माझ्या वडिलांनी प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितले, *"माझ्या बाळा, हे कधीही विसरु नकोस की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस, तेव्हा तुमच्याबाबतीत ही नेहमी चांगलेच होते!”*


मला माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमी आठवतात आणि मी त्यानुसार माझा व्यवहार आणि उद्योग करतो. हे खरेच आहे, की मला माझ्या उद्योगात त्यामुळेच सफलता मिळाली आहे.. 


*नारायण मुर्ती*

Featured post

Lakshvedhi