Friday, 21 October 2022

राज्यात 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान ‘बाल सप्ताह’ साजरा करणार

 राज्यात 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान बाल सप्ताह’ साजरा करणार

                                             सुशीबेन शहा

राईट टू प्ले’ सप्ताहाची संकल्पना

 

            मुंबईदि. 20 : बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 14 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान राज्यात बाल सप्ताह’ साजरा करणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी दिली.

            आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती शहा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वरळीतील कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. प्राथमिक स्तरावर मुंबईत हा सप्ताह राबविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला आयोगाचे सचिव उदय जाधवमुंबई शहरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलारमुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एच. नागरगोजेजिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाणयुनिसेफच्या कार्यक्रम अधिकारी सायली मोहिते आदी उपस्थित होते.

            बाल सप्ताहाविषयी माहिती देतांना श्रीमती शहा म्हणाल्या कीबाल दिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी बाल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. बालकांसाठी राईट टु प्ले’ (खेळण्याचा अधिकार) हा या सप्ताहाची संकल्पना (थीम) असणार आहे. हा सप्ताह युनिसेफच्या सहकार्याने आयोजित केला जाणार आहे. राज्यातील बालकांच्या विशेषत: बालगृह आणि सीसीएफच्या मुलांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या बालकांमध्ये खेळाबाबत प्रचंड इच्छाशक्ती असून त्यांना संधी देण्यासाठी संपूर्ण राज्यात बाल सप्ताह’ कार्यक्रम राबवून मुलांसाठी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे श्रीमती शहा यांनी सांगितले.

            बाल सप्ताहाच्या माध्यमातून मुलांना चांगली संधी मिळेल. राज्यातील मुलांसाठी एकत्र मिळून बालस्नेही महाराष्ट्र घडवू याअसे आवाहनही आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती शहा यांनी यावेळी केले.

००००

पवन राठोड/ससं/20.10.22

शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाद्वारे आदर्श पिढी

 शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाद्वारे आदर्श पिढी घडविण्याचे काम करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 20 :- शिक्षण हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून राज्याच्या शिक्षण विभागाचे काम पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने सुरू आहे. शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकांनी देखील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची आदर्श पिढी घडविण्याचे काम करावेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर निकषांची पूर्तता करणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते इरादा पत्रे तथा मान्यता पत्रे देण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थाचालकांकडून दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा व्यक्त केली. मंत्रालयातील परिषद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओलसमग्र शिक्षा अभियान संचालक कैलास पगारेस्वयंअर्थसहाय्यित शाळाचालक आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीराज्याने देशाला अनेक नामवंत विद्वानविचारवंतशास्त्रज्ञशिक्षक दिले आहेत. भविष्यातील पिढी घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यामुळे त्यांचे स्थान आदराचे असून या कामी शिक्षण संस्थांचेही महत्वपूर्ण योगदान असते. शिक्षण हा वसा मानून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने सर्वांनी काम करावेशासन म्हणून आम्ही ठामपणे पाठिशी आहोतअसेही त्यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीराज्यात शिक्षणाचा विस्तार झाला आहे. तथापि, गुणवत्तावाढ होणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्ता पोहोचली पाहिजे. यासाठी शिक्षण क्षेत्र हा व्यवसाय नाही तर मिशन आहे असे समजून संस्थाचालकांनी आणि शिक्षकांनी काम करावे. याद्वारे नवीन पिढी घडविण्याचे राष्ट्रीय कार्य करायचे असून त्यातून चांगली समाजनिर्मिती होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न करालही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढील वर्षी इरादापत्रे डिजिटली दिली जाणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील पद्धती पारदर्शी करण्याचा प्रयत्न होत आहेयाबद्दल त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि विभागाचे अभिनंदन केले.

            शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रास्ताविकात शिक्षण हे पवित्र क्षेत्र असल्याचा उल्लेख करून विभागाचे कार्य पारदर्शक आणि गतिमान करणार असल्याचे सांगितले. ज्या संस्था पात्र आहेत त्यांना मान्यता मिळणार आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यावर शासनाचा भर आहे. त्याचबरोबर उद्याची पिढी गुणवान घडवायची असल्याने संस्थांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावेअसे सांगून महाराष्ट्र विविध क्षेत्रात अग्रस्थानी आहे. शिक्षण क्षेत्रातही अग्रस्थानी राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूयाअसे आवाहन त्यांनी केले.

00000

राज्यात 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान ‘बाल सप्ताह’

 राज्यात 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान बाल सप्ताह’ साजरा करणार

                                             सुशीबेन शहा

राईट टू प्ले’ सप्ताहाची संकल्पना

 

            मुंबईदि. 20 : बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 14 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान राज्यात बाल सप्ताह’ साजरा करणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी दिली.

            आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती शहा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वरळीतील कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. प्राथमिक स्तरावर मुंबईत हा सप्ताह राबविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला आयोगाचे सचिव उदय जाधवमुंबई शहरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार<


पोलीस स्मृतिदिनानिमित्त






 पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहिदांना अभिवादन

 

            मुंबई, दि. 21 :कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या पोलिसांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

            नायगावच्या पोलीस मुख्यालयातील मैदानात झालेल्या हुतात्मा दिन मानवंदना व संचलन कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवगृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमयेपोलीस महासंचालक रजनीश सेठमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

            कर्तव्यावर असताना हौतात्म्य आलेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्मरण दरवर्षी 21 ऑक्‍टोबर रोजी करण्यात येते. मागीलवर्षी देशभरात विविध पोलीस दलांतील 62 अधिकारी व 202 कर्मचारी शहीद झाले आहेत. या पोलीस स्मृतिदिनाच्या निमित्ताने वीरमरण आलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतिंना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्मरण केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कार्यक्रमाला उपस्थित विविध देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस शहिदांच्या कुटुंबियांची  भेट घेतली.

००००

ग्रामीण उद्योजकांच्या वस्तुंना मोठी मागणी

 ग्रामीण उद्योजकांच्या वस्तुंना मोठी मागणी

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली प्रदर्शनाला भेट

 

            मुंबईदि. 20 : ग्रामीण भागातील उद्योजकांना प्रोत्साहन देणारे मंत्रालयाच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्यावतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला मंत्रालयातील अधिकारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे.

               स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्तानेमहाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग विभागाच्यावतीने दि. 18 ते 21 ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

            प्रदर्शनाला भेट देतांना ग्रामीण कारागिरांनी लाकडाच्या माध्यमातून तयार केलेल्या महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे सुताने तयार केलेला हार अर्पण करुन मंत्री श्री. सामंत यांनी अभिवादन केले. या प्रदर्शनात राज्यभरातून  सहभागी झालेल्या उद्योजकांशी त्यांनी संवाद साधला. मतिमंदअपंग मुलांनी तयार केलेल्या सुबक पणत्याशोभेच्या वस्तूकागदी फुले आणि महिला उद्योजकांनी तयार केलेले खाद्य पदार्थमसाल्याचे पदार्थमधसाबण आणि सुगंधीत उटण्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

            राज्यातील अमरावतीजळगावसांगलीसातारावर्धारायगडपालघर आदी जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उद्योजक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. महाबळेश्वर येथील मध व वर्धा येथील सेवाग्रामची खादी तसेच लाकडी वस्तूमसालेदेशी गाईचे तूपतांब्यावरील नक्षीकाम केलेली भांडीदिवाळीसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तूसाबण व इतर  गृहपयोगी वस्तु या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

***

अर्चना शंभरकर/ विसंअ/ उद्योग


 

ग्रामीण भागातील आरोग्य

 ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्याबळकटीकरणावर भर द्यावा

- सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

 

            मुंबईदि. 20 : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी शासन प्रयत्नशील असून आरोग्य व्यवस्थेचे विस्तारीकरण होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत व त्यावर कार्यवाही करावीअशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांनी केल्या. मंत्री श्री. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विविध बैठका झाल्या. त्यावेळी ते बोलत होते.

            बैठकीस आमदार संजय कुटेसार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेवैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकरसहसचिव दिलीप गावडेआरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडेसंचालक नितीन अंबाडेकरउपसंचालक डॉ. विजय कंदेवाडअवर सचिव दीपक केंद्रे आदी उपस्थित होते.

            संग्रामपूर ग्रामीण आरोग्य रुग्णालयातील पदभरतीयंत्रसामग्री याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा. या प्रस्तावाला शासनाकडून तत्काळ मान्यता मिळेल याची दक्षता घ्यावीअशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी दिल्या.

            बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला शासनाकडून तत्काळ मान्यता मिळेल यासाठी पाठपुरावा करावाअशा सूचना त्यांनी दिल्या.

            परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयास 50 एकर जागा देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. भारतीय वैद्यकीय परिषदेने निश्चित केलेल्या शिफारशीनुसार वैद्यकीय महाविद्यालयास जागा उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी प्रस्ताव सादर करताना आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

            धुळे जिल्ह्यातील साक्री येथील रुग्णालयाबाबतचा प्रस्ताव सादर करावाअशा सूचना त्यांनी दिल्या. आमदार मंजुळा गावित यांनी याबाबत बैठकीत माहिती दिली. साक्री तालुक्यातील जनतेसाठी आरोग्य व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

000000 


राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीला चालना देणार

 रायगड जिल्ह्यातील 20 हजार कोटींच्या कागद निर्मिती उद्योगास मान्यता


राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीला चालना देणार

उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय.

            मुंबई, दि. 20 :- कोविडमुळे मंदावलेला उद्योग क्षेत्राचा वेग वाढवण्यासाठी टाळेबंदीच्या काळात, राज्यातील ज्या उद्योगांना परताव्याचे दावे दाखल करता आले नाहीत, त्यांचे असे दावे मंजूर करण्याकरिता औद्योगीक प्रोत्साहन अनुदान कालावधी दोन वर्षांनी वाढविण्याचा निर्णय उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीत रायगड जिल्ह्यातील सिनारमन्स पल्प या कागद निर्मितीच्या वीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या उद्योगासह अन्य उद्योग प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली. राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीला मोठी चालना देण्यासाठी महत्वपूर्ण उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ उपसमितीची तिसरी बैठक मंत्रालयात झाली. बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, औद्योगीक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.


            मंत्रिमंडळ उपसमितीने राज्यातील घटकांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने यापूर्वी केलेल्या शिफारशींचा विचार करुन अशा विविध ११ प्रकरणात उद्योग घटकांना प्रोत्साहन अनुदान संदर्भातील तसेच अन्य मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करुन लाभ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळेही या उद्योग घटकांना सर्वसाधारणपणे 30 हजार कोटींचा लाभ मिळेल, असा अंदाज आहे.


            विविध उद्योग घटकांना प्रोत्साहन देतानाच, स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषतः नाणार रिफायनरीसह, मोठी गुंतवणूक, रोजगार संधी असणाऱ्या उद्योगांना विशेष निमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला.


कोविडकाळातील औद्योगीक प्रोत्साहन अनुदान कालावधीत दोन वर्षांची वाढ


            कोविड काळामध्ये देशपातळीवर दोन वेळा लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे उद्योग घटकांना सामोरे जावे लागलेल्या अडचणी व त्याचा उद्योग घटकांवर झालेला विपरीत परिणाम या बाबी लक्षात घेऊन, उद्योग घटकांना द्यावा लागणारा औद्योगिक प्रोत्साहन अनुदान कालावधी दोन वर्षांनी वाढवून देण्यास उप समितीने मान्यता दिली. त्यामुळे उद्योगांना मार्च २० ते डिसेंबर २२ असा दोन वर्षांसाठी औद्योगीक प्रोत्साहन अनुदानासाठी कालावधी वाढवून देण्यात आला आहे. राज्यातील अनेक उद्योग घटकांना कोविड कालावधीत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनुदान प्राप्त झाले नव्हते व उद्योगधंद्याच्या वाढीवर तसेच कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम झाला होता. या निर्णयामुळे त्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.


            सिनारमन्स पल्प ॲण्ड पेपर प्रा. लि. (एशिया पेपर ॲण्ड पल्प) हा आ‍‍शियातील सर्वात मोठा कागद निर्मिती क्षेत्रातील उद्योग आहे. हा उद्योग भारतात प्रथमच वीस हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. इंडोनेशियातील हा समुह भारतात पहिल्यांदाच असा प्रकल्प आणि तोही महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे या प्रकल्पासाठी यापुर्वीच तीनशे एकर जागा देण्यात आली असून, प्रकल्पाच्या मागणीनुसार अधिकची जागा देण्याचा शासनाचा मानस आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मान्यता देताना प्रकल्पस्थळ व आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढणारे उद्योग व त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी रोजगार निर्मिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळ उप समितीने या प्रकल्पाला मान्यता देऊन, राज्यात नव्हे तर देशात अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प मिळविण्यात पहिले स्थान मिळवले आहे.


            जेनक्रेस्ट बायो प्रोडक्ट्स प्रा. लि. हा उद्योग समुह या जळगाव जिल्ह्यातील खडका किन्ही (ता. भुसावळ) येथे केळीच्या टाकाऊ भागापासून विविध पदार्थांची निर्मिती करणारा उद्योग उभा करणार आहे. हा जगातील अशा प्रकारच्या उत्पादनाचा एकमेव पेटंट धारक उद्योग असून तो इको फ्रेंडली तंत्रज्ञानावर आधारीत जगातील हा पहिलाच प्रकल्प राबवित आहे. हा उद्योग सुरवातीच्या टप्प्यात 650 कोटी आणि नंतर पुढच्या टप्प्यात ही गुंतवणूक एक हजार कोटी पर्यंत करणार आहे. या उद्योग प्रकल्पासाठी औद्योगिक विकास अनुदान कालावधी 10 वर्षावरुन 30 वर्षे वाढविण्यास तसेच 120 टक्के दराने औद्योगिक प्रोत्साहन अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली.


            बैठकीत राज्यातील फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स लि. पुणे, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लि. नाशिक, जिंदाल पॉलिफिल्म लि. नाशिक व जेएसडब्ल्यु डोलवी, रायगड या उद्योगांची वार्षिक सरासरी अनुदान देय मर्यादा 12.5 टक्के प्रमाणेच करण्याचा उच्चाधिकार समितीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला .


०००००




 

Featured post

Lakshvedhi