Friday, 16 December 2022

निबंध -दगड

 -------------------------------

♦️ *मराठी कांही वाचनीय*♦️

-------------------------------


शाळेत बाई म्हणाल्या : आपल्या

आवडत्या विषयावर निबंध लिहा..

एका मुलाने निबंध लिहिला...


विषय -

                 *दगड*


'दगड' म्हणजे 'देव' असतो..

कारण तो आपल्या आजूबाजूला

सगळीकडे असतो.. पाहीलं तर दिसतो..


अनोळख्या गल्लीत तो

कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो..


हायवे वर गाव

केव्हा लागणार आहे ते दाखवतो..


घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो..


स्वैयंपाक घरात

आईला वाटण करून देतो.. 


मुलांना झाडावरच्या

कैऱ्या, चिंचा पाडून देतो..


कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून

भळाभळा रक्त काढतो आणि

आपल्या शत्रूची जाणीव करून देतो..


माथेफिरू तरुणांच्या हाती लागला तर,,

काचा फोडून त्याचा राग शांत करतो..


रस्त्यावरच्या मजुराचं

पोट सांभाळण्यासाठी

स्वत:ला फोडुन घेतो..


शिल्पकाराच्या मनातलं

सौंदर्य साकार करण्यासाठी

छिन्निचे घाव सहन करतो..


शेतकऱ्याला

झाडाखाली क्षणभर विसावा देतो..


बालपणी तर स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी

अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो..


सतत आपल्या मदतीला

धावून येतो, देवा'सारखा..


मला सांगा,,

'देव' सोडून कोणी करेल का

आपल्यासाठी एवढं ??


बाई म्हणतात -

तू 'दगड' आहेस,, तुला गणित येत नाही..

आई म्हणते -

काही हरकत नाही,,

तू माझा लाडका 'दगड' आहेस..

देवाला तरी कुठे गणित येतं ! नाहीतर

त्याने फायदा-तोटा बघितला असता..

तो व्यापारी झाला असता." 


आई म्हणते -

दगडाला शेंदुर फासून

त्यात भाव ठेवला की,,

त्याचा 'देव' होतो ~


म्हणजे, 'दगड' च 'देव' असतो ~


🎁🏆🏅


पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले

दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून राज्याची वेगळी ओळख निर्माण करणार

 दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून राज्याची वेगळी ओळख निर्माण करणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

मुंबई, दि. 15 : राज्यातील रस्त्यांमुळे विविध शहरे जोडली जात आहेत. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबईसह मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. काही रस्ते प्रगती पथावर आहेत. अशा दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या रस्त्यांमुळे राज्याची एक वेगळी ओळख निर्माण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


दै.लोकसत्ताच्यावतीने सेंट रेजिस हॉटेल येथे आयोजित गृहनिर्माण व्यावसायिकांच्या परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यासह विविध विकासक उपस्थित होते.


इंडियन एक्सप्रेस समूहाचे राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे. गृहनिर्माण व्यावसायिकांच्या परिषदेच्या माध्यमातून व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत होईल. लोकसत्ताने गेली 74 वर्ष राज्याच्या विकासात सहभाग घेतला आहे. दै.लोकसत्ता अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण करण्यात लोकसत्ताने मोठे योगदान दिले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


गृहनिर्माण विकास क्षेत्रातील नियमांमध्ये सुधारणा करून अटी व नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. लोकांना घर परवडणाऱ्या किंमतीमध्ये मिळाले पाहिजे, याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. छोट्या व मोठ्या घराच्या प्रकल्पांना सरकार सवलती देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. व्यावसायिकांनी त्यांच्या सुचनांचे सादरीकरण तयार करावे. यातील सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल. त्याबाबत योग्य तो निर्णयही घेण्यात येईल. राज्याच्या विकासाचे निर्णय घेताना ते केवळ कागदावर न राहता निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करुन शेवटच्या घटकापर्यंत त्याचे लाभ पोहचविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


कोविडसारख्या संकटात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची खरेदी विक्री झाली. लोकांना घरे विकत घेता आली. शासन, महापालिकांना यामुळे उत्पन्न मिळाले हे पहिल्यांदा घडलं. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर त्याचा परिणाम चांगलाच होतो. हे सर्वांनी लक्षात घ्यावे. हे सरकार लोकांचे सरकार आहे. लोकहिताच्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. शेतकरी हितासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. समृद्धी महामार्ग हा राज्याच्या दृष्टिने गेम चेंजर प्रकल्प आहे. हा खऱ्या अर्थाने या राज्याला समृद्धी देणारा महामार्ग ठरेल, असे त्यांनी सांगितले.

मुंबईत 350 कि.मी. मेट्रोची कामे सुरू आहेत. ही कामे झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतुकीचा ताण कमी होईल. मेट्रोमुळे खूप फायदा होणार असून प्रदूषण कमी होईल. तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल. कोळी बांधवांसाठी देखील सोईसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. जी 20 चे आपल्या देशाला अध्यक्षपद मिळाले. यानिमित्ताने मुंबई शहर सुशोभित केले. मुंबईतील विकास कामांबद्दल सर्व स्तरातून सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. धारावी प्रकल्प जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प होणार असून त्यामाध्यमातून नागरिकांचे जीवनमान निश्चितच उंचावेल. प्रत्येक वार्डामध्ये एक याप्रमाणे 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरु करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक राहतो त्या ठिकाणी सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा या शासनाचा निर्धार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बीयर नो fear


 

जिवन गाणे







 

Thursday, 15 December 2022

चीन* के स्कूलों में बच्चों को उनके पिताओं के काम के वीडियोज़ दिखाये जा रहे हैं

 *चीन* के स्कूलों में बच्चों को उनके पिताओं के काम के वीडियोज़ दिखाये जा रहे हैं, ताकि बच्चे देखें कि उनके मां-बाप कैसी मेहनत-मशक्कत और तक़लीफ़ें उठा कर पैसा कमाते हैं, जिससे बच्चे अपने माँ-बाप की इस मेहनत की कमाई का पैसा बर्बाद न करें, पढ़ाई में मेहनत करें, दिल लगाएं और पैसे की क़ीमत समझें।


सिंगापूरचे कॉन्सुल जनरल चेओंग मिंग फूंग यांनी

 सिंगापूरचे कॉन्सुल जनरल चेओंग मिंग फूंग यांनी घेतली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.

,सिंगापूरचे कॉन्सुल जनरल चेओंग मिंग फूंग यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत निवासस्थानी भेट घेतली.


यावेळी व्हाईस कॉन्सुल जनरल(राजकीय)झ्याचेस लिम, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यावेळी उपस्थित होते.


गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणात जमीन, पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. लॉजीस्ट पार्क,आयटी पार्क, समृद्धी महामार्गालगत औद्योगिक गुंतवणुकीच्या संधी, रायगड आणि पालघर क्षेत्रात उद्योगांसाठी जागा आदी विषयांसह सिंगापूर आणि भारतातील दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण आर्थिक संबंध वाढविण्याबाबत, अत्याधुनिक नवकल्पना निर्माण करण्याच्यादृष्टीने व्यवसाय आणि भारतातील संभाव्य गुंतवणूक वाढवणे अशा विविध विषयांवर उभयतांमध्ये यावेळी चर्चा करण्यात आली.

मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ

 मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ

थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला चालना

अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

मुंबई, दि. 15 : मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एअर इंडियाच्या मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांच्या हस्ते आज करण्यात आला. या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. केंद्रीय नागरी विमान उड्डाण विभागाचे सचिव राजीव बन्सल, एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्बेल विल्सन आदी यावेळी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई येथून सुरू झालेली ही थेट सेवा आहे. हा प्रवास आतापर्यंतची सर्वांत लांब अंतराचा हवाई प्रवास आहे. आठवड्यातून तीन वेळा ही सेवा असून त्यानंतर ती दररोज सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

सॅनफ्रान्सिस्को हे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असल्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी ही थेटसेवा महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनानंतर आता आंतरराष्ट्रीय प्रवासात वाढ झाली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चोविस तासात दिड लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबईसह महाराष्ट्रातील लाखो लोक अमेरिकेत स्थायिक असून या सगळ्यांचे हवाईसेवेच्या माध्यमातून जोडणाऱ्या एअर इंडियाशी वेगळ नातं निर्माण झालं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. महाराष्ट्राला देखील जी २० परिषदेच्या बैठकांचा मान मिळाल्याने ही राज्याच्या ब्रॅंडींगची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नुकतेच आमच्या शासनाने राज्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली असून विमानतळ विस्ताराला प्राधान्य दिले आहे. राज्यात प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करणार असून त्यामाध्यमातून हवाईसेवा जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


           गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र आवडते ठिकाण असून थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एअर इंडियाने युरोप आणि अमेरिकेतील महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी योवळी केले.


केंद्रीय मंत्री श्री. सिंदिया यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात करून, मुंबई आणि सॅनफ्रान्सिस्कोशी असलेल्या भावनिक नात्याची आठवण सांगितली. हवाईसेवेच्या क्षेत्रात भारतात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचे सांगत जगात भारत हे नागरी हवाई उड्डाण क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाचा देश असून हवाईप्रवास सेवेला अधिक बळ देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी मुंबई विमानतळावर श्री. विल्सन यांच्या हस्ते प्रवाशांना बोर्डींग पासचे वितरण करण्यात आले.


००००

Featured post

Lakshvedhi