Friday, 4 November 2022

सुप्रभात

 *अपने खराब मूड के समय बुरे शब्द ना बोलें, क्योंकि.. खराब मूड को बदलने के बहुत मौके मिलेंगें, पर शब्दों को बदलने के मोके नहीं...मिलेंगे*.!!!!

              

🌞 सुप्रभात🌞


आपका दिन शुभ एवं मंगलमय हो!

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा

 *#कार्तिक_वारी 2022 निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई मुळे रात्रीच्या वेळी दिसणारे मंदिराचे नयनरम्य दृश्य ...*


सुप्रभात

 *क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते . नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघार ही घ्यावी लागते . माणसानं आयुष्यात नक्की झुकावं पण योग्य ठिकाणीच . नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तुडवून मोकळे होतात* .

           *सुप्रभात*💐💐💐

Thursday, 3 November 2022

Jag manava jag

 केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते?😳 

    नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते?😳

     केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार...😊

सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते? 

सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव...😊 

काय उपयोग सांग मानवा

अशा या दान धर्माचा ??😳

कधी शेतक-याला बियाणं

दान देऊन बघ... 😊

कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ.... 😊

कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ... 😊

कधी एखाद्या उपाश्याला घlस भरवुन बघ...😊

कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ...😊

कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ...😊

कधी एखाद्या वृध्दाश्रमास

दान करून बघ....😊

कधी एखाद्या आश्रमातील

निराधारांवर प्रेम करून बघ...😊

एकदा दान धर्माच्या व्याख्या

बदलून तर बघ !!😊

जेव्हा मंदिरात आणि मस्जीद मध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल...😇

पुस्तकानं माणसाच मस्तक सशक्त होत...😇

सशक्त झालेलं मस्तक

कुणाच हस्तक होत नसत...😇

आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...! 😇

शाळेचे छत गळके आणि

मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?😳

शाळेत आज मुलांना बसायला

साधी फरशी नाही मंदिराला मात्र संगमरवरी ?😳

शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही...😔

आपला भारत नक्की महासत्ता होणार?😳

पायात घालायची चप्पल AC मधे विकायला ठेवतात आणि

भाजीपाला फूटपाथवर...😔

म्हणे आमचा देश कृषी प्रधान

आणि आत्महत्या करतो शेतकरी...😔

शेकडो मैल चालतो वारकरी...😳

अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो .......! 😊


वाचा,

विचार करा,

(एका ग्रुप वरून आलेली हि माहिती,प्रबोधन करणारी वाटली म्हणून आपल्या ग्रुप वर टाकली.)

आपले लाईट बील कमी करून घ्या*!

 *आपले लाईट बील कमी करून घ्या*!


सामान्य ग्राहक, मंदिर ट्रस्ट मधील सभासद जागृत व्हा!


औद्योगिक ग्राहक, DCCC व्यावसायिक ग्राहक, व्यापारी ग्राहक, असे सर्व वीज ग्राहकांनी वीज दरवाढ बाबत हरकती नोंदवा!


सध्या एक मेसेज फिरतो आहे की मंदिराला 7.85 रुपये प्रती युनिट दर तर मशीद आणि चर्चला मात्र 1.85 रुपये प्रति युनिट दर लागू आहे.


सर्व धार्मिक स्थळावरील मीटर रीडिंग हे तीनशे युनिट पेक्षा जास्त होते त्यामुळे रुपये 7.85 असा दर निश्चितच त्यांना पडतो परंतु MERC ने मागे मंजुरी दिल्यामुळे मशीद आणि चर्चना वीज दर वाढीमध्ये सवलती मिळत आहेत पण मंदिरांना मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. 


मंदिर, मस्जिद, चर्च यांचे इलेक्ट्रिसिटीचे दर मधील तफावत दूर करणे साठी आपण ग्राहक म्हणून खालील गोष्टी केल्या पाहिजेत.


तीनही धार्मिक स्थळे ही ग्राहक आहेत आणि प्रत्येक ग्राहकांना तोच दर लावला पाहिजे परंतु Maharastra Electricity Regulatory Authority 

(MERC) दर rivision साठी नोटिफिकेशन काढते तेव्हा एकूणच सर्व ग्राहक त्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. 


परंतु ग्राहक म्हणून आपण सर्व गोष्टी पहात नाही आणि त्यातील ज्या तरतुदी असतात त्यावर वेळीच ऑब्जेक्शन/आक्षेप घेत नाही. 


त्यामुळे सदर आक्षेप घेतला नाहीतर नंतर कितीही तक्रारी केल्या तरी त्यावर काहीही होणार नाही.


MERC ने २९ ऑक्टो २०२२ रोजी वीज ग्राहकांना पुढील साधारण ५-६ वर्षासाठी होणारी वीज दर वाढ, सवलती, गळती इत्यादी बाबत सर्व ग्राहकांकडून हरकती मागवल्या आहेत.


आपण याबाबत www.MERC.gov.in या संकेत स्थळावर सदर दर वाढ बाबतचे प्रारूप प्रसिद्ध केले आहे ते नक्की वाचा. हातातील मोबाईलचा चांगला वापर करा.


सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांनी याबाबत आपल्या हरकती, सूचना या इमेलने पाठवा. त्यासाठी खालील ईमेल आयडी आहे.

 suggessions@merc.gov.in 


आपणास पोस्टाने पाठवायच्या असतील तर त्या महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग, 13 वां मजला, केंद्र क्र १, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई ४००००५ इथे पाठवा.


2016 नंतर आता ६ वर्षांनी हे दर बदल होत आहेत आणि ते पुढील ५-६ वर्षासाठी लागू होतील.


सर्व मंदिर प्रशासनातील सदस्यांनी याबाबत जास्त लक्ष द्यावे आणि सर्व धार्मिक स्थळांना सारखे दर हवेत ही मागणी करावी.


बऱ्याच हिंदू धार्मिक स्थळांवरील ट्रस्ट मध्ये कलेक्टर हे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यामुळे ते याबाबत कदाचित पुढाकार घेणार नाहीत परंतु सेक्रेटरी आणि इतर सभासद यांनी याबाबत आपली बाजू मांडून वीज बिलातील ही तफावत दूर करणे साठी प्रयत्न करावेत.


नकारात्मक पोस्ट फॉरवर्ड करणे पेक्षा सकारात्मक काम करू आणि ग्राहक म्हणून आपण सर्वजण एकत्रित रित्या MERC कडे हरकती नोंदवू.


आपण प्रत्येक वीज ग्राहकाने हरकती नोंदवल्या पाहिजेत. ग्राहक संघटना हरकती घेतील आपण कशाला हरकती नोंदवायच्या असा विचार करू नका.


सर्व ग्राहक मित्रानो, चला संघटित होऊ आणि वेळीच हरकती घेऊ आणि पुढील ५-६ वर्षे अकारण वीज दरवाढ होणार नाही याची काळजी घेऊ.


विजय सागर,

अखिल भारतीय ग्राहक पंचायत,

६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.


आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी अवश्य संपर्क करावा. 


आमची वेबसाईट :

www.abgpindia.com


विजय सागर

अखिल भारतीय ग्राहक पंचायत

६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.


मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: 

*दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*


विजय सागर

9422502315

श्री विलास लेले

9823132172

सौ अंजली देशमुख

9823135803

श्रीमती विजया वाघ

9075132920

श्री रवींद्र वाटवे

9422383785

श्रीमती राजश्री दीक्षित

9422318909

श्री रवींद्र सिन्हा, बाणेर

7774001188

श्री विश्वास चव्हाण,धानोरी

7769978484

श्री अरुण नायर,विश्रांतवाडी

9890652675


*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,


श्री दिपक सावंत 9833398012


*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 

*सातारा* - शुभदा नागपूरकर 7972477892

*अहमद नगर* - अतुल कुऱ्हाडे 9860365551

*नाशिक* - रवींद्र अमृतकर 9860798999

*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881

*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103

*पंढरपूर*- 

शशी कांत हरीदास 

9423536395

*सांगली* - सुर्यवंशी सर्जेराव 9763722243

*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979

*नंदुरबार* - वदंना तोरवणे

9421526777.

टेलिमेडिसिन सुविधा केंद्रांचे

 टेलिमेडिसिन सुविधा केंद्रांचे

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ४ आणि ५ नोव्हेंबरला उद्घाटन.

                 मुंबई, दि. 3 :- राज्यातील गोरगरिब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध व्हावी आणि सर्व तपासण्या गावातच आणि त्याही तात्काळ मिळण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण यांनी पहिले पाऊल टाकले आहे.


                 पालकमंत्री चव्हाण हे स्वखर्चाने न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीने विकसित केलेले “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” उपलब्ध करुन देणार आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये टेलिमेडिसिनच्या माध्यमातून प्रत्येकी दोन आरोग्य केंद्रामध्ये हे अत्याधुनिक हेल्थ केअर किट्स उपलब्ध होणार आहेत. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ०९.३० वा. कुडाळ येथील माणगावं प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तसेच ५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ०३.०० वाजता सावंतवाडी मधील बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सुविधा केंद्र येथे होणार आहे.


                 सिंधुदुर्गनंतर रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड येथे टेलिमेडिसिनच्या माध्यमातून ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यामधील गरजू जनतेला वैद्यकीय चाचण्यांची सुविधा मोफत व तात्काळ उपलब्ध होऊ शकेल, जेणेकरुन गरजू रुग्णांना मिळणारे उपचार अधिक जलदगतीने होण्यास त्याची मदत होईल असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.


                 न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. या कंपनीचे संस्थापक सीईओ समीर सावरकर व संस्थापक सीओओ राजीव कुमार असून दोघेही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरचे माजी विद्यार्थी आहेत. श्री समीर हे अशोका फेलो देखील आहेत. न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही ISO13485-2016 आणि CE प्रमाणित, वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित उत्पादनांसह स्वदेशी वैद्यकीय उपकरणे तयार करणारी डिजिटल हेल्थकेअर कंपनी असून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग (DSIR) मान्यताप्राप्त अशी न्यूरोसिनॅप्टिकची R&D लॅब आहे. कंपनीने “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” हे उपकरण तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) आणि भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग ( BIRAC ) ह्यांच्या सहकार्याने आविष्कृत केले आहे. विशेष म्हणजे कंपनीने 'मेक इन इंडिया' अंतर्गत पूर्णतः भारतीय तंत्रज्ञान वापरून “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” विकसित केले आहे.


                 न्यूरोसिनॅप्टीक गेली अनेक वर्षे ई-हेल्थ व एम-हेल्थ टेक्नोलॉजी सोल्युशन्स या क्षेत्रात काम करत आहे. सामाजिक जबाबदारीचे भान राखून खाजगी रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तसेच परदेशातही टेलिमेडिसिनच्या माध्यमातून कंपनी तर्फे याच प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” हे भारतातील विविध राज्यांमध्ये उपलब्ध असून आजतागायत देशभरातील सुमारे २७०० ग्रामीण केंद्रात सदर सुविधा स्थापन करुन दिलेली आहे.


                 न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन्सला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मान्यता प्राप्त आहेत ज्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्मचा "टेक्नॉलॉजी पायोनियर", नॅसकॉम फाउंडेशनचा "ज्यूरीज स्पेशल चॉईस" आणि नुकताच मिळालेला " रेड हॅरींग ग्लोबल टॉप १०० कंपनीज" असे प्रतिष्ठित पुरस्कार समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे ह्या क्षेत्रातील न्यूरोसिनॅप्टीक ही एकमेव भारतीय कंपनी आहे जीचा गौरव “टाईम मॅगझिन”ने केला आहे.


                 माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम ह्यांनी उदघाटन करून राष्ट्राला समर्पित केलेले हे “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” आता महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अतिशय सोयीचे आणि लाभदायक ठरणार आहे असे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.


0000

विकास योजना आणि प्रकल्पांची माहिती

 विकास योजना आणि प्रकल्पांची माहिती

मुख्यमंत्री डॅशबोर्डद्वारे मिळणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. 3 : राज्य शासनाच्या महत्वाच्या विकास योजना आणि महत्वाच्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती नेमकी काय आहे, त्यात काय अडचणी आहेत याची माहिती मुख्यमंत्री (सीएम) डॅशबोर्डद्वारे तत्काळ मिळणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुख्यमंत्री डॅशबोर्डची रचना वापरकर्त्यांसाठी सुलभ आणि सहज असण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


            मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रुममध्ये मुख्यमंत्री डॅशबोर्डसंदर्भात सादरीकरण आणि मध्यप्रदेश मुख्यमंत्री डॅशबोर्डचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व तंत्रज्ञानचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, उपमुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री डॅशबोर्डच्या पुढील नियोजन आणि अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहेत. या बैठकीत आज सुचविण्यात आलेल्या मुद्दयांचा विचार करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री डॅशबोर्डबाबत पुन्हा एकदा सविस्तर चर्चा होणार असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

            “एखाद्या जिल्ह्यातील योजनेवर कशाप्रकारे अंमलबजावणी सुरू आहे, हे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यालयात बसूनच यापुढे कळेल अशी रचना या मुख्यमंत्री डॅशबोर्डची असणार आहे. यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे एक पथक नियुक्त करण्यात येईल. मुख्यमंत्री डॅशबोर्डचा भर प्रामुख्याने सामान्यांना देण्यात येणाऱ्या सेवा, महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या योजना आणि विकास प्रकल्पांची माहिती, सर्वसामान्यांनाकडून येणाऱ्या तक्रारी आणि महत्वाच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य या चार बाबींवर असेल”, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.


            श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मुख्यमंत्री डॅशबोर्डद्वारे शासनाचे सर्व विभाग तसेच त्यांच्या सर्वसामान्यांसाठी असलेल्या सेवा ऑनलाईन स्वरुपात मिळणार आहेत.24 तास ऑनलाईन सेवा आणि समस्यांचे तत्काळ निराकरण यामुळे मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना मुख्यमंत्री डॅशबोर्डचा फायदा होणार आहे.


            “मुख्यमंत्री डॅशबोर्डचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महत्वाच्या प्रकल्पांची सद्यस्थिती तत्काळ समजण्यास मदत होणार आहे. विविध विभाग, सेवा आणि अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे, जिल्हा आणि तहसील पातळ्यांवर नेमकी काय प्रगती सुरू आहे, हे मुख्यमंत्री डॅशबोर्डाद्वारे समजण्यास मदत होईल”, असे उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.


            यावेळी उपस्थितांना मध्यप्रदेश मुख्यमंत्री डॅशबोर्ड तसेच मुख्यमंत्री हेल्पलाईनचे काम कसे होते याबाबतची पूर्ण माहिती दूरदृश्यप्रणालीद्वारे देण्यात आली.

Featured post

Lakshvedhi