सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 29 October 2022
कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाशी पंगा घेऊ नका*
*कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाशी पंगा घेऊ नका*
*एक वृद्ध नागरिक बँकेत जातो, आणि काउंटरवरील रोखपाल ला (कॅशियर) 1000/-चा धनादेश देतो.*
रोखपाल: सर, तुम्ही बाहेरील एटीएममधून इतकी छोटी रक्कम काढावी आणि माझा वेळ वाया घालवू नका.*
*वृद्ध : मला 1000/- रोख द्यायला काय हरकत आहे?*
रोखपाल: माफ करा सर, हे होऊ शकत नाही. तुम्ही एकतर एटीएममध्ये जा किंवा पैसे काढण्याची रक्कम वाढवा.*
*वृद्ध : ठीक आहे, मला माझ्या खात्यातून किमान अनिवार्य रकमेपैकी संपूर्ण शिल्लक काढायची आहे*
*कॅशियर वृद्ध व्यक्तीच्या खात्यातील शिल्लक तपासतो, आणि ते रु. 80 लाख आहे
*तो म्हणतो_ "सध्या आमच्याकडे तिजोरीत इतके पैसे नाहीत. पण तुम्ही मला 80 लाख रुपयांचा धनादेश दिलात तर उद्या आम्ही रोख रकमेची व्यवस्था करू"*.
*वृद्ध : आता तुम्ही मला किती रक्कम देऊ शकता?*
रोखपाल: (बँकेची रोकड शिल्लक तपासतो) सर, मी तुम्हाला थेट 10 लाख देऊ शकतो.*
*वृद्ध नागरिक रु. 1000/- चा चेक फाडतो, रु. 10 लाखाचा नवीन चेक लिहून कॅशियरला देतो*
जेव्हा रोखपाल तिजोरीत रोख जमा आ णण्यासाठी जातो तेव्हा तो शेजारील जुन्या सार्वजनिक शेल्फमधून रोख ठेव स्लिप काढतो आणि भरतो.
* रोखपाल आत बँकेच्या तिजोरीतून रोख घेऊन परत येतो, काळजीपूर्वक 10 लाख रुपये मोजतो, म्हाताऱ्याला देतो आणि म्हणतो - "महाराज, तुम्ही ही रक्कम घेऊ शकता. आता ही रक्कम तुम्हाला स्वतः घरी घेऊन जावी लागेल, पण काउंटर सोडण्यापूर्वी मोजणे, नंतर कोणतीही तक्रार नाही."*
* वृद्धाने 500/- रु च्या दोन नोटा काढतो आणि त्याच्या पर्समध्ये ठेवतो आणि म्हणतो - "माझा तुझ्यावर विश्वास आहे, बेटा, मला मोजण्याची गरज नाही. आता ही आहे रोख ठेव स्लिप. ₹ 9,99,000/- कृपया." माझ्या खात्यात परत जमा करा आणि मला एक मुद्रांकित स्वाक्षरीयुक्त काउंटरफॉइल द्या.*
*आणि हो, तुम्हीही माझ्या उपस्थितीत रोख मोजा ."*
*कॅशियर बेशुद्ध*
*कथेचा नैतिक सारांश:*
*ज्येष्ठ नागरिकांशी गल्लत करू नका, विशेषत: ते निवृत्त झाले असले तरी त्यांची बुद्धिमत्ता हे त्यांचे शस्त्र आहे त्यामुळे मी मी म्हणणाऱ्यांना पाणी पाजण्याची ताकद त्यांच्या शस्त्रात आहे.अति हुशार माणसाला ते योग्य जागा दाखवतात कारण अनेक अनुभवांचे पावसाळे त्यांनी अंगावर घेतलेले असतात .*
*सर्व ज्येष्ठ नागरिकांना आदरपूर्वक सन्मान द्या* 🙏🙏🙏
कॉपी पेस्ट
ग्रंथपालन परीक्षेच्या फेरगुण मोजणीसाठी
ग्रंथपालन परीक्षेच्या फेरगुण मोजणीसाठी
३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मतदान केंद्रस्तरीय कार्यवाहीबाबत
मतदान केंद्रस्तरीय कार्यवाहीबाबतच्या प्रशिक्षणातील माहितीची
काटेकोरपणे अंमलबजावणी करावी
- केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल
मुंबई, दि. 28 : येत्या 3 नोव्हेंबर रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रशिक्षणादरम्यान देण्यात आलेल्या माहितीचा व प्रात्यक्षिकांचा उपयोग काटेकोरपणे व शिस्तबद्धरीत्या करावा", असे निर्देश या पोटनिवडणुकीसाठी नियुक्त केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल (भा.प्र.से.) यांनी दिले आहेत.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रांच्या स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विलेपार्ले पूर्व परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री.देवल बोलत होते. कार्यक्रमाला निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण कटाळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र हजारे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. दोन सत्रात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात सुमारे दीड हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
यंदाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य सांगताना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पाटील यांनी सांगितले की, द्विस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम हा दोन ठिकाणी घेण्यात आला. प्रशिक्षणाचा पहिला भाग हा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे घेण्यात आला. या अंतर्गत उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना संगणकीय सादरीकरणाच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचे आयोजन हे विलेपार्ले पूर्व परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दीक्षित रोड महानगरपालिका शाळा संकुल येथे करण्यात आले होते. या शाळेमध्ये असणाऱ्या वर्गखोल्यांचे सूक्ष्मस्तरीय सुनियोजिन करून या ठिकाणी मतदान प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात नाट्यगृहातील खुर्च्यांना असणाऱ्या आसन क्रमांकाचा एक वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण वापर करण्यात आला. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदान केंद्रानुसार आसन क्रमांक निर्धारित करण्यात आले होते. हे निर्धारित आसन क्रमांक लघु संदेशांद्वारे आधीच कळविण्यात आले होते. तसेच याबाबतची माहिती प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावर देखील प्रदर्शित करण्यात आली होती.
मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणादरम्यानची आसन व्यवस्था मतदान केंद्रनिहाय करण्यात आली होती. ज्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रांसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणादरम्यान एकाच रांगेत शेजारी - शेजारी आसनस्थ होते. यामुळे येत्या 3 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांवर कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकमेकांशी ओळख मतदानाच्या काही दिवस आधी झाली आहे. परिणामी, मतदान केंद्रांच्या स्तरावर पूर्वतयारी करताना आवश्यक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यास यामुळे मदत होणार आहे, असेही श्री.पाटील यांनी प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य नमूद करताना आवर्जून सांगितले.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील '१६६ - अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या दि.०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार असून दि. ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघात २ लाख ७१ हजार ५०२ मतदार आहेत. या निवडणुकीची सर्व प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व संबंधित नियमांनुसार होत आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, यंत्रसामग्री तपासणे व यंत्रसामग्री सीलबंद करणे, मतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे आदी विविध स्तरीय बाबींचा या प्रक्रियेमध्ये समावेश असतो. निवडणूक प्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी असणारे 'मायक्रो ऑब्जरव्हर' यासह समन्वय अधिकारी, विविध चमूंमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे २ हजार ५०० कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग असणार आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण टप्पेनिहाय पद्धतीने देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी 'अंधेरी पूर्व' मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी यानिमित्ताने आवर्जून केले आहे.
दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा
दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालणे आवश्यक
- परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर
मुंबई दि. 28 :- दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशातील सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते.
दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत (26/11) झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष तथा गॅबॉन प्रजासत्ताक देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मायकल मौस्सा अडामो प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्षा आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत श्रीमती रूचिरा कंबोज यांनी केले.
भारत 2022 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचा अध्यक्ष आहे. या समितीमध्ये सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्रसंघाच्या 15 देशांतील राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची दोन दिवसीय बैठक भारतात होत आहे. उद्या दिल्ली येथे बैठक आहे. मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे बैठक झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीने 'दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याशी लढा' या विषयावर अनौपचारिक चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. यात स्थानिक आणि क्षेत्रीय पातळीवरील उपाययोजनांसंदर्भात चर्चा झाली.
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर म्हणाले, दहशतवाद विरोधात लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. दहशतवाद आणि त्यांच्या प्रायोजकांविरुद्ध ठोस कारवाई करावी लागेल. दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थाने, प्रशिक्षण स्थळे शोधून त्यांना असलेले राजकीय समर्थन आर्थिक आणि वैचारिक संरक्षण नष्ट करणे आवश्यक आहे.
गेल्या काही वर्षांत, दहशतवादी गटांनी त्यांना मिळत असलेल्या मिळकतीच्या पद्धतीमध्ये विविधता आणली आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. वित्तपुरवठ्यासाठी उपलब्ध असलेल्या अनामिकतेचा फायदा घेऊन व्हर्च्युअल चलने वापरून निधी उभारणी सुरु केली आहे. या संदर्भात, अधिक विचारमंथन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला विचारात घेऊन नाविन्यपूर्ण उपाय योजण्यासाठी उद्या नवी दिल्ली येथे होणाऱ्या समितीच्या विशेष बैठकीत चर्चा होईल, अशी अपेक्षा डॉ. जयशंकर यांनी व्यक्त केली.
दहशतवादविरोधी लढाई सामूहिकपणे लढणे गरजेचे
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दहशतवादविरोधी लढाई ही सर्वांनी एकत्रितपणे आणि एकजुटीने लढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केले. या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीची महत्वपूर्ण परिषद मुंबईत झाली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी ज्या ताजमहाल हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला तेथे या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल संयुक्त राष्ट्र समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना त्यांनी मनापासून धन्यवाद दिले.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाच्या सुरक्षेविषयी महत्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांसह सर्व राज्याचे गृहमंत्री उपस्थित असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी यावेळी दिली.
26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली
सुरूवातीला दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत (26/11) झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. गॅबॉन प्रजासत्ताकचे परराष्ट्र मंत्री तथा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष मायकेल मौस्सा अडामो यांच्यासह भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्षा आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत रूचिरा कंबोज यांनी केले.
0000
महत्वाची क्षणचित्रे :-
· श्रद्धांजली वाहताना उपस्थित सदस्यांमध्ये गॅबॉन, मेक्सिको, भारत, नॉर्वे, घाना, चीन, युके, माल्टा, युएई, मोझांबिक, अल्बानिया, इक्वाडोर, ब्राझील, स्वित्झर्लंड, रशिया, जपान, युएसए, युएसजी युएनओसिटी, फ्रान्स, आयर्लंड, एईडी सिटीईडी, युएनआरसी, केनियाच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
· दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांनी मनोगत व्यक्त केले. यात छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर जखमी झालेली देविका रोतवाल, हवाई सुंदरी निधी चाफेकर, ताज हॉटेलचे महाव्यवस्थापक करणबीर सिंग यांनी आपले अनुभव कथन केले. तर, त्यावेळी दोन वर्षाचा असलेला मोशे याने ध्वनिचित्रमुद्रीत संदेश दिला.
· शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन त्यांच्या पत्नी श्रीमती वैशाली तुकाराम ओंबळे यांच्या समवेत उपस्थित सदस्यांनी छायाचित्र घेतले.
· केंद्र शासनाचे सहसचिव शफी रिझवी यांनी 'दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याशी लढा' या विषयावर सादरीकरण केले.
· केंद्रीय सह सचिव पंकज ठाकूर यांनी 26/ 11 रोजी झालेला हल्ला, त्यात हुतात्मा झालेले लोक, तपासाची पद्धती आणि काही महत्वपूर्ण घडामोडींबाबत यावेळी सादरीकरण केले. दहशतवादी साजिद मीर याची कट रचत असताना करत असलेल्या संवादाची ध्वनीफीत देखील ऐकविली.
· यावेळी संयुक्त राष्ट्र परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या सदस्य राष्ट्राच्या प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. यात युके, युएसए, युएई, ब्राझिल, रशिया, फ्रान्स, आयर्लंड, केनिया, मॅक्सिको, नॉर्वे, चीन आदींचा समावेश होता.
· संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी नुकतीच हॉटेल ताज येथे भेट देऊन 26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली होती. या कार्यक्रमाची ध्वनीचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.
· 26/11चा हल्ला आणि त्याविषयाची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. यासंदर्भातील प्रदर्शन यावेळी लावण्यात आले.
· हा कार्यक्रम परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आयोजित केला होता.
00000
Cyber inteligence युनिट
महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार
सुरजकुंड येथील बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
सुरजकुंड, हरयाणा, दि. 28 : सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरजकुंड येथील चिंतन शिबिरात दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत देशभरातील विविध राज्यांचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर हरयाणातील सुरजकुंड येथे आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या बैठकीला संबोधित केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनेक विषयांवर या बैठकीत मंथन करण्यात आले.
या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सायबर इंटिलिजन्स युनिट हा एक समर्पित सिंगल प्लॅटफॉर्म असेल. या माध्यमांतून सायबर गुन्ह्यांना आळा घालणारे जागतिक मॉडेल तयार होईल. सरकारी आणि खासगी बँका, वित्तीय संस्था, सोशल मीडिया संस्था, नियामक संस्था, सायबर पोलिस, तंत्रज्ञ असे सर्व या व्यासपीठावर एकत्रित राहणार असून, त्यातून गतिमान प्रतिसादाची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर असेल. अलिकडच्या काळात आर्थिक आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत येणाऱ्या काळात कदाचित या गुन्ह्यांचीच संख्या अधिक असेल. ही संस्था आधीच त्यादृष्टीने सज्जता असेल.
ही बैठक आयोजित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणताही गुन्हा किंवा कायदा-सुव्यवस्था हा प्रश्न केवळ कोणत्याही एका राज्याचा प्रश्न नसतो, तर अनेक राज्यांना एकाचवेळी त्याचा सामना करावा लागतो. या बैठकीच्या माध्यमांतून केंद्र आणि राज्यात समन्वयाची उत्तम व्यवस्था तयार करण्यात आली, याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांचे मी विशेष आभार मानतो.
‘सीसीटीएनएस’मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक गतीने कार्यवाही पूर्ण केली. ‘अॅम्बीस’च्या माध्यमांतून सुद्धा मोठी प्रगती राज्य सरकार करते आहे. सुमारे 6 लाखांहून अधिक गुन्हेगारांचे बायोमेट्रीक रेकॉर्ड तयार करण्यात आले आहेत. याला सीसीटीएनएसशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे नाव बदलून अन्य राज्यांत पुन्हा गुन्हे करणाऱ्यांना ओळखणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे सोपे होणार आहे. सीसीटीव्हीच्या जाळ्याला सायबर पोलिसांशी जोडल्यामुळे गुन्ह्यांचा तपास वेगाने होणार आहे. चालान प्रणाली आणि एकच ऑनलाईन कोर्ट यामुळे मनुष्यबळाची सुद्धा बचत होते आहे. ऑनलाईन ट्रेनिंग प्रणालीमुळे प्रशिक्षणाला गती मिळते आहे. राज्यात 20 हजार पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईला गती देण्यात आली असून, यात केंद्र सरकारची मोठी मदत मिळत आहे. शहरी नक्षलवादाचा धोका मोठा आहे. त्याविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांतून अपराध सिद्धीचा दर वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे. सागरी सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत आहे, अशीही माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिली.
0000Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...


.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)