आत्ता प्रथम *अमृततुल्य* या शब्दाला खरा न्याय मिळाला
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 18 December 2022
Saturday, 17 December 2022
हा आक्रोश मोर्चा नसून हा तर थयथयाट मोर्चा
हा आक्रोश मोर्चा नसून हा तर थयथयाट मोर्चा
आ. भातखळकर यांची मविआवर टीका
संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान करत काढलेला मोर्चा हा आक्रोश मोर्चा नसून सत्तेची खुर्ची गेल्यानंतर होणारा थयथयाट आहे, त्यामुळे हा थयथयाट मोर्चा असल्याची टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
कांदिवली पूर्व येथे भाजपाच्या वतीने माफी मांगो आंदोलनात ते बोलत होते. आमदार भातखळकर म्हणाले सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान केला आहे, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी 12 व्या शतकात विज्ञानाधिष्ठित मानवतेची आणि समभावाची शिकवण दिली, संत तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली त्यांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील प्रत्येकासाठी प्रति परमेश्वर आहेत त्यांचाही संजय राऊत आणि अमोल मिटकरी यांनी अपमान केला आहे, त्यानंतर साधा खुलासा आणि माफी सुद्धा मागितली नाही हा त्यांचा माज जनता उतरल्याशिवाय राहणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करण्याचे काम भाजपने केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रपती भवनात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा सुरू झाला आहे
आ. भातखळकर यांची मविआवर टीका
मुंबई, दि. १७ डिसेंबर (प्रतिनिधी)
संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान करत काढलेला मोर्चा हा आक्रोश मोर्चा नसून सत्तेची खुर्ची गेल्यानंतर होणारा थयथयाट आहे, त्यामुळे हा थयथयाट मोर्चा असल्याची टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
कांदिवली पूर्व येथे भाजपाच्या वतीने माफी मांगो आंदोलनात ते बोलत होते. आमदार भातखळकर म्हणाले सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान केला आहे, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी 12 व्या शतकात विज्ञानाधिष्ठित मानवतेची आणि समभावाची शिकवण दिली, संत तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली त्यांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील प्रत्येकासाठी प्रति परमेश्वर आहेत त्यांचाही संजय राऊत आणि अमोल मिटकरी यांनी अपमान केला आहे, त्यानंतर साधा खुलासा आणि माफी सुद्धा मागितली नाही हा त्यांचा माज जनता उतरल्याशिवाय राहणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करण्याचे काम भाजपने केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रपती भवनात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा सुरू झाला आहे
सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्येसकारात्मक बदलासाठी प्रयत्न करावा
सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्येसकारात्मक बदलासाठी प्रयत्न करावा.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन
मुंबई, दि. 17 : मुंबई शहर जिल्ह्यात ‘माझी मुंबई - स्वच्छ मुंबई’ अभियान राबविले जात आहे. सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीद्वारे सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने अभियानाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
मुंबईचा शाश्वत विकास करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून या अभियानामध्ये शाळांचा सक्रीय सहभाग असावा या उद्देशाने श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीवकुमार, पी.वेलारासू, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, महानगरपालिकेच्या उपायुक्त चंदा जाधव, अभियानाचे मुख्य समन्वय अधिकारी डॉ.सुभाष दळवी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील शाळांचे सुमारे 1000 मुख्याध्यापक ऑनलाईन उपस्थित होते.
अभियान कालावधीत प्रत्येक आठवड्यातील शनिवार व रविवार स्वच्छता दिवस म्हणून घोषित करण्यात येतील. या दिवशी अभियान भागीदार त्यांच्याशी निगडीत अथवा त्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये स्वच्छता अभियान राबवतील. अभियान कालावधीत उर्वरित दिवशी स्वच्छता विषयक विविध कार्यक्रम हाती घेण्यात येतील. तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आयोजन व मिशन मोडमध्ये स्वच्छताविषयक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प राबविणे अशा कार्यक्रमांचा अंतर्भाव करण्यात येईल असे बैठकीत नियोजन करण्यात आले.
सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, महानगरपालिकेच्या शाळा, मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक/ माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीद्वारे सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल घडवून अभियानाची अंमलबजावणी करतील. सदर अभियान यशस्वी होण्याकरीता आपल्या शाळांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला जाईल तसेच महानगरपालिकांचे प्रभाग कार्यालय व शिक्षण विभागाची कार्यालये यांच्याकडून आवश्यक ते साहाय्य करण्यात येईल, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
०००
चौ ल दत्त मंदिर चोरी , सूचना
एक अत्यंत महत्वाची सूचना
चौल भोवाले दत्त मंदिर येथील गाभार्यात बसवलेली 40 किलो चांदी दिनांक 15/12/2022 रोजी रात्रि 2 च्या सुमारास चोरीला गेली आहे.
तरी कोणाला काही संशय किवा विकन्यास आली तर माला किवा रेवदंडा पोलिस स्टेशन येथे संपर्क करावा ही नम्र विनंती
प्रविण मधुकर किल्लेकर
9422696120
रेवदंडा पोलिस स्टेशन
9623787648
सत्संगाचे दुकान'*….*
*देवाचे दुकान*
एके दिवशी मी रस्त्याने जात होतो, वाटेत एक बोर्ड दिसला, 'ईश्वरीय किराणा दुकान...'
माझी उत्सुकता वाढली. या दुकानाला भेट देऊन त्यात काय विकले जाते ते का पाहू नये?
हा विचार येताच आपोआप दार उघडले, थोडेसे कुतूहल असेल तर दरवाजे आपोआप उघडतात, ते उघडावे लागत नाहीत...
मी दुकानात पाहिले तर सर्वत्र देवदूत उभे होते. एका देवदूताने मला टोपली दिली आणि म्हणाला, "माझ्या मुला, काळजीपूर्वक खरेदी कर, माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इथे आहे ..."
देवदूत पुढे म्हणाला, "जर तुला टोपली एकाच वेळी भरता येत नसेल, तर पुन्हा ये आणि पुन्हा टोपली भर."
आता मी सगळं बघितलं, आधी संयम विकत घेतला, मग प्रेम, मग समजूतदारपणा, मग विवेकाचे एक-दोन डबे घेतले.
पुढे जाऊन विश्वासाचे दोन-तीन डबे उचलले, माझी टोपली भरत राहिली...
पुढे गेलो, पावित्र्य दिसले; विचार केला कसं सोडू, तेवढ्यात शक्तीची पाटी आली, शक्ती पण घेतली..
हिम्मत सुद्धा घेतली, वाटले की हिम्मतीशिवाय आयुष्यात काहीच चालत नाही...
आधी सहिष्णुता घेतली, मग मुक्तीची पेटीही घेतली...
माझे सद्गुरू प्रभुजींना आवडणाऱ्या सर्व वस्तू मी विकत घेतल्या. मग एक नजर प्रार्थनेवर पडली, मी त्याचाही डबा उचलला..
कारण सर्व गुण असूनही माझ्याकडून कधी काही चूक झाली तर मी देवाला प्रार्थना करेन की देव मला माफ कर...
आनंदी होऊन मी टोपली भरली, मग मी काउंटरवर गेलो आणि देवदूताला विचारले, "सर.. या सर्व गोष्टींसाठी मला किती पैसे द्यावे लागतील?"
देवदूत म्हणाला, "माझ्या बाळा, इथली बिल भरण्याची पद्धतही दैवी आहे. आता तू जिथे कुठे जाशील, तिथे या गोष्टींची उधळपट्टी कर, सर्वांना मुक्तपणे वाट. या गोष्टींचे बिल असेच भरले जाते..."
या दुकानात क्वचितच कोणी प्रवेश करतो, जो आत जातो तो श्रीमंत होतो, तो या गुणांचा भरपूर उपभोग घेतो आणि लुटतो...
प्रभूंच्या या दुकानाचे नाव आहे *'सत्संगाचे दुकान'*….
सद्गुणांचा खजिना भगवंताने दिला आहे, रिकामा झाला तरी सत्संगाला या आणि टोपली भरा...
देवाच्या या दुकानातून मी एकतरी वस्तू आपलीशी करू शकेन असा मला आशीर्वाद द्या.
✍️*_नमोस्तुते_* !
🙏🙏🙏
विचारपुष्प वाचनिय
🟥🟪🟧
*विचारपुष्प*
*प्रश्न - देवदर्शनानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर अथवा ओट्यावर थोडावेळ बसावे असे म्हणतात, परंतु असे थोडावेळ का बरे बसावे?*
*उत्तर* - एखाद्या मंदिराला भेट दिल्यानंतर आपण बाहेर येऊन मंदिराच्या पायऱ्यांजवळ काही क्षण विसावतो असे परंपरेने चालत आले आहे परंतु यामागील कारण आपणांस माहीत आहे का?
ही प्राचीन परंपरा काही विशिष्ट उद्देशाने बनवली गेली आहे.
किंबहुना अशाप्रकारे शांतपणे मंदिराच्या
पायऱ्यांशी बसले असताना एका श्लोकाचे पठण करावे आजच्या काळात लोकांना या श्लोकाचा विसर पडला आहे. या श्लोकावर चिंतन करा आणि तो पुढील पिढीपर्यंतदेखील अवश्य पोहोचवा
श्लोक पढीलप्रमाणेआहे~
*अनायासेन मरणम् ,*
*विना दैन्येन जीवनम्।*
*देहान्त तव सानिध्यम् ,*
*देहि मे परमेश्वरम्॥*
*अर्थ* ~ *अनायासेन मरणम् ,*
म्हणजे आपल्याला सहजपणे त्रासरहित मृत्यू
आला पाहिजे, आजारी पडून, अंथरुणाला खिळून राहू नये, व्यथित होऊन मरू नये... तर आपल्या दैनंदिन जीवनात सर्वसाधारण दिवशी आपण जसे वावरतो तसेच मृत्यूच्या दिवसालाही सामोरे जावे.
*विना दैन्येन जीवनम्।*
म्हणजे आपले जीवन कोणावर अवलंबून नसावे. कोणाजवळ असहायपणे आधाराची याचना करायला लागू नये.
*देहान्ते तव सानिध्यम् ,*
म्हणजे जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तो परमेश्वराच्या सान्निध्यात यावा.त्याचे दर्शन घेत असताना देहत्याग घडावा.
*देहि मे परमेश्वरम्*
हे परमेश्वरा मला असा आशीर्वाद दे.
परमेश्वराची प्रार्थना करत असताना वरील श्लोकांचे पठण करावे.
नोकरी, गाडी, बंगला, कन्या,पुत्र पती-पत्नी, घरदार, पैसाअडका इ. (म्हणजे ऐहिक वस्तू) मागू नका.
तुमच्या योग्यतेप्रमाणे परमेश्वर त्या स्वतःहून देत असतो. म्हणून आपण देवदर्शनानंतर स्वस्थचित्ताने बसून ही प्रार्थना करावी. ही प्रार्थना आहे, विनंती अथवा याचना नव्हे. घर नोकरीधंदा मुलगा मुलगी ऐहिक सुखे संपत्ती यांसाठी प्रार्थना नसते. अशा प्रकारच्या लौकिक गोष्टींची मागणी करणे म्हणजे भीक मागणे होय.
'प्रार्थना' या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे....
'प्र' म्हणजे विशेष, सर्वोत्तम सर्वोच्च आणि 'अर्थना' म्हणजे विनंती.
अशा रीतीने प्रार्थना म्हणजे 'विशेष आणि सर्वोच्च विनंती.'
मंदिरात नेहमीच डोळे उघडे ठेवून देवाचे दर्शन घेतले पाहिजे. काही लोक त्या ठिकाणी त्यांचे डोळे बंद करून उभे राहतात जर आपण पाहायला आलो आहोत तर डोळे बंद कशाला?
तुमचे डोळे उघडा आणि परमेश्वराच्या रूपाकडे पाहा. त्याच्या दर्शनाचा संपूर्ण आनंद घ्या. त्या सर्वांगसुंदर परमेश्वराच्या निजस्वरूपाकडे डोळे भरून पाहा.
अशा दर्शनानंतर जेव्हा तुम्ही बाहेर स्वस्थ बसाल, तेव्हा बंद डोळ्यानी, तुम्ही पाहिलेल्या या रूपाचे ध्यान करा. आणि जर ध्यानात परमेश्वर येत नसेल तर पुन्हा देवळात जा आणि पुन्हा दर्शन घ्या.
*वाचण्यात आलेला सुंदर लेख*...
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ ; मुंबईच्या वाहतुकी स मोठा दिलासा मिळणार ...

