Tuesday, 25 October 2022

राज्यात 93 हजार 166 पशुधन उपचाराने लम्पी रोगमुक्त

 राज्यात 93 हजार 166 पशुधन उपचाराने लम्पी रोगमुक्त


            मुंबई दि. 25 : 25 ऑक्टोबर अखेर 32 जिल्ह्यांमधील एकूण 3030 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 143089 बाधित पशुधनापैकी एकूण 93166 पशुधन उपचाराने रोगमुक्त झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिली. 

            श्री. सिंह म्हणालेबाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 140.97 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 135.58 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात असून, जळगांवअहमदनगरधुळेअकोलाऔरंगाबादबीडकोल्हापूरसांगलीवाशिमजालनाहिंगोलीनंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्थासहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारीनुसार सुमारे 97 टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

            श्री. सिंह म्हणालेमहाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रणनिर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी दिलेल्या सुधारीत उपचार प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावेशासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांना आवाहन करण्यात येते कीत्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.

००००

नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम’

 नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुख्यमंत्र्यांनी अतिदुर्गम भामरागडमध्ये पोलीसांसोबत साजरी केली दिवाळी

 

          गडचिरोलीदि. 25 : गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन पोलिसांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

          भामरागड तालुक्यातील धोडराज येथे पोलीस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जनजागरण मेळाव्यास संबोधीत केले तसेच आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

          मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीयापूर्वी पालकमंत्री असतानासुद्धा अनेक ठिकाणी दुर्गम भागात आपण भेटी दिल्या. विकासाचे काम आता गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्तेपाणीशिक्षणवैद्यकीय सुविधा आदी मूलभूत सुविधांची निर्मिती करून हा भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे.

          मुख्यमंत्री म्हणाले, गत दोन वर्षात कोरोनामुळे अनेक प्रकारचे निर्बंध होते. आता अनेक सण नागरिक मनमोकळेपणाने साजरे करीत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. पोलीस महत्त्वाचा घटक असून पोलीसांच्या पाठीमागे शासन भक्कमपणे उभे आहे. तसेच, आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गडचिरोलीत विविध योजनानवीन उद्योगलोकांच्या हाताला काम देण्याबाबत सरकारने नियोजन केले आहे. पूर्वीचा गडचिरोली आणि आत्ताचा गडचिरोली यात अमुलाग्र बदल झालेला दिसत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

          यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले कीमहाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवर येऊन जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करण्याचा घेतलेला निर्णय हा पोलीस जवानांसाठी अतिशय आनंदाचा आहे. सरकारच्या पाठिंबामुळेच गडचिरोली पोलीस उत्कृष्ट काम करीत आहेत.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर बिरसा मुंडा आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुप्षहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठजिल्हाधिकारी संजय मीणापोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटीलपोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.

          कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इरपे दोगे पल्लोमाळी गुमा मासाशांती कुतु मज्जूचैते चैतू पल्लो यांना साडीवाटपराजे चैतु पुंगाटीजैनी वड्डेइंदरसाय गावडे यांना ब्लॅंकेट वाटपरेश्मा सैनू मिच्छा हिला शिलाई मशीनपरी दिनेश पुंगाटीमोहन वड्डे या बालकांना स्कूल बॅग तर, बबलू देवाजी सिडामसोमजी विना पुंगाटी यांना फवारणी संच वाटप करण्यात आले.

००००


जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची मुलाखत.

 जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची मुलाखत.

            मुंबई, दि.25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. बुधवार, दि.26 ऑक्टोबर 2022 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

            साहित्याचे विविध प्रकार, कविता, वाचनसंस्कृती व दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी दिवाळी अंकांची भूमिका, काव्यप्रकार तसेच नवीन साहित्यिक व त्यांचे साहित्य आणि वाचकांची बदलती भूमिका याबाबत ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उपयुक्त माहिती दिली आहे. ज्येष्ठ निवेदिका स्नेहा आघारकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००००

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत

 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत

मोफत धान्य वितरणासाठी 41 हजार 138 मेट्रीक टन धान्य मंजूर.

            मुंबई, दि. 25 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी मुंबई-ठाणे क्षेत्रातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीकरिता प्रतिसदस्य पाच किलो मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी प्रतिमाह 16 हजार 385 मेट्रीक टन गहू, 24 हजार 753 मेट्रीक टन तांदूळ असे एकूण 41 हजार 138 मेट्रीक टन धान्य वितरीत करण्यासाठी नियतन मंजूर करण्यात आले असल्याची माहिती नियंत्रण शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी दिली आहे.


            गरीब कल्याण अन्न येाजना अंतर्गत मोफत अन्नधान्य वितरणाचे परिणाम, प्राधान्य कुटुंबाकरिता प्रतिमाह प्रति लाभार्थी 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू तसेच, अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांकरिता प्रतिमाह प्रति लाभार्थी 4 किलो तांदूळ व 1 किलो असे वितरणासाठी प्राप्त झाले आहेत.


            योजनेतील लाभार्थींचे शासनाकडून प्राप्त ड,ई व ग परिमंडळ कार्यालयांचे तांदूळ व गव्हाचे नियतन हे सप्टेंबर करिता अहवालानुसार विक्रीपेक्षा कमी असल्याने संबंधित परिमंडळ कार्यालयांना शासनाकडून प्राप्त नियतनाच्या मर्यादेत नियतन मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित परिमंडळ कार्यालयांना सप्टेंबर करिता अहवालानुसार विक्रीच्या 100 टक्के प्रमाणे नियतन मंजूर करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.


०००



 


 



अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत

 अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत ६४७ मेट्रिक टन नियतन मंजूर


 मुंबई, दि. २५ : मुंबई - ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांसाठी डिसेंबर २०२२ करिता १८५१२ लाभार्थ्यांकरिता २७७ मेट्रीक टन गहू३७० मेट्रीक टन तांदूळ असे एकूण ६४७ मेट्रिक टन नियतन शासनाकडून प्राप्त झाले असल्याची माहिती नियंत्रण शिधावाटप व संचालक नागरीपुरवठा यांनी दिली आहे.

मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रात डिसेंबरसाठी परिमंडळ अ,,,,फ मध्ये अत्योंदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति शिधापत्रिकाधारकास गहू २ रू किलो आणि तांदूळ ३ रू किलो प्रमाणे १५ किलो गहू आणि २० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य वितरीत करण्यात येणार आहेत.

डिसेंबर २०२२ करिता शासनाकडून प्राप्त अंत्योदय अन्न योजनेचे परिमंडळ  ग कार्यालयांच्या विक्रीच्या अहवालानुसार आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने सदर परिमाडळ कार्यालयास शासनाकडून प्राप्त नियतनाच्या मर्यादेत नियतन मंजूर करण्यात आले आहे. तसेच उर्वरित अ व फ परिमंडळ कार्यालयांना तांदूळ व गव्हाचे सप्टेंबर २०२२ करिता अहवालानुसार १०० टक्के प्रमाणे नियतन मंजूर करण्यात आले आहे.

००००

अनमोल

 


Hamesha खुश रहे


 

Featured post

Lakshvedhi