थळ चालमळा गावात
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 20 December 2022
Monday, 19 December 2022
फारच महत्त्वाचा संदेश* - कृपया काळजीपूर्वक वाचा, लक्षात ठेवा आणि पुढे पाठवा
🙏🏻 *फारच महत्त्वाचा संदेश* - कृपया काळजीपूर्वक वाचा, लक्षात ठेवा आणि पुढे पाठवा...🙏🏻
🔔 *उच्च धोक्याचा इशारा* 🔔
सर्व बंधू आणि भगिनींनो, कृपया तुमच्या सर्व नातेवाईक तसेच आप्तेष्टांना हा संदेश पाठवा.
डॉ. अंजली माथूर,- चेअरमन आणि सी.एम.अो., इंडो अमेरिकन हॉस्पीटल (IAH), साऊथ डाकोटा (United states)...
हा संदेश भारतातील डॉक्टरांच्या ग्रुपतर्फे लोककल्याणार्थ प्रसारित केला जातआहे.
१) *अॅप्पी फिझ (APPY FIZZ - हे कृत्रिम सफरचंदापासून बनवलेले एक पेय आहे.) हे पेय कृपया कोणीही पिऊ नका कारण यात कॅन्सरचे विषाणू असतात*
२) *कोक अथवा पेप्सी घेतल्यानंतर मेन्टास (mentos) गोळ्या कधीही खाऊ नये. असे केल्याने पोटामध्ये सायनाइड सारखे विषारी रासायनिक मिश्रण तयार होते व खाणारी व्यक्ती त्वरित मरते....*
३) *कुरकुरे कुणीही खाऊ नका कारण यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर केलेला असतो. खरे वाटत नसल्यास हे कुरकुरे जाळा व वितळलेले प्लास्टिक स्वत: पहा.!*
४) *पुढील धोकादायक गोळ्या घेण्याचे नक्की टाळा* -
**D-Cold,*
**Vicks Action - 500,*
**Actified,*
**Coldarin*
**Cosome*
**Nice*
**Nimulid*
**Cetrizet - D*
*कारण यांमध्ये फीनाइल प्रोपॅनाॅल अमाईड ( Phenyl Propanol Amide - PPA) नावाचे रसायन असते जे, शरीरावर सरळ हल्ला करते. अमेरिकेत (in USA) या रसायनास प्रतिबंध केलेला आहे !*
कृपया, हा मेसेज डिलीट करण्यापूर्वी तुमच्या सर्व मित्र व आप्तेष्टांना नक्की पाठवा व सहकार्य करा...!
*हा मेसेज कदाचित कुणाला तरी मदत करू शकतो म्हणून शक्य तितका फॉरवर्ड करा.*
*आणखी काही महत्त्वाचे*:
*इंडो अमेरिकन हॉस्पीटलच्या (INDO AMERICAN HISPITAL) डॉक्टरांना मानवी शरीरात सिल्वर नायट्रो ऑक्साइड मुळे होणारा नवीन कॅन्सर सापडला आहे. म्हणजेच ज्या वेळेस तुम्ही बाजारातील मोबाइल अथवा कोणतेही रिचार्ज कार्ड नखांनी स्क्रॅच करतात तेव्हा त्यावर असलेल्या सिल्वर नायट्रो ऑक्साइडचा शरीरात प्रवेश होऊन या कॅन्सरचा धोका संभवतो. हा त्वचेला होनारा अथवा त्वचेचा कॅन्सर आहे. त्यामुळे कोणतेही कार्ड नखांनी स्क्रॅच करू नये.* तुमच्या प्रियजनांसोबत ही माहिती नक्की शेअर करा.
👉🏻 आरोग्यासंबंधीत काही महत्त्वाच्या सूचना :-
» *फोन नेहमी डाव्या कानाला लावूनच त्यावर बोलावे.*
» *थंड पाण्यासोबत कोणतीही गोळी अथवा औषध घेऊ नये....*
» *सायंकाळी पाच वाजेनंतर जड अथवा स्थूल जेवण करू नये*.
» *रात्रीपेक्षा सकाळी उठल्यावर जास्तीत जास्त पाणी प्यावे*
» *झोपण्याची आदर्श वेळ ही रात्री दहा ते पहाटे चार पर्यंतची असते.*
» *कोणतेही अौषध घेतल्यानंतर अथवा जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये*
» *ज्या वेळेस फोनची बॅटरी ही खूपच कमी झालेली असते त्यावेळेस फोनवर बोलणे टाळा. कारण त्यावेळेस रेडिएशनचा धोका हजारपट वाढलेला असतो.*
तुमच्या आप्तेष्टांना तुम्ही हा मेसेज फॉरवर्ड करू शकता का ?
मी तर केलेला आहे! कारण, प्रेमभावनेची कोणतीही किंमत नसते !
परंतु.....
*ज्ञान हीच शक्ती होय* ✊
*इतर आवश्यक गोष्टी*:-
यू.एस.ए. केमिकल रिसर्च सेंटर सर्च (U.S.A. CHEMICAL RESEARCH CENTER) यांनी पुढीलप्रमाणे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत:
*प्लास्टिकच्या कपात कृपया चहा पिऊ नका तसेच कोणत्याही पॉलीथीन पेपरवर जेवण करू नका. कारण त्याच्याने शरीरातील उष्णता वाढते व ५२ प्रकारच्या कॅन्सरला आमंत्रण मिळते.*
*तरी कृपया पुन्हा एकदा विनंती की, कृपया हा मेसेज शक्य तितका फॉरवर्ड करा*
विधिमंडळ अधिवेशन : माध्यम कक्षाचे उद्घाटन
विधिमंडळ अधिवेशन : माध्यम कक्षाचे उद्घाटन
श्रीमती जयश्री भोज यांचा पत्रकारांशी संवाद.
नागपूर, दि. १९ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सिव्हील लाईन्स येथील 'सुयोग' निवासस्थानी उभारण्यात आलेल्या माध्यम कक्षाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीमती भोज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असून शासनाच्या विविध योजना, निर्णय यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये माध्यमांचे योगदान मोलाचे आहे. पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत सहकार्य करण्यात येईल”, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी इतर विविध मुद्यांच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली.
माध्यम कक्षामध्ये पत्रकारांसाठी संगणक, वायफाय सुविधेसह इतर सर्व आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर संचालक कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या ठिकाणी पत्रकारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महासंचालक श्रीमती भोज यांनी यावेळी या सोयी-सुविधांची पाहणी केली. त्याचबरोबर आरोग्य कक्षाची पाहणी केली. या सोयी-सुविधांबाबत पत्रकारांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी संचालक (प्रशासन) तथा नागपूर विभागीय संचालक हेमराज बागुल, संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहुल तिडके, उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, नागपूर शिबिर प्रमुख विवेक भावसार, सह शिबिर प्रमुख प्रवीण पुरो, महेश पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र बारई यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0000
विधिमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी'महाअसेंब्ली ॲप' उपलब्ध.
विधिमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी'महाअसेंब्ली ॲप' उपलब्ध.
मुंबई, दि. १९ : विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन माहिती, बैठका, विविध योजना आदींची माहिती देणारे ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत तर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत दिली.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी हे ॲप (MH Assembly) तयार केले असून विधिमंडळ कामकाजाबाबत माहिती मिळण्यासाठी सर्व सदस्यांनी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन अध्यक्ष ॲड. नार्वेकर आणि उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.
***
सीमावासियांच्या पाठिशी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे
सीमावासियांच्या पाठिशी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर, दि. १९ : सीमावासियांच्या पाठिशी सर्वपक्षीयांनी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केलेल्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, मराठी माणूस आणि मराठीच्या अस्मितेशी निगडीत या विषयावर केंद्राने गांभीर्याने दखल घेऊन बैठक बोलविली. या बैठकीत राज्याने ठोस भूमिका घेतली.
केंद्रीय गृहमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत सीमेवर राज्यातील गाड्या अडविल्या जातात, ही बाब लोकशाहीला धरून नाही, ही माहिती दिली. कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारची घटना होऊ नये. हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या विषयावर सामंजस्याची भूमिका घ्यावी. कर्नाटकचे मुख्यमंत्री अणि गृहमंत्री यांच्या उपस्थितीत केंद्राने भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
सीमावासियांसाठी शासन सकारात्मक असून काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 48 गावांसाठी दोन हजार कोटींची सिंचन योजना मंजूर केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहाला दिली.
***
49 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे
49 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
नागपूर, दि. 19 :राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता विधानपरिषद सभागृह, विधानभवन, नागपूर येथे उद्घाटन होणार आहे.
भारतातील संसदीय लोकशाही कशा पध्दतीने कार्यरत आहे, कार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशाप्रकारे नियंत्रण ठेवले जाते, त्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा वापर केला जातो, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, विधिमंडळाची समिती पद्धती, कायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनद्वारे विद्यार्थ्यांना मिळत असते.
या उद्घाटन समारंभास विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेचे सह-अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचे खजिनदार ॲड. आशिष शेलार, राज्यातील 12 विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित राहणार आहेत.
49 वा संसदीय अभ्यासवर्ग 20 ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीत विधानभवन, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासवर्गात विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
बुधवार दि.21 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘विधिमंडळात विधेयकांचे महत्त्व व कार्यपद्धती तसेच विधिमंडळाचे विशेषाधिकार’ या विषयावर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. ‘विविध संसदीय आयुधे, विधिमंडळाची समिती पद्धती व अर्थविषयक समित्यांचे कामकाज’ या विषयावर विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात मार्गदर्शन करणार आहेत.
गुरुवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘लोकप्रतिनिधी स्वत:च्या मतदारसंघाविषयी कर्तव्ये आणि विकासकामांचे नियोजन’ या विषयावर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. ‘संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धवासाठी युवक चळवळीचे योगदान’ या विषयावर विधानसभा सदस्य कु. प्रणिती शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्रवार, दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या विषयावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. ‘आदर्श लोकप्रतिनिधी : अपेक्षा आणि वास्तव व संसदीय लोकशाहीत लोकशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मार्गदर्शन करणार आहेत.
शनिवार, दि.24 डिसेंबर रोजी चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्र, जि.चंद्रपूर येथे अभ्यास भेट आयोजित करण्यात आली आहे.
रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. ‘कार्यपालिका व न्यायपालिका यांच्यातील परस्पर संबंध’ याविषयावर विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 11 वा. ‘भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचना, कार्यपद्धती व कायदा तयार करण्याची प्रक्रिया’ या विषयावर विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले हे मार्गदर्शन करणार आहेत.
सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर दै.सकाळ, नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे मार्गदर्शन करणार आहेत तर सकाळी 9.30 वा. ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि विधिमंडळातील भूमिका’ या विषयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.
मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘अर्थसंकल्पाची प्रक्रिया : कल्याणकारी राज्यनिर्मितीचे महत्त्वपूर्ण साधन’ या विषयावर उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत तर सकाळी 9.30 वा. ‘विधिमंडळ : जनतेच्या इच्छा आकांक्षांच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ’ या विषयावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळी 10.35 वा. पीठासीन अधिकारी व मान्यवरांच्या शुभहस्ते सहभागी विद्यार्थी, प्राध्यापकांना प्रशस्तीपत्रांचे वितरण व अभ्यासवर्गाचा समारोप होणार आहे.
या अभ्यासवर्गाचे प्रसारण महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल
यू ट्यूब- https://www.youtube.co/
फेसबुक https://www.facebook.com/
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
००००
नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही
नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही.
नागपूर, दि. १९ : नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही अशी ग्वाही देतानाच सुरजागड स्टील प्रकल्पामुळे सुमारे सहा हजार जणांना रोजगार मिळाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांना मिळालेल्या धमकीबाबत बोलताना त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य श्री. आत्राम यांना मिळालेल्या धमकीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य दिलीप वळसे पाटील, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी मुद्दा उपस्थित केला होता.
यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड स्टील प्रकल्पामुळे या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे सहा हजार जणांना रोजगार मिळाला असून कोनसरी येथील प्रकल्प उभारल्यानंतर दहा हजार जणांना रोजगार मिळेल. विधानसभा सदस्य श्री. आत्राम यांच्या सुरक्षेत कुठलीही कमतरता राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
०००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
