Friday, 16 December 2022

कान्हेरी लेण्यांच्या सौंदर्यावरजी- 20 देशांचे प्रतिनिधी

 कान्हेरी लेण्यांच्या सौंदर्यावरजी- 20 देशांचे प्रतिनिधी भारावले.

          मुंबई, दि. 16 : कान्हेरी लेण्यांचे अप्रतिम सौंदर्य, नीरव शांतता आणि निसर्गरम्य परिसर पाहून जी- 20 देशांचे प्रतिनिधीं भारावले.


     जी-20 देशांच्या प्रतिनिधींची 13 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुंबईत परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या शेवटच्या दिवशी जी-20 प्रतिनिधींसाठी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील प्रसिद्ध कान्हेरी लेण्यांना भेट देवून या स्थळांची माहिती व इतिहास जाणून घेतला.


            बोरीवली जवळील साष्टी बेटाच्या अरण्यात कान्हेरी लेणी आहेत. या लेण्यांचा इतिहास, 'कान्हेरी' या शब्दाचा उगम कशा प्रकारे झाला. या लेण्यांतून भारताच्या बुद्धकाळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते. हा परिसर अत्यंत शांत आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा आहे त्यामुळे या भागात अनेक पर्यटक भेट देत असतात अशी माहिती केंद्रीय पुरातत्व विभागाने यावेळी जी-20 च्या प्रतिनिधींना दिली.


            या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्खूंसाठी विहार, सभागृह, खोल्या. बुद्ध आणि अवलोकितेश्वर यांच्या मूर्ती, डोंगर माथ्यावर पाण्याची टाकी यावेळी सर्वांनी पहिल्या. गुंफा पूर्ण झाली की त्यांचे परिवर्तन विहारामध्ये होई आणि तेथे बौद्ध धर्मीय विविध उपक्रम राबवत. बहुतेक गुंफांचा वापर बौद्धधर्मीय श्रमण यांना राहण्यासाठी, अभ्यासासाठी आणि ध्यानासाठी करीत. मोठ्या गुंफामधून परिषदा भरविल्या जातात. तसेच तेथे स्तूप आहेत त्यामुळे तेथे प्रार्थना करण्यासाठीही त्यांचा वापर केला जाई. बौद्ध संघातील जीवनात काय हवे आहे, याबद्दलचे मार्गदर्शन बहुतेक विहारातील मठाधीश देत असत, अशा अनेक ऐतिहासिक घटनांना उजाळा देत कान्हेरी गुंफाच्या निर्मितीपासूनचा इतिहास परिषदेतील प्रतिनिधींना देण्यात आली.


            सुवाच्य अक्षरातील शिलालेख आणि वचननामे (एपिग्राफ्स) ही ब्राह्मी, देवनागरी आणि पहलवी या तीन लिप्यांत आहेत. येथे अनेक लहानमोठे धबधबे आहेत





, सध्या रिकामे ओहोळ पूर्ण कोरडे आहेत. मात्र पाण्याचा प्रवाह किती मोठा असू शकतो याच्या खुणा येथे लक्षात येतात. संजय गांधी राष्ट्रीय पार्कचे मुख्य गेट ते कान्हेरी गुंफा हा रस्ता एका नदी पात्राने विभागलेला आहे. हा परिसर पावसाळ्यात अत्यंत सुंदर दिसतो.


जगभरातील प्रतिनिधींनी भारतीय शास्त्रीय संगीताचा घेतला आस्वाद


             तुळशी तलाव येथे वन विभागाच्या निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी केंद्रीय पर्यटन विभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तबला वादन, पखवाल वादन आणि शास्त्रीय संगीत सहभागी कलाकारांनी सादर केले. बासरी वादक देबो प्रिया,सुश्मिता चॅटर्जी, कलिनाथ मिश्रा आणि मृणाल मिश्रा यांनी भारतीय संस्कृतीतील विविध सुप्रसिद्ध गाण्यांवरती बासरी वादन केले.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022

 प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022

विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना1966 कोटी 63 लाख नुकसानभरपाईचे वितरण

- कृषिमंत्री अब्दुल सत्तार.

मुंबई, दि. 15 - 'प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022' मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 966 कोटी 63 लाख रुपयांची नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे तसेच प्रलंबित 447 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विमा कंपन्यांना दिले आहेत.


प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या आढाव्या संदर्भात आज मंत्रालयात कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी बैठकीचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव सरिता बांदेकर - देशमुख, कृषि आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे आदींसह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई यामध्ये शेतकऱ्यांकडून एकूण प्राप्त झालेल्या सूचना, सर्वेक्षण पूर्ण झालेल्या सूचना, नुकसानभरपाई लाभार्थी संख्या आणि निश्चित लाभार्थी संख्या याचा आढावा यावेळी मंत्री श्री. सत्तार यांनी घेतला. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप-2022 अंतर्गत आतापर्यंत 57 लाख 91 हजार 167 इतकी निश्चित लाभार्थी संख्या आहे. त्यासाठीची निश्चित नुकसान भरपाई रक्कम 2 हजार 413 कोटी 69 लाख रुपये इतकी आहे. आतापर्यंत 43 लाख 86 हजार 763 शेतकऱ्यांना एकूण 1 हजार 966 कोटी 63 लाख रकमेचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. उर्वरित नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करा. पीक विमा भरलेला एकही शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री श्री.सत्तार यांनी विमा कंपन्यांना दिले.


यावेळी भारतीय कृषि विमा कंपनी, एचडीएफसी इर्गो, आयसीआयसीआय लोंबार्ड, युनायटेड इंडिया कंपनी आणि बजाज अलियान्झ या पाचही विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गडबड गोंधळ


 

एक ते पाच जानेवारी दरम्यान सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सव

 एक ते पाच जानेवारी दरम्यान सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सव.

- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

· नावीन्यपूर्ण कृषी संशोधन, चर्चासत्रे, प्रात्यक्षिकांसह शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी.

· महोत्सवात कृषी विद्यापीठे, विविध शासकीय विभागांसह विविध यंत्रणांचे 600 स्टॉल्स.

            मुंबई, दि. 15 - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना 50 वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठांनी आतापर्यंत केलेली वाटचाल व त्यांची संशोधने ही शेतक-यांपर्यंत पोहोचली पाहिजेत, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत दि. 01 जानेवारी ते 5 जानेवारी, 2023 या कालावधीत सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव - 2023 चे आयोजन केले आहे. राज्यातील कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन, नवीन वाणांची निर्मिती याबरोबरच नावीन्यपूर्ण कृषी संशोधन, शेतकऱ्यांशी थेट संवाद, विविध चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिके आणि विविध योजनांची शेतकऱ्यांना थेट माहिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.


            कृषि विभागाच्यावतीने दरवर्षी जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याबाबतची माहिती देण्यासाठी मंत्री श्री. सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.


            यावेळी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी (अहमदनगर), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (जि. रत्नागिरी), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) या चार विद्यापीठांनी केलेली संशोधने, कृषी विभागाची प्रात्यक्षिके, परिसंवाद, तंत्रज्ञान, राज्यातील शेतक-यांच्या यशोगाथा, असे एकत्रित सादरीकरण करणारा हा पहिलाच राज्यस्तरीय कृषी महोत्सव आहे. यामध्ये राज्यभरातील विविध प्रयोग ज्यामध्ये उत्पादनक्षम शेती, एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक किटक व्यवस्थापन, एकात्मिक शेती व्यवस्थापन, सेंद्रिय आणि रासायनिक शेतीची प्रात्यक्षिके विद्यापीठांकडून सादर केली जाणार आहेत. राज्यभरातून शेतकरी या महोत्सव आणि प्रदर्शनास भेट देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


            आंतरराष्ट्रीय स्तरावर आगामी 2023 हे वर्ष 'भरड धान्यांचं' म्हणून साजरे केले जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्राची भुमिका, महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे कार्यक्रम यावरही महोत्सवातील चर्चासत्रांमधून विचारमंथन होणार आहे. महोत्सवात कृषि विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञान पासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही चर्चासत्रे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील, असे मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले. कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट, त्यासंबंधी होणारे संशोधन, नवीन वाणांचे संशोधन, बदलेले वातावरण पर्जन्य आणि उष्णता यांच्या बदलांचा वेध घेऊन करण्यात येत असलेलं संशोधन याचेही सादरीकरण यावेळी महोत्सवात करण्यात येणार आहे.


            या महोत्सवात कृषि विभाग, कृषि विद्यापीठे यांच्यासह शासनाचे विविध विभाग याबरोबरच कृषि तंत्रज्ञानात सहभाग असणारे विविध खासगी दालने असणार आहेत. कृषी विभागाच्या एकात्मिक दालनामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, पोकरा, स्मार्ट, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फळप्रक्रिया यांचे सादरीकरण केले जाणार आहे. बाजारपेठांचे नवीन तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान याची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाबीज, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अशा योजनांची माहिती देणारी दालने देखील महोत्सवात असतील. कृषी निविष्ठा, तंत्रज्ञान, सिंचन साधने यांचीही माहिती देणारी 160 पेक्षा अधिक दालने महोत्सवात असतील. शिवाय शेतीविषयक अवजारे, मशिनरी, नवनवीन यांत्रिकीकरण, ऑटोमेटेड फार्मिंग, यांचीही दालने असतील. शेतीपूरक लघुउद्योगांसाठी विशेष दालन, यामध्ये राज्यभरातील विविध शेतकरी गटांनी तयार केलेली उत्पादनेही शेतक-यांना पाहावयास मिळतील, असे मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.


            या महोत्सवात एकूण सहाशे दालने असणार आहेत. तसेच सायंकाळी शेतकऱ्यांसाठी आणि महोत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विविध प्रबोधानात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या महोत्सवास भेट देऊन येथील चर्चासत्रे, प्रदर्शन, प्रात्यक्षिके याचा लाभ घ्यावा, यासाठी कृषि विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. सत्तार यांनी दिली. 


            या राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सवाचे यशस्वी आयोजन व्हावे, यासाठी कृषि विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांची राज्यस्तरीय नियंत्रक अधिकारी तर कृषि सहसंचालक तुकाराम मोटे यांची समन्वयक अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


0000

येणार यनारच


 कार्यकर्ते पण एक एक नमूने असतात...!!

स्मशान भुमीच्या भिंतीवर लिहून आलेत..

"२०२४ ला आमचे साहेब येणारच..." 🤪😝🤣🤣

विनियोजन विधेयकांच्या कार्यवाही संदर्भात

 विनियोजन विधेयकांच्या कार्यवाही संदर्भात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा.

मुंबई, दि. 15:- पावसाळी अधिवेशनातील विनियोजन विधेयकांच्या कार्यवाहीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. 


पावसाळी अधिवेशनात विनियोजन विधेयकावर सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीबाबत सह्याद्री अतिथी गृह येथे आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.  


या बैठकीस विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकिय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. अश्विनी जोशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संजय खंदारे आदीसह उच्च व तंत्र शिक्षण, गृह, सामान्यप्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पर्यटन विभागाने शास्त्रशुद्ध पद्धतीने गड-किल्ल्यांचे संवर्धन होईल यासाठी व्यवस्थापनासंदर्भात आराखडा तयार करून, मंजूरी मिळतील त्याप्रमाणे ती कामे पूर्ण करावीत. वैद्यकिय शिक्षण विभागाने सातारा वैद्यकिय महाविद्यालयाचे बांधकाम तातडीने सुरू करावे. तसेच अलिबाग वैद्यकिय महाविद्यालयासाठी स्थानिक स्तरावरील समस्या सोडवून पुढील कार्यवाही करावी. वैद्यकिय महविद्यालयासाठी स्टाफ नेमण्यासाठी पदभरतीस मान्यता देण्यात आली असून, त्यानुसार पदभरतीची कार्यवाही करण्यात यावी. सार्वजनिक आरोग्य विभागाने मेडिकल इंडस्ट्रियल पार्क संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.


मुख्यमंत्री यांनी आश्वासित केलेली कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच छत्रपती संभाजी राजे शौर्य पुरस्काराचे निकष ठरवणारी समिती तात्काळ गठीत करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.


सहकार विभागाने जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारणे, मुंबईतील पशुवैद्यकिय महाविद्यालयासंदर्भात वास्तूविशारद नेमून पुढील कार्यवाही करावी. याचबरोबर कृषी, गृह, सहकार व पणन, उच्च शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभागासही प्रलंबित व सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.


------- 000 -----



 

कोळीबांधवांची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण

 कोळीबांधवांची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण

कोस्टल रोडवरील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करण्याचा निर्णय

विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

मुंबई, दि. 15 : विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. मुंबईतील कोस्टल रोडचे काम करताना वरळी कोळीवाड्याजवळील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर 60 वरून 120 मीटर करण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. याभागातील कोळीबांधवांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून अत्याधुनिक तंत्रज्ञान, मनुष्यबळाची संख्या वाढवून कोस्टल रोड प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल आणि कोळी बांधव उपस्थित होते.

वरळी जवळून कोस्टल रोड सी लिंकला जोडला जात आहे. तेथील क्लीव्ह लॅण्ड बंदर जवळ दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या कनेक्टरचे काम सुरू असून त्या पिलरमधील अंतर वाढविण्याची मागणी स्थानिक कोळी बांधवांची होती. यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कोळीबांधवांची बैठक देखील घेतली होती. त्यामध्ये यामागणी बाबत तज्ञ



Featured post

Lakshvedhi