Saturday, 29 October 2022

मतदान केंद्रस्तरीय कार्यवाहीबाबत

 मतदान केंद्रस्तरीय कार्यवाहीबाबतच्या प्रशिक्षणातील माहितीची

काटेकोरपणे अंमलबजावणी करावी

केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल

 

            मुंबईदि. 28 : येत्या 3 नोव्हेंबर रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रशिक्षणादरम्यान देण्यात आलेल्या माहितीचा व प्रात्यक्षिकांचा उपयोग  काटेकोरपणे व शिस्तबद्धरीत्या करावा"असे निर्देश या पोटनिवडणुकीसाठी नियुक्त केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल (भा.‌प्र.से.) यांनी दिले आहेत.

             अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रांच्या स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विलेपार्ले पूर्व परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री.देवल बोलत होते. कार्यक्रमाला निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटीलसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण कटाळेउपजिल्हाधिकारी रवींद्र हजारे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. दोन सत्रात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात सुमारे दीड हजार  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

            यंदाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य सांगताना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पाटील यांनी सांगितले कीद्विस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम हा दोन‌ ठिकाणी घेण्यात आला. प्रशिक्षणाचा पहिला भाग हा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे घेण्यात आला. या अंतर्गत उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना संगणकीय सादरीकरणाच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचे आयोजन हे विलेपार्ले पूर्व परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दीक्षित रोड महानगरपालिका शाळा संकुल येथे करण्यात आले होते. या शाळेमध्ये असणाऱ्या वर्गखोल्यांचे सूक्ष्मस्तरीय सुनियोजिन करून या ठिकाणी मतदान प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले.

            या प्रशिक्षण कार्यक्रमात नाट्यगृहातील खुर्च्यांना असणाऱ्या आसन क्रमांकाचा एक वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण वापर करण्यात आला. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदान केंद्रानुसार आसन क्रमांक निर्धारित करण्यात आले होते. हे निर्धारित आसन क्रमांक लघु संदेशांद्वारे आधीच कळविण्यात आले होते. तसेच याबाबतची माहिती प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावर देखील प्रदर्शित करण्यात आली होती.

            मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणादरम्यानची आसन व्यवस्था मतदान केंद्रनिहाय करण्यात आली होती. ज्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रांसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणादरम्यान एकाच रांगेत शेजारी - शेजारी आसनस्थ होते. यामुळे येत्या 3 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांवर कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकमेकांशी ओळख मतदानाच्या काही दिवस आधी झाली आहे. परिणामीमतदान केंद्रांच्या स्तरावर पूर्वतयारी करताना आवश्यक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यास यामुळे मदत होणार आहेअसेही श्री.पाटील यांनी प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य नमूद करताना आवर्जून सांगितले.

            मुंबई उपनगर जिल्ह्यातील '१६६ - अंधेरी पूर्वविधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या दि.०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार असून दि. ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत.  मतदारसंघात २ लाख ७१ हजार ५०२ मतदार आहेत. या निवडणुकीची सर्व प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व संबंधित नियमांनुसार होत आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षणयंत्रसामग्री तपासणे व यंत्रसामग्री सीलबंद करणेमतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे आदी विविध स्तरीय बाबींचा या प्रक्रियेमध्ये समावेश असतो. निवडणूक प्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारीमतदान केंद्राध्यक्षसहाय्यक मतदान केंद्राध्यक्षमतदान अधिकारीपोलीस कर्मचारीकेंद्र सरकारी कर्मचारी असणारे 'मायक्रो ऑब्जरव्हरयासह समन्वय अधिकारीविविध चमूंमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे २ हजार ५०० कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग असणार आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण टप्पेनिहाय पद्धतीने देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

            अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी 'अंधेरी पूर्वमतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावेअसे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी यानिमित्ताने आवर्जून केले आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi