Tuesday, 15 November 2022

मार्गदर्शन

कोकणचे दुःख कोणी दूर करेल?*

 *कोकणचे दुःख कोणी दूर करेल?* 

कोकणात माकड आणि वानर हे दोन प्राणी नसले तर कोकण समृद्ध होईल. गेली कित्येक वर्षे न मारल्यामुळे काहिवर्षात यांची संख्या शंभरपटीने वाढली आहे. ग्रामीण भागात नागरिक कष्ट करून स्वर्ग निर्माण करतील. आज लाखो रुपयांचे कष्ट पाण्यात जात आहेत. हे दुःख कोणाला समजेल काय? आंबा राखणीसाठी आज लाखो रुपये खर्च होत आहेत. केळी, भाजीपाला, नारळ, फळभाज्या,फणस,चिकू,पेरू,पपई ,शेवगा,कुळीथ,उडीद, इ चे लाखो रुपयांचे उत्पन्न ही जोडी आणि त्यांची प्रचंड वाढलेली जमात फस्त करते.शिवाय नळे, पत्रे फोडणे यांचे नुकसान वेगळे. माकडे तर घरात घुसून नासधूस करायला लागली आहेत. अंगावर येण्याचे धैर्य त्याच्याकडे वाढत चालले आहे. आर्थिक नुकसान , हाकलण्याचे शारीरिक नुकसान आणि वेदना, हतबलता चे मानसिक नुकसान...किती सोसायचे?  

मागे मी पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत मांडले होते त्यावेळी वनाधिकारी माझ्याकडे येऊन नुकसान भरपाई जीआर देऊन गेले. त्यात प्रचंड त्रुटी आहेत. हे त्यांनाही माहीत आहे. पंचनामा त्यावरील सह्या, खाल्लेले नुकसान कसे दाखवणार,राखण साठी होणारा त्रास, नळे,पत्रे फोडलेले इ. बाबत भीक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती आहे. 

आज आम्ही कोकण सोडून इतर ठिकाणच्या भाजीपाला,शेवगा,चिकू,पेरू,केळी यांच्या बहरलेल्या बागा पाहतो. आम्ही आंबा,पपई,शेवगा,चिकू,पेरू,केळी,भाजीपाला इ. चे प्रचंड उत्पादन घेऊ शकतो. पण आम्ही हतबल आणि असहाय आहोत. खरतर कुणी वालीच नाही असं झालंय. 

हिमाचल प्रदेश मध्ये वानर आणि माकडे यांना उपद्रवी पशु जाहीर करून मारायला सुरुवात केली शिवाय मारण्यासाठी अनुदान देणे सुरू केले असे वाचनात आले. महाराष्ट्रातसुद्धा असं करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात कोकणातील शेतकरी आत्महत्या करू लागला तर आश्चर्य वाटायला नको. आज कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाही कारण इथे एक पीक पद्धतीऐवजी बहुपिक पद्धत आहे .दोन माड,दोन फणस,थोडी शेती,दोन कलमे,चार जांबी इ प्रत्येक घरात असल्याने त्याला काहीतरी मिळतं. मात्र आज वानर,माकडांनी त्यावर घाला घातला आहे. कोकणातील ग्रामीण भागातील ही परिस्थिती कोणी लक्षात घेईल काय? शहरात बसून सल्ले देणे खूप सोपे आहे. एकदा राहून अनुभवा..

या परिस्थितीतून कोकणी माणसाला दिलासा मिळेल काय? माणूस जगला पाहिजे की प्राणी जगला पाहिजे हे सुद्धा एकदा ठरवण्याची गरज आहे. सरकार उपद्रवी पशु म्हणून वानर,माकडे याना जाहीर करेल काय? नाहीतर रीतसर पत्र देऊन महिनाभरात आता उपोषणाला बसणार आहे. 

अविनाश काळे

९४२२३७२२१२

🙏🙏🙏🙏 मित्रांनो, प्रत्येक कोकणस्थाला भेडसवणारा व मनस्ताप देणार्या ह्या प्रश्नाला अविनाश काळे हे वाचा फोडत आहेत. कृपया आपण प्रत्येकाने हा मेसेज जितका प्रसारीत करता येईल तेवढा करा, जेणेकरुन हा मेसेज आपले सर्वपक्षीय राजकारणी व्यक्तींपर्यंत पोहचेल व काही ठोस निर्णय प्रशासन घेईल ही अपेक्षा.

👆🏿खरोखर परिस्थिती गंभीर आहे का?

असल्यास कोकणी माणूस गप्प?

Monday, 14 November 2022

बालदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री रमले मुलांमध्ये..

 बालदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री रमले मुलांमध्ये..

पांढऱ्या रंगाचेच कपडे का, दाढी का ठेवता.. ? मुलांचे कुतूहल अन् मुख्यमंत्र्यांची खुमासदार उत्तरे

            मुंबई, दि. 14 : परळच्या क्षा.म.स. संस्थेच्या डॉ. शिरोडकर शाळेमधील विद्यार्थ्यांना आज बालदिनाची अनोखी भेट मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात शाळेत आले.. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या..त्यांच्या मनातल्या प्रश्नांना थेट उत्तरे देताना मी याठिकाणी मुख्यमंत्री म्हणून नाही तर तुमच्यातलाच एक होऊन शाळेच्या आठवणी जागवायला आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकंदरीतच सुमारे तासभर चाललेल्या या बालदिनाच्या अनोख्या सोहळ्यात मुख्यमंत्री मुलांसोबत रमले.. त्यांच्यासोबत सेल्फी घेताना तेही त्यांच्यातलेच एक होऊन गेले.

            पांढऱ्या रंगाचे कपडेच का घालतात, दाढी का ठेवतात, शिक्षकांचा मार खाल्ला होता का..मुलांनी विचारलेल्या या भन्नाट प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी खुमासदार उत्तरे दिली.

            परळच्या डॉ. बोर्जेस रस्त्यावरील डॉ. शिरोडकर विद्यालयाच्या सभागृहात केजी पासून ते माध्यमिक वर्गापर्यंतचे विद्यार्थी जमले होते. निमित्त होते बालदिनाचे. मुख्यमंत्री सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास शाळेत आले. चिमुकल्यांनी स्वत: तयार केलेल्या शुभेच्छापत्रे, गुलाबाच्या फुलांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.

            बालदिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, एक विद्यार्थी म्हणून मी आज इथे माझ्या शाळेतल्या आठवणी जागवायला आलो आहे. बालपण महत्वाच असून त्यातला निरागसपणा सर्वांनी जपावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मोठं झाल्यावर जबाबदाऱ्या येतात त्यामुळे लहानपण देगा देवा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. अभ्यास करताना दडपण घेऊ नका असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला.

शिक्षकांचा मार खाल्ला का..?

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना मुलांनी बिनधास्तपणे मनातले प्रश्न विचारले त्यालाही त्यांनी तितक्याच मोकळेपणाने उत्तरे देखील दिली. एका विद्यार्थीने मुख्यमंत्र्यांना आई-बाबांचा, शिक्षकांच्या हातचा मार खाल्ला का असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री हसले आणि त्यांनी ठाण्यातील किसननगर मधील महापालिकेच्या शाळा क्रमांक 23 मधील आठवणी सांगितल्या. रघुनाथ परब नावाचे शिक्षक कसे शिक्षा करायचे याचा अनुभव सांगतानाच लहानपणापासून दुसऱ्याला मदत करण्याची आवड होती. समाजकारणातून राजकारणात आल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

लग्नासाठी काढली दाढी..

            तुम्ही दाढी का नाही करत असा प्रश्न विचारल्यावर माझे गुरू धर्मवीर आनंद दिघे दाढी ठेवायचे त्यामुळे मी देखील दाढी ठेवली. लग्नाच्या वेळेस दाढी काढल्याचे सांगतानाच दाढीची कमाल आणि किमया सगळ्यांना माहित असल्याचे मुख्यमंत्री मिष्कीलपणे म्हणाले.

पांढरा रंग आवडतो कारण...

            मला पांढरा रंग आवडतो कारण तो सगळ्या रंगात सामावून जातो असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले तर मराठी शाळेची पटसंख्या वाढावी यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मातृभाषेत शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये मुलांचा ओढा वाढला पाहिजे, स्पर्धात्मक जगात मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.

मैदानी खेळ खेळावेत

            मला फुटबॉल, क्रिकेट खेळायला, पाहायला आवडतात. मैदानी खेळ नेहमी खेळायचो. आता मोबाईलच्या जमान्यात देखील विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. विद्यार्थी भविष्य असून ते या देशाचे, राज्याचा पाया असल्याचे सांगत विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्याचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री आपल्यातलेच एक होऊन गप्पा मारताय हे पाहून चिमुकल्यांनी निरागसपणे त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली.

००००

महाराष्ट्र चेंबर व सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सामंजस्य करारा

 महाराष्ट्र चेंबर व सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सामंजस्य करारामुळे दोन्ही राज्याच्या व्यापार उद्योगांचा विकास होईल - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.

महाराष्ट्र व उत्तराखंड राज्यातील गुंतवणुकीसाठी सहकार्याचे ललित गांधी यांना उत्तराखंडचे उद्योग मंत्री चंदन राम दास यांचे आश्वासन.

            ''सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन'' व ''महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चर'' यांच्यात सामंजस्य करार

            राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंड आणि महाराष्ट्र राज्यातील व्यापार उद्योगांच्या विकासासाठी ''सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन'' व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चर यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे कौतुक केले. महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची प्रशंसा केली. महाराष्ट्र चेंबर व सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सामंजस्य करारामुळे दोन्ही राज्याच्या व्यापार उद्योगांच्या विकासासाठी महत्वपूर्ण व सकारात्मक पाऊल टाकल्याने विकास निश्चित होईल असे प्रतिपादन केले. 

            उत्तराखंडचे उद्योग मंत्री माननीय श्री. चंदन राम दास यांनी उत्तराखंड सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उत्तराखंड मध्ये व्यापार उद्योगांसाठी पोषक वातावरण असून दोन्ही राज्यातील उद्योगांच्या गरजेनुसार गुंतवणुकीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना दिले. तसेच महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळास उत्तराखंडच्या भेटीचे निमंत्रण दिले. 

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र चेंबरतर्फे ''इन्वेस्ट इन महाराष्ट्र'' अभियान सुरु करण्यात आले असून इतर देशांबरोबरच भारतातील इतर राज्यांबरोबर विविध उपक्रम राबविण्यात येत असून सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनसमवेत सामंजस्य करार करून दोन्ही राज्यातील व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रातील उत्पादनांची आयात-निर्यात करणे, दोन्ही राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी संयुक्त उपक्रम राबविणे, माहितीची देवाण-घेवाण करण्यात येणार आहे. या सामंजस्य करारामुळे दोन्ही राज्यांचा विकास होण्यास मदत होईल असे सांगितले. तसेच महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्यात व्यापार उद्योग वाढीसाठी महिला उद्योजकता अभियान, उद्योग वृद्धी यात्रा, महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्सपोचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. उत्तराखंडमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी महाराष्ट्र चेंबरमध्ये गुंतवणूक केंद्र स्थापन करण्यात येईल असे आश्वासन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी उत्तराखंडचे उद्योग मंत्री श्री. चंदन राम दास यांना दिले. सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हरिंद्र कुमार गर्ग यांनी उत्तराखंडमध्ये व्यापार उदयोगांच्या संधींबाबत माहिती दिली. तसेच व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्रासाठी उत्तराखंडमध्ये गुंतवणूक करण्यास सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले. व्यापार उद्योगांच्या विकासासाठी माहितीची देवाण -घेवाण करून व्यापार उद्योगांचा विकास करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. 

             ''सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन'' व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चर यांच्यात सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी सामंजस्य करार मान. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उत्तराखंडचे उद्योग मंत्री श्री. चंदन राम दास, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हरिंद्र कुमार गर्ग यांच्या उपस्थितीत राजभवन येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आला.   

            याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन सौ. संगीता पाटील, पर्यटन समितीचे चेअरमन संतोष तावडे, इंटरनॅशनल रिलेशन्स कमिटीचे चेअरमन मनप्रीत नेगी, टॅक्सेशन कमिटीचे चेअरमन उदय गोडबोले, इंटरनल ट्रेड कमिटीचे चेअरमन प्रदीप मांजरेकर, ट्रेड असोसिएशन कमिटीचे चेअरमन धैर्यशील पाटील, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे व उत्तराखंडमधील उद्योजक जगदीश लाल पहावा डॉ. मोहिंदर आहूजा, रणजीत जालान, सुयश वालिया, राकेश कुमार त्यागी, जतीन अग्रवाल, सुरेश बोरा, सुभाष शर्मा, अनिल कुमार, शैलेश अजमेरा, कुणाल दाढीया, विमलकुमार सिंग, खुबिलाल राठोड हे उद्योजक उपस्थित होते.

बालभारती’ चित्रपटाच्या ट्रेलरचे शालेय शिक्षण मंत्री

 बालभारती’ चित्रपटाच्या ट्रेलरचे शालेय शिक्षण मंत्री

दीपक केसरकर यांच्या हस्ते अनावरण.

            मुंबई, दि. 14 - इंग्रजी ही संपर्काची भाषा असली तरीही ती सर्वस्व नाही. मातृभाषेतून दिलेले शिक्षण प्रभावी ठरते त्यामुळे शासन मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन देत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘बालभारती’ हा चित्रपट याच विषयावर आधारित असल्याने तो लोकप्रिय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते ‘बालभारती’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन नंदन, निर्माते कोमल आणि संजोय वाधवा, कलावंत सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर आणि शालेय विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री.केसरकर म्हणाले, अनेक समृद्ध देशांमध्ये त्यांच्या मायबोलीचाच वापर केला जातो. भारतात देखील नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे. न्यायालयाचे कामकाज मराठीतून व्हावे, यासाठी न्यायालयांनीही पुढाकार घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण हे ओझे वाटू नये आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावला जाऊ नये असा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते चित्रपटातील कलावंत आणि तंत्रज्ञांचा सत्कार करण्यात आला.

गोद्री येथील कुंभ महोत्सवसाठी चोख व्यवस्था करा

 गोद्री येथील कुंभ महोत्सवसाठी चोख व्यवस्था करा

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

             मुंबई, दि. १४ : जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी देशभरातून अंदाजे 50 ते 60 हजार भाविक अपेक्षित आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी सर्व व्यवस्था चोखपणे करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

               जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे होणाऱ्या 'अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३' बाबत सह्याद्री अतिथगृह येथील पूर्वतयारी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

             बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव (परिवहन) पराग जैन नानोटिया, प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे, अन्न व प्रशासनचे (आयुक्त) अभिमन्यू काळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, बांधकाम विभागाचे सचिव एस. एस.साळुंखे, जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल, जळगावचे जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            श्री.फडणवीस म्हणाले की, या कार्यक्रमासाठी देशभरातून हजारो भाविक येतील. त्यामुळे कार्यक्रम स्थळी पायाभूत सुविधा चोख असाव्यात. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करावे. या कार्यक्रमाच्या नियोजनातील सर्व विभागांतील कामांच्या समन्वयासाठी जिल्ह्याचे पालक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती करावी. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून भाविकांना एक चांगला अनुभव घेता आला पाहिजे, अशा सुविधा सर्व यंत्रणांनी द्याव्यात. सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, ऊर्जा विभाग, ग्रामविकास विभाग, गृह विभाग यांनी त्यांना दिलेल्या जबाबदारी पार पाडाव्यात. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास नियोजन समितीमार्फत त्या सोडविण्यात येतील.

             श्री.फडणवीस म्हणाले की, गोद्री येथे जाणारे प्रमुख मार्ग, रस्त्यांची कामे सावर्जनिक बांधकाम विभागाने त्वरित हाती घेवून पूर्ण करावीत. गोद्री गावात हेलिपॅड तयार करणे, अतिक्रमण काढणे ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. पिण्याचे पाणी, स्नानगृह, सांडपाणी व्यवस्था करावी. ऊर्जा विभागाने या ठिकाणी नवीन व तात्पुरत्या स्वरुपात ट्रान्सफॉर्मर लावणे, विजेच्या उपक्रेंद्राची क्षमता वाढविणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे या कामाला प्राधान्य द्यावे. परिवहन विभागाने कुंभस्थानी तसेच गोद्री येथे जाण्यासाठी जादा बसेस सोडाव्यात व गर्दी होऊ नये यासाठी वाहतूकीचे नियोजन करावे. ग्रामविकास विभागाने महिला बचतगटांचे स्टॉल्स लाववावेत, वैद्यकीय सुविधा, कायदा व सुव्यवस्था देखील चोख ठेवावी.

            अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत सादरीकरण केले.

***

Featured post

Lakshvedhi