Thursday, 29 December 2022

जिवन गाणे गात राहावे

 *अगर कुछ बनना चाहते हो तो भीड़ से हटकर चलो..*

*भीड़ साहस तो देती है पर पह़चान छीन लेती है..!*


🙏🏻 *सुप्रभात*🙏🏻






महाराष्ट्रातील तीन साहित्य‍िकांना मराठी, संस्कृत आणि ऊर्दू भाषेसाठी

 महाराष्ट्रातील तीन साहित्य‍िकांना मराठी, संस्कृत आणि ऊर्दू भाषेसाठी

साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान.

            नवी दिल्ली, २८ : महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठीत ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


            येथील कमानी सभागृहात युवा साहित्यिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक आणि प्रमुख पाहुणे प्रसिद्ध साहित्य‍िक ममता कालिया उपस्थित होते. कार्यक्रमात एकूण 24 भाषेसाठी ‘युवा साहित्यिकांना वर्ष 2022 चा’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांचा समावेश आहे.


            मराठी भाषेसाठी युवा साहित्य‍िक पवन नालट यांना ‘मी संदर्भ पोखरतोय’ या काव्य संग्रहासाठी ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या साहित्यकृतीत मी संदर्भ पोखरतोय या शीर्षकातूनच बऱ्याच गोष्टी व्यक्त होत असल्याचे श्री नालट म्हणाले. मी म्हणजे सामान्य माणूस, मी चा संदर्भ समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक,आर्थिक या सर्व घटकांमध्ये जे अनिष्ट आहे त्याला पोखरण्याचे काम हा सामान्य माणूस करू शकतो. अशा आशयाच्या कविता या काव्य संग्रहात असल्‍याचे श्री. नालट म्हणाले.


            श्री. नालट हे मूळचे अमरावतीचे असून ते शिक्षक आहेत. त्यांच्या याच कविता संग्रहाला के.बी. निकुंब काव्यसंग्रह पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा नवोदित साहित्य लेखनाचा पुरस्कार तसेच डॉ. किसनराव पाटील वाड;मय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.


‘श्रीमतीचरित्रम्’ या संस्कृत काव्य संग्रहासाठी श्रुती कानिटकर यांना पुरस्कार


            मुंबईच्या श्रुती कानिटकर यांना त्यांच्या संस्कृत भाषेतील ‘श्रीमतीचरित्रम्’ या काव्यसंग्रहासाठी ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राधा-कृष्ण प्रेम हे सर्व परिचित आहे. कृष्णाबद्दल सर्वांना माहिती आहे. मात्र, राधाबद्दल कमी लोकांना माहिती असल्याचे श्रुती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, राधा या चरित्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या काव्य संग्रहात करण्यात आला आहे. हे काव्य सात विभागात आहे. प्रत्येक भागाला लीला असे नाव देण्यात आलेले आहे. यात प्रेम भक्ती व्यक्त करण्यात आली आहे.


            श्रुती कानिटकर या आयआयटी मुंबईत सहायक प्राध्यापक आहेत. त्या वेदांतमध्ये पी.एच.डी करीत आहेत. श्रुती यांनी वयाच्या 11 वर्षापासून लेखनाला सुरूवात केली. त्यांच्या श्रीमतीचरित्रम् (कविता संग्रह), सुभाषित – रत्नभांडागारम् (मराठीतील अनुवादाला) श्रीपाद सेवा मंडळ काव्य लेखन स्पर्धेमध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे.


‘गिरयाह’ ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना युवा साहित्य पुरस्कार


             ‘गिरयाह’ ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना वर्ष 2022 चा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा ग़ज़ल संग्रह सामाजिक संबंध, मानवीय मूल्य, श्रम आणि आधुनिक दुनियेतील भ्रम यावर आधारित आहे. हा संग्रह पारंपरिक आणि आधुनिक ग़ज़लांचे संयोजन आहे. जीवनातील चढ उतार ग़ज़लांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेले आहेत.


            मुंबईचे मकसूद आफाक हे शिक्षक आहेत. त्यांचे ऐतबार आणि गिरयाह हे दोन ग़ज़ल संग्रह आहेत. त्यांनी वेब सीरीजसाठी गीत लिहिले आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्‍यात आले आहे.


000

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांवरील खटले मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय

 बाळगंगा प्रकल्पग्रस्तांवरील खटले मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            नागपूर दि. २८ : रायगड जिल्ह्यातील बाळगंगा धरण संघर्ष व पुनर्वसन समितीचे कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्तावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तावरील गुन्हे मागे घेण्याच्या अनुषंगाने सदस्य शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावेळी श्री.फडणवीस यांनी ही माहिती दिली.


            याबाबत अधिक माहिती देतांना श्री फडणवीस यांनी सांगितले की, राजकीय व सामाजिक आंदोलनामध्ये ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी दाखल झालेले व प्रलंबित असलेले सर्व खटले शासन निर्णयामध्ये नमूद अटीवर मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सदर खटले काढून घेण्याची कार्यवाही करण्यासाठी सविस्तर सूचना व कार्यपध्दती निर्गमित करण्यात आली आहे. त्यातील तरतूदीनुसार ज्या गुन्ह्यामध्ये दि. ३१.०३.२०२२ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत. या शासन निर्णयामध्ये नमूद अटी व शतींची पूर्तता होत आहे, असे खटले मागे घेण्यासाठी कायदेशीर तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सदर खटल्यांसदर्भात कार्यवाही करण्यासाठी पोलीस आयुक्तालय क्षेत्राकरिता व जिल्ह्याकरिता समिती गठित करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून जिल्ह्याकरिता महसूल उपविभागनिहाय महसूल उप विभागीय अधिकारी (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येत आहे. याप्रकरणी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            गिरणी कामगारांच्या संदर्भातही लवकरच निर्णय घेण्यात येईल, प्रकल्प ग्रस्तांच्या प्रलंबीत असलेल्या नोकऱ्यासंदर्भात वस्तुस्थिती तपासून त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, सचिन अहिर, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.


00

नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबादला आणि सोयी-सुविधांबाबत

 नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबादला आणि सोयी-सुविधांबाबत


मुख्यमंत्र्यांसमवेत लवकरच बैठक घेणार

- उद्योग मंत्री उदय सामंत

            नागपूर, दि. २८ : नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याबाबत आणि तेथील ग्रामस्थांना विविध नागरी व पारंपरिक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.


            याबाबतची सदस्य गणेश नाईक यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, सिडको व नवी मुंबई महापालिकेसंदर्भात हा प्रश्न असून स्थापनेपासून आतापर्यंत विविध निर्णय घेतले गेले. शहरे वसवण्याची जबाबदारी सिडकोची आहे. याबाबत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. त्याअनुषंगाने दहा ते बारा हजार हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्याचा अहवाल देखील मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येईल. पनवेल महानगरपालिकेकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी सदस्य योगेश सागर, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, सीमाताई हिरे यांनी या संदर्भातील चर्चेत सहभाग घेतला.

Wednesday, 28 December 2022

31St थंडग्लास ग्रहणाचे वेळापत्रक :

Pl share to urs close.   Only yealy31st  dont forget                                                                              ३१ डिसेंबर चे थंडग्लास ग्रहणाचे वेळापत्रक :


वेध : संध्याकाळी ७ ते ९


स्पर्श : रात्रौ ९ ते १०


परमोच्च मध्य : रात्रौ ११ ते १


मोक्ष ‌‌ : क्षमतेनुसार


*महाआरती :* *घरी पोहोचल्यावर*😂😂

मेरा भारत महान,जाई हिंद टाटा जी

 


पर्यावरणाचा समतोल राखून त्रंब्यकेश्वरचा विकास करणार

 पर्यावरणाचा समतोल राखून त्रंब्यकेश्वरचा विकास करणार

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            नागपूर, दि. 27 : “पर्यावरणाचा समतोल राखून त्रंब्यकेश्वरचा विकास केला जाईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान सभेत एका लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.


            “नाशिक जिल्ह्यातील त्रंब्यकेश्वर येथील पाण्याची मागणी वाढली आहे. या वाढीव पाण्याच्या मंजूरीसाठी तसेच इतर सोयी सुविधांसाठी लवकरच जिल्हाधिकारी आणि संबधित यंत्रणांच्या सोबत बैठक घेतली जाईल असे” उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधीच्या एका उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.


            सदस्य हिरामण खोसकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षावेधीवरील चर्चेत छगन भुजबळ यांनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi