Monday, 14 November 2022

महाराष्ट्र चेंबर व सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सामंजस्य करारा

 महाराष्ट्र चेंबर व सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सामंजस्य करारामुळे दोन्ही राज्याच्या व्यापार उद्योगांचा विकास होईल - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.

महाराष्ट्र व उत्तराखंड राज्यातील गुंतवणुकीसाठी सहकार्याचे ललित गांधी यांना उत्तराखंडचे उद्योग मंत्री चंदन राम दास यांचे आश्वासन.

            ''सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन'' व ''महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चर'' यांच्यात सामंजस्य करार

            राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंड आणि महाराष्ट्र राज्यातील व्यापार उद्योगांच्या विकासासाठी ''सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन'' व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चर यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे कौतुक केले. महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची प्रशंसा केली. महाराष्ट्र चेंबर व सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सामंजस्य करारामुळे दोन्ही राज्याच्या व्यापार उद्योगांच्या विकासासाठी महत्वपूर्ण व सकारात्मक पाऊल टाकल्याने विकास निश्चित होईल असे प्रतिपादन केले. 

            उत्तराखंडचे उद्योग मंत्री माननीय श्री. चंदन राम दास यांनी उत्तराखंड सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उत्तराखंड मध्ये व्यापार उद्योगांसाठी पोषक वातावरण असून दोन्ही राज्यातील उद्योगांच्या गरजेनुसार गुंतवणुकीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना दिले. तसेच महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळास उत्तराखंडच्या भेटीचे निमंत्रण दिले. 

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र चेंबरतर्फे ''इन्वेस्ट इन महाराष्ट्र'' अभियान सुरु करण्यात आले असून इतर देशांबरोबरच भारतातील इतर राज्यांबरोबर विविध उपक्रम राबविण्यात येत असून सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनसमवेत सामंजस्य करार करून दोन्ही राज्यातील व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रातील उत्पादनांची आयात-निर्यात करणे, दोन्ही राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी संयुक्त उपक्रम राबविणे, माहितीची देवाण-घेवाण करण्यात येणार आहे. या सामंजस्य करारामुळे दोन्ही राज्यांचा विकास होण्यास मदत होईल असे सांगितले. तसेच महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्यात व्यापार उद्योग वाढीसाठी महिला उद्योजकता अभियान, उद्योग वृद्धी यात्रा, महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्सपोचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. उत्तराखंडमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी महाराष्ट्र चेंबरमध्ये गुंतवणूक केंद्र स्थापन करण्यात येईल असे आश्वासन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी उत्तराखंडचे उद्योग मंत्री श्री. चंदन राम दास यांना दिले. सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हरिंद्र कुमार गर्ग यांनी उत्तराखंडमध्ये व्यापार उदयोगांच्या संधींबाबत माहिती दिली. तसेच व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्रासाठी उत्तराखंडमध्ये गुंतवणूक करण्यास सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले. व्यापार उद्योगांच्या विकासासाठी माहितीची देवाण -घेवाण करून व्यापार उद्योगांचा विकास करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. 

             ''सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन'' व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चर यांच्यात सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी सामंजस्य करार मान. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उत्तराखंडचे उद्योग मंत्री श्री. चंदन राम दास, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हरिंद्र कुमार गर्ग यांच्या उपस्थितीत राजभवन येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आला.   

            याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन सौ. संगीता पाटील, पर्यटन समितीचे चेअरमन संतोष तावडे, इंटरनॅशनल रिलेशन्स कमिटीचे चेअरमन मनप्रीत नेगी, टॅक्सेशन कमिटीचे चेअरमन उदय गोडबोले, इंटरनल ट्रेड कमिटीचे चेअरमन प्रदीप मांजरेकर, ट्रेड असोसिएशन कमिटीचे चेअरमन धैर्यशील पाटील, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे व उत्तराखंडमधील उद्योजक जगदीश लाल पहावा डॉ. मोहिंदर आहूजा, रणजीत जालान, सुयश वालिया, राकेश कुमार त्यागी, जतीन अग्रवाल, सुरेश बोरा, सुभाष शर्मा, अनिल कुमार, शैलेश अजमेरा, कुणाल दाढीया, विमलकुमार सिंग, खुबिलाल राठोड हे उद्योजक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi