Monday, 19 December 2022

अल्पसंख्याक विकास विभागाच्‍या पुस्तिकेचे

 अल्पसंख्याक विकास विभागाच्‍या पुस्तिकेचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

            नागपूर, दि. 18 : केंद्र व राज्य शासनाच्यावतीने अल्पसंख्याक समुदायासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा एकत्रित समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन आज अल्पसंख्याक हक्क दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. रामगिरी येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती.


            यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

वनविभागाचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय

 वनविभागाचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरण

            नागपूर, दि. 18 : वन्यजीव आणि वनसंपदेचे जतन व संवर्धनाचे कार्य वनविभाग करतो. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल वॅार्मिंगच्या काळात वनविभागाचे हे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या कार्याचा गौरव आज येथे केला.


            डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात वनविभागाच्या ‘वन भवन­­’ या इमारत उद्घाटन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम आणि उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.


             कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोक्कड्डे, आमदार सर्वश्री आशिष जयस्वाल, देवराव होळी, माजी खासदार पद्मश्री विकास महात्मे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी व वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख वाय.एल.पी. राव आदी अधिकारी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री पुढे म्हणाले, देशात नागपूरच्या ‘झिरो माईल’चे विशेष महत्व असून त्याच्या बाजूला वनभवनाची इमारत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाके असतात. ही दोन्ही चाके सुरळीतपणे चालल्यास विकास शक्य आहे. मुंबई, ठाणे या भागात अर्बन फॅारेस्ट ही संकल्पना पुढे येत आहे. त्यामुळे प्राणवायू वाढण्यास नक्कीच मदत होईल. कोविडमध्ये प्राणवायूचे महत्व सर्वांनाच कळले आहे. मा. प्रधानमंत्र्याच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आलेल्या समृध्दी महामार्गावर छोटी - मोठी मिळून जवळपास 35 लक्ष झाडे लावण्याचे नियोजन आहे.


            वन्यजीवांना धोका होऊ नये म्हणून या महामार्गावर 100 अंडरपास व ओव्हरपास तयार करण्यात आले आहे. त्यासाठी 350 कोटी रुपये अतिरिक्त खर्च केले आहे.


वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा पर्यावरणप्रेमी, संवेदनशील आणि आत्मियतेने काम करणारा दूरदृष्टीचा नेता मंत्रीमंडळात आपला सहकारी आहे. वन विभागात त्यांनी अतिशय तळमळीने काम केल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            वनभवन समाधान भवन व्हावे ही अपेक्षा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार


वन आणि जीवन यांचा शब्दश: संबंध आहे. वन असेल तेथेच जीवन आहे. देशाच्या हृदयस्थानी असलेल्या ‘झिरो माईल’ येथे वनभवन उभारण्यात आले आहे. या इमारतीमध्ये 14 क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज होणार असून वनभवन हे सेवाभवन व्हावे, अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.


ते पुढे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरात आले असता वनविभागाच्या पहिल्याच कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लाभली. हे आमचे सौभाग्य आहे. जगातील 193 देशांपैकी 14 देशात वाघ आहेत. त्यातील 65 टक्के वाघ भारतात आढळतात. आणि विशेष म्हणजे देशात नागपूर ही टायगर कॅपिटल म्हणून ओळखली जाते. वनभवन ही इमारत जी प्लस फोर आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून यावर्षी भारताला जी - 20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून या परिषदेमध्ये पर्यावरण हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे नागपूर येथील जी-4 या वनभवनाच्या इमारतीमधून जी-20 ला देशाच्या पर्यावरणाविषयी योग्य माहिती मिळणार असल्याचे वनमंत्री म्हणाले. 


            आई आणि वनराईची सेवा ही मौल्यवान आहे. पृथ्वीच्या 456 कोटी वर्षाच्या इतिहासात अलिकडच्या 100 वर्षात सर्वाधिक उष्णता वाढली आहे. प्रदुषणामुळे मृत्युच्या संख्येत 300 टक्के वाढ झाली असून आपल्या आरोग्याची चिंता करतांना आपल्याला पृथ्वी आणि पर्यावरणाच्या आरोग्याचीसुध्दा चिंता करावी लागणार आहे. मुख्यमंत्री वने, आणि पर्यावरण याबाबत अतिशय संवेदनशील आहेत. जगात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 36 व्या क्रमांकावर आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कामात महाराष्ट्र पहिल्या 10 क्रमांकात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज पुरस्कार मिळाले, त्यांनी यापेक्षाही उत्तम कार्य करावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


            यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वनरक्षक रामदास खोत, प्रफुल फरतोडे, व्ही.व्ही. हलगे यांच्यासह पाच जणांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आले.


            दीप प्रज्वलन व वृक्ष पुजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. प्रास्ताविक वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार नागपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी मानले.


00000


 



महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे हिवाळी अधिवेशन : नागपूर

 महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे हिवाळी अधिवेशन : नागपूर

प्रस्तावित विधेयके :- 23 (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त - 12,मंत्रीमंडळ मान्यता सापेक्ष-11)

पटलावरती ठेवावयाचे अध्यादेश -5

 (1) विधानसभा विधेयक -  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (तिसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर) (जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या वाढविणेबाबत) (ग्रामविकास विभाग),

 (2) विधानसभा विधेयक - महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) सुधारणा विधेयक, 2022 ( सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 11 चे रूपांतर) (शेतकऱ्यांना निवडणूकीत उभे राहता येण्याकरिता नियमात सुधारणा) (कृषी विभाग).

 (3) सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक. मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 12 चे रूपांतर) (इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मुल्यात सुधारणा करणेबाबत) (नगर विकास विभाग).

  (4) विधानसभा विधेयक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठकवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022, (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर) (विद्यापीठांचे कुलगूरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगूरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

 (5) विधानसभा विधेयक-  जे.एस.पी.एम. युनिव्हसिर्टी विधेयक, 2022 ( नवीन स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याबाबत) (उच्च व तंत्रशिक्षण विभाग).

 (6) महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र सिनेमा ( विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2022 ( शिक्षेची तरतूद कमी करण्याबाबत) (गृह विभाग).

 (7) विधानसभा विधेयक - महाराष्ट्र औद्योगिक संबंधमहाराष्ट्र कामगार कल्याण निधीमहाराष्ट्र माथाडीहमाल व इतर श्रमजीवी कामे (नोकरीचे नियमन व कल्याण)महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि महाराष्ट्र कागारांचा किमान घरभाडे भत्ता (सुधारणा) विधेयक, 2022 (मुख्य अधिनियमातील तुरंगवासाच्या तरतुदीऐवजी दंडाची तरतूद वाढविण्याकरिता) (उद्योगऊर्जा व कामगार).

 (8) विधानपरिषद विधेयक - युनिवर्सल ए. आय. विद्यापीठपुणे विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).

 (9) विधानपरिषद विधेयक -  पिंपरी चिंचवड विद्यापीठपुणे विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).

 (10) विधानसभा विधेयक - महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग).

 (11) विधानसभा विधेयक - उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे(सुधारणा) विधेयक, 2022 (नगर विकास विभाग)

 (12) विधानसभा विधेयक - महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2022 (वित्त विभाग).

पटलावर ठेवायचे अध्यादेश

 (1) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (तिसरी सुधारणा) अध्यादेश, 2022 (ग्रामविकास विभाग)

 (2) महाराष्ट्र आकस्मिकता निधी (सुधारणा) अध्यादेश, 2022 (आकस्मिकता निधीमध्ये तात्पुरती वाढ करणेबाबत) (वित्त विभाग)

 (3) महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) सुधारणा अध्यादेश, 2022 ( शेतकन्यांना निवडणूकीत उभे राहता येण्याकरिता नियमात सुधारणा) (कृषी विभाग).

 (4) मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) अध्यादेश, 2022 ( इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मुल्यात सुधारणा करणेबाबत) (नगर विकास विभाग).

(5) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठकवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, 2022 ( विद्यापीठांचे कुलगूरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगूरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).

00000

महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार

 महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार

 

·         अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         पारदर्शकभ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल

·         विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

 

            नागपूरदि. 18 : महाराष्ट्राचा लोकायुक्त कायदा झाला पाहिजे असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सांगत होते. अण्णा हजारे समितीने दिलेला रिपोर्ट शासनाने स्वीकारला असून नवीन लोकायुक्त कायदा तयार करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 मान्यतेसाठी मांडण्यात येईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला देखील लोकायुक्तच्या कक्षेत आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहेअसे त्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी आज ही पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटीलसुधीर मुनगंटीवारगिरीश महाजनसंजय राठोडशंभूराज देसाईविजयकुमार गावीततानाजी सावंतसुरेश खाडेअतुल सावेरवींद्र चव्हाण उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीआमचे सरकार लोकाभिमुख सरकार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची जी मागणी होती ती आता प्रत्यक्षात येत आहे. सरकार पूर्णपणे पारदर्शकतेने कामकाज करेल. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही कामकाज करूअसे त्यांनी सांगितले.

आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मोठी मदत

            मुख्यमंत्री म्हणाले कीआपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली आहे. यासाठी 9 हजार कोटी रुपयांची मदत मान्य करण्यात आली असून आतापर्यंत 4 हजार 800 कोटी रुपयांचे मदतीचे वितरण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या निकषांमध्येही बदल करून मदत करण्यात येत आहे. कर्जमाफीच्या प्रोत्साहन अनुदानासाठी आमच्या सरकारने 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार 500 कोटी रुपये जमा केले आहेत. जलसिंचन क्षेत्रांमध्ये वाढ व्हावी यासाठी आतापर्यंत 18 प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. यामधून 2 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून यासाठी साधारण 18 हजार कोटी रुपयांस मान्यता देण्यात आली आहे.

विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक कार्य

            मुख्यमंत्री म्हणाले कीविदर्भ आणि नागपूरशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची मागे संधी मिळाली. या माध्यमातून या भागात काम करता आले. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सरकार व्यापक कार्य करेल.

            यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आत्ताच माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले आहे. याद्वारे चांगली सुरुवात झाली आहे. विदर्भातील सर्व प्रकल्पप्रश्न मार्गी लावले जातील. सरकार पूर्णपणे जनतेच्या मागे आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतअसे त्यांनी सांगितले.

जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणास मान्यता

            मुख्यमंत्री म्हणाले कीमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली आहे. हा प्रश्न फार गांभीर्याने घेण्यात आला आहे. सीमा भागातील नागरिकांसाठी असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या योजनासुविधा मागील काळात बंद करण्यात आल्या होत्यात्या सुविधायोजना आमच्या शासनाने पुन्हा सुरू केल्या आहेत. जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी साधारण 2 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेतून कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील 48 गावांना पिण्याचे पाणी तसेच सिंचनाचे पाणी मिळू शकणार आहे. त्या भागातील दुष्काळ दूर होण्यास या विस्तारित प्रकल्पाची मोठी मदत होईलअसे मुख्यमंत्री म्हणाले.

            आमच्या शासनाने सगळे सणउत्सव आनंदात साजरे करण्यासाठी प्रोत्साहन दिले. दिवाळीच्या काळात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. फक्त शंभर रुपयांमध्ये गोरगरिबांना दिवाळी साजरी करता आली. यासाठी आनंदाचा शिधा योजनेतील अन्नधान्याचे 96 टक्के लोकांना वितरण झालेअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला मान्यता देण्यात आली आहेअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घोषीत केले.

पारदर्शक कारभारभ्रष्टाचारमुक्तीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीशासनाचे संपूर्ण कामकाज अत्यंत पारदर्शक व्हावे आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त कायद्यास मान्यता देण्यात आली. चालू हिवाळी अधिवेशनातच यासाठीचे विधेयक मांडण्यात येईल. या विधेयकासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समितीने दिलेला रिपोर्ट जसाच्या तसा स्वीकारण्यात आला. हा कायदा भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरेलअसे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            विदर्भाच्या अनुशेषासंदर्भातील सगळे आकडे लवकरच विधिमंडळात मानण्यात येतील. विदर्भातील जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीचा निधी मध्यंतरी कमी करण्यात आला होतातो वाढविण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री म्हणाले.

            कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्रातील जत तालुक्यातील 77 गावांना आम्ही 2016 साली पाणी पोहोचवले होते. उर्वरित गावांनाही पाहणी पोहोचवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. शिष्यवृत्तीसाठी पुढची मागणीही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती देण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री म्हणाले.

            विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठवाडाविदर्भाबरोबरच राज्यातील मागास भागातल्या विविध प्रश्नांवर जास्तीत जास्त चर्चा होईल. विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय मिळवून देण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री म्हणाले.

0000

भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे.*

 आपल्या सर्वांचे अभिनंदन.  आपले राष्ट्रगीत *"जन गण मन..."* हे युनेस्कोने *"जगातील सर्वोत्कृष्ट 2022"* म्हणून घोषित केले आहे.  काही मिनिटांपूर्वीच.


 कृपया हे शेअर करा

 *भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे.*


 🇮🇳👏


 आपल्या राष्ट्रगीताचा अर्थ...


 🎵जन = लोक

 🎵गण = गट

 🎵मन = मन

 🎵अधिनायक = नेता

 🎵जय हे= विजय

 🎵भारत = भारत

 🎵भाग्य = भाग्य

 🎵विधाता = निपटारा करणारा

 🎵पंजाब= पंजाब

 🎵सिंधू = सिंधू

 🎵गुजरात = गुजरात

 🎵मराठा = मराठी महाराष्ट्र

 🎵द्राविड = दक्षिण

 🎵उत्कल= ओरिसा

 🎵बंगा = बंगाल

 🎵विंध्य = विंध्य

 🎵हिमाचल = हिमालय

 🎵यमुना = यमुना

 🎵गंगा = गंगा

 🎵उच्छल= हालचाल

 🎵जलधी = महासागर

 🎵तरंगा = लाटा

 🎵तव= तुमचा

 🎵शुभ = शुभ

 🎵नामे= नाव

 🎵जागे = जागे व्हा

 🎵तव= तुमचा

 🎵शुभ= शुभ

 🎵आशिष= आशीर्वाद

 🎵मागे = विचारा

 🎵गाहे = गा

 🎵तव= तुमचा

 🎵जय= विजय

 🎵गाथा = गाणे

 🎵जन = लोक

 🎵गण = गट

 🎵मंगल= भाग्य

 🎵दायक = देणारा

 🎵जय हे= विजय असो

 🎵भारत = भारत

 🎵भाग्य = भाग्य

 🎵विधाता = दवाखाना


 💐जय हे, जय हे जय हे, जय जय जय जय हे = विजय, विजय, विजय C6, कायमचा विजय...

 जा


 *कृपया शेअर करा आणि सर्व लोकांना आमच्या राष्ट्रगीताचा अर्थ कळू द्या...*

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

आरे संसार संसार

 "... मम्मी, तू आणि बाबांनी खूप अडचणी असताना त्या काळात लग्न केलंत...

 गेली *छत्तीस वर्षं* संसार केलात...

आमच्या पिढीला का गं जमत नाही  हे ?


*" तिशीची लेक हातातला फोन टेबलवर आपटत म्हणाली*. 


चार वर्षं मज्जेत *बॉयफ्रेन्ड* असलेल्याचा आठ महिन्यापुर्वी *हजबन्ड* झाल्यानंतरचा हा राग होता.


*"प्रश्न विचारलास, का ?


पंचावन्नची आई त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली; 


" *उत्तर हवंय*, का   ?

'हो 


"उत्तर हवंय", लेक म्हणाली. 


"असे आहे न बाळा," आई सहजच म्हणाली;


"आम्ही *'कसं जमवता येईल'* ते शोधत होतो; 

तुम्ही *'जमलं तर पाहू'* म्हणताय.


"आमच्या वेळी प्रेम हे *व्हायचं*; तुमच्या काळात ते *केलं* जातं.


"आम्ही *साथीदार* व्हायचो; तुम्ही *पार्टनर* बनवता. 


"आमच्यात प्रेम ही *सहजता* होती; तुमच्यात तो *अट्टहास* झालाय.


"आमचं प्रेम *लहानाचं मोठं* व्हायचं; तुमचं प्रेम *लहानपणीच घाई* करतं. 


"आमच्या वेळी *मैत्री विश्वासात* रुपांतरीत व्हायची; तुम्ही *जवळिकीला रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई* करताय.


"आम्ही कविता *लिहायचो*; तुम्ही त्या *फॉरवर्ड* करताय. 


"आमचे *जीवनसाथी* होते; तुमचे *बॉयफ्रेन्ड* नि *गर्लफ्रेन्ड* आहेत.


"आमचं प्रेम *आमच्यासाठी* होतं; तुमचं प्रेम *'सगळ्या फ्रेन्ड्सचा बॉयफ्रेन्ड आहे, मग माझाही असलाच पाहीजे',* म्हणून केलं जातंय. 


"आमचे *बॉयफ्रेन्ड नव्हते; कारण जो आहे तो फ्रेन्ड असण्याच्या खूप पुढे गेलाय, हे आम्हाला स्पष्ट* जाणवायचं. तुमच्यात *इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहीजे तसा बॉयफ्रेन्डही असलाच पाहीजे*, 


"आम्ही *गिफ्ट नव्हे तर स्वत:लाच समर्पित* करायचो; तुमच्या *गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल* याची *कैलक्युलेशन्स* असतात. 


"आम्ही *धुंद* होतो; तुम्ही *उधळलेले* आहात. 


"आम्ही *चेहऱ्यावरचं तेज* शोधायचो; तुम्ही *शर्टचा ब्रान्ड* पाहताय. 


"आम्हाला नजरेतली *समजदार चमक* भाळायची; तुम्हाला *गॉगलच्या किमती* भुरळ घालतायत. 


"आमच्या शरीरांना *पेशन्स* मंजूर होता; *तुमच्या मनालाच तो नकोय."*


..."बाळा; *जमणं - न जमणं हे क्षमतेवर* अवलंबून असतं. क्षमता *डेव्हलप* करायची

 असते..!

✍🏻✍🏻

*जगता आलं पाहिजे... मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृव उजाळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पापं काय* *कसही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताठ काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला, पुन्हा चालता आलं पाहिजे.* *शहाण्याचं सोंग घेऊन, वेड होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता, आनंदी जगता आलं पाहिजे.* *जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूचा मिलाप करून. फक्त समाधानी राहता आलं पाहिजे...* 

*आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे*

👏


*लेखक कोण आहेत, हे माहीत नाही पण् जे काही लिहिले आहे ते आजच्या पिढीला डोळ्यात अंजन घालणारे आहे.*

Sunday, 18 December 2022

प्रमुख उद्दिष्ट्य आहे. लक्ष्य २०१७ च्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात सन २०१८-१९ पासून लक्ष्य कार्यक्रम

 प्रमुख उद्दिष्ट्य आहे. लक्ष्य २०१७ च्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात सन २०१८-१९ पासून लक्ष्य कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे..

          महिला व बालकाचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याला यश मिळाले आहे.

          दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या शुभहस्ते हे दोन्ही पुरस्कार उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर आणि सहाय्यक संचालक डॉ.अनिरुध्द देशपांडे यांनी स्वीकारले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल आशा व परिचारिका गटात महाराष्ट्र राज्याला द्वितीय पुरस्कार गोंदिया जिल्ह्यातील डव्वा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशासेविका गीता चोपराम भेंडारकर व परिचारिका पंचफुला राने यांना देण्यात आला.

          पुणे येथे बैठकीत मंत्री सावंत यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन आंबाडेकर, सहसांचलक डॉ.भोये, डॉ.रामचंद्र हंकारे, डॉ.अशोक नंदापूरकर , डॉ.अनिरुद्ध देशपांडे आणि इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi