Tuesday, 3 January 2023

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे राजकारण - समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला

 लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे

राजकारण - समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

          मुंबई, दि. 3 :- “आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नांची जाण आणि माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ माझ्या पक्षाचेच नाही तर माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे, मी एक चांगला मित्र गमावला आहे. राजकारण आणि समाजकारणात ठाम भूमिका घेणारा नेता आपल्यातून निघून गेला”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी - चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान कायम लक्षात राहील. मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी काम केले. वाढत्या शहरीकरणात वंचित व उपेक्षित घटकांच्या हिताला बाधा न पोहचता विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते. आपल्या आजारपणातही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान करून राज्याचा आवाज संसदेत वाढला पाहिजे, यासाठी आग्रह धरला. मध्यंतरी प्रकृती सुधारत असताना ते आपल्यात पुन्हा परतणार, असा ठाम विश्वास होता. पण आज ही वाईट बातमी आली. या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत”.


००००

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लढवय्या सहकारी गमावला

- मंत्री सुधीर मुनगंटीवार


चंद्रपूर, दि. 3 : “आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक निष्ठावान लढवय्या सहकारी आणि लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे”, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.


ते पुढे म्हणाले, “मितभाषी, पण जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ‘चिंचवडचा ढाण्या वाघ’ असे त्यांचे वर्णन केले जायचे. गंभीर आजारातही विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकात मतदानाचे आपले लोकशाहीतले कर्तव्य पार पाडून त्यांनी एक उदाहरण घालून दिले. ईश्वर त्यांना सद्गती देवो. जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो”, असे श्री.मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.


0000



दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री

 दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री

दीपक केसरकर यांची उद्या मुलाखत.

            मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून बुधवार दिनांक 4 जानेवारी, गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.


            मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा, दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिक वापर होण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करणे, जगभरातील मराठी बांधव एकत्र यावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने मराठी तितुका मेळवावा या उदात्त हेतूने 'विश्वमराठी संमेलन 2023' आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाविषयी मराठी भाषा मंत्री श्री. केसरकर यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून विस्तृत माहिती दिली आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घे

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख.

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख.

अवघ्या सहा महिन्यात 2600 रुग्णांना 19 कोटी 43 लाखांची मदत.

            मुंबई, दि. 3 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यात कक्षाकडून 2600 रुग्णांना एकूण 19 कोटी 43 लाख रुपयांची मदत दिली आहे.


            मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून रुग्णसेवेत झोकून दिले आहे. त्यामुळेच पहिल्याच जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाखाची तर डिसेंबर महिन्यात विक्रमी 8 कोटी 52 लाख रुग्णांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.


            डिसेंबर महिन्यात रुग्णांना देण्यात आलेल्या विक्रमी मदतीबाबत बोलतांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे.


0000



 

ग्रामविकास- सलोखा तंटामुक्त धोरण











 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन.

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन.

ठाणे, दि. 3 (जिमाका) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


“देशातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपून आजच्या महिलांनी विविध क्षेत्रात आणखी भरारी घ्यावी, हेच सावित्रीबाई फुले यांना खरे अभिवादन असेल”, अशा शब्दांत मुख्यमंत्री महोदयांनी अभिवादन केले.


यावेळी तहसीलदार राजाराम तवटे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

000

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन.

मुंबई, दि. ३ : आद्य शिक्षिका, भारतीय समाजसुधारक, कवियित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


आज मंत्रालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासन (प्रशासकीय सुधारणा) विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.


0000


 

निसर्गाचा चमत्कार

 नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे गुलमोहोराचे झाड आहे त्यात एक पिंपळाचे रोपटे उगवले आहे अदभूत चमत्कार म्हणजे काल पासून त्यातून झरा वाहू लागला बुंध्या तुन पाणीच पाणी वाहू लागले आहे लोक गर्दी करू लागले आहेत 🙏🏼


Featured post

Lakshvedhi