Saturday, 24 December 2022

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे उद्या लसीकरण आणि वैद्यकीय शिबीर.

 महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे

उद्या लसीकरण आणि वैद्यकीय शिबीर.

          मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डी वॉर्ड’ कार्यक्षेत्रात ताडदेव महापालिका शाळा, बने कम्पाऊंड, साने गुरूजी मार्ग, ताडदेव येथे शनिवार दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत मोफत लसीकरण आणि वैद्यकीय शिबीराचे आयोजन केले आहे.


          या शिबीरामध्ये महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी, लसीकरण आणि दंत तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी सुमारे 1 हजार बालके उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती सुशीबेन शहा यांनी प्रसिध्दीस दिली आहे.


000


 


 

अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

 अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीजागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणीवर भर द्यावा

        - अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन

मुंबई, दि. 23 : अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणी या तिन्ही बाबींचा अवलंब करावा अशा सूचना नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन यांनी दिल्या. श्री. गोपाल कृष्णन यांनी प्राधिकरणाचे संचालक गुणवत्ता हमी तपासणारे अधिकारी श्री हरींदर ओबेरॉय, संचालक पश्चिम विभाग श्रीमती प्रीती चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी आज वांद्रे कुर्ला संकुलातील अन्न व औषध प्रशासन कार्यालय आणि प्रयोगशाळेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.


   अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी केंद्रीय पथकाचे स्वागत केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (विधी) चंद्रकांत थोरात, सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई शशिकांत केकरे, अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळेच्या संचालक श्रीमती संगीता ठाकूर व इतर अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त आणि प्रयोगशाळेतील सहयोगी कर्मचारी उपस्थित होते.


या भेटीदरम्यान या संकुलात अन्न व औषध प्रशासनाचे कामकाज कसे चालते, तसेच प्रयोगशाळेत येणारे नमूने कशा पध्दतीने तपासले जातात याची पाहणी त्यांनी केली. प्रशासनाच्या चौथ्या मजल्यावर प्रयोगशाळेकरिता नव्याने बांधकाम सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच अत्याधुनिक प्राणी गृह, अन्न तपासणी केंद्र, अन्न दर्जा तपासली जाणारी प्रयोगशाळा येथे भेट दिली.


​ याभेटी दरम्यान अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळेच्या संचालक श्रीमती ठाकूर यांनी मुंबई, नागपूर व औरंगाबाद प्रयोगशाळेबाबत सादरीकरण केले. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन,यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.


​ सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई श्री. केकरे, यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.


000



फुलले रे क्षण माझे

 


जिवन गाणे

 *कोणतीही स्थिती कायमची नसते. साहजिकच संकटे ही तात्पुरतीच असतात. संकटरूपी अंधारात काहीही दिसत नसले तरी, डगमगून जाऊ नये कारण अंधार संपून लवकरच यशाचा उजेड पडणार असतो.*

         *🌺शुभ सकाळ 🌺*

Friday, 23 December 2022

कामगारांसाठी सुधारीत वेतनदर जाहीर

 कामगारांसाठी सुधारीत वेतनदर जाहीर


, मुंबई, दि. 23 : किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत २१ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योग’ व ‘अभियांत्रिकी उद्योग’ या उद्योगांच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने अधिसूचनेतील तरतुदीनुसार २१ नोव्हेंबर २०२२ ते 31 डिसेंबर २०२२ या कालावधीकरिता तसेच २३ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्ते किंवा न्यायवादी यांचा अधिसंघ संस्था व विधी व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा’ या उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने अधिसूचनेतील तरतुदीनुसार २3 नोव्हेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीकरिता ९ डिसेंबर २०२२ रोजी विशेष भत्ता दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे, असे कामगार उपायुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


             मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्ते किंवा न्यायवादी यांचा अधिसंघ संस्था व विधी व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा" या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने या अधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरिता पुढीलप्रमाणे आहे.


परिमंडळ १ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १६,६२०/- + ८५८/- = १७,४७८/-


२) अर्ध कुशल कामगार : १५,१५०/- + ८५८/- = १६,००८/-


३) अकुशल कामगार : १४,०९५/- + ८५८/- = १४,९५३/-


            परिमंडळ २ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम(प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम


१) कुशल कामगार : १५,७८०/- + ८५८/- = १६,६३८/-


२) अर्ध कुशल कामगार : १४,३१०/- + ८५८/- = १५,१६८/-


३) अकुशल कामगार : १३,२५५/- + ८५८/- = १४,११३/-


            औषधी द्रव्य व औषध बनविणारा उद्योग’ या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने या अधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरता पुढीलप्रमाणे आहे.


परिमंडळ १ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १६,६०५/- + ३७२/- = १६,९७७/-


२) अर्ध कुशल कामगार : १५,१८५/- + ३७२/- = १५,५५७/-


३) अकुशल कामगार : १४,१७०/- + ३७२/- = १४,५४२/-


        परिमंडळ २ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम(प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम


१) कुशल कामगार : १६,०००/- + ३७२/- = १६,३७२/-


२) अर्ध कुशल कामगार : १४,५८०/- + ३७२/- = १४,९५२/-


३) अकुशल कामगार : १३,५६५/- + ३७२/- = १३,९३७/-


        परिमंडळ ३ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम (प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम


१) कुशल कामगार : १५,५९०/- + ३७२/- = १५,९६२/-


२) अर्ध कुशल कामगार : १४,१७०/- + ३७२/- = १४,५४२/-


३) अकुशल कामगार : १३,१५५/- + ३७२/- = १३,५२७/-


            अभियांत्रिकी उद्योग’ या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने याअधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरिता पुढीलप्रमाणे आहे.


        परिमंडळ १ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम


१) कुशल कामगार : १६,४५०/- + ३७२/- = १६,८२२/-


२) अर्ध कुशल कामगार : १५,०२५/- + ३७२/- = १५,३९७/-


३) अकुशल कामगार : १४,०१०/- + ३७२/- = १४,३८२/-


        परिमंडळ २ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम (प्रती महिना)= एकूण किमान वेतन रक्कम


१) कुशल कामगार : १६,०४५/- + ३७२/- = १६,४१७/-


२) अर्ध कुशल कामगार : १४,६२०/- + ३७२/- = १४,९९२/-


३) अकुशल कामगार : १३,६०५/- + ३७२/- = १३,९७७/-


        परिमंडळ ३ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १५,२२५/- + ३७२/- = १५,५९७/-


२) अर्ध कुशल कामगार : १३,८०५/- + ३७२/- = १४,१७७/-


३) अकुशल कामगार : १२,७९५/- + ३७२/- = १३,१६७/-




 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शुभेच्छा

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राष्ट्रीय ग्राहक

दिनानिमित्त शुभेच्छा

 

            नागपूरदि. 23 : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

            ग्राहकहित जोपासण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, ग्राहक हाच कोणत्याही बाजारपेठेचा कणा असतोत्याचे हित हेच सर्वतोपरी असते. ग्राहकांच्या संरक्षणासाठी राज्य शासनासोबतच या क्षेत्रात कार्यरत सर्व अशासकीय संस्था आणि व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे आहे. तसेच एक विकसित राज्य आणि राष्ट्र उभारणीत जागरूक ग्राहकाचे महत्त्व सर्वात अधिक आहे.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संदेशात पुढे म्हटले आहे की, जागतिकीकरणामुळे आता संपूर्ण जगच बाजारपेठ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना निवडीची संधी प्राप्त झाली आहे. नव्या तंत्रज्ञानाचा फायदा जसा ग्राहकांना होत आहेतसेच या तंत्रज्ञानाचा वापर करून काही कुप्रवृत्तीच्या लोकांकडून ग्राहकांची फसवणूकही होत आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी राज्य शासनाचा ग्राहक संरक्षण विभाग सातत्याने सतर्क असून सक्रियपणे कार्यरत आहे. त्याला समाजातील विविध सामाजिक अशासकीय संस्थांचे मिळत असलेले बळही महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. 

            ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक चळवळीत सातत्याने कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि राज्यातील सर्व जनतेला शुभेच्छा.

000


आरोग्य योजना

 


Featured post

Lakshvedhi