Wednesday, 16 November 2022

पोच पावती*

 *पोच पावती*


मागे एकदा पोस्टात गेलो असताना एक आजोबा स्टाफ ला विचारत होते "ह्याची पोचपावती मिळेल ना ?


बरेचदा मी ही हिला ला सांगतो acknowledgment म्हणून जपून ठेव ग !!!


नेहमीप्रमाणेच तो शब्द माझ्या मनात फिरू लागला आणि बोटं लिहू लागली... 


*पोचपावती* ही आपल्या व्यवहारात जितकी महत्वाची, तितकीच आयुष्यातही कां असू नये ?? 


ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुक असाच अर्थ नसावा.


*कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना appreciation असू शकतं.*

 

ह्या पोचपावतीचे

माझ्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आई- अप्पा. 


घरात कोणताही एकत्र कार्यक्रम होवो किंवा एखादा नवीन पदार्थ केला,कोणतीही चांगली कृती केली की सुनांना ते तसंआवर्जून सांगतात *"छान झाला बर का आजचा कार्यक्रम"* आणि मग त्यांच्या ह्या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला अजून उत्साह येतो!


*पोचपावती तुमच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी फिरवते* 


एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींच appreciation देऊन बघा अगदी मनापासून त्याच्या चेहऱ्यावर कस हसू फुलतं. 


आमची घर कामवाली गजरे , फुल घालून यायची फार आवड ! कधी त्या मोठा गजरा घालून आल्या कामाला की हिच्या तोंडून उस्फूर्तपणे येत "प्रमिला काय मस्त दिसतेय


चला एक फोटो काढते तुझा!" ह्याने सुद्धा खूप खुश होतात


*लहानांपासून मोठ्यां पर्यन्त 

आणि अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींसाठी ही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते.*


एखादं मोठं प्रोजेक्ट complete केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो की वर्गात "छान निबंध लिहिलंस हो" अस म्हणून बाईंची मिळालेली शाबासकी असो, हिने खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यानी केलेली स्तुती असो की, कधीतरी नवीन साडी नेसल्यावर हिला न बोलता दिलेली दाद असो. 


ह्या पोचपावती साठी माणूस फक्त जवळचाच हवा असं नाही कधीतरी आपल्याच दुकानदाराला ही म्हणावं "काका तांदूळ चांगले होते हं तुमच्या कडून घेतलेले "

*सामान्य माणसांपासून अगदी कलाकारां पर्यन्त ह्या पोचपावतीची गरज असतेच, ही दखल घायला आणि द्यायला ही वयाच बंधन नसावं कधीच*

 

काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात ,

पण तरीही अधूनमधून ह्याचा शिडकावा नात्यात नक्की आनंद देऊन जातो ..! 


बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही ... 

तसं करूही नये कारण पोचपावती जितकी उस्फुर्त, तितकीच जास्त खरी !! 


*पोच पावती फक्त शब्दातूनच नाही तर डोळ्यातून कधी कृतीतून, स्पर्शातूनही व्यक्त व्हावी. जसं जसं ज्याच्याशी नातं तशी तशी ती पोचवावी ...*


कधी योग्य आदर ठेवून, कधी गळा मिठी मारून, अगदी कधी "च्यामारी भारीच काम केलंस तू भावड्या" अशी वेगळ्या भाषेतून ही यावी. 


माणूस जितका दिलखुलास तितकीच ही दाद उस्फुर्त,

महत्वाचं म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच ह्या मुलांच्या भाषेत cool dude हवा. 


*ह्या पोच पावती ने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते, उत्साह मिळतो, नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो...*


आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी काही लागत नाही 


*फक्त मोकळं व स्वच्छ मन!*


*तर मग होऊन जाऊ द्यात एखादी झकास, दिलखुलास दाद !!!😊🌱🌿🙏

काळी कमाई

 *काळा पैसा कमवण्याचे मार्ग बंद झाले पाहिजेत...

    मी डॉक्टर आहे, म्हणूनच

 मी सर्व प्रामाणिक डॉक्टरांची माफी मागतो.

    •........ हृदयविकाराचा झटका आला

    डॉक्टर म्हणतात - स्ट्रेप्टोकिनेज इंजेक्शन द्या... 9,000/= रु. इंजेक्शनची खरी किंमत रु. ७००/ ते ९००/= रु., तर MRP रु. ९,०००/=! तू काय करशील

    ……… टायफॉइड झाला

    डॉक्टरांनी लिहिले. एकूण 14 मोनोसेफ घ्या! घाऊक किंमत रु. 25/= हॉस्पिटल केमिस्ट रु. 53/= देतात. तुम्ही काय करता??

    • ............,,,, किडनी निकामी होणे .तीन दिवसातून एकदा डायलिसिस केले जाते.. डायलिसिस केले जाते आणि इंजेक्शन दिले जाते. MRP 1800 रु.

 तुला वाटेल मी ते घाऊक बाजारातून उचलेन...! भारतभर शोधतोय पण कुठेच सापडत नाही... का?

    कंपनी फक्त डॉक्टरांना पुरवते!!

    इंजेक्शनची मूळ किंमत 500/= आहे, परंतु त्याच्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांची MRP 1,800/= आहे.

  तुम्ही काय करता??

     .......... संसर्ग झाला आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेले प्रतिजैविक रु. ५४०/=

 150/= त्याच इतर कंपनीकडून आणि जेनेरिक रु 45/=

 पण केमिस्टने नकार दिला. आम्ही कोणतेही जेनेरिक देत नाही.., फक्त डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन... म्हणजे 540/ = तुम्ही काय कराल...??

    बाजारात अल्ट्रासाऊंड चाचणीसाठी रु. ७५०/=, ट्रस्ट फार्मसी रु. 240/= रु.750 डॉक्टरांच्या कमिशन पैकी 300/= रु.....!

    MRI वर डॉक्टरांचे कमिशन रु. 2,000/= ते 3,000/=

    डॉक्टर आणि रुग्णालयांची ही लूट, बेधडक, बेधडक, बेधडक भारत देशात सुरू आहे...!

    औषध कंपन्यांची लॉबी इतकी मजबूत आहे की त्यांनी थेट देशाला ओलीस ठेवले आहे....!

    डॉक्टर आणि औषध कंपन्यांचा सहभाग! दोघेही सरकारला ब्लॅकमेल करत आहेत...!!

    मोठा प्रश्न...

    माध्यमे दिवसरात्र काय दाखवतात?

    खड्ड्यात पडलेला राजकुमार, ड्रायव्हर नसलेली गाडी, रॉकी सावंत, बिग बॉस, सासू, क्राईम रिपोर्ट, क्रिकेटरची मैत्रीण हे सगळं दाखवा...

  पण डॉक्टर कंपन्या, हॉस्पिटल आणि औषध कंपन्या त्याचा स्पष्ट दरोडा का दाखवत नाहीत?

    समाजाच्या मदतीला मीडियाच येत नसेल तर कोण करणार?

    मेडिकल लॉबीची क्रूरता कशी थांबवायची?

    ही लॉबी सरकारला खाली आणत आहे का?

    मीडिया गप्प का?

    20 रुपये जास्त मागितल्यास ऑटोरिक्षा चालकाला फटका...

    तुम्ही डॉक्टरसाठी काय करता???


     जर तुम्हाला हे खरे वाटत असेल तर सर्वांपर्यंत पाठवा! जागरूकता आणा आणि जनजागृतीसाठी तुमचा पाठिंबा द्या....

   


    पाच जणांना पाठवलं तर ते पाच लोक पुढच्या पाच जणांना नक्की पाठवतील! प्रत्येकाने असे पाठवले तर राष्ट्र ते पाहील आणि संघटित होईल.


    https://www.facebook.com/DrPardeep-Aggarwal-381141815344043/


    मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो

    किमान पाच गटांसाठी

    धन्यवाद पाठवा

Copy paste

कौशल्य विकास , रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता

 कौशल्य विकास , रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र चेंबरमध्ये सामंजस्य करार


कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून नोकरी मिळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे, जिल्हास्तरीय रोजगार मेळावे आयोजित करणे, कौशल्य विभागाच्या सहकार्याने गाव पातळीवर एक हजार कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहे. 


राज भवन येथे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता, पर्यटन आणि महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये रोजगार मेळावे, कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम, वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, आयटीआयच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येऊन तरुणांना रोजगार देण्याचे काम केले जाते. राज्यातील ५८९ आयटीआयला अद्यायावत करण्यात येणार आहे. राज्यातील 1000 गावांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तरुणांना काम देण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असून राज्यातील व्यापार उद्योगांचा विकासासाठी व तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने सरकार चांगले काम करत आहे. महाराष्ट्र चेंबर व कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे उद्योग क्षेत्राचा विकास होऊन तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.


राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व महाराष्ट्र चेंबर यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराने राज्यातील व्यापार उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल, नवीन उद्योजक तयार होतील. महाराष्ट्र चेंबर राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका साकारेल असे प्रतिपादन केले.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात उद्योगांना आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ मिळावे यासाठी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम कौशल्य विकास विभाग करत आहे. शेती क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्राला जोडल्यानंतर चांगले काम होईल व राज्याचा आणि व्यापार उद्योग क्षेत्राचा स्थिर विकास होईल. व्यापार, उद्योग वाढीसाठी व रोजगार निर्मितीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्यातील व्यापार, उद्योगांच्या विकासासाठी व तरुणांना रोजगार मिळण्याच्या हेतूने महाराष्ट्र चेंबर तर्फे विविध उपक्रम व कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येत असते. कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता आणि नाविन्यता विभागासमवेत झालेल्या या सामंजस्य कराराने महाराष्ट्र चेंबर या विभागाच्या सहकार्याने राज्यात जिल्हास्तरावर व गावपातळीवर तरुणांसाठी रोजगार मेळावे, कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून कौशल्य विकासासाठी उत्कृष्ट काम करण्यात येईल. तसेच राज्यात महिला उद्योजकता अभियान व उद्योगवृद्धी यात्रेच्या माध्यमातून महिला व तरुणांना प्रशिक्षण देणे, उद्योग करण्यास मार्गदर्शन, शासनाच्या योजनांची माहिती देण्याचे काम करणार असल्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.  


कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान श्रीमती मनीषा वर्मा यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी आभार मानले.  

याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरच्या महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन सौ. संगीता पाटील, एमएसएमई समितीचे चेअरमन प्रकाश शहा, स्किल कौन्सिल समितीचे को चेअरमन स्वप्निल शहा, कार्यकारिणी सदस्य नितीन धूत, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते. 

औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात आगामी काळात मोठी गुंतवणूक

 औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात आगामी काळात मोठी गुंतवणूक

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

        मुंबई, दि. 16 : उद्योगांना आवश्यक असणारे उद्योगस्नेही वातावरण देण्याचे काम राज्य सरकार करत असून येत्या काळात औरंगाबाद आणि राज्याच्या विविध भागात मोठी गुंतवणूक करण्यासाठी उद्योजक पुढे येत आहेत. त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी औरंगाबाद परिसरात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या तसेच उद्योग विस्तार करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसोबत चर्चा केली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, ऑरिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासन राज्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करेल आणि ज्या ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य आहे त्या उपलब्ध केल्या जाईल. ज्या उद्योजकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यावर येत्या पंधरा दिवसात निर्णय घेण्याच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी उद्योजकांच्या पसंतीचे राज्य आहे. त्यामुळे राज्यात उद्योगासाठी आवश्यक सुलभ वातावरण देणे, उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या शक्य तितक्या कमी वेळात देणे या बाबींना आमचे प्राधान्य आहे. उद्योग समूहांकडून नव्याने प्रस्ताव आल्यास त्यावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल, असे श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.


            यावेळी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष नितीन गुप्ता, मानद सचिव अर्पित सावे, उद्योग प्रतिनिधी अथर्वेश नंदावत, एथर एनर्जीचे संचालक मुरली शशिधरन, पिरामल फार्मा सोल्युशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष मयंक मट्टू, कॉस्मो फर्स्टचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक जयपूरिया आदी उपस्थित होते.


०००

भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरती 2021

 भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरती 2021


भूकरमापक तथा लिपीक पदाची परीक्षा 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत होणार


            मुंबई, दि. 16 : भूमी अभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमूह (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या पदाची परीक्षा 28,29 आणि 30 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. 28 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये पुणे विभागाची तर सत्र 2 मध्ये कोकण विभागाची परीक्षा होईल. 29 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये औरंगाबाद विभागाची तर सत्र 2 मध्ये नाशिक आणि अमरावती विभागाची परीक्षा होणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये नागपूर विभागाची परीक्षा होईल, अशी माहिती जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एन.के. सुधांशू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


            परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत माहिती विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in यावर उपलब्ध होणार आहे. संबंधित उमेदवारांने संकेतस्थळावरील सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेवून परीक्षा द्यावयाची आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते.


             सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) २८ ते ३०/११/२०२२ या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होईल. परीक्षेबाबत संभाव्य वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.


            भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता ०९/१२/२०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याकामी दिनांक ०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी व अर्ज स्विकृतीचे काम करण्यात आलेले होते.


            ०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची माहिती (DATA) प्राप्त झालेनंतर सदर DATA ची प्राथमिक तपासणी केली असता भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक तथा लिपिक पदाकरीता जाहिरातीत नमूद अर्हता धारण न करणाऱ्या उमेदवारांनी देखील अर्ज सादर केल्याचे दिसून आले. तसेच उमेदवारास कोणत्याही एकाच विभागाकरीता अर्ज सादर करण्याबाबत सूचना असून देखील काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक विभागाकरीता अर्ज सादर केलेले दिसून आले. या कारणास्तव विभागाकडून २८/०२/२०२२ ते १३/०३/२०२२ या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवित दुबार अर्ज भरलेल्या उमेदवारांना कोणत्याही एकाच विभागातील अर्ज कायम करण्याची तसेच अर्हता धारण करत असल्याबाबत प्रमाणपत्रे अपलोड करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.


            छाननी अर्ज प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या सूचनांनुसार ज्या उमेदवारांनी दिनांक ९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे तसेच छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या उमेदवारांच पदभरती प्रक्रियेतील परीक्षेस बसण्याकरीता पात्र करण्यात येईल. जे उमेदवार अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड करुन छाननी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, अशा उमेदवारांना पदभरती परीक्षेसाठी अपात्र समजण्यात येईल, अशी सूचना एस एम एस द्वारे तसेच विभागाकडून देण्यात आलेली होती.


०००००



बंदरांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

 बंदरांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

- बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

            मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र सागरी मंडळाअंतर्गत येणाऱ्या बंदराचा दर्जा व सोयीसुविधा वाढविण्यासाठी तसेच बंदरांची रस्ते, रेल्वे मार्गासोबत जोडणी करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

            आज मंत्रालयात आयोजीत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाअंतर्गत येणाऱ्या बंदरांच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. भुसे बोलत होते. बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सौनी यांनी विभागनिहाय बंदरांच्या कामकाजाविषयी माहिती दिली.

            राज्याला ७२० किमीची सागरी किनारपट्टी असून, त्याअंतर्गत मुंबई बंदर आणि जेएनपीटी बंदर दोन मुख्य प्राधिकरण पोर्ट तर, ४८ लहान बंदरे आहेत. त्याअंतर्गत मालवाहू आयात-निर्यात बंदरे, कॅप्टीव्ह जेट्टी, शिपयार्ड, ग्रीनफील्ड फोर्ड आणि विविध कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या जेट्टी असल्याची माहिती सादरीकरणाद्वारे डॉ. सौनी यांनी दिली.

            यावेळी मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन शर्मा, बंदरे विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात उपस्थित होते.


०००

Featured post

Lakshvedhi