महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आज हिंगोली दौर्यावर.
मुंबई : ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज चे अध्यक्ष ललित गांधी हे रविवारी (ता. ८) रोजी हिंगोली जिल्हा दौर्यावर येत आहेत.
मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँण्ड कॉमर्स संलग्नित हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ व्दारा आयोजित ८ जानेवारीला भव्य मराठवाडा व्यापारी महापरिषद होत आहे. हिंगोली येथील रामलीला मैदान, महावीर भवनात सकाळी साडेदहा वाजता होत असलेल्या या महापरिषदेसाठी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र चेंबरने राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यात उद्योग व व्यापार वाढून पायाभूत सुविधांचा विकास, पर्यटनासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी चेंबरच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील उद्योजक आणि व्यापारी यांच्यासोबत ते संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र चेंबरचे हिंगोली जिल्ह्यातील उद्योजक व व्यापारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment