Saturday, 29 October 2022

दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा

 दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालणे आवश्यक

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर

 

            मुंबई दि. 28 :- दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशातील सदस्यांनी सहकार्य करावेअसे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे झालीत्यावेळी ते बोलत होते.

            दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत (26/11) झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकरसंयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष तथा गॅबॉन प्रजासत्ताक देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मायकल मौस्सा अडामो प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्षा आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत श्रीमती रूचिरा कंबोज यांनी केले.

            भारत 2022 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचा अध्यक्ष आहे. या समितीमध्ये सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्रसंघाच्या 15 देशांतील राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची दोन दिवसीय बैठक भारतात होत आहे. उद्या दिल्ली येथे बैठक आहे. मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे बैठक झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीने 'दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याशी लढाया विषयावर अनौपचारिक चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. यात स्थानिक आणि क्षेत्रीय पातळीवरील उपाययोजनांसंदर्भात चर्चा झाली.

            परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर म्हणालेदहशतवाद विरोधात लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. दहशतवाद आणि त्यांच्या प्रायोजकांविरुद्ध ठोस कारवाई करावी लागेल. दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थानेप्रशिक्षण स्थळे शोधून त्यांना असलेले राजकीय समर्थन आर्थिक आणि वैचारिक संरक्षण नष्ट करणे आवश्यक आहे.

            गेल्या काही वर्षांतदहशतवादी गटांनी त्यांना मिळत असलेल्या मिळकतीच्या पद्धतीमध्ये  विविधता आणली आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. वित्तपुरवठ्यासाठी उपलब्ध असलेल्या अनामिकतेचा फायदा घेऊन व्हर्च्युअल चलने वापरून निधी उभारणी सुरु केली आहे. या संदर्भातअधिक विचारमंथन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला विचारात घेऊन नाविन्यपूर्ण उपाय योजण्यासाठी उद्या नवी दिल्ली येथे होणाऱ्या समितीच्या विशेष बैठकीत चर्चा होईलअशी अपेक्षा डॉ. जयशंकर यांनी व्यक्त केली.

दहशतवादविरोधी लढाई सामूहिकपणे लढणे गरजेचे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

          दहशतवादविरोधी लढाई ही सर्वांनी एकत्रितपणे आणि एकजुटीने लढणे गरजेचे आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केले. या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीची महत्वपूर्ण परिषद मुंबईत झाली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी ज्या ताजमहाल हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला तेथे या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल संयुक्त राष्ट्र समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना त्यांनी मनापासून धन्यवाद दिले.

            देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाच्या सुरक्षेविषयी महत्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांसह सर्व राज्याचे गृहमंत्री उपस्थित असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी यावेळी दिली.

26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली

          सुरूवातीला दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत (26/11) झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. गॅबॉन प्रजासत्ताकचे परराष्ट्र मंत्री तथा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष मायकेल मौस्सा अडामो यांच्यासह भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्षा आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत रूचिरा कंबोज यांनी केले.

0000

महत्वाची क्षणचित्रे :-

·        श्रद्धांजली वाहताना उपस्थित सदस्यांमध्ये गॅबॉनमेक्सिकोभारतनॉर्वेघानाचीनयुकेमाल्टायुएईमोझांबिकअल्बानियाइक्वाडोरब्राझीलस्वित्झर्लंडरशियाजपानयुएसएयुएसजी युएनओसिटीफ्रान्सआयर्लंडएईडी सिटीईडीयुएनआरसीकेनियाच्या प्रतिनिधींचा समावेश होता.

·        दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांनी मनोगत व्यक्त केले. यात छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर जखमी झालेली देविका रोतवालहवाई सुंदरी निधी चाफेकरताज हॉटेलचे महाव्यवस्थापक करणबीर सिंग यांनी आपले अनुभव कथन केले. तरत्यावेळी दोन वर्षाचा असलेला मोशे याने ध्वनिचित्रमुद्रीत संदेश दिला.

·        शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन त्यांच्या पत्नी श्रीमती वैशाली तुकाराम ओंबळे यांच्या समवेत उपस्थित सदस्यांनी छायाचित्र घेतले.

 ·        केंद्र शासनाचे सहसचिव शफी रिझवी यांनी 'दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याशी लढाया विषयावर सादरीकरण केले.

 ·        केंद्रीय सह सचिव पंकज ठाकूर यांनी 26/ 11 रोजी झालेला हल्लात्यात हुतात्मा झालेले लोकतपासाची पद्धती आणि काही महत्वपूर्ण घडामोडींबाबत यावेळी सादरीकरण केले. दहशतवादी साजिद मीर याची कट रचत असताना करत असलेल्या संवादाची ध्वनीफीत देखील ऐकविली.

·        यावेळी संयुक्त राष्ट्र परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या सदस्य राष्ट्राच्या प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. यात युकेयुएसएयुएईब्राझिलरशियाफ्रान्सआयर्लंडकेनियामॅक्सिकोनॉर्वेचीन आदींचा समावेश होता.

·        संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी नुकतीच हॉटेल ताज येथे भेट देऊन 26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली होती. या कार्यक्रमाची ध्वनीचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

 ·        26/11चा हल्ला आणि त्याविषयाची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. यासंदर्भातील प्रदर्शन यावेळी लावण्यात आले.

·        हा कार्यक्रम परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आयोजित केला होता.

00000


 

Cyber inteligence युनिट

 महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार

सुरजकुंड येथील बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

 

            सुरजकुंडहरयाणादि. 28 : सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरजकुंड येथील चिंतन शिबिरात दिली.

            केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत देशभरातील विविध राज्यांचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर हरयाणातील सुरजकुंड येथे आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या बैठकीला संबोधित केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनेक विषयांवर या बैठकीत मंथन करण्यात आले.

            या बैठकीत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीसायबर इंटिलिजन्स युनिट हा एक समर्पित सिंगल प्लॅटफॉर्म असेल. या माध्यमांतून सायबर गुन्ह्यांना आळा घालणारे जागतिक मॉडेल तयार होईल. सरकारी आणि खासगी बँकावित्तीय संस्थासोशल मीडिया संस्थानियामक संस्थासायबर पोलिसतंत्रज्ञ असे सर्व या व्यासपीठावर एकत्रित राहणार असूनत्यातून गतिमान प्रतिसादाची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर असेल. अलिकडच्या काळात आर्थिक आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत येणाऱ्या काळात कदाचित या गुन्ह्यांचीच संख्या अधिक असेल. ही संस्था आधीच त्यादृष्टीने सज्जता असेल.

            ही बैठक आयोजित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीकोणताही गुन्हा किंवा कायदा-सुव्यवस्था हा प्रश्न केवळ कोणत्याही एका राज्याचा प्रश्न नसतोतर अनेक राज्यांना एकाचवेळी त्याचा सामना करावा लागतो. या बैठकीच्या माध्यमांतून केंद्र आणि राज्यात समन्वयाची उत्तम व्यवस्था तयार करण्यात आलीयाबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांचे मी विशेष आभार मानतो.

            ‘सीसीटीएनएस’मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक गतीने कार्यवाही पूर्ण केली. ‘अ‍ॅम्बीस’च्या माध्यमांतून सुद्धा मोठी प्रगती राज्य सरकार करते आहे. सुमारे 6 लाखांहून अधिक गुन्हेगारांचे बायोमेट्रीक रेकॉर्ड तयार करण्यात आले आहेत. याला सीसीटीएनएसशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे नाव बदलून अन्य राज्यांत पुन्हा गुन्हे करणाऱ्यांना ओळखणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे सोपे होणार आहे. सीसीटीव्हीच्या जाळ्याला सायबर पोलिसांशी जोडल्यामुळे गुन्ह्यांचा तपास वेगाने होणार आहे. चालान प्रणाली आणि एकच ऑनलाईन कोर्ट यामुळे मनुष्यबळाची सुद्धा बचत होते आहे. ऑनलाईन ट्रेनिंग प्रणालीमुळे प्रशिक्षणाला गती मिळते आहे. राज्यात 20 हजार पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईला गती देण्यात आली असूनयात केंद्र सरकारची मोठी मदत मिळत आहे. शहरी नक्षलवादाचा धोका मोठा आहे. त्याविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांतून अपराध सिद्धीचा दर वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे. सागरी सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत आहेअशीही माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिली.

0000




Today


 

Art








 

Chhat पूजा























 

Anadashram khopoli🌈🌈🌈

 Anadashram khopoli🌈🌈🌈

*"मला फक्त मज्जा हवीये"* (Todays Goal of Every Youth)

तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे? 

प्राचीन काळी "ज्ञानप्राप्ती आणि परमार्थसाधना" हे उदात्त उत्तर मिळत असे.

अर्वाचीन काळी "प्रापंचिक सुख" हे व्यवहारात बसेल इतपत उत्तर देत असत. 

आत्ता काल-परवा "पैसा, समाधान, शांती" हे शब्द ऐकू यायचे. 

हल्ली थेट विकेट पडते -

"मला फक्त मज्जा करायचीये". 

विषय संपला. 

 "मज्जा केलीच पाहीजे" ही बळजबरी माणसं एकमेकांच्या ऊरावर पांघरू लागलीयेत.

इथे "मज्जा" ही निवडीची गोष्ट राहीली नाहीये; ती "निकड" झालीये; केली गेलीये. मज्जा कशी करायची हे निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही; ती समाजातल्या "मॉडर्न" शहाण्यांनी (!) आखून दिलेल्या पद्धतीनेच व्हायला हवी. 

तशी ती नाही केली म्हणजे फालतू आहात तुम्ही, हे तुमच्या तोंडावर फेकून मारलं जातंय. म्हणजे पहा -

"बर्थडे सेलिब्रेशन घरात? शी..."

"पार्टी नाही? शी..."

"फ्रायडे नाईट, आणि तू घरी आहेस? शी... पथेटिक..."

तुम्ही घरी स्वयंपाक वगैरे करून खाता विकेंडला!? फारच बोरिंग ....

"तू आजवर कधी पब मध्ये गेलीच नाहीस? काय काकूबाई आहेस गं..."

"वेलेन्टाईन डे; आणि नो रोजेस? शी, बोअर..."

"डेटवर चाललायस? आणि हातात नो गिफ्ट्स? So sad..."

"वीकेन्ड घरच्यांबरोबर? नो फ्रेन्ड्स? नो आऊटिंग? शी..."

यात नफ्याची आर्थिक गणितं ठासून भरलेली आहेत. नव्वदच्या दशकात ग्लोबलायजेशन आपल्यावर येऊन आदळलं; आणि त्या नवश्रीमंतीच्या लाटेवर अनेकजणांनी विचार-विवेक गहाण टाकले. 

तसे त्यांनी ते टाकावेत, जास्तीत जास्त मासे या भोगवादात सापडावेत, यासाठी (त्यातल्या त्यात।पाश्चात्य) कॉर्पोरेट कंपन्यांनी मार्केटिंगची जाळी मस्तपैकी सर्वदूर फेकली होतीच. 

TV, सिनेमा, सततच्या जाहिरातींच्या भडिमाराने आमचा सुरेख ब्रेन वॉश केला. 

न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तंत्राच्या वापराने, ध्वनी व दृश्य या दोघांनी आमचे कान आणि डोळे स्वप्नांत गुंतवले. मध्यमवर्गीय काटकसरीने म्हातारपणाच्या चिंता सोडून "आजचं बघा" हा अमेरिकन मंत्र स्वीकारला. मग अचानक वाढदिवसाला निरांजनांच्या ओवाळणी backward झाल्या; वीस-पंचवीस हजारांचं हॉटेलवालं सेलिब्रेशन रितीचं झालं. 

सी सी डी अन् बरिस्तामधल्या दोनशे रुपयाच्या कॉफ्या आम्हाला स्वस्त वाटू लागल्या. 

"अनलिमिटेड बुफे" च्या नावाखाली बार्बेक्यूंच्या भट्टीत पगार जाळून घेणं हे "त्यात काय एवढं?" असं झालं.

जीन्स पाचशेच्या पाच हजार झाल्या. पुर्वी कुत्रा कोण ज्या कॉटनला विचारत नव्हतं, तेच कॉटन "लिनन"च्या रुपात थेट स्टेटस सिम्बॉल बनलं. 

एक दिवसाचं मराठी लग्न पाच दिवसांचं "big fat पंजाबी वेडिंग" झालं; घराच्या हॉलमधले साखरपुडे नि टिळे हे फाईव स्टारवाले "इवेन्ट्स" झाले. 

मज्जा, आनंद, आपल्या आत निर्माण करायचा असतो म्हणताय? तुमची संस्कृती तसं सांगते? हड. चुलीत घाला तुमची संस्कृती. आमचं Grand Live life kingsize उधळणं घ्या. बायकोला सोन्या-चांदीतून बाहेर काढा; हिरे नि प्लेटिनम मध्ये तिला बुडवून काढा.

तुमच्या पोराला गर्लफ्रेन्ड नि पोरीला बॉयफ्रेन्ड असलाच पाहीजे. त्यांच्या "प्रेमाचं" मूल्यमापन गिफ्टच्या किमतीवर ठरेल. 

कमवा; आणि उडवा. 

तुम्ही तुमच्या नवाबज़ाद्यांकडे पाहा बघू. लिव Macho !!

भले तुम्ही स्टायपेन्डवाले ट्रेनी इंजिनिअर असा. 

विषय इतपत येऊन थांबलेला नाही. दारू नि सिगरेटचं उदात्तीकरण तर आता जुनं झालं. आता त्याच्यापुढे सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय पोरांच्या तोंडीही "वीड", "ग्रास" हे शब्द येऊ लागलेत. 

यांचे अर्थ माहितीयेत? गांजासारख्या भयानक नशील्या पदार्थांची अमेरिकेतून उचललेली बोली भाषेतली नावं आहेत ही. 

या घाणीची जाहिरात थेट करता येत नाही; पण त्यासाठी आमचे नव्याने पैदास झालेले "रॉकस्टार्स" आणि "rap singers" आहेत ना! त्यांच्या गाण्यांतून या अमली विकृतीची भलावण रोजच्या रोज होतेय. "मनाली ट्रान्स" म्हणे. शोधा गुगलवर लिरिक्स. शब्दांना जोड दृश्यांची. दृश्यांत ठासून भरलेला सेक्स. अनिर्बंध, अमर्याद आणि मुद्दाम चाळवणऱ्या अनैतिक नात्यांचा, अगदी घरच्या अंतर्गत नात्यातही तो मुक्तहस्ते सपोर्ट करणारा !!! एकेक वेब सिरिज मनोरंजन कमी, आणि पोर्नोग्राफी जास्त इतपत मज्जेच्या डेफिनेशन्स गेलेल्या !!! तरुणांना नाद लावायला तेवढं पुरतं. 


चील... एंजॉय... पार्टी चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग. 

मग मेलात तरी चालेल. 


आपण ठरवलेलं उद्दिष्ट हे प्रत्यक्षात आपण स्वत: निवडलेलं नसून, ते आपल्याला गंडवून आपल्याकडून निवडून घेतलं गेलंय, हे लक्षात येतंय आपल्या?


चंगळवाद हा एक कॉर्पोरेटधार्जिणा पंथ झालाय. पंथामध्ये विचार आणि आचार निवडीचं स्वातंत्र्य नसतं. कुणीतरी महाभागाने सांगितलेलं तत्वज्ञान तो महापुरूष आहे असं सगळे म्हणतात म्हणून, मुकाट्याने नाकासमोर धरून चालणं, हे पंथाचं आचारशास्त्र असतं. तेच चंगळवादाचं आहे. "आम्ही कित्ती आनंदात आहोत", "आमचं कित्ती मस्त चालू आहे", "आम्ही कित्ती एंजॉय करतोय", *हे दुसऱ्याला दाखवणं*, हा चंगळवादाचा अट्टहास असतो. 


ते दुसऱ्याने सत्य म्हणून मान्य केलं, तर चंगळवादाचा विजय असतो. आणि आपण ओढवून घेतलेल्या पद्धतीचा दुसऱ्याने स्वीकार केला, तर तो चंगळवादाचा दिग्विजय असतो. 


मुद्दा हा आहे, की या झुंडीत सामील झाल्यावर आपण किती "cool" आहोत, याच्या देखाव्यांचं एक compulsion असतं ना; त्यात बऱ्याच जणांचा श्वास कोंडला जातो. 

तो देखावा न करणाऱ्यांना पाखंडी समजून झुंडीबाहेर फेकलं जातं. 


मुळात जे झुंडीत कधी सामील झालेच नाहीत, किंवा आर्थिक कारणांमुळे होऊ शकले नाहीत, त्यांच्याकडे आगाऊपणाने "सो पथेटिक" म्हणून नकारात्मकतेने पाहीलं जातं; त्यांच्या मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होईल याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होतात. 


गंमत म्हणजे, चंगळवादाचे पुरस्कारकर्ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारतात; पण हीच सोंगं आयुष्य आनंदाने जगण्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र वेगळे मार्ग असू शकतात, हे साधं सत्य दुसऱ्याला नाकारतात.

त्यावेळी आपण त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करतोय, हे यांच्या गावीही नसतं. म्हणूनच मग "तुम्ही दारू पिऊन पार्ट्या करत नाही, म्हणजे आयुष्य कसं एंजॉय करायचं ते तुम्हाला माहीतच नाही", अशी बिनडोक तर्कटं मांडली जातात; जी हास्यास्पद ठरतात. 


हेअर जेल, मेक अप आणि ब्रांडेड कपड्यातली बिनधास्त आहोत हे दाखवत राहण्याची केविलवाणी धडपड नजरेत लपत नसते. ब्रांडेड आयुष्यातल्या पोकळ्या वेडावतातच. 


जागे होऊया रे.

स्वत्व नको विकूया आपण. 

दुनियेतल्या प्रत्येकाला आपण आवडलोच पाहीजे, हा मूर्ख विचार सोडूया; आणि करूया हिंमत स्वत:चा स्वतंत्र जीवनभाव निवडण्याची. सेलिब्रेशन्स मिळकतीची होऊ देत; आणि ती नजाकतीची होऊ देत !!  


उधळण्याच्या फुलबाज्या क्षणभरच चमकतात; स्वतंत्र विवेकाचा सूर्य अनंतकाळ चमकतो.

आपण सूर्य निवडू या. 

👍👍👍

Featured post

Lakshvedhi