Saturday, 22 October 2022

अंधेरी मतदान प्रक्रिया

 मतदान यंत्र सरमिसळीकरण प्रक्रिया पूर्ण

            मुंबई, दि. २१ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील '१६६ अंधेरी (पूर्व) या मतदारसंघात ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारी मतदान प्रक्रिया नि:पक्षपणे पार पडण्याच्या दृष्टीने मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वस्तरीय कार्यवाही सुरु आहे. याचाच भाग म्हणून मतदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण असणाऱ्या मतदान यंत्रांचे 'द्वितीय सरमिसळीकरण' (Second Randomization) निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार केंद्रीय निरीक्षक श्री. देवेश देवल यांच्या उपस्थितीत आज झाले.

            अंधेरी (पूर्व) मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यवाहीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. हे सरमिसळीकरण नि:पक्षपणे व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाच्या संगणकीय प्रणालीद्वारे (Computer Software) करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अजित साखरे यांनी दिली.

            या पोटनिवडणूक प्रक्रियेकरिता २५६ मतदान केंद्रे असणार असून या मतदान केंद्रांवर ३३३ बॅलेट युनिट, ३३३ कंट्रोल युनिट आणि ३५९ व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघात जेवढ्या यंत्रांची आवश्यकता आहे, त्यापेक्षा सुमारे २० टक्के अतिरिक्त बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आहेत. तर सुमारे ३० टक्के अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्रांची तजवीज करण्यात आली आहे. जेणेकरून कोणत्याही यंत्रामध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास पर्यायी यंत्रांची व्यवस्था सहजपणे होऊ शकेल. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान उपयोगात येणारी यंत्रे ही सशस्त्र सुरक्षादलाच्या कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास देखरेख ठेवण्यात येत आहेत.

            मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोटनिवडणुकीबाबतची विविध स्तरीय प्रक्रिया निर्धारित वेळापत्रकानुसार वेळोवेळी सुरु आहे. त्यानुसार पोटनिवडणूकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याद्वारे सातत्याने विविध स्तरीय कार्यवाही अव्याहतपणे सुरु आहे. यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन आणि तेथील अधिकारी व कर्मचारी हे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देखील कार्यरत असतील.

            मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी ३ नोव्हेंबर रोजी मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही प्रक्रिया अधिकाधिक सुदृढ करावी, असे आवाहन केले आहे.


०००

धन धनादन धन


 

मुंबईतील कोळीवाड्यां

 मुंबईतील कोळीवाड्यांची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून पाहणी.

            मुंबई, दि. 21 : शहरातील ससून डॅाक कुलाबा, कफ परेड, वरळी आणि माहिम येथील कोळीवाडा बंदरे (जेट्टी) आणि वसाहतींची आज शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली.

            या पाहणी दौऱ्यात पालकमंत्री श्री.केसरकर यांनी कोळीवाडा वसाहतीतील रहिवासी, मच्छिमार संघटनांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या. प्रारंभी भारतीय मत्स्य सर्वेक्षण कार्यालयात कुलाब्यातील ऐतिहासिक वैभव असलेल्या ससून डॅाकमधील स्थानिक महिला आणि मच्छिमारांना तातडीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठक घेतली      .                                                      ससून डॅाक येथील मच्छिमार, महिला कामगारांसाठी पायाभूत सुविधा

            ससून डॅाक येथील मच्छिमार संघांच्या मागण्यांवर मंत्री श्री. केसरकर म्हणाले, येथील मच्छिमार नौकांना डिझेल पुरवठ्यासाठी तात्पुरती व्यवस्था करावी तसेच मच्छिमार, सर्व कामगारांसाठी पिण्याचे पाणी तत्काळ उपलब्ध करून द्यावे, त्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पाण्याच्या टाक्या बसवाव्यात. डॅाक परिसरात हाय मास्ट लॅम्प, पथदिवे(स्ट्रीट लाईट) बसवावे. ससून डॅाक येथे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात करावे. याठिकाणी ब्रेकवाटरची मागणी मच्छिमारांकडुन होत असून ब्रेकवॅाटर तयार करून त्यांना दिलासा द्याव. मालाच्या लिलावासाठी लिलाव हॅाल, वितरण मार्केट उपलब्ध करावे. कचऱ्याची विल्हेवाट लावावी. मुंबई पोर्ट ॲथॅारिटीची परवानगी घेवून मच्छिमार बांधव आणि कामगार महिलांसाठी शौचालय, स्नानगृह, वेगवेगळे विश्रामगृह उभारावे. या सर्व कामांचा आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा, यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे निर्देश पालकमंत्री श्री.केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कफ परेड कोळीवाड्याचे सौंदर्यीकरण

            कफ परेड कोळीवाड्याची (जेट्टी) पाहणी करतांना या परिसराच्या सौंदर्यीकरणाचा आराखडा तयार करावा.या आराखड्यामध्ये मच्छिमारांसाठी आरसीसी शेड, संरक्षण भिंत बांधणे, सोलर ड्रायर बसवणे, बंदिस्त प्रवेशद्वार बांधणे,रस्ता बांधणे आदी विकासांची कामे समाविष्ट करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

वरळी कोळीवाड्याच्या पाहणीसाठी बाईकची लिफ्ट

            पालकमंत्र्यांचा राजशिष्टाचार बाजूला सारून मंत्री श्री. केसरकर हे मोटार बाईकची लिफ्ट घेवून वरळी कोळीवाड्यातील पाहणी स्थळी पोहोचले. वरळी कोळीवाडा हा मुंबईतला गजबजलेला भाग आहे. पालकमंत्र्यांच्या या सामान्य माणसांसारख्या वागणूकीचे स्थानिकांनी कौतुक केले. या पाहणी दरम्यान वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेवू. वरळी कोळीवाडा हा पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. या कोळीवाड्याच्या सौंदर्यीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यासंदर्भातील आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

            या पाहणी दौऱ्यात पालकमंत्री श्री. केसरकर यांनी माहिम येथील कोळीवाड्याची सुद्धा पाहणी केली. त्यांच्यासह विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन आदी विभागाचे अधिकारी आणि विविध मच्छिमार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


००००



गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव

 नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            नाशिकदि.२१ : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासह त्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            आज महाकवी कालीदास कलामंदिर येथे नाशिक रत्न पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसेखासदार हेमंत गोडसेआमदार सीमा हिरेछत्रपती संभाजीराजे भोसलेविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेपोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटीलजिल्हाधिकारी गंगाथरन डी.पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरेसपकाळ नॉलेज हबचे संचालक रवींद्र सपकाळनाशिक न्युजचे मुख्य संपादक लक्ष्मण घाटोळ-पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमुंबईपुणे या शहरांच्या सोबत विकासाच्या वाटेवर अग्रेसर असलेले महत्वाचे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असल्याने जगात धार्मिक शहर म्हणून देखील नाशिकचा नावलौकीक आहे. त्याचप्रमाणे अनेक गडकिल्ल्यांचा वारसा लाभल्याने स्वराज्याच्या रक्षणाचे केंद्रबिंदू म्हणून नाशिक ओळखले जाते.  धार्मिकसांस्कृतिक ओळख जपत नाशिक जिल्ह्याने उद्योगकलाकृषीपर्यटन अशा सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. पर्यटनाला चालना देवून नाशिकमध्ये विकास साधला जाईल. गडकिल्ल्‍यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनामार्फत प्राधान्य देण्यात येणार आहेअशी ग्वाहीही मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांनी दिली.

            2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोणतीही गैरसोय होणार नाही याकरिता शासनामार्फत नियोजन करण्यात येईल. नाशिक महानगर व जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. बळीराजाला केंद्रबिंदू मानून त्याला सर्वोतोपरी मदत करत आहे. उद्योग वाढीसाठी प्रयत्न करून रोजगार  निर्मितीवर राज्य शासनाच्यावतीने भर देण्यात येत आहे. पुरस्कारार्थींनी समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून  समाजहिताचे काम अखंड सुरू ठेवावे. तसेच आपल्या कामातून इतरही प्रेरित होतील यादृष्टिने प्रयत्नशील रहावेअशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

            पालकमंत्री दादाजी भुसे म्हणालेवेगवेगळ्या कार्यक्षेत्रात समर्पित भावनेतून जनेतेची सेवा करणाऱ्यांचा नाशिक रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. पुरस्कारार्थीनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कामातून निश्चितच सर्वांना प्रेरणा मिळेलअशी भावना व्यक्त करत उपस्थितांना त्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

            छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणालेकोल्हापूर नंतर सर्वगुण संपन्न शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. रायगड किल्ला संवर्धनाच्या धर्तीवर नाशिक येथील किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे. तसेच राजर्षी शाहू महाराजांनी समतेच्या लढ्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे इतिहास घडविला आहे. त्यामुळे नाशिक येथे शाहू महाराजांच्या   जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे स्मारक व्हावे. तसेच पर्यटनाच्या दृष्टिने जिल्ह्याचा विकास होण्यासाठी राज्य शासनाने सहकार्य करण्याची अपेक्षा यावेळी संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली.

नाशिक रत्न म्हणून यांचा झाला सन्मान...

·       राजकीय क्षेत्र : डॉ. भारती पवारकेंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री

·       पोलीस प्रशासन : सुनील कडासनेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक

·       प्रशासकीय : लीना बनसोडआदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक

·       वैद्यकीय क्षेत्र : डॉ. आवेश पलोडनाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक

·       विधिज्ञ : ॲङ नितीन ठाकरेअध्यक्षनाशिक वकील परिषद

·       पर्यटन : शशिकांत जाधवसंचालकनाशिक फ्लावर अँड शुभम वॉटर पार्क

·       बांधकाम : ललित रुंग्ठासीईओरुंग्ठा ग्रुप

·       व्यापार : राजेंद्र शहाणेसंचालकमयुर अलंकार

·       उद्योग : प्रविण मराठेसीईओईशा पब्लिसिटीनाशिक

·       शैक्षणिक : साने गुरूजी शिक्षण संस्था

·       शेती : शिवाजी ढोलेप्रयोगशील शेतकरी

            यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाशिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

000000


 


घाणा

 


सुदिन




 

आरोग्य धनसंपदा,


 लक्षवेधी मास मीडिया pvt ltd. तर्फे हार्दिक शुभेच्छा 

Featured post

Lakshvedhi