Wednesday, 21 December 2022

अंधेरी येथे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन.

 अंधेरी येथे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन


          मुंबई, दि. 20 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांचे विद्यमाने दिनांक २४ डिसेंबर, २०२२ रोजी नित्यानंद शाळा, गरवारे कंपनीसमोर, सहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००६९ येथे सकाळी १०.०० ते संध्या. ४.०० या वेळेत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

          मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय/पदवीधर उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी वरील नमुद पत्यावर उपस्थित रहावे. असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांचे वतीने करण्यात येत आहे.

कोकण विभागातील जिल्ह्यात जैवविविधता प्रकल्पांचे नियोजन करावे..

 कोकण विभागातील जिल्ह्यात जैवविविधता प्रकल्पांचे नियोजन करावे.

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या सूचना.

          मुंबई, दि, 20 : कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील जैवविविधता वाढीस लागण्यासाठी प्रकल्प हाती घ्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त कोकण महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या


          मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोकण विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्या बैठकीत श्री.कल्याणकर यांनी सूचना दिल्या. या बैठकीस उपआयुक्त (नियोजन) संजय पाटील, उपआयुक्त (महसूल) मकरंद देशमुख, निवासी उप जिल्हाधिकारी मुंबई उपनगर विकास गजरे, विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांचे जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.


          श्री. कल्याणकर म्हणाले, विविध योजनांखाली प्राप्त तरतुदींचे सुयोग्य विनियोग होण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व अधिक सोयीसुविधा पुरविण्याबाबत काम करावे. सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विकास क्षेत्र निहाय सुक्षम नियोजन करावे. शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी स्वतंत्र चिन्हांकित निधीचा कल्पकतेने वापर करावा. यामध्ये जिल्ह्यातील जैवविविधता वाढीस लागण्यासाठी प्रकल्प हाती घ्यावे. कोकण विभागातील महसूल यंत्रणा बळकट करण्यासाठी त्यांना आवश्यक सुविधा तसेच क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यकतेप्रमाणे वाहने पुरविण्यासाठी कार्यवाही करावी.


000


     

सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो.

 सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो

हे आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे प्रतीक

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत विधानभवन येथे ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गाचा प्रारंभ


            नागपूर, दि. २० : विधिमंडळात विविध संसदीय आयुधांचा वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जातात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला समर्पक राज्यघटना दिली आहे. या राज्यघटनेनुसार देशाचा कारभार चालतो. आपली लोकशाही जगात आदर्शवत मानली जाते. देशातील अगदी सर्वसामान्य माणूससुद्धा सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो, हे आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे प्रतीक आहे, तसेच आपल्या लोकशाहीचे हे खूप सुंदर रुप आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            राज्यातील विविध विद्यापीठांच्या राज्यशास्र व लोकप्रशासन विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेमार्फत ‘संसदीय कार्यप्रणाली व प्रथा’ या विषयावर आयोजित ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गाचे आज विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार तथा राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे खजिनदार ॲड. आशिष शेलार, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत व इतर मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राष्ट्रकुल संसदीय मंडळाची परंपरा आणि त्यांचा इतिहास मोठा आहे. या मंडळामार्फत राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या अभ्यासवर्गाचा उपक्रम चांगला आहे. या अभ्यासक्रमात सहभागी झालेले अनेक विद्यार्थी पुढे विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदावर विराजमान झाले. या अभ्यासवर्गाचे विद्यार्थी राहिलेले विधीमंडळ सदस्य दिलीप वळसे- पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळविले. आता या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनीही जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करुन भविष्यात विविध क्षेत्रात यश मिळवावे, यासाठी हा अभ्यासवर्ग निश्चितच उपयोगी ठरेल. संसदीय लोकशाही अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने असे अभ्यासवर्ग निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतात, असे त्यांनी यावेळी सांगितले.


            मुख्यमंत्री म्हणाले की, विधिमंडळ हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. विधिमंडळात विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडली जाते. विधीमंडळातील कायदे हे सर्वसामान्यांच्या हिताचे असतात. आपल्या लोकशाहीने सर्वसामान्यांचे हीत समोर ठेवून केलेली संसदीय रचना ही जगात आदर्शवत आहे.


मेस्सीसारखे खेळाडू एका दिवसात घडत नाहीत


            नुकत्याच झालेल्या फुटबॉल विश्वचषक सामन्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अर्जेंटिना देश फुटबॉल विश्वचषकामध्ये जगज्जेता ठरला. या संघाच्या लियोनेल मेस्सीने खूप कमालीची कामगिरी केली. मेस्सी आता तरुणाईचा आदर्श झाला आहे. पण मेस्सीसारखे खेळाडू एका दिवसात तयार होत नाहीत. खूप जिद्द आणि चिकाटीने ते मेहनत करतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेणेही महत्वाचे ठरते. आजच्या तरुणांनीही अशाच पद्धतीने आदर्श ठेवून विविध क्षेत्रात आपले योगदान द्यावे, यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.      


संवाद, चर्चा, वादविवाद हे लोकशाहीचे वैशिष्ट्य – अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर


            विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, संवाद, चर्चा, वादविवाद हे आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य असले तरी सर्वांच्या एकत्रित सहभागातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय विधिमंडळात होतात. भूमिकेवर ठाम राहून सर्व पक्षाचे सदस्य विधिमंडळात जनहितासाठी काम करीत असतात. आपल्या संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्ष जितका महत्वाचा तितकाच विरोधी पक्षही महत्वाचा आहे. महाराष्ट्राचे विधिमंडळ हे देशातील प्रमुख कायदेमंडळ म्हणून नावाजले जाते. आपल्या विधिमंडळाला मोठा इतिहास असून आपली संसदीय लोकशाही आदर्शवत आहे, असे ते म्हणाले.


            श्री. नार्वेकर म्हणाले की, संसदीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत राबविण्यात येत असलेला अभ्यासवर्गाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. ज्याप्रमाणे शास्त्र शाखेचे विद्यार्थी प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक करतात तशाच प्रकारे राज्यशास्त्र आणि लोकप्रशासनच्या विद्यार्थ्यांना विधिमंडळ कामकाजाचे प्रात्यक्षिक करण्याची संधी या अभ्यासवर्गातून मिळते. हा अभ्यासवर्ग म्हणजे एक प्रकारे संसदीय लोकशाही प्रणालीची प्रयोगशाळाच आहे. सक्षम आणि ध्येयवादी नागरिक घडविण्यासाठी याचा उपयोग होईल. या अभ्यासवर्गाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.       


विधिमंडळ, संसद ही सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षांची प्रतिबिंबे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकशाहीची रचना फार सुंदर केली आहे. विधिमंडळे किंवा संसद सभागृहे ही सर्वसामान्य माणसाच्या आशा आकांक्षांची प्रतिबिंबे आहेत. लोकशाहीतील सर्व संस्थांचा एकमेकांवर अंकुश आहे. चेक अँड बॅलन्स पद्धती असलेली आपली लोकशाही जगातील आदर्श लोकशाही आहे. कार्यकारी मंडळावर विधिमंडळाचा अंकुश असतो. विधिमंडळ कामकाजात सरकारला विरोधी पक्षासह सत्तारूढ पक्षातील सदस्यही प्रश्न विचारतात. एक प्रकारे आपल्या संविधानाने सरकारला विधिमंडळासाठी उत्तरदायी ठरविले आहे, असे ते म्हणाले.


            विधिमंडळाच्या मान्यतेशिवाय सरकारला एक पैसाही खर्च करता येत नाही. लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न अशा विविध संसदीय आयुधांचा वापर करून विधिमंडळाचे सदस्य सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतात. लोकशाहीच्या आणि विधिमंडळाच्या अशा रचनेमुळे शेवटच्या माणसाचे प्रश्नही या सभागृहापर्यंत पोहोचतात. कामकाज करताना सभागृहात अनेक वेळा गोंधळ होत असला तरी नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ कामकाज केले जाते. कधी कधी रात्री बारा वाजेपर्यंत कामकाज करून दुसऱ्या दिवशी परत सकाळी नऊ वाजता कामकाजाला सुरुवात केली जाते, असेही त्यांनी सांगितले.


            आपल्या लोकशाहीशी विद्यार्थ्यांचा निकटचा परिचय व्हावा, लोकशाही मूल्यांचा अभ्यास व्हावा यासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या अभ्यासवर्गाची खूप चांगली परंपरा आहे. या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती होईल. आपली लोकशाही समजून घेता येईल व त्यांच्या माध्यमातून आपल्या लोकशाहीचे स्वरूप लोकांपर्यंत पोहोचेल. सर्वसामान्यांचा लोकशाहीवरचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.


            आमदार ॲड. आशिष शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन विधिमंडळाचे अवर सचिव सुनिल झोरे यांनी केले.


००००




 


वृत्त क्र. २१


विधानसभा प्रश्नोत्तरे :

मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध

 मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लवकरच उच्चस्तरीय बैठक बोलविणार.

            नागपूर, दि. २० :- मुंबईकरांना दर्जेदार आणि अद्ययावत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. लवकरच या संदर्भात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य ॲड. आशिष शेलार आणि अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुंबईतील कांदिवली (पश्चिम) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील अद्ययावत सोयी सुविधांविषयी प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले, “मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. रुग्णांना औषधे वेळेत मिळतील याची दक्षता घेण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत. पाच हजार स्वच्छता दूत, याप्रमाणेच साडेपाच हजार आशा कार्यकर्ती नव्याने नियुक्त करण्यात येतील. त्यामुळे आरोग्य सुविधा सुरळीत होण्यास मदत होईल”.


            मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह, पदभरती, आरोग्य तपासणीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीसह विविध प्रश्न सोडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात येईल.


            मुंबईतील गोवर आजाराची साथ रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाचा आरोग्य विभाग युद्ध पातळीवर काम करीत आहे. आता गोवरची रुग्ण संख्या नियंत्रणात आली आहे. गोवर रोखण्यासाठी लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या लसीकरण अभियानास नागरिकांनी सहकार्य करावे, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करून पुढाकार घ्यावा, असेही आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

संसदीय अभ्यासवर्गात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,

 संसदीय अभ्यासवर्गात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,

 विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात यांचे उद्या मार्गदर्शन

 

            नागपूरदि. 20 : राष्ट्रकुल संसदीय मंडळमहाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8.30 वा. विधानपरिषद सभागृह, विधानभवन, नागपूर येथे विधिमंडळात विधेयकांचे महत्त्व व कार्यपद्धती तसेच विधिमंडळाचे विशेषाधिकार’ या विषयावर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सकाळी 9.30 वा. विविध संसदीय आयुधेविधिमंडळाची समिती पद्धती व अर्थविषयक समित्यांचे कामकाज’ या विषयावर विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात मार्गदर्शन करणार आहेत.

            भारतातील संसदीय लोकशाही कशा पद्धतीने कार्यरत आहेकार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशाप्रकारे नियंत्रण ठेवले जातेत्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा  वापर केला जातोअर्थसंकल्पीय प्रक्रियाविधिमंडळाची समिती पद्धतीकायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनद्वारे विद्यार्थ्यांना या व्याख्यानातून मिळत असते.

सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ

 सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भात तात्काळ बैठक घेऊआवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार

- विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            नागपूर दि. २०: स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेण्यात येईल आणि या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाडा येथे करण्याबाबत राज्य शासन गंभीर आहे. लवकरच त्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


०००००

जिंदगी गुलजार हैं

 Life is the best school .

Hardship Is our Best Teacher. 

Problem is the best assignment. 

&  Failure is the best revision. 


Have a nice day...


Good Morning 🌄🌻: *🙏🙏☀️🙏🙏👉. . "शांततापूर्ण आयुष्याचे दोन नियम आहेत.अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचू द्यायचे नाही, आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही."*

*💐 शुभ सकाळ 💐*

Featured post

Lakshvedhi